कथाशंभरी - २ - फोन कॉल - रायगड

Submitted by रायगड on 8 September, 2022 - 02:33

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि परत एकदा त्याच्या अंगावर काटा आला.

सहा महिन्यापूर्वी सकाळी सुमनच्या फोननी आलेली जाग - " मी इथे कामानिमित्त बाहेर आणि सौरभ गेले २-३ दिवस फोन ऊचलत नाहीये, जरा घरी जाऊन बघ " ही विनवणी. त्याच्याकडील किल्लीने रघूने ऊघडलेले सौरभ-सुमनच्या घराचे दार. आतमध्ये अस्ताव्यस्त पडलेले सामान, झटापटीच्या खुणा...सुकलेल्या रक्ताचा, असह्य दुर्गंधीचा माग घेत सापडलेले प्रेत – सुमनचे!!! ….. त्यानंतर पोलिस, पोस्ट-मार्टेम…अहवाल: सुमनचा ३ दिवसापूर्वी चाकूच्या वाराने मुत्यू!!! ….बेपत्ता सौरभवर खुनाचा आरोप...

आजदेखील रघूला कळत नाहीये. सुमन तीन दिवस आधी मृत पावलेली...पण त्या सकाळी आलेल्या फोनवरचा आवाज तर नक्कीच सुमनचा होता!

Group content visibility: 
Use group defaults

ओह...

ओह.

कडक

सही!

मस्त आहे. पण आणखीन एक गूढ भयकथा, गणपती उत्सवात केवढ्या भयकथा! रायगड नाव वाचून काहीतरी खुसखुशीत हसवणारे असेल म्हणून उघडले तर डबल धक्का!