LIC वाले नातेवाईक

Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07

Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< अर्थसाक्षर होणं हे काही फार कठीण नाही. इथे आम्ही काहीजण त्याबाबत लिहितोय, तर तुम्ही त्यातच खोडा घालताय. लोकांनी अर्थसाक्षर होऊ नये हा अट्टहास का? >> +१

It is difficult to get a man(woman) to understand something, when his(her) salary depends on his(her) not understanding it.
- Upton Sinclair, I,

मुळात जीवनविमा हा देखील आता EEE या स्वरूपात नाही आहे. (पूर्णपणे करमुक्त - सुरुवात करताना, दरवर्षी मिळणारे उत्पन्न किंवा वाढ आणि अंतिम परतावा). माझ्या माहिती प्रमाणे सध्या PPF मध्येच (अजूनतरी) हे शक्य आहे.

भरत आणि उ बो, दोन्ही एकत्र उत्तर देते.

तुम्ही जे सांगत आहात ते विम्याचे मुळ तत्व आहे.
पण त्याचाच दुसरा भाग मानवी आयुष्याची किंमत, human life value आहे. किती जण पुरेसा इन्शुरन्स घेतात?

मी आम्ही करत असलेली प्रॅक्टिस-
आम्ही (LIC) विमा घेताना च विमा कमाई ला योग्य आहे का ते चेक करतो, क्लेम देताना नाही. एकदा ठरलेला प्रिमियम, क्लाएंट निट भरत असेल तर रिवाईज होत नाही,
त्या मुळे एखादा जर तिशीत टर्मप्लान घेत असेल तर त्याला आधीच आपण किती वर्ष कार्यरत असु हे सांगता येणार नाही, उदा. १. जर त्याने समजा वीस वर्षे मुदत घेतली. जर तो मुदतपूर्तीनंतर पण कार्यरत असेल तर त्याला पन्नशीला त्या वयाच्या हिशेबाने प्रिमियम लागेल.
उदा. २. जर त्याने जास्तीत जास्त मुदत घेतली आणि तो कार्यरत असे पर्यंत प्रिमियम भरला, नंतर भरायचा बंद केला तर त्याचे काहिच नुकसान नाही. कमाई बंद झाल्यावर जरी त्याने हप्ता भरला तरी त्याला डेथ क्लेम मिळेलच.

१ करोड साठी LIC चा प्रिमियम २० ते २१ हजार असेल कायमसाठी.

भरत सर, मी कुठेही असे म्हणले नाही कि, अर्थ साक्षर होऊ नका,
मी असेही म्हणले नाही, एजंट ने सांगितलेली प्रत्येक गोष्ट बरोबर आहे आणि डोळे मिटून ऐका.
योग्य व्यक्ती, योग्य वेळ गरजेचे आहे.
तुम्ही कुठे राहता ते माहीत नाही, सध्याची ग्रामीण भागातील जी स्थिती आहे, ती जर तुम्ही जवळून बघितली असेल तर सगळ्यांसाठी अर्थ साक्षर होणे किती सोपे आहे ते तुम्हांला कळेल.
कोणीही अर्थ साक्षर व्हा, आणि उत्तम गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवल्यास मला वाईट वाटायाचे कारण नाही.
उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नका.

साठाव्या वर्षी टर्मप्लान बद्दल...
एकतर काही प्रमाणात ती गम्मत होती.. जर पटत नसेल तर पुढील स्पष्टीकरण
साठाव्या वर्षी टर्मप्लान द्याच, असे नाही.
आणि कोणीही घ्या म्हणल्यावर टर्मप्लान मिळायला ती किराणामाल दुकानातील साखर नव्हे.
जर कोणी मागत जरी तर ती व्यक्ती कमावती असल्याशिवाय तिला कोणताही इन्शुरन्स मिळणार नाही.
तिला योग्य आर्थिक कागदपत्रे सादर करावी लागतील. आणि मेडिकल टेस्ट पण क्लिअर कराव्या लागतात.
तरच त्याला /तिला पॉलिसी मिळेल.

एन पी एस च्या नावाखाली सामान्य लोकांना कफल्ल्क करायचा जो घाट सरकारने घातला आहे तो सगळ्यात भयंकर आहे. LIC पोलिसी मध्ये तुम्चे भांडवल तरी परत मिळेल पण एन पी एस तर रस्त्तावर आणणार आहे तेहि सगळे कपडे देखील काढुन घेउन !

Submitted by बिचुकले on 6 August, 2022 - 17:44
>>>>>
बिचुकले, एन पी एस मध्ये नक्की काय नुकसान आहे ते अजून जरा स्पष्ट करणार का? किंवा वेगळा धागा काढून लिहा.
इनकम टॅक्ससाठी एन पी एस मध्ये गुंतवत होते पण आता नवीन टॅक्स रेजिम प्रमाणे त्याचा उपयोग नाही.

तुम्ही हे विमा कंपनीच्या दृष्टिकोणातून लिहिताय का? त्याचं मी काय करू? मी एक सामान्य माणूस आहे.

अर्थ साक्षर व्हा असे सांगताना तुम्ही विमा कंपन्यात गुंतवणूक करू नका असे सांगत आहात, पण काय करा कि खात्रीशीर परतावा मिळेल हे सांगत नाही, काय काय सावधानता बाळगावी हे सांगत नाही.
जो माणूस अर्थ साक्षर होईल, त्याने गुंतवणूकीचे चे तोच जर ठरवायचे असेल तर विमा कंपन्यांकडे जायचे का नाही हे तोच ठरवेलच.
एक बरा दरवाजा बंद करतात खरा पण दहा कितीतरी वाईट दरवाजे उघडे आहेत, त्याबद्दल तुम्ही बोलतही नाही.

मोद,
LIC मध्ये भरलेला प्रिमियम वर तुम्ही लिमीट नुसार टॅक्स एक्सम्शन घेऊ शकता.

मुदतपुर्तीला, विमा रक्कम, बोनस, FAB हे सगळे धरुन मिळणारी रक्कम पुर्णपणे करमुक्त आहे. कसलाही फॉर्म दर वर्षी भरायची गरज नाही.

सुहृद आपण मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. आयुर्विम्यातून मिळणार परतावा पूर्णपणे करमुक्त नाही हे आपण मान्य करत नाही.

मुळात आर्थिक गुंतवणुकीचे निकष वेगवेगळे असतात - वय, गरज, उत्पन्न, करपात्रता, गुंतवणुकीचा प्रकार हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित करून केवळ lic च घ्या हे पूर्णपणे चूक होय. आयुर्विमा हा आयुर्विमा आहे गुंतवणूक नव्हे हे मूळ तत्व ध्यानात घ्यावासा हवे

आज 8% कितीही आकर्षक वाटले तरी ते inflation proof नाहीत. आज दर महिना 1 लाख खूप जास्त वाटले तरी 4-5 वर्षात त्या एक लाख मध्ये किती गरज पूर्ण होतील?

सुहृद आपले वाचन वाढवा. Taxation related आपली माहिती चुकीची आहे.

Further the 8% return you are talking about refers to annuity I believe. It’s fully taxable

@सुहृद
१) समजा मी ३० वर्षे वयाचा आहे आणि माझे वडील ६० वर्षाचे आहेत. दोघांना एकाच वेळी,
LIC कडून प्रत्येकी १ करोड term insurance घ्यायचा आहे (30 year certain) तर प्रत्येकी प्रीमियम किती पडेल ते सांगाल का? दोघेही सुदृढ आहेत.
२) मला term life ऐवजी whole life ला प्रीमियम किती पडेल ते सांगाल का? तुमच्या मते सर्वोत्तम पॉलिसी निवडा.
लगेच हिशोब करून ठरवता येईल. (अट एकच: term life insurance आणि whole life insurance ची रक्कम आणि मुदत सारखीच पाहिजे)

तुम्ही बेधडक चुकीची माहिती सांगत आहात, याला येथील बऱ्याच जणांचा आक्षेप आहे. तूर्तास इतकेच.

<< आम्ही (LIC) विमा घेताना च विमा कमाई ला योग्य आहे का ते चेक करतो, क्लेम देताना नाही. एकदा ठरलेला प्रिमियम, क्लाएंट निट भरत असेल तर रिवाईज होत नाही. >>
प्रीमियमचा दर actuary ठरवतात, (अनेक मॉडेल्स वापरून) हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही actuary आहात का?

मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की ६० वर्षे वयाच्या व्यक्तीला LIC ३० year certain term life insurance देणारच नाही. किती वर्षे देतील आणि किती प्रीमियम ते सांगा.

पर्याय लिहिलेत की. हा धागा अर्थसाक्षरतेबद्दल अ पासून ज्ञ पर्यंत माहिती लिहिण्याचा नाही. गुंतवणुकीच्या प्रत्येक पर्या यात काही ना काही जोखीम असते. आजकाल अगदी मराठी वृत्तपत्रांतूनही याबद्दल लेखमालिका असतात. सर्टिफाइड फायनान्शल प्लानर असतात.

विमा कंपन्यांत गुंतवणूक का नको त्याची स्पष्ट कारणे मी लिहिली आहेत. त्यावर तुम्ही काही उत्तर दिलेलं दिसलं नाही.

बाकी साठाव्या वर्षी विम्याबद्दल तुम्ही लिहिलेलं वाचून करमणूक झाली.

उ बो, बहुतेक लिहीलेले समजण्यात चुक होतीये, किंवा मला अशा माध्यमावर लिहायची सवय नाही, त्यामुळे नीट लिहीता येत नाहिये.

तीस वयाच्या माणसाला कमी मुदत आणि जास्त मुदत असे टर्मप्लान घेतल्यास येणार्या दोन स्थिती सांगितले आहे.
त्याला हप्ता २१००० च्या आसपास येईल.
तो आधी कसा ठरवु शकेल कि तो किती वर्षे वर्किंग असेल?
म्हणून जर त्याने विस वर्षे मुदत घेतली आणि पन्नाशी ला जर तो वर्किंग असेल तर त्याला पन्नाशीच्या दराने नव्या पॉलिसी ला हप्ता लागेल.
पण जर त्याने जास्त मुदतीची पॉलिसी घेतली तर काम बंद पॉलिसी बंद असे केले तरी चालेल. त्याला तसेही मॅच्युरिटी नाही.
तिशीत असलेला हप्ता जर तो नीट भरत असेल तर रिवाईज होणार नाही. जर भरणे मध्येच थांबले, आणि त्याला काही मोठा आजार/ अपघात झाला असेल, मेडीकल टेस्ट चे रिझल्ट दिलेल्या मर्यादेपर्यंत नसतील तर रिवाईज होणार. असा त्याचा अर्थ.
हे तुमच्या लिंक साठी होते.

धागा अर्थसाक्षरतेबद्दल अ पासून ज्ञ पर्यंत माहिती लिहिण्याचा नाही. >>> + 11 >>>> mrunali.samad यांचे आधेचे प्रदिसाद बघता त्यांनी अर्थसाक्षरतेबद्दल बोलावे हे फारच हास्यस्पद वाटते. असो .

बिचुकले, एन पी एस मध्ये नक्की काय नुकसान आहे ते अजून जरा स्पष्ट करणार का? >> मुळात एन पी एस मधील गुंतवणुक हि मुचुअल फंड मधील गुनंतवणुक सारखी आहे पण ओपन एंडेड नाहि. एसायपी मध्ये तुम्हि कधीहि गुंतवणुक करु शकता, थांबवु शकता किंवा वाढवु शकता. तेहि डायरेक्ट फंड मध्ये. आणी तेहि तुम्च्या चौइस च्या फंड मध्ये. फंड चा पर्फोर्मन्स चांगला नसेल तर तुम्हि रिडिम करु शकता आणी दुसरा फंड उघडु शकता. हि फ्लेक्सिबिलिटी एन पी एस मध्ये मिळणार नाहि
एन पी एस मध्ये ८-१०% पेक्षा जास्त मिळणार नाहित डायरेक्ट फं मध्ये १५-२० पर्यत मिळु शकते .
टैक्स चे बेनिफिट सोडले तर एन्पीएस मध्ये जास्त काहि नाहि.

उद्या भारताची एकोनोमी कोसळली तर दोन्हिकडे पैसा जाइल पण एन्पीएस मध्ये पैसा जाताना नुसता पहात बसावा लागेल लोक इन पिरियड असल्यामुळे , पण मुचुअल फंड बंद करुन थो दे तरी पैसे वाचवता येतील

मुळात शेअर मार्केट मध्ये पैसा गुतवनुन त्याला पेंशन म्हणने हेच रिस्कि आहे. आणी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. शेअर मार्केट मधेय गुंतवणुक करणारा माणुस "गुंतवणुक " करत असतो जास्त परतावा मिळेल म्हणुन . शेअर मार्केट मध्ये कोणी पेन्शनचा पैसा ठेवत नाहि आणी ठेउ नये. पण सरकार जाहिरात करुन, भुलवुन, रिटायर मेंट चा पैसा शेअर मर्र्केट मध्ये घालायला सांगत आहे.
त्यापेक्षा आरबीआय बौन्ड , पीपीएफ, स्टेट बैक बौन्ड असे चांगले पर्याय सरकार पुढे आणत नाहिये कारण त्यांना लायाबिलिटी तुन मुक्त व्हायचे आहे जनतेच्या.

पीपीएफ हा चांगला सुरक्षित पर्याय होता, पण आता सरकारने व्याज दर कमी केले आहेत त्यामुळे रिटायरेमेंट पैशावर रिस्क घ्यायला लागत आहे.

का? अटी असतात का काही अर्थसाक्षरतेबद्दल बोलायला?आधीचे प्रतिसाद कसे असले पाहिजेत वगैरे? >> हो !

<हि फ्लेक्सिबिलिटी एन पी एस मध्ये मिळणार नाहि> साफ चूक
https://www.npstrust.org.in/content/change-my-scheme-preference-or-fund-...

<एन पी एस मध्ये ८-१०% पेक्षा जास्त मिळणार नाहित डायरेक्ट फं मध्ये १५-२० पर्यत मिळु शकते .>
हेही चूक आहे. एन पी एस मध्ये तुमच्या रिस्क प्रोफाइलनुसार फंड कम्पोझिशन निवडायचा पर्याय आहे. फक्त G-sec सरकारी रो ख्यांत पैसे गुंतवणारी एन पी एसही आहे.
मी एन पी एसच्या वाटेला कधी गेलो नाही त्यामुळे फार खोलात जाऊन वाचलेले नाही.

इथे मूळ मुद्दा विमा कंपन्यांकडे गुंतवणूक हा आहे. ए न पी एस साठी वेगळा धागा आहे बहुतेक. तिथे चर्चा करता येईल.
विमा कंपन्यांच्या वेगवेगळ्या योजनांत एजंटना किती कमिशन असतं? रेन्ज मिळाली तरी चालेल.

मॄणाली, योग्य वयात योग्य आर्थिक नियोजन केल्याने आताच रिटायरमेंट घेऊन चित्रपट पाहत बसू शकते, असं सांगा Wink

बरोबर आहे भरत सर Happy
Knowledge diversification गरजेचे आहे..सिनेमे, हॉबीज,गेम्स, वाचन,हिस्टरी, हेल्थ सगळ्याच बाबतीत.

<< त्याला हप्ता २१००० च्या आसपास येईल. >>
वय वर्षे ३०, assured amount १ crore, 20 year certain term insurance.
प्रीमियम २१,०००.

आता सांगा
१) आज वय वर्षे ५०, assured amount १ crore, 20 year certain term life.
प्रीमियम किती?

२) आज वय वर्षे ३०, assured amount १ crore, whole life insurance.
प्रीमियम किती?

Submitted by भरत. on 7 August, 2022 - 02:01 >> मी फक्त हसु शकतो तुम्च्या प्रतिसादावर.

मी एन पी एसच्या वाटेला कधी गेलो नाही त्यामुळे फार खोलात जाऊन वाचलेले नाही. >> ज्याची माहिती नाहि त्याला चुक ,बरोबर कशाला म्हणता !

जरा माहि ती घ्या भरत आधी, अर्धवट माहितीवर नका लिहु

Knowledge diversification हेल्थ ??? असो ! कठिण आहे.

Knowledge diversification हिस्टरी ?? म्हणजे संघी हिस्टरी का ?

अधिकृत लिंक दिली आहे की. न बघण्याचा पर्याय निवडलात ना.
जी सेक फंडसाठी सुद्धा लिंक देऊ शकतो. तेही पाहू नका.

जी सेक फंडसाठी सुद्धा लिंक देऊ शकतो. तेही पाहू नका. >> अहो साहेब, किती फ्लेक्सिबिलिटी आहे ते पहा तुम्हिच, प्रोब्लेम हा आहे कि तुम्हाला काहिच माहिती नसतान कोणत्यातरी लिका (पिंका च खरे तर) टाकुन तुम्हि माझा वेळ तर बरबाद करत्च आहात पण ज्यांना माहित नाहि त्यांची दिशाभुल करत आहात.
मला काहि इथे पैसे मिळणार नाहियेत, तुम्हाला एवढे कौतुक आहे तर टाका एन्पीएस मध्ये सगळे पैसे आणी पीपीफ मध्ये वगैरे नका टाकु,
माझे काय जाणार आहे !

Pages