Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07
Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धागा वाचून कळतंय की एल आय सी
धागा वाचून कळतंय की एल आय सी वाले नातेवाईक हँडल करणं खरंच कठीण असतं
च्रप्स , काय वाट्टेल ते करा
च्रप्स , काय वाट्टेल ते करा पण या धाग्यावर ज्यांनी भाग घेतलेला नाही त्यांचा विनाकारण उल्लेख करायची गरज आहे का ?
तुम्ही अॅडमिन टीम मधे असाल कदाचित म्हणून वाटेल तसे का ?
च्रप्स यांच्या कटप्पा या आयडीच्या लिखाणात शोधलं इतकाच उल्लेख झाला तर आयडी आणि प्रतिसाद डिलीट होतो... ही फॅसिलिटी सर्वांना नको का ?
मी जिथे काम करते तिथे अगदी
मी जिथे काम करते तिथे अगदी घरटी पर्लस्, पॅनकार्ड क्लब, मैत्री क्लब, समृद्ध जीवन अशा काही चीट फंड मध्ये लोकांनी पैसे घालवले आहेत, पोटाला चिमटे घेऊन रूपया रूपया वाचवून अशा ठिकाणी गुंतवणूक करतात पण हातात काहीच मिळत नाही.
आमच्या भागात रस्त्याची कामे सुरू आहेत, प्रचंड पैसे मिळत आहेत. रात्री पर्यंत पतसंस्था / चीट फंड/ पेढी ची माणसे घरी जाऊन, थांबून, छोटेमोठे गिफ्ट देऊन, मुलाला नोकरी ची आशा अशा अनेक विविध आमिषे दाखवून दहा -बारा- पंधरा लाखाचे चेक घेऊन जातात.
वारसदार नोंद नसते, असल्यास वारसदाराला माहित पण नसते ठेवी बद्दल.
अर्थ साक्षरता यामध्ये पहिला टप्पा योग्य संस्था निवडणे, मग ती ठेव असो वा आरडी. बॅंक असो, पोस्ट असो नाही तर LIC . हा नको का?
ज्यांना अर्थ साक्षरतेतले चांगले कळते, त्यांनी नक्कीच या बद्दल जनजागृती करावी, पण ती एकांगी होणार नाही याची काळजी घ्यावी. विरोधाला विरोध होऊ नये.
मी कोणत्याही अर्थ साक्षरतेचे धडे देताना खोडे घातले नाहीत आणि घालणार नाही.
च्रप्स , काय वाट्टेल ते करा
च्रप्स , काय वाट्टेल ते करा पण या धाग्यावर ज्यांनी भाग घेतलेला नाही त्यांचा विनाकारण उल्लेख करायची गरज आहे का ?
>>>????
तुम्हाला ऑफ़ेन्ड व्हायला काहीही कारण लागते का? माझा तुमच्याशी कसलाही वाद नाही... तुम्ही उगाच मला पिन मारताय गेले कित्येक दिवस बघतोय... प्लिज...
च्रप्स, मी तुम्हाला उद्देशून
च्रप्स, मी तुम्हाला उद्देशून कुठेही कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. ही तिसरी वेळ आहे. तुम्ही एकतर मला कोट केले आहे किंवा इथे मी एकही प्रतिसाद दिलेला नसताना उगीच माझे नाव या धाग्यावर मेन्शन केलेले आहे. आणि कांगावासुद्धा करताय.
हे ऑफेन्ड होण्यासारखे कारण नाही हे तुमच्याकडून कळतेय. मला तुमच्याशी कुठेही कसलाही संवाद नको आहे. प्लीज.
तुम्हाला आयडीच उडवायचाय का ? त्यासाठी ही नाटकं नकोत.
(No subject)
उत्कंठावर्धक क्रिकेट सामना सुरू आहे. बॉलर बॉल टाकण्यास धाव घेत आहे तेवढ्यात साईट स्क्रीन समोर कोणी तरी तिऱ्हाईत व्यक्ती येते आणि सामना थांबतो. तसे काही तरी वाटले.
अॅडमिन, लक्ष द्या प्लीज.
अॅडमिन, लक्ष द्या प्लीज.
मला तुमच्याशी कुठेही कसलाही
मला तुमच्याशी कुठेही कसलाही संवाद नको आहे.
>>> गुड... मलाही...
दर धाग्यावर हा याचा ड्यू आयडी
दर धाग्यावर हा याचा ड्यू आयडी.. तो त्याचा ड्यू आयडी- कंटाळा कसा येत नाही .... मारा खडे.. लागला तर लागला...
पुन्हा विनाकारण माझा उल्लेख
पुन्हा विनाकारण माझा उल्लेख कुठे करू नका. तुम्ही कदाचित अॅडमिन टीम मधे आहात म्हणून हे चालवून घेतले जातेय. इतर कुणाचाही आयडी ब्लॉक झाला असता.
च्रप्स, तुम्ही मानसिक रूग्ण
च्रप्स, तुम्ही मानसिक रूग्ण आहात काय ? या धाग्यावर माझा उल्लेख कशासाठी केला कारण नसताना ?
मला हौस नाही तुमचा आयडी कोण शोधायची. तुमच्या आयडीचा असा उल्लेख झाला म्हणून तो आयडीच उडाला हे सांगितलेय. तुम्ही कोण आणि तुमचे आयडी कोण यात काडीचाही इंटरेस्ट नाही. जी फॅसिलिटी तुम्हाला आहे तीच इतरांनाही हवी. ही तिसरी वेळ आहे खोडसाळपणे माझा उल्लेख करण्याची. करत बसा मानसिक विकृतसारखी बडबड.
चिट फंड, पर्ल्स, कडकनाथ,
चिट फंड, पर्ल्स, कडकनाथ, खाजगी पतपेढ्या यापेक्षा एल आय सी हा चांगला पर्याय आहे, खास करून अशिक्षित / अल्पशिक्षित लोकांसाठी, हे मान्य. एल आय सी पेक्षा हे सारे चांगले असेही इथे कुणी म्हणत नसावे.
१ एन आर आय लोकांनी एल आय सी मनी बॅक योजना केवळ भिडेखातर घेऊन अर्धवट सोडून प्रचंड नुकसान करून घेणे मूर्खपणाचे आहे. त्यांना विदेशात जास्त रकमेचा टर्म इन्शुरन्स सहसा असतो, त्यामुळे तोही उपयोगाचा नाही.
२ एजंट लोकांचे कमिशन स्ट्रक्चर पर्व्हर्स आहे. त्यांना मनी बॅक योजनातूनच जास्त कमिशन मिळते व तेही सुरुवातीचे काही महिने. यामुळे आपसूकच Conflict of Interest होतो. तेही शेवटी स्वार्थच पहाणार. त्यामुळे सुरुवातीचे काही महिने घरी येऊन हप्ते घेऊन जाणे व नंतर विसरून जाणे हेही होते. हे खरे तर अमेरिकेतही होते.
तुमच्या आयडीचा असा उल्लेख
तुमच्या आयडीचा असा उल्लेख झाला म्हणून तो आयडीच उडाला हे सांगितलेय
>> हे दर धाग्यावर येऊन कशाला सांगत बसता? कोणी विचारलेही नाहीय... मूळ कमेंट मला माहीतही नाही- वाचलीही नव्हती.. असेल काहीतरी आक्षेपार्ह्य म्हणून उडाली असेल... कमेंट उडण्याचे दुःख मी समजू शकतो पण मी ती उडवली नाही.. मी ऍडमिन नाही... उगाच मी ऍडमिन टीम मध्ये आहे हे दर धाग्यावर सांगत जाऊ नका.. ऍडमिन के सब दुश्मन मेरे पिछे लग जायेंगे...
उगाच मला कशाला मध्ये आणताय...
हेमाशेपो - तसेही धागा फारच डिरेल होतोय...
हे दर धाग्यावर येऊन कशाला
हे दर धाग्यावर येऊन कशाला सांगत बसता? कोणी विचारलेही नाहीय... >>> या कमेण्ट शुद्धीत करता का हो ?
इथे या धाग्यावर माझा एकतरी प्रतिसाद होता का माझे नाव घ्यायला ?
चिकवा च्या धाग्यावर दोन तीन पाने मागे गेलेली कमेण्ट माझे नाव कोट करून आणली कशाला वर ?
चिकवाच्या धाग्याचा मालकच उडाला हे मी लिहीले होते. त्याची कमेण्ट काय होती हे नव्हते लिहीलेले . तरी जाणूनबुजून आयडी उडाला हे कसे कळते असा खोडसाळ प्रतिसाद दिला होता. मायबोलीवर काल आलात का आयडी कसा उडतो हे माहिती नसायला ? तिथे तुम्हाला अपेक्षित उत्तर एका राजकीय धाग्यावरच्या चिखलात लोळणार्या आयडीने दिले. ती आक्षेपार्ह कमेण्ट उडाली नाही.
तुम्हाला उद्देशून असलेला प्रतिसाद आणि आयडी सेकंदात कसा उडतो हे मला नमूद करावे लागले. तुम्ही विचारले म्हणून लिहीले होते. इथे वर्षभर तक्रारी करूनही कारवाई होत नाही.
दुसर्या धाग्यावर धाग्याच्या विषयाबद्दल एकही प्रतिसाद न देता अन्य संस्थळावर माझा आयडी काय या चौकशा करताना धागा डीरेल होत नाही का ? तुमच्यासारख्या विकृत आणि प्रत्येक धागा डीरेल करणार्याला हे सांगण्यात काही पॉईंंट नाही तरीही.
हे इथे सांगितले ते शेवटचे. तुम्ही पुन्हा ही विकृती दाखवालच. वर्षभर इग्नोर करूनही काही उपयोग नाही. तक्रार करूनही काही उपयोग नाही. काही आयड्यांना असलेले अभय पाहता या विकृतीला पायबंद बसेल असे वाटत नाही.
विकु, एजंट ला टर्म प्लान आणि
विकु, एजंट ला टर्म प्लान आणि मनी बॅक ला सारखेच कमिशन आहे.
एजंट हप्ता घ्यायला हवा हे खरे आहे पण हप्ता हि एजंट ची जबाबदारी नसुन ग्राहकांची आहे.
विदेशात राहणर्यांना हि मनी बॅक मिळण्यात अडचण येत नाही, खरतर NRI, FNO, अशा अनेक पॉलिसी होतात, ते करमुक्त अलाईड इनकम अशा दृष्टीने बघतात.
साधारण किती कमिशन मिळते?
साधारण किती कमिशन मिळते?
०.१ ते २५% अशा रेंज मध्ये
०.१ ते २५% अशा रेंज मध्ये असते, काही फक्त एकदाच तर काही पॉलिसी च्या पहिल्या वर्षी हप्ता्यावर अवलंबून असतात.
२५% कमिशन. => हे उत्तर आहे
@च्रप्स
२५% कमिशन. => हे उत्तर आहे तुमच्या प्रश्नाचे की LIC चे एजंट हात धुऊन तुमच्या मागे का लागतात.
हो ना उबो... आय डोन्ट ब्लेम
हो ना उबो... आय डोन्ट ब्लेम देम नाऊ
... 25% म्हणजे जोक नाही...
उ बो, तुम्हाला हविये का
उ बो, तुम्हाला हविये का एजन्सी?
भारतातील सगळ्या कम्पन्या
भारतातील सगळ्या कम्पन्या सगळ्या पॉलिश्या भारताबाहेर झालेला मृत्यू कव्हर करतात का ?
एजंट लोक हे फक्त एलाय सी चेच
एजंट लोक हे फक्त एलाय सी चेच असतात आणी ते फसवतात (फक्त तेच) जे मानतात ते स्वतःला अर्थसाक्षर मानतात हा सर्वात मोठा जोक आहे. किंवा ते खाजगी कंपन्यांचे एजंट आहेत आणी त्यांनी लोकांना फसवलेले आहे
बाकि युलिप सारख्या योजनेत पैसे घालुन फसलेले (एजंट च्या आग्रहाखातर) हजारो लोक आहेत
मी एकदा एका एजंटला कोरा चेक
मी एकदा एका एजंटला कोरा चेक दिला होता , अमुक लाख पॉलिसी साठी
त्याने मोठ्या पॉलिसीचा प्रीमियम लिहिला , माझ्या अकाउंटला 800 रु कमी होते , तेही त्याने परस्पर जाऊन भरले , त्याची सर्वत्र ओळख होती , त्याकाळात मॅन्युअल चेक होते , ऑन लाईन इ इ नव्हतं
लई मोठे भांडण झाले होते.

त्याच एजंटचे अनेक पराक्रम समजले , सुरुवातीला जास्त फॉर्मवर सह्या घेणे , चार वर्षांनी मनी बेकचा चेक देतू असे सांगून चेक परस्पर नवीन पॉलिसीत घालणे इ इ इ. मलादेखील ही भीती वाटत होती , म्हणून मी माझी सही बदलली , सगळ्या ब्यांका , पॅन कार्डवर सही बदलली , एल आय सी त ही लेटर दिले की मला सही बदलायची आहे , आजपासून फक्त नवीन सही व्हॅलीड राहील. तर ते लोक आधी मला सही बदलू देईनात , मग मी फॉर्म भरून दिला तर मला त्याची रिसीट देईनात , शेवटी ग्रीवन्स रिड्रेसलशी पत्रव्यवहार करून काम करून घेतले.
त्याच एजंटकडची पूर्वीची मनी बॅक पॉलिसी पुढच्या वर्षी चार वर्षे पूर्ण झाली तर मला 15 दिवस चेकच देत नव्हते , पुढच्या वर्षीचा प्रीमियम कापून 25 नाही 16 च हजार देणार म्हणून बसले होते , मधल्या काळात मी सह्या बदलून ठेवल्या होत्या , त्यामुळे त्या चेकचे काही परस्पर करणे त्यांना जमले नाही , मी पुन्हा वर पत्रव्यवहार केले , 25 हजारांचा पूर्ण चेक घेतला , त्याच दिवशी पॉलिसी सरेंदर करून अजून काही उरत असतील तर तेही मागितले.
तेंव्हापासून नो एल आय सी
मग टर्म इन्शुरन्स घेतला होता , खूप आधी , पण संसार धड जाग्यावर नाही तर कशाला नॉमीनिला फुकट पैशे द्या , म्हणून तीही बंद केली
4 वर्षे हेल्द इन्शुरन्समध्ये क्लेमस ला काम केले , पण तरीही नो एनी पॉलिसी
गेल्या आठवड्यात नवीन कंपनी जॉईन केली , त्यांनी 5 लाखाची हेल्द इन्शुरन्स पॉलिसी दिली आहे , मी 10 वर्षांपूर्वी ज्या टिपीएत होतो , तेच टिपीए आहे
पण आताची ऑन लाईन प्रोसेस अगदी सोपी आहे , मी लोकल ट्रेन मध्ये बसून मोबाईलवरून कंपनीने पाठवलेली लिंक वापरून पॉलिसी घेतली , आमच्या काळी असे नव्हते हो
आयडीसुद्धा लगेच जनरेट केले.
इन्शुरन्स घ्या म्हणून मला फोन येतात , बहुतेकदा ह्या बायकाच असतात , आणि तुम्ही मेल्यावर , घरवालो का क्या होगा इ विचारतात , मी म्हटले , तुम्हीही बाई आहात , नोकरी करताय ना ? बायकांना शिक्षण नोकर्या मिळतात तर नवऱ्यावर पॉलिसीचे ओझे कशाला ? मला एखादी बायको मिळेल का जी माझ्यासाठी पॉलिसी घेऊन मरेल ?
तिने फोन बंद केला !!
चांगली चर्चा चालू आहे, सुहॄद
चांगली चर्चा चालू आहे, सुहॄद नी न चिडता उ त्तरं दिलित, हे ही कौतुकाचे वाटले. पर्सनली मला त्यांच्या वर कोंडळे करून हल्ला केल्या ची फिलींग आली
तसे नसेल तर क्षमस्व!
आर्थिक साक्षरते बद्दल सजगता हवी ह्याला अनुमोदन. मला नाही वाटत धागा भरकटलाय, जर तसे असेल तर उलट योग्य दिशेने भरकटलाय!
हो सुहृद नि छान उत्तरे दिलीत.
हो सुहृद नि छान उत्तरे दिलीत.. या धाग्याचा भरपूर जणांना फायदा होईल...
हो सुहृद नि छान उत्तरे दिलीत.
हो सुहृद नि छान उत्तरे दिलीत.. या धाग्याचा भरपूर जणांना फायदा होईल...
चिटफंड इ.इ. पेक्षा एलायसी
चिटफंड इ.इ. पेक्षा एलायसी बरी. कारण ती यांच्यासारखं मुद्दल बुडवून गायब होणार नाही.
अर्थसाक्षरतेचा मुद्दा आला की इथे जो ऑडियन्स आहे तो सोडून दुसर्या लोकांबद्दल लिहायचं. इथे लिहिणार्या- वाचणार्यांना माहिती शोधता, तुलना करता येते . तसं त्यांना करता येत नाही. (अर्थात माहिती पडताळायची सोय असूनही अधिक परताव्याच्या लोभाला बळी पडणारे लोक इथेही असतात. अगदी वित्तसंस्थांत काम करणारेही असतात.
सुहृद यांनी शांतपणे उत्तर दिली हे बरोबर. पण अनेक मुद्द्यांना बगल दिली.
एन्डोमेंट मनी बॅक पॉलिसीपेक्षा एक टर्म पॉलिसी आणि दुसरा तुम्हाला रुचत असेल तर तो गुंतवणुकीचा पर्याय निवडावा इतकंच म्हणणं होतं. त्याला मी कुठे नाही म्हणतेय म्हणत मध्ये कधीतरी सहमती दर्शवली.
टर्म पॉलिसींबद्दल कसलाही आक्षेप नाही. फक्त त्याला गुंतवणूक समजू नका, इतकंच सांगणं होतं. डिट्टो पेन्शन प्लान्स बद्दल.
गुंतवणूक आणि विमा यांची सांगड नको हे आर्थिक नियोजनातलं तत्त्व का मान्य नसावं?युलिप्सवरू़न गहजब का झाला?
असो. नेमकी आकडेवारी घेऊन पुढे कधीतरी.
भरत सर, शिळ्या कढी ला ऊत
भरत सर, शिळ्या कढी ला ऊत आणतेय पण मी पहिल्या पोस्ट पासून असेच म्हणत आलेले आहे कि, ज्यांना टर्म प्लान काढुन ईतर गुंतवणूक करायची आहे त्यांनी करावीच.
सगळ्यात जास्त परतावा आम्ही देतो असे नाही. प्रत्येक वेळी एन्डॉमेंट पॉलिसी घेतली कि फक्त नुकसान असे नाही.
योग्य वेळ आणि योग्य माणूस गरजेचे आहे.
चांगला फायदा ही तौलनिक आहे, कशा बरोबर बघताय हे गरजेचे.
दहा वर्षे पुर्वी व्याजदर नऊ टक्के च्या आसपास होता, त्या तुलनेत आताचे परतावे तोट्यात च वाटतील. जर अर्थव्यवस्था कोणत्याही कारणासाठी कोसळत असेल तर सगळे तोट्यातच.
कोविड काळात छोटे दुकानदार, चहावाले, रोजंदारी वर काम करणारे, मोठे शोरूम मालक, घर भाड्यावर गुजराण करणारे अशा लोकांचे जे हाल झाले, त्यातून कमी असले तरी चालेल पण खात्रीशीर दर महिन्याला मिळतील अशा दुय्यम कमाई ची गरज निर्माण झाली, हे लोकांना खुप जाणवले.
एक केस सांगते नंतर.
> विकु, एजंट ला टर्म प्लान
> विकु, एजंट ला टर्म प्लान आणि मनी बॅक ला सारखेच कमिशन आहे.
हे खरे असले तरीही मनी बॅक चा प्रिमियम बराच जास्त असतो त्यामुळे त्याला जास्त पैसे मिळतात.
गुंतवणूक आणि विमा यांची सांगड नको हे आर्थिक नियोजनातलं तत्त्व मान्य आहे का ? वॉशिंग मशीन व डिश वॉशर या वेगवेगळ्या वस्तू आहेत. कपडे व भांडी धुणारे एकच मशिन कुणी बनवले तर ते धड कपडे ही धुणार नाही व भांडीही नाही.
मनी बॅक मध्ये योजना अर्ध्यात बंद केली तर होणारे प्रचंड नुकसान हाही एक कळीचा मुद्दा आहे. शिवाय ती बंद केली तर लाईफ चे कव्हरेज जाते ते वेगळेच.
विकु, मला मान्य का अमान्य हा
विकु, मला मान्य का अमान्य हा मुद्दा का असावा? मी मान्य केल्या न केल्याने काय बदलणार आहे?
मला जे वाटते ते माझ्या पाशी, तुमचे मत तुमच्याकडे..
मी का कशात गुंतवणूक केली आहे हे मी आधीच स्पष्ट केले आहे.
आता यात आमच्या एजंटने काय करावे असे तुमचे म्हणणे आहे?
मनी बॅक नको तर नका घेऊ, पण हे तुम्ही च करायचे आहे.
कपड्याच्या दुकानात गेलात, तर तुमच्या बजेट प्रमाणे घेता का दुकानदार देईल ते घेऊन येता?
Pages