ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं … नाही नाही काहीतरी चुकतय. म्हणजे तिने जिंकलं हे बरोबर पण ती यायच्या आधीच तिने जिंकलं होतं. आधी नुसतेच तिच्याबद्दल कळले. काही न कळतावळता कनेक्षन जुळले आणि तिने जिंकले. मग ती आली आणि तिने पाहीले.. असा सिक्वेन्स आहे इथे.
ती म्हणजे माझी धाकटी, आमच्या घरचं शेंडेफळ आणि आमचं चार पायांचं फरी बाळ.
माझा इतकी वर्ष जुन्या दम्यासारखा चिकटलेला 'ॲनिमल फोबिया' एका पंजात दूर करायचं श्रेय तिलाच.
पुलंच्या "मी आणि माझा शत्रूपक्षातले" डायलॉग आठवून हसणाऱ्या मला, तस्सेच डायलॉग कंव्हिन्सिंगली म्हणायला लावायचं श्रेयही तिलाच. "आमच्या मनूला सगळं सगळं कळतं हो" या, पुर्वी विनोदी कॅटेगरीत मोडणाऱ्या वाक्याला 'facts' गटात ढकलायच पुण्यकर्मही तिच्यामुळेच.
डॅंबीसपण किती निखळ असतं आणि कॅटिट्यूड किती लोभस असतो हे तिच्या एंट्रीमुळे समजलं.
ती खूश की घर खुश होतं आणि ती आजारी पडली कि घरही ठप्प होतं, याचाही अनुभव आला.
तिने मला काय दिलं? कसं बसवू कमी शब्दात?
ती रेस्क्यु किटन आहे. आईपासून फार लवकर म्हणजे दहाबारा दिवसातच ताटातूट झालेलं बाळ ते. बरोबरच्या भावंडाचा अपघातात हात सुटलेल. सर्व्हायव्हलची धडपड करणारं. कोणातरी व्यक्तीने फिश मार्केटमधे आणून सोडलं होतं म्हणे दोघांनाही. असं सोडून देणारा मनुष्यप्राणी असूनही तिने आमच्यावर म्हणजे परत एकदा माणसावर विश्वास दाखवला. आमचा फॅमिली म्हणून स्वीकार केला.
रेस्क्यु करुन माझ्याकडे आली तेव्हा २१ दिवसाच हे बाळ डॉक्टरांच्या मते आईच दूध न मिळाल्याने जरा अंडरवेट होतं, फर नव्हती फार. पहिले दोन दिवस आधाशासारखं खाल्लं मग अन्न असतच हवं तेव्हा याची खात्री पटल्यावर भूक भागली कि थांबायच बरोबर जमवलं तिचं तिने.
तिने, मला परिस्थितीचा स्विकार शिकवला. तिने, कालचं ओझं टाकून आजची सुंदर मेमरी नव्याने तयार करायला शिकवली. तिने 'विश्वास टाकण्यातलं' महत्व शिकवलं. 'सोबतीला मी आहे' हे शब्दाशिवाय सांगता येतं हे कृतीतून दाखवून दिलं.
तिच्याबद्दल बरच काही लिहू शकते. तिच्यामुळेही बरच काही लिहू शकते पण मी तिच्याबद्दल फार कमी वेळा कमी ठिकाणी भरभरून लिहीते. अशावेळी मी अंधश्रध्दाळू आई होते. मला माझीच दृष्ट लागायची भीती वाटते. तरी आज मी मनोमन तीट लावत बाप्पाचा मंडप आहे. बाप्पा घेतो काळजी असं स्वतःला खडसावत उतरवून काढलं काहीबाही सुचलं तसं.
'Everyone comes into your life for a reason' यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझे तिचे नाते माझ्यासाठी खास आहे याच कारण सांगू? I am in love with my furry child who was not born from me, but born for me.
असो आता फार इमोशनल काला करुन झाला आता एक वेगळा फायदा नोंदवून ठेवते. पॅंप्लेट्स मधे जसं other benefits उल्लेखले असतात तसे काहीसे
टिनएजर्स मुलं तुम्हाला परत 'जास्त' भाव द्यायला लागतात. तुम्ही फक्त एक करायचं, तुमचे तुमच्या चार पायाच्या लेकरासोबतचेच फोटो इथे तिथे डिपीला लावायचे. काही दिवसांत तुमच्या दोन पायाच्या बाळाने हट्टाने तुमच्या बरोबर फोटो काढून ते शेअरही करायच अप्रूव्हल आपणहून दिलंच म्हणून समजा
कविन किती गोड लिहिलयस.
कविन किती गोड लिहिलयस.
कसलं गोड लिहिलस कविन
कसलं गोड लिहिलस कविन
I am in love with my furry
I am in love with my furry child who was not born from me, but born for me. >> पेट असणार्या प्रत्येकाचे हे च विचार असतील - आवडला लेख.
मस्त
मस्त
छान.
छान.
हे आधी वाचलंय का?
का गेल्यावर्षी शशकं मध्ये तू असं काही लिहिलेलंस. लक्षात नाही.
हे आधी वाचलंय का?
हे आधी वाचलंय का?
का गेल्यावर्षी शशकं मध्ये तू असं काही>> नाही. पण फेसबुकवर इतक्यातच तिच्या आजारपणानंतर एक लेख पोस्ट केला होता त्यात हाच फोटो आणि हा पुढचा कोट लिहीला होता -" I am in love with my furry child who was not born from me, but born for me."
धन्यवाद मंडळी
खूप छान लिहिलंय कविन...
खूप छान लिहिलंय कविन...
हाही लेख छान कविन!
हाही लेख छान कविन!
हा माझा छबुराव उर्फ पोपट
हा माझा छबुराव उर्फ पोपट
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
ती खूश की घर खुश होतं आणि ती आजारी पडली कि घरही ठप्प होतं >>>> याला बहुतेक सगळे पेट पेरेन्ट्स डिट्टो म्हणतील!
छबुराव एकदम देखणे आहेत
छबुराव एकदम देखणे आहेत
गोड फोटो आहेत.
गोड फोटो आहेत.
कवेssssssss किती गोड! मला
कवेssssssss किती गोड! मला माझ्या चिंग्याची आठवण झाली. तो पण असाच ९-१०दिवसांचा केविलवाणा पावसात भिजत ओरडत होता, त्याला घरी आणलं तेव्हा हाताच्या पंजाएवढा होता. खुप छान आठवणी आहेत त्या. आणि तू म्हणतेस ते बरोबर मुलांना जेलस व्हायला होईल एवढं प्रेम करतात हे प्राणी. तो हाताला विळखा घातलेला फोटो कसला आहे. छान लिहीलयस हेवेसान.
मनुप्रियाचा छबुरावपण देखणा आहे.
मस्त लिहिलंय कविन!
मस्त लिहिलंय कविन!
छबु/पोपटराव गोड आहेत.
आई गं..किती गोड!!
आई गं..किती गोड!!
ऑऊ कसलं गोंडस आहे फरी बाळ!
ऑऊ कसलं गोंडस आहे फरी बाळ! मस्त लिहिलेयस.
हे ही छान लिहिलेय.
हे ही छान लिहिलेय.
मी खरे तर पाळीव प्राणी प्रेमी नाहीये. त्यामुळे मला नेहमीच कौतुक कम आश्चर्य वाटते की कसे होते हे बाँडींग
लेख आवडलाच पण तो फोटो किती
लेख आवडलाच पण तो फोटो किती गोड आहे.
खूप छान लिहीलंय. आवडला लेख.
खूप छान लिहीलंय. आवडला लेख. फोटो सुंदर.
छबुराव पण भारी क्यूट!
Awww कसलं क्यूट बाळ आहे. हे
Awww कसलं क्यूट बाळ आहे. हे पण फार मस्त लिहिले आहेस कविन.
मलाही लिहावे वाटू लागले आहे.
मलाही लिहावे वाटू लागले आहे. आमच्या काळूबाईची कौतुकं उचंबळून यायलीत
किती क्यूट लेख आहे हा.
कवे, किती क्यूट लिहीलंयस.
मला मांजर आवडत नाही.पण हे
मला मांजर आवडत नाही.पण हे लिखाण जाम च क्युट आहे आणि तो निरागस फोटो पण!
मस्त.
मस्त.
हे फारच cute लिहिले आहे.मस्तच
हे फारच cute लिहिले आहे.मस्तच.
मजेदार.
मजेदार.
कविता, किती गोड लिहिलं आहेस..
कविता, किती गोड लिहिलं आहेस.. खूप आवडलं
हा ही लेख आवडला!
हा ही लेख आवडला!