Submitted by संयोजक on 6 September, 2022 - 23:45
शब्दखेळ - एकोळी कथा
काल करमरकर काकूंनी काकांच्या कोर्टाच्या कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले.
हे वाक्य बऱ्याचजणांनी लहानपणी ऐकलेलं/ म्हणलेलं आहे. त्यात भर सुद्धा घातली आहे. आज असेच वेगवेगळी अक्षरे घेऊन जितकं लांब करता येईल तेवढं वाक्य करा.
आज आमच्या आईने आणि आरवने आडापलीकडून आवळे आणले.
नियम:
१. ही स्पर्धा नाही, खेळ आहे.
२. एकाने एक अक्षर घेऊन वाक्य लिहिलं की पुढील प्रतिसादकाने कोणतंही वेगळं अक्षर घेऊन वाक्य लिहावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पतिव्रतेचे पावित्र्य पातकी
पतिव्रतेचे पावित्र्य पातकी पुरुषालाही परमेश्वराच्या पदवीला पोहोचवते.
ढापण्या ढब्ब्याच्या ढेरीवरुन
ढापण्या ढब्ब्याच्या ढेरीवरुन ढब्बा ढेकुण ढासळला.
पौषातल्या प्रभातीचे पहिले
पौषातल्या प्रभातीचे पहिले प्रकाशकिरण प्रासादाच्या पूर्वेकडील पायर्यांवरील पायघड्यांवर पहुडले.
कावळे काव काव करताना करकोचा
कावळे काव काव करताना करकोचा का कातवला?
ओळखीच्या ओंकारने ओंकार आकारात
ओळखीच्या ओंकारने ओंकार आकारात आळवला.
हसर्या हंसाबेननी होतकरू
हसर्या हंसाबेननी होतकरू हेमलचा हिरवा हातरुमाल हौसेने हरवला.
चांदणीच्या चाचीने चमकदार
चांदणीच्या चाचीने चमकदार चांदिच्या चमच्याने चटकदार चटणी चाटवली.
खडकीच्या खंडेरायाने
खडकीच्या खंडेरायाने खुल्दाबादच्या खिल्जीला खंडाळ्याच्या खिंडीत खिळवून खमंग, खरपूस खापरोळ्या खिजवत खिजवत खाल्ल्या.
काकूंनी काल केळ्याचे काप
काकूंनी काल केळ्याचे काप करपवले , काकांना कळल्यावर कसले किंचाळले! काका कोणत्याही कारणावरून किंचाळतात .
फराहने फरदीनला फसवून फरहानचा
फराहने फरदीनला फसवून फरहानचा फेटा फाडला
डाह्याभाईच्या डालड्याच्या
डाह्याभाईच्या डालड्याच्या डब्यात डाळिंबाची डहाळी डवरली.
जाई जपून जहाजातून जपानला जा
जाई जपून जहाजातून जपानला जा , जाता जाता जमल्यास जलपरिनां जहाजात जेवण्यास जमव .
(हे काहींच्या काही होतय, पण आता सुचलेच तर लिहिले :-))
पडवीसमोरच्या पारिजातकाच्या
पडवीसमोरच्या पारिजातकाच्या पारावर पहाटे पडलेली पांढरीशुभ्र पुष्पं पल्लवीने पळतपळत पोलादपूरच्या पंकजकडे पूजेसाठी पोचवली.
जाधवरावांच्या जोंधळ्यावर जावई
जाधवरावांच्या जोंधळ्यावर जावई जयवंतराव जसे जोगले जोत्या जवळील जोडेही जाजमासह जोडले.
गोबर्या गालाची गितांजली
गोबर्या गालाची गितांजली गोडबोले गोड गाणे गात गात, गेटवर गुरकावणार्या गणू गुराख्याला गांगरवून गरीब गोर्या गुणी गायीच्या गोठ्यात गोवर्यांसाठी गेली.
टारगट टीनाने टेंब्यांच्या
टारगट टीनाने टेंब्यांच्या टारझनचे टवटवीत टरबूज टकमककड्याच्या टोकावरून टुणकन टोलवले.
जबरदस्त जयेशने जंगली
जबरदस्त जयेशने जंगली जनावरांना जादूने जाजमावर जमवले
प्रधानाचार्या पद्मा पाटलांनी
प्रधानाचार्या पद्मा पाटलांनी पोंक्ष्यांच्या परीक्षितचे पाचवीचे प्रगतीपुस्तक परवा पहाटेच पाठशाळेच्या परसात पुरले.
थेट पुरले? चेटूक वगैरे
थेट पुरले?
चेटूक वगैरे करायचं होतं की काय त्यांना?
शितळ शिमग्यात शेवग्याच्या
शितळ शिमग्यात शेवग्याच्या शेंगा शेकोटीवर शेकता शेकता शेवटी शरद शहाणे शकटातून शिंदेंच्या शिवारातील शेतावर शिंकला.
वनिता व वरद वनात वावरताना
वनिता व वरद वनात वावरताना वजनी वाघ वाट वलांडून विहीरीकडे वळला
अरे! काहीच्याकाही चालु आहे
अरे! काहीच्याकाही चालु आहे
पुरले? Rofl चेटूक वगैरे करायचं होतं की काय त्यांना?>>> हो ना
शेतावर शिंकला
शेतावर शिंकला
वीट, वहाण, वखारीचा व्यवसाय
वीट, वहाण, वखारीचा व्यवसाय वाढवताना व्यंकटेश वडिलांप्रमाणेच व्यवस्थितपणे वागला.
पद्मा पाटील नाव उगाच नाही
पद्मा पाटील नाव उगाच नाही घेतलं
पवारांचा परश्या पारावरच्या
पवारांचा परश्या पारावरच्या पोपटसह पाणवठ्यावर पोचला पण पल्याडच्या पावण्यांनी पाणकोंबडे पाटीतून पळवले.
फणसवाडीची फुलवा फणींद्रनाथ
फणसवाडीची फुलवा फणींद्रनाथ फडकुले फुरसुंगीच्या फाजील फास्टर फेणेने फुरसतीत फुसक्या फुलबाज्यांनी फसवल्याने फिस्कारली
मधू मलुष्ट्याने म्हशीचा मामला
मधू मलुष्ट्याने म्हशीचा मामला मोठा मालमसाला मारून मित्रांमध्ये मिरवला.
मराठवाड्यातील मुधोळच्या
मराठवाड्यातील मुधोळच्या मधुवंती ने मधुमालतीचा मांडव मातीसह मखरीतून महाराष्ट्रभर मिरवला
मामाच्या मुलीला मैत्रिणीचे
मामाच्या मुलीला मैत्रिणीचे मस्तीखोर मांजर मारुतीच्या मंदीरामागील मंडईत मासोळीवरच्या माशा मारतांना मिळाले.
Pages