चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किंग्समन ३ पाहीला. पहील्या किंग्सननचा प्रिक्वल होता.
पहिल्या दोन पेक्षा हा जबरजस्त आहे. ऐतीहासीक घटना जश्याच्या तशा घेतल्या आहेत. ऊदा. रासपुतीन मर्डर.
पहिल्या महायुध्दातील एक वाॅर सीन तर जबरजस्त. ईंचरवललाच एक अनपेक्षीत धक्का बसतो. एकंदरीत सुपर्ब. मस्ट वाच. (जर पहीले दोन पाहीले नसतील तरी चालेल) किंग्समन ह्या सिक्रेट सर्वीस एजंसीची स्थापना दाखवलीय ह्यात.

लालू चड्ड्याचा सिनेमा पाहीला नाही गंप पाहीला. अमेराकेचा ईतिहास माहीत नसल्याने खास वाटला नाही.
लालू चड्डयाच्या ट्रेलर ची पहीलीच लाईन “होंदा हे” वगैरे पाहून हा चित्रपट चालनार नाही ह्याचा अंदाज होता. ट्रेलर मध्येच सगळेच डायलाग पंजाबी असतील तर सिनेमात काय असावं? देव जाणे. प्रत्येक कॅरेक्टर पंजाबीच का? हा प्रश्न मंजूळेंनीही विचारला होता.

राजकुमार रावचा हिट चित्रपट पाहिला.

त्या दिवशी एका चित्रपटांच्या फेसबूक ग्रूपवर या चित्रपटाबद्दल फार काही चांगले वाचले नव्हते. लेखातही चांगले लिहीले नव्हते आणि प्रतिसादातही चांगले लिहिले नव्हते. ओवरऑल गंडलेला पिक्चर असावा असे मत तयार झालेले.. पण आमच्याकडे तर सर्वांना आवडला Happy

कदाचित एखादा डिटेक्टीव्ह सस्पेन्स पिक्चर असला की हुमायुन नेचरनुसार त्यातील चुका काढण्यात मजा येत असावी. पण अश्या कॉमेंट वाचून एका चांगल्या अनुभवाला मुकू नका ईतकेच म्हणेन.

जॉर्डन पिलचा तिसरा सिनेमा नोप पाहिला.

आधीचे दोन-

१. गेट आउट- प्रचंड आवडला. थ्रिलर ! खुर्चीवर गोठवून टाकेल असा सिनेमा !

२. अस (Us)- गेट आउट मुळे खूप जास्त अपेक्षा होत्या, पूर्ण नाही झाल्या. पण, सिनेमा वेगळा होता, मेंदूला खाद्य पुरवणारा होता, त्यामुळे जॉर्डन पिल पुढे काय करतो ह्याबद्दल उत्सुकता टिकून राहिली.

नोप-

कॅलिफोर्निया जवळच्या वाळवंटात हेवुड हॉलिवूड होर्सेस नावाची रँच असते. इथे अनेक पिढ्यांपासून हेवूड कुटुंब सिनेमासाठी घोड्यांना हाताळण्याचे, घोडे पुरवण्याचे काम करत असते. आणि, मानवी इतिहासात पहिली चित्रफीत तयार झाली ती होती 'ब्लॅक मॅन ऑन अ हॉर्स' (हे खरेच आहे). तो ब्लॅक मॅन ह्या हेवूड कुटुंबाचा पूर्वज असतो. तेव्हापासूनच हे कुटुंब सिनेमा-घोडा व्यवसायात असतात.

एके दिवशी अचानक आकाशातून काही गोष्टी खाली पडतात. त्यात एक नाणे ओटीस सिनियर हेवूड, म्हणजे कुटुंबप्रमुखाच्या डोज्यावर वेगाने आदळते आणि ते मरतात. सरकारी यंत्रणांकडून विमानातून ह्या गोष्टी पडल्या असल्याचे कारण दिले जाते, जे खरेतर ओटीस ज्युनिअर उर्फ ओजे ला पटत नाही.

आता पूर्ण व्यवसाय पाहणे ओजे आणि त्याची लहान बहीण एमराल्ड 'एम' वर आले असते. पण सीजीआय जमान्यात धंदा बसत चालला असतो, एकेक ठरत घोडे विकायची वेळ आली असते.

सोबतच, फार्मवर विचित्र गोष्टी घडत असतात. काही घोडे नाहीसे झाले असतात, आणि ओजेला एक दिवस एक प्रचंड उडती तबकडी दिसते. तो आणि त्याची बहीण एलियन शिपचे शूटिंग करून श्रीमंत होण्याचा प्लॅन करतात. त्यावर पुढे सिनेमा आहे.

सिनेमॅटोग्राफी आणि संगीत खूपच आवडले. चित्रीकरण खूप सुंदर आहे.
कथा रोचक आहे, पण काही गोष्टी एकत्र येत नाहीत असे वाटले. सिनेमा आवडला.

हिट मला पण आवडला. काही त्रुटी आहेत, पण दुर्लक्ष करण्यासारख्या आहेत.

कठपुतली वाईट आहे. नामू (परिट) च्या भाषेत सांगायचं तर ‘एकदम फॉग आहे.’ Happy

बॉलिवुड ला बोंबलायला कॉपी पण धड मारता येत नाही .
ज्यांनी अगोदर साऊथ चा रक्तसन पाहिला आहे , त्यांना बॉलीवुड च्या रिमेकमधील मर्यादा कळतील.
८ कोटी मध्ये बनवलेला रक्तासन थेटर मध्ये ६४ कोटी कमवतो , आणि ८० कोटीत बनवलेला ओ टी टी ला रिलीज केला जातो .
अक्षय चे ते कुंग फु स्टाईल चालणे आता वैताग आणते . तपास करताना चेहऱ्यावर गंभीर भाव ची उणीव जाणवते , असे वाटते सिरियस डायलॉग मारता मारता आता खुदकन हसतो की काय !
त्यामुळे कठपुटली पूर्णपणे फसल्या सारखा वाटतो .

कठपुतली वाईट आहे. नामू (परिट) च्या भाषेत सांगायचं तर ‘एकदम फॉग आहे.’ >> अक्षय कुमारवर बॅन घालायला हवा Wink जवळजवळ तसाच असलेला फॉरेंसिक त्या मानाने बराच बरा आहे.

हायला, मला तर बरा वाटला कटपुतली.. डिरेक्शन चांगलं आहे.. उगाच कोणता रोमॅंटिक ॲंगलही दिला नव्हता..अक्षय कुमारही बऱयापैकी तरूण दिसतोय.. पूर्ण पिच्चर त्याला सहन करू शकले

मेजर संदीप उन्नीकृष्णन पाहिला.
पहिल्या हाफला वाटले थेट टेरेरीस्ट अटेक दाखवायचे सोडून हे काय लवलाईफ वगैरे दाखवत बसलेत. पण नंतर वाटले ते ही ठिकच आहे. शहीद जवानांच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यातही रस असायला हवा. आणि ते ही दाखवले गेले पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबाने काय गमावलेय वा देशाला काय अर्पण केलेय हे कसे पोहोचणार. त्यामुळे चित्रपटाची मांडणी साधारण विक्रम बत्रा यांच्यावरच्या शेरशहासारखी झालीय.

असो, सुरुवातीचा भागही मला तसा आवडला. पण तरी कोणाला तो आवडला नाही तरी पुढे नेटाने बघा. एकदा ताजचा थरार सुरू झाल्यावर चित्रपट पकड घेतो, खिळवून ठेवतो. अर्थात तो मुंबई टेरेरीस्ट अटेक होताच तसा. कितीही चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये बघा. एकदा बघायला घेतले की सगळे अगदी कालपरवा घडल्यासारखे झरझर डोळ्यासमोर येते. आणि चित्रपट संपूनही आपण काय कमावले यापेक्षाही गमावले याचाच विचार मन करत बसते. ज्यांना असे रिलेट करता येत असेल त्यांनी जरूर बघा..

हायला, मला तर बरा वाटला कटपुतली.. डिरेक्शन चांगलं आहे.. उगाच कोणता रोमॅंटिक ॲंगलही दिला नव्हता..अक्षय कुमारही बऱयापैकी तरूण दिसतोय.. पूर्ण पिच्चर त्याला सहन करू शकले>>>>>>>
कठपूतली चा ओरिजिनल मैं हु दंडाधिकारी किंवा रक्तासान यू ट्यूब ला आहे , तो एकदा बघा ! मग अक्षय च्या ॲक्टिंग चा विट येईल .
आणि बॉलीवुड चे एडिटिंग देखील किती बकवास असते ते कळेल. अक्षयच्या मुव्हित विनाकारण दृश्ये भरपूर टाकली आहेत , तसे रक्तसन ट्रॅक बिलकुल सोडत नाही . मोठ्ठे मोठ्ठे खेळाडू फेल गेले असताना एकदा आय पी एल गाजवली होती राहुल टेवटिया ने .
अगदी तशी तुलना रक्तासन आणि कठपुतली मध्ये होऊ शकते.....

चुप चा प्रोमो वेगळा वाटला. ही कल्पनाच भारी आहे.
दुर्दैवाने एकाने या पिक्चरबद्दल सांगताना स्पॉयलर्सचे भानच ठेवले नाही. बघणार आहेच, पण आता तितकी मजा येईल का ?
ज्याने सांगितलेय त्याचे म्हणणे खोटे ठरावे इतकीच अपेक्षा...

सर
सगळे म्हणताहेत की ब्रह्मास्त्र मध्ये शाखा आहे.

म्हाळसा कदाचित अशा सिनेमांची तुलना हॉलीवूडमधल्या तशा टाईपच्या सिनेमांशी होत असेल म्हणून असू शकेल. मी त्या आधी देल्ही क्राईम २ पाहिली होती त्याचाही परीणाम होता. त्या समोर कठपुतली 'कि झाड कि पत्ती' वाटते.

आज बघितला.. चांगला आहे पण मला आधीचे थॅारचे पिच्चर जास्त आवडायचे.. तरीही हा देखील तसा एंटरटेनिंगच आहे.. ज्यांचा राहिला असेल त्यांनी बघा.. परवाच डिस्नीवर आलाय

'कौन प्रवीण तांबे?' बघितला. मस्त आहे.. आवडला. श्रेयस तळपदे आवडतोच..फक्त सुरुवातीच्या काळात तो जरा अजून 'लहान' दिसायला हवा होता. बाकी पण सगळ्यांची कामं छानच. अरुण नलावडे आणि आशिष विद्यार्थी बऱ्याच दिवसांनी दिसले. 'कहानी'मधला 'सात्योकी' पण कहानीनंतर पहिल्यांदा दिसला. त्यानेही मस्त केलंय काम.

ब्रम्हास्त्र भयानक भिकार आहे असा रिव्ह्यू वाचला >>>>
ब्रह्मस्त्र एक नंबर चा बंडल मुव्ही आहे
4-5 एवढं काम करून अस्त्रवर्स च्या नावाखाली लव स्टोरी विकत आहेत
टिकटॉक लेव्हल चे डायलॉग आहे
फुकट डाऊनलोड करून पण डेटा वाया घालवू नका
Happy

ब्रह्मास्त्रची ओपनिंग बंपर आहे मी सुद्धा ऐकलेय. आणि आज आमच्या शेजारच्या मल्टीप्लेक्सला तुडुंब गर्दी खेचत होता. सुरुवातीला तरी लोकांनी पाठ फिरवली नाहीये. अर्थात याचा अर्थ असा नाही की पिक्चर चांगला असावा. तो बंडलही असू शकतो. वा दर्जेदार नसला तरी मनोरंजक असू शकतो. तरी पहिल्या विकेंडचे आकडे फसवे असू शकतात. पुढच्या विकेंडला खरे काय ते समजेल.

सध्या मला त्याची गाणी कानावर पडून हळूहळू आवडायला लागली आहेत. आधी नव्हती आवडत

Brahmastra ओके चित्रपट आहे. फार भारी नाही फार बंडल नाही, आपल्याला आता उच्च इंग्रजी चित्रपट बघायची सवय आहे.

त्या मानाने बंडल आहे पण प्रयत्न ठीक ठाक

कोर्ट मार्शल पाहिला. त्याच्याबद्दल इथे का अजुन कुठे वाचले ते आठवत नाही पण कुठेतरी रिव्यु वाचुन युत्युबवर पाहिला. सुन्न व्हायला झाले. केवळ जातीमुळे, ज्याची निवड कोणाच्याही हातात नाही, माणसाच्या आत्मसन्मानाला वारंवार डिवचले जातेय अशा वातावरणात माणसे राहतात आणि असे वातावरण कित्येक शतके अस्तित्वात आहे.. ही जाणिव घुसमटवुन टाकणारी आहे.

.

Pages