Submitted by मोहिनी१२३ on 7 September, 2022 - 08:26
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि त्याला गावातील प्रसिध्द ज्योतिषाने सांगितलेले बोलणे सवयीने आठवले.
“जर तुला तुझ्या नामसद्रृश एक पक्षी त्या घरात दिसला आणि तू त्या पक्ष्याला संस्कृतमध्ये जो शब्द आहे त्याने हाक मारली आणि त्याने ठमीला आवडणारा आवाज काढला; तर तुझ्यावर तुझे नामसद्रुश असणारा देव प्रसन्न होईल. आणि तुला तुझ्या आडनावात असणारी गोष्ट मुबलक मिळेल.”
पाय उंचावून, नजर ताणून देखील भिंतीपलीकडच्या त्या घरात काहीच न दिसल्याने रघू मिठ्याचा परत एकदा ‘त्या पक्षाचे सामान्यनाम’ झाला होता.
देव प्रसन्न झाल्यावर माठ/मीठ/मिठी यातील काय, कोणाची आणि किती मिळणार या विचारात तो सवयीने बुडून गेला.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे " ‘त्या पक्षाचे
इथे " ‘त्या पक्षाचे सामान्यनाम’ " थोडी जास्तच सर्कस झाली आहे पण मजा आली वेगळा प्रयत्न म्हणून.
मस्त प्रयोग आहे!
मस्त प्रयोग आहे!
मस्त
मस्त
मजा आली एकेक नाव आठवताना.
मजा आली एकेक नाव आठवताना. आडनाव नाही समजलं मला. विचार करतोय.
मस्त आहे ही
मस्त आहे ही
>>> रघू मिठ्याचा
>>> रघू मिठ्याचा
लिहिलंय की आडनाव.
ओह्ह!
ओह्ह!
धन्यवाद सर्वांना. ‘ रघू’
धन्यवाद सर्वांना. ‘ रघू’ नावाचा उपयोग/वापर होईल अशी शशक लिहायचा प्रयत्न होता.