Submitted by नानबा on 4 September, 2022 - 07:01
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .....
तिसरी आज इतक्यात?
तशा त्या रोजच भेटतात. मोकळा वेळ वगैरे शब्दांचे बुडबुडे! अंधार पडला की अनादि कालापासून रंगणारा खेळ सुरू!
अरे, चौथी पण आली, पाचवी, सहावी...
कुणी आपल्याकडे पहात असेल, ह्याची त्यांना कल्पनाही नव्हती!
पण अंगणात बाजेवर पडून ह्या अद्भूताकडे अनिमिषपणे बघणारे बालकवी भारावून म्हणाले,
"प्रथम तारके! पहा सखी तव एक पुढे आली,
ही दुसरी, ही तिसरी - आता कितीतरी भवताली!
आली होती भरती, आता अस्त समुद्राला,
त्या लाटांतून काय सांडल्या ह्या मौक्तीकमाला!"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त!
वा, छान
वा, छान
छान
छान
छान!
छान!
मस्त जमलीय!!
मस्त जमलीय!!
थीमला अडसर ठरणाऱ्या शब्दांना "शब्दांचे बुडबुडे" वगैरे म्हणण्याची आयडिया भारी आहे
शीर्षकावरून अंदाज आला.
शीर्षकावरून अंदाज आला.
थीमला अडसर ठरणाऱ्या शब्दांना
थीमला अडसर ठरणाऱ्या शब्दांना "शब्दांचे बुडबुडे" वगैरे म्हणण्याची आयडिया भारी आहे >> हे हे..
शीर्षकावरून अंदाज आला. >> काही सजेशन्स?
छान. एकदम poetic. हटके.
छान. एकदम poetic. हटके.
हटके आहे!!! पण फक्त ४५ शब्द
हटके आहे!!! पण फक्त ४५ शब्द स्वतः लिहीले, बाकी बालकवी- स्मार्ट अप्रोच!!
शाळेत एका मुलाला निबंध
शाळेत एका मुलाला निबंध लिहायला सांगितला. त्याने एका पुस्तकातून जशाचा तसा उतरवून काढला. मास्तर म्हणाले हे काय?
त्याने उत्तर दिले मला जे काय म्हणायचे होते ते यांनी अगदी उत्कृष्ठ शब्दात मांदले आहे, मी आणखी काय लिहिणार?
Chhan!
Chhan!
पण फक्त ४५ शब्द स्वतः लिहीले,
पण फक्त ४५ शब्द स्वतः लिहीले, बाकी बालकवी- स्मार्ट अप्रोच!! >> lol..
नाही नाही, संध्यारजनीच्या 4 ओळी बसवण्याकरता (कारण तो कथेचा बेस होता) म्हटल्यावर बरेच शब्द कमी करावे लागले.. 5-6 ड्राफ्ट फक्त शब्द कमी करण्याकरता झाले..
एकदा एकाची मोटार सायकल बिघडली
एकदा एकाची मोटार सायकल बिघडली. तर तो मेकॅॅनिक कडे घेऊन गेला. मेकॅॅनिकने हलकेच एक स्क्रू पिळला. मोटार सायकल सुरु झाली.
"किती पैसे द्यायचे?"
"द्या पन्नास रुपये." मेकॅॅनिक बोलला.
"पन्नास रुपये? एक साधा स्क्रू तर पिळलात. त्याचे पन्नास रुपये? कमाल आहे!"
"हो. नाही म्हणजे स्क्रू पिळायचे पन्नास पैसे. बाकीचे एकूणपन्नास रुपये पन्नास पैसे कुठला स्क्रू पिळायचा त्याचे."
एकदा एकाची मोटार सायकल बिघडली
एकदा एकाची मोटार सायकल बिघडली. तर तो मेकॅॅनिक कडे घेऊन गेला. मेकॅॅनिकने हलकेच एक स्क्रू पिळला. मोटार सायकल सुरु झाली.
"किती पैसे द्यायचे?"
"द्या पन्नास रुपये." मेकॅॅनिक बोलला.
"पन्नास रुपये? एक साधा स्क्रू तर पिळलात. त्याचे पन्नास रुपये? कमाल आहे!"
"हो. नाही म्हणजे स्क्रू पिळायचे पन्नास पैसे. बाकीचे एकूणपन्नास रुपये पन्नास पैसे कुठला स्क्रू पिळायचा त्याचे."
>>> Wow! U made my day!
मस्त कथा.
मस्त कथा.
छानच कल्पना!
छानच कल्पना!
कल्पना भारीच... एकदम वेगळी
कल्पना भारीच... एकदम वेगळी कथा!
कथापंचेचाळिशी
कथापंचेचाळिशी
काव्यात्मक शशक! कल्पना आवड्ली
काव्यात्मक शशक! कल्पना आवड्ली ! कथाही छान जमलेय!
तरल !
तरल !
सुंदर..
सुंदर..
कल्पना आवडली. मुख्य म्हणजे
कल्पना आवडली. मुख्य म्हणजे काहितरी अत्यंत क्रिप्टीक, प्रचंड थरार, अंगावर येणारा ट्विस्ट, काळजाला चटके असं नसलेली शशक (किंवा पंशक ;)) पाहून छान वाटलं..
मस्तच.
मस्तच.