Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07
Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती ती चिडचिड असे वाटत आहे..
किती ती चिडचिड असे वाटत आहे..
ताई,
आपल्या खिसा लिक कसा होतोय आणि त्यातून पैसे कसे पडणार आहेत.ते लिकेज असतं in terms of taxes ,bad financial products etc.
९५% लोकांसाठी LIC सारख्या कंपन्या आहेत.>>>जरा हा मुद्दा स्पष्ट करा. तुम्ही सारख्या जरी म्हणले असेल तरी उल्लेख LIC
आहे.
Nobody needs term plans after theirs working age...
हे तुम्ही कशावरून म्हणताय?
LIC आणि/किंवा एकंदरीत जीवन
LIC आणि/किंवा एकंदरीत जीवन विमा बद्दल बरेच गैरसमज पसरलेले दिसत आहेत.
LIC पेक्षा खाजगी कंपन्याचे एजंट्स मनी बॅक पॉलिसी घेऊन पाच वर्षात दीडपट होईल शिवाय वरून जीवन, अपघात विमा असे आश्वासन देऊन पॉलिसी विकण्यात पटाईत आहेत. पण प्रत्यक्षात त्यातील गुंतवणुक equity market मध्ये होते ज्यात काही खात्री नाही दीडपट होईल. मार्केट तेव्हा तेवढे वर असेल तर होईल नाहीतर नाही.
त्यांच्याकडे सुद्धा चांगल्या पॉलीसिज आहेत, आपण नीट विचार करून माहिती काढून अभ्यास करून घ्यायला हवी.
काहींनी म्हटले आहे काही हप्ते भरून पॉलिसी सरंडर केली तर कमी पैसे मिळाले. म्हणजे जीवन विमा नक्की काय आणि याची नीट माहिती नसताना त्यावर आधारीत मनी बॅक पॉलिसीत गुंतवणूक केलेली दिसते. हे काही रिकरिंग deposit नव्हे हवे तेव्हा बंद करून जमलेल्या व्याजासकट पैसे काढून घ्यायला. अशा पॉलिसिज तेव्हाच घ्याव्यात जेव्हा आपण त्याची टर्म पूर्ण करणार असू. मध्ये सरंडर केल्यास तुम्हाला जिवन विमा सुद्धा त्यात मिळाला होता, तेव्हा त्यासाठी टर्म प्लॅन साठी लागेल एवढा हप्ता तरी त्यातून जाऊन तो परत मिळणार नाही. आणि तीन वर्षाच्या आत सरंडर केल्यास काहीच मिळत नाही (सुहृद, या विषयी अधिक माहिती देऊ शकतील.)
विमा आणि गुंतवणूक दोन्ही एकत्र करण्यापेक्षा टर्म इन्शुरन्स घेऊन गुंतवणूक इतरत्र केल्यास जास्त रिटर्न्स मिळू शकतील. (याचा हिशेब करताना 80C मधला फायदा जर त्यात जागा असेल तर + त्यात मिळणाऱ्या रिटर्न्स मध्ये आयकर/capital gain tax किती लागेल हे सुध्दा पहावे). पण अनेक लोक असे असतात की म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करायलाही घाबरतात. किंवा त्यात अभ्यास करून कुठे गुंतवायचे याच्या भानगडीत पडायलाही आवडत नाही. सगळी गुंतवणूक FD मध्ये.
मग त्यांच्यासाठी विमा + मनी बॅक पॉलिसी जी FD तुलनेत ( अधिक (खरे तर रिकरिंग deposit शी तुलना करायल हवी, त्या पेक्षा कितीतरी अधिक) आणि व्याजरहीत परतावा देते
ती केव्हाही चांगली नव्हे का?
LIC fd पेक्षा जास्त रिटर्न
LIC fd पेक्षा जास्त रिटर्न देते?
धन्यवाद मानव, खरचं अर्धवट
धन्यवाद मानव, खरचं अर्धवट माहिती वर बरीच जण हे योग्य नाही, असे म्हणत असतो.
मी पहिल्या च पोस्ट मध्ये लिहिले आहे, की योग्य वेळेला योग्य पॉलिसी असेल तर फायदा होतो.
आताही अशा अनेक पॉलिसी आहेत, ज्याचा फायदा होऊ शकतो.
पण योग्य माणसाकडे जाणे गरजेचे आहे.
मी परत एकदा सांगते, ईथे किंवा मिडिया मध्ये सुद्धा खुप दा
LIC मध्ये गुंतवणूक करु नका, फक्त टर्म प्लान घ्या असे देतात,
पण मृत्यू ही एक रिस्क आहे पण निवृत्ती नंतर खुप काळ न कमावता, हयात असणे ही मोठी रिस्क आहे असे माझे मत आहे.
त्यासाठी ठरलेली रक्कम, ठरलेल्या वेळांना खात्रीशीर मिळणे गरजेचे आहे. करमुक्त असल्यास उत्तम. . आम्ही व्याजदर बॉंड पेपर वर लिहून देतो, १००%गॅरंटीड. कोणती ईतर वित्तीय संस्था हे करू शकते.
या साठी मला तरी अगदी व्यक्ती म्हणून विचार करताना LIC ला पर्याय दिसत नाही.
हे सर्व आपण किमान आर्थिक बाबी कळणार्याबद्दल बोलत आहोत. पण ग्रामीण भागात/शेतकरी/ भाजी/ फळ व्यापारी यांच्याकडे खुप पैसा रोज येतो किंवा हंगाम झाल्यावर येतो. आता बर्याच हायवे ची कामे सुरू आहेत, त्यांना जागेचे चांगले पैसे मिळतात.
रात्रीत नवनव्या पतसंस्था स्थापन होतात, आणि लाखोंचे चेक तिथे जातात, पहिले काही वर्ष /महिने व्याज मिळते नंतर मुद्दल पण जाते.
LIC मध्ये सध्या बॅंकेईतकेच तोडीसतोड व्याज मिळते शिवाय खात्रीशीर. सोवेरिअन गॅरंटी सकट. (हे शोधून पहाच)
मी हे अगदी मान्य करते की आमच्या सगळ्या एजंटस् ना आर्थिक नियोजन कळते असे नाही पण विमा घेताना योग्य आणि जाणकार व्यक्तीला संपर्क करणे श्रेयस्कर.
LIC fd पेक्षा जास्त रिटर्न
LIC fd पेक्षा जास्त रिटर्न देते?>>>> देऊ शकते.
च्रप्स, ते जीवन विमा घ्यायचा
च्रप्स, ते जीवन विमा घ्यायचा आहे हे गृहीत धरून आहे, आधीच पुरेसा जीवन विमा आहे, मग पुढली गुंतवणुक यासाठी नाही.
जेवढी रक्कम FD त टाकणार त्यातून टर्म इन्शुरन्स साठी लागणारा प्रीमियम वजा करून रिटर्न्स बघा.
2005 - 2015 या दहा वर्षात LIC average return 6.7% होता. सध्याचा माहीत नाही.
<< मी तर असे म्हणेन उलट
<< मी तर असे म्हणेन उलट साठाव्या वर्षी टर्मच बरा, मृत्यू होण्याची शक्यता अधिक तर क्लेम तरी मिळेल. >>
3० year certain policy for 1 crore coverage.
३० वर्षे वयाला आणि ६० वर्षे वयाला पॉलिसी घेतली तर त्याचा प्रीमियम काय असेल ते बघा. थोडीफार अर्थसाक्षरता असेल तर तुमचे तुम्हाला कळेल. (अगदीच इंटरेस्ट असेल तर LIC मधील actuary शी बोलून बघा).
अर्थसाक्षरता आयुष्यात फार उपयुक्त आहे. ज्यांची स्वतः शिकायची तयारी आहे, ते स्वतः शिकतात आणि सारासार विचार करून निर्णय घेतात. ज्यांची असे कष्ट घेण्याची तयारी नाही ते असे इथून तिथून एजंटकडून सल्ला घेतात आणि मग नकळत फसतात.
<मी तर असे म्हणेन उलट
<मी तर असे म्हणेन उलट साठाव्या वर्षी टर्मच बरा, मृत्यू होण्याची शक्यता अधिक तर क्लेम तरी मिळेल>
<मी हे अगदी मान्य करते की आमच्या सगळ्या एजंटस् ना आर्थिक नियोजन कळते असे नाही पण विमा घेताना योग्य आणि जाणकार व्यक्तीला संपर्क करणे श्रेयस्कर.>
धन्यवाद.
मृणाली x १००.
उपाशी बोका, यांनी लिंक दिलेला लेख उत्तम आहे. मला आता न सुचलेलाही एक मुद्दा त्यात आहे. लोक लिंक उघडायचे कष्ट घेणार नाहीत म्हणून लिहितो.
१. तुमच्या विम्याला अर्थ तुम्ही कमावते असे पर्यंतच असतो. बहुसंख्य लोक साठ वयापर्यंत निवृत्त होतात. त्यानंतर स्वतः काही काम करून कमवत नाहीत. त्यामुळे तुम्ही गेलात तरी तुमच्या कुटुंबाच्या उत्पन्नात फरक पडणार नसतो. शिवाय तोवर तुमची मुलं स्वतःच्या पायावर नीट उभी राहिलेली असतात.
२. जरी तुमचा जोडीदार तुमच्यावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून असला तरी साठाव्या वर्षापर्यंत तुम्ही पुरेशी बचत आणि गुंतवणूक केलेली असायला हवी.
३. साठाव्या वर्षी (खरं तर कोणत्याही वयात) टर्म प्लान घ्यायला तुम्हांला घसघशीत प्रिमियम भरावा लागतो. विमा कंपन्या नफ्यात कशा चालतात? त्यांच्या एजंटांना इतकं कमिशन कसं मिळतं?
४. आयुष्यमान वाढतं आहे. तुम्ही ७५ वर्षापर्यंतचा विमा काढला तरी त्याही पुढे जगण्याची शक्यता खूप जास्त आहे.
५. आणखी २० वर्षांनी
मिळणार्यामिळण्याची शक्यता असलेल्या १ कोटी रुपयांचं मूल्य आताच्या तुलनेत बरंच कमी असेल. त्यासाठी तुम्ही आता घसघशीत प्रिमियम भरताय.मुख्य म्हणजे विम्याचा उद्देश मी मेल्यावर माझ्या कुटुंबाला लाभ व्हावा हा नाही तर तुम्ही गेल्यावर त्यांची काळजी घेतली जावी , त्यांना त्यांचं राहणीमान टिकवता यावं हा आहे. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त रकमेचा विमा उतरवला तर तुम्ही अन्यत्र गुंतवणूक करून नक्कीच मिळणार असलेल्या लाभापासून किंवा तुम्हांला आता ते पैसे खर्च करून मिळणार्या आनंदापासून वंचित राहता.
इथे काहींनी एल आय सी मध्ये गुंतवणूक नको म्हटलंय ते विमा कंपनीत नको असं वाचावं.
अर्थसाक्षरता आयुष्यात फार
अर्थसाक्षरता आयुष्यात फार उपयुक्त आहे. ज्यांची स्वतः शिकायची तयारी आहे, ते स्वतः शिकतात आणि सारासार विचार करून निर्णय घेतात. ज्यांची असे कष्ट घेण्याची तयारी नाही ते असे इथून तिथून एजंटकडून सल्ला घेतात आणि मग नकळत फसतात.>>+ १११
माझ्या एका परिचिताला एजंटने तब्बल १२ पॉलीसी काढुन दिल्या होत्या.
माझ्याही गळ्यात गोड बोलुन wealth plus पॉलीसी बांधली होती एका एजंटने.
आता एजंट भेटले तर कोपरापासून नमस्कार करतो.
हो. दर वर्षीच्या मार्च
<आणि मग नकळत फसतात.> नकळत फसतात म्हणजे आपण फसलो आहोत हेच त्यांना कधीही कळत नाही.
. दर वर्षीच्या मार्च महिन्यात कर वाचवायला म्हणून नवी पॉलिसी घेणारे नमुने असतात.
आता विमा कंपन्यांना गुंतवणूकीसाठीचा पर्याय म्हणायला आक्षेप का आहे त्याबद्दल.
भारतात सगळ्या प्रकारची गुंतवणूक सेबीच्या कार्यकक्षेत येते. विमा कंपन्या IRDA खाली येतात. त्यांचे गुंतवणुकीबद्दलचे नियमन सेबीपेक्षा बरेच सैल आहे. एजंटांना कमिशन, स्वतःचा खर्च यासाठी म्युच्यल फंडांवर जेवढे निर्बंध आहेत, त्यापेक्षा इथे बरीच सूट आहे. एजंट त्याला मिळणार्या कमिशनमधून तुमचा एक किंवा दोन प्रिमियम भरू शकतो म्हणजे बघा. शिवाय जमा केलेल्या पैशाच्या गुंतवणुकीबद्दलचे निर्बंधही सैल आहेत.
विमा कंपन्यांनी युलिप योजना काढून कशी लूट केली ते वाचा.
शेअर बाजार म्हणजे फक्त इंट्राडे किंवा ऑप्शन ट्रेडिंग नव्हे. मुळात ती गुंतवणूक नाहीच. तर ट्रेडिंग आहे. शेअर्समधल्या किंवा म्युच्यल फंडांच्या इक्विटी फंडांच्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीची तुलना मनी बॅक , एन्डोमेंट पॉलिसीशी का करू नये?
लोक टीव्हीफ्रीजमिक्सरमोटार घेताना जितका विचार करतात त्याच्या काही अंशही विचार न करता, त्याच्या काही पट रक्कम माहिती न घेता एजंट सांगेल तशी गुंतवणूक करतात.
अगदी अमुक एक एन्डोमेंट पॉलिसी घेऊ का अशा धाग्यावर तेवढ्याच रकमेत टर्म प्लान + वेगळी गुंतवणूक करून मिळणारा परतावा कितीतरी जास्त असेल हे आकडेवारी मांडून दाखवूनही ;" फार विचार न करता मला इतके इतके पैसे तर मिळताहेत म्हणून एन्डोमेंटच छान" अशाच निर्णयाप्रत धागामालक आले होते. म्हणूनच मृणाली x 100.
मृणाली/ भरत, सडेतोड उत्तर.
मृणाली/ भरत, सडेतोड उत्तर. लिंक अजून वाचली नाही. पण आता नक्की वाचेन.
घरातल्या लहान थोर सगळ्यांची
घरातल्या लहान थोर सगळ्यांची पॉलीसी घेण्यापेक्षा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स आणि फॅमिली हेल्थ इन्शुरन्स काढुन उरलेली बचत पीपीएफ, म्युच्युअल फंड, शेअर बाजार यात नियमित पणे दीर्घ कालासाठी गुंतवल्यास चांगला निधी गोळा होईल.
आता सध्या कामात आहे, यावर
आता सध्या कामात आहे, यावर लवकरच लिहीते.
पीपीएफ, म्युच्युअल फंड, शेअर
पीपीएफ, म्युच्युअल फंड, शेअर बाजार यात नियमित पणे दीर्घ कालासाठी गुंतवल्यास चांगला निधी गोळा होईल.> you can consider NPS also. Now corporate NPS is also available. You can invest upto 10% of basic. This amount will become tax free. This is over and above 50000 individual put in NPS. This is for tier 1 account. This is for private sector employees. Central government employees are already putting in this.
एन्डॉमेंट पॉलिसी किवा टर्म
एन्डॉमेंट पॉलिसी किवा टर्म पॉलिसी मधील फरक बघण्यासाठी काल LIC आणि पॉलिसीबझार ह्या दोन्ही मध्ये काय फरक आहे ते बघितले.
त्यासाठी खालील डाटा वापरला.
पॉलिसी धारकाचे वर ३३ वर्ष
पोलिसी २५ वर्ष
टर्म पोलिसी : ICICI (पॉलिसी बझार मधील सर्वात स्वस्त प्लॅन) वार्षिक प्रिमियम रु १४०७६, २५ वर्षबभरायचे.
LIC एन्डॉमेंट पॉलिसी : जीवन लाभ (जीवन कोमल बंद झाली आहे त्यामुळे ही पॉलिसी घेतली जर दुसरी चांगली असेल तर ती सांगा) प्रिमियम पहिल्या वर्षी ४,६५,०८८ आणि दुसर्या वर्षापासुन ४,५५,०७३. फक्त १६ वर्ष प्रिमियम भरायचे, २५ वर्षानंतर ११० लाख ते १८५ लाख मिळतिल.
जर समजा एखाद्याने LIC एन्डॉमेंट पॉलिसी ऐवजी टर्म पॉलिसी घेतली आणि बाकीचे पैसे जर RBI Bond मध्ये घातले तर त्या व्यक्तीला ५८ लाख ते १३३ लाख पर्यन्त जास्त फायदा होईल . PPF मध्ये पण साघारणतः तेवढेच पैसे मिळतिल. LIC एन्डॉमेंट पॉलिसी मध्ये १६ वर्ष प्रिमियम भरतो पण टर्म पॉलिसी मध्ये २५ वर्ष भरतो त्यासाठी जे RBI Bond/PPF मधुन १६व्या वर्षानंतर पैसे घतले आहेत. त्यासाठी हा तक्ता
ह्या तक्या वरुन एक गोष्ट लक्षात येते की LIC एन्डॉमेंट पॉलिसी पेक्षा टर्म पॉलिसी / PPF केव्हाही चांगले . LIC एन्डॉमेंट मध्ये १६ वर्ष दरवर्षी ४ लाख + भरावे लागतात. जर नोकरी गेली किंवा घराचे हप्ते नाही भरता आले तरी पण ४ लाख भरवे लागतात. अश्या वेळी टर्म पॉलिसी मध्ये फक्त १४ हजार रुपये भरले की झाले.
व्याज दर सध्या कमी आहेत जर व्याजदर वाढला PPF/Bond मध्ये आजुन जास्त परतावा मिळेल.
अर्थ साक्षरते बद्द्ल न
अर्थ साक्षरते बद्द्ल न बोललेलेच बरे . एन्पीएस सारखे फ्रौड प्रौडक्ट वरपासुन खालपर्य्त जाहिरात करुन रीटायर्ड लोकांचे पैसे डुबवणार आहे. तेथे जास्त काय बोला !
LIC खिसा हलका करते वगैरे कस
LIC खिसा हलका करते वगैरे कस ठरवलं ? >>> त्या एजंट असतील खाजगी कंपनीच्या !
सोवेरिअन गॅरंटी सकट. >>>
सोवेरिअन गॅरंटी सकट. >>> हे काय आहे हेच लोकांना माहित नाहि आहे तरीहि ९५% आणी ५% करत आहेत.
सोवेरिअन गॅरंटी देणारी एल आय सी हि एकमेव इन्शुरन्स कंपनी आहे.
असो. फार दिवस नाहि राहिले आता. अर्थ व्यवस्था कोसळली की कळेल गम्मत !
साहिल शहा , तुम्ची
साहिल शहा , तुम्ची कैल्कुलेशन्स चुकीची आहेत. बोनस धरला नाहि, चुकिचा प्रीमियम, आरबीआय च्या बौंड मध्ये इटंरेस्ट काढुन तो दरवर्शी ऐड करत आहात. डेथ झाली तर जीवन लाभ मिळणारा बोनस पकडला नाहित. टैक्स ची काहिच कैल्कुलेशन्स नाहित !
माझ्यासारखे सामान्य लोक जितकी
माझ्यासारखे सामान्य लोक जितकी ही चर्चा वाचतील तितके गोंधळून जातील.
याबाबतीत शेवटी जे आपला ओळखीचा एजंट जे सांगतो त्यावरच सामान्य लोकं विश्वास ठेवतात. त्यामुळे प्रत्येक विमा कंपन्यांचे दुकान चालू राहते.
पर्सनल फायनान्स आणि
पर्सनल फायनान्स आणि अर्थसाक्षरता सगळ्यांना माहिती असायला हवी.. ज्यांना एटलिस्ट बेसिक माहिती असेल त्यांना, रिसेशन आलं, सरकार बदलले, इंटरेस्ट रेट्स बदलले तरी काही फरक पडत नाही.. कारण कसं मैनेज करायला हवं ते समजलेले असतं.
चुक LIC एजंट किंवा इतरांची नसते आपलीच असते कारण आपल्यालाच त्याबद्दल माहिती नसते.
घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन यायचं काम बाकीचे करू शकतात पण पाणी प्यायचं कि नाही हे सर्वस्वी घोड्याला ठरवावं लागतं.
पब्लिक, प्रायव्हेट दोन्ही कंपन्या फायनान्शियल products च्या नावावर जाळं टाकून टपलेल्या असतात.आपल्या पैशावर ते डबल डिजीट मधे प्रॉफिट कमवतात आणि आपल्याला देतात फक्त पाच पैसे which is less than influeation..
रोज रात्री झोपताना कडी कोयंडे लावून घेतो ना आपण चोरांच्या भीतीने, इथे दिवसा ढवळ्या तुमचा खिसा हलका होतोय मग आता अर्थसाक्षरता नाही शिकणार तर कधी?
चोरांच्या भीतीने, इथे दिवसा
चोरांच्या भीतीने, इथे दिवसा ढवळ्या तुमचा खिसा हलका होतोय मग आता अर्थसाक्षरता नाही शिकणार तर कधी? >>> एन पी एस च्या नावाखाली सामान्य लोकांना कफल्ल्क करायचा जो घाट सरकारने घातला आहे तो सगळ्यात भयंकर आहे. LIC पोलिसी मध्ये तुम्चे भांडवल तरी परत मिळेल पण एन पी एस तर रस्त्तावर आणणार आहे तेहि सगळे कपडे देखील काढुन घेउन !
बँक बुडली की लोकांच्या पैशाची
बँक बुडली की लोकांच्या पैशाची जबाबदारी बँक आणि सरकार कोणीच घेत नाहीत.
हा दिवस ढवळ्या दरोडा च आहे.
बँक एक व्यवसाय आहे नीट चालवणे त्यांचे काम आहे.बुडली तर त्याला खातेदार कसे जबाबदार आणि त्यांना शिक्षा का.
कर्जदार चे कर्ज थकले की बुडीत काढतात का बँका..सर्व घरदार जप्त करतात.
साहिल शहा, कृपया काही
साहिल शहा, कृपया काही प्रश्नांची उत्तरे दिलीत तर बरे होईल.
हे उदाहरण तुम्ही दिलेले आहे म्हणून,
१. RBI bond चे हे जे व्याजदर धरले आहेत ते कायम स्वरूपी तेच राहतील का? नविन बॉंड्स घेताना, जे पुढिल पंधरा वर्षे गुंतवणूक करायची आहे, तेंव्हा नवे व्याजदर लागु होतील का जुने?
२. RBI bond चे व्याज करमुक्त आहे का? त्याला काही लिमीट आहे का?
३. त्याला सोवेरिअन गॅरंटी आहे का?
४. ICICI चा डेथ क्लेम रेशो तपासला आहे का?
५. जीवन लाभ चे कॅल्क्युलेशन करताना तुम्ही त्याचा बोनस रेट आणि FAB धरला आहे का?
६. जीवन लाभ पेक्षा इतर पॉलिसी सुचवली तर चालेल का?
मी पुन्हा एकदा सांगते आहे, टर्म इन्शुरन्स घेऊन इतर गुंतवणूक करण्यास माझी ना नाहीच, मी स्वतः काही गुंतवणूक, शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉंड्स, स्थावर यात केलेली आहे. पण हे प्रत्येकाला जमते असे नाही.
ज्यांना अर्थसाक्षरता नाही, आणि शिकण्याची इच्छा, संधी, क्षमता नाही, असे बरेच जण आहेत, ज्यांचे कष्टाचे पैसे वाया जातात, त्यांचे काय?
ज्यांना अर्थसाक्षरता नाही,
ज्यांना अर्थसाक्षरता नाही, आणि शिकण्याची इच्छा, संधी, क्षमता नाही, असे बरेच जण आहेत - त्यांचेच कष्टाचे पैसे एजंट लोकांचा सल्ला घेऊन वाया जातात. हे विम्याइतकंच म्युच्यल फंडालाही लागू आहे. वृद्ध निवृत्त व्यक्तीची रक्कम सेक्टर इक्विटी फंडात गुंतवणारे एजंट माहीत आहेत.
अर्थसाक्षर होणं हे काही फार कठीण नाही. इथे आम्ही काहीजण त्याबाबत लिहितोय, तर तुम्ही त्यातच खोडा घालताय. लोकांनी अर्थसाक्षर होऊ नये हा अट्टहास का?
आणि साठ वर्षाच्या व्यक्तीला टर्म प्लान घेण्याचा सल्ला का ते सांगताय ना?
Submitted by सुहृद on 6
Submitted by सुहृद on 6 August, 2022 - 09:59 >>> अर्थसाक्षर असते तर त्यांनी हि सगळी उत्तर आधी तपासली असती !
सुहृद , मुद्देसूद उत्तरे
सुहृद , मुद्देसूद उत्तरे शांतपणे दिल्याबद्दल धन्यवाद.
साहिल शहा यांनी दिलेल्या दोन टेबल्स मध्ये आणखी दोन कॉलम्स घातले तर चित्र पुरेसे स्पष्ट होईल. प्रत्येक प्रिमियम मध्ये एजंट ला गेलेले कमिशन आणी त्या त्य प्रिमियम नंतर आपण काही कारणाने पॉलीसी बंद केली तर होणारे नुकसान !
विजय कुलकर्णी, मी विचारलेले
विजय कुलकर्णी, मी विचारलेले मुद्दे जे आहेत त्याची उत्तरे येऊ देत मग तुमच्या प्रश्नांची उत्तरे देते.
माझे जे प्रश्न आहेत त्यांनी चित्र स्पष्ट होणार आहे.
सुहृद
सुहृद
RBI bond ला RBI ची सोवेरिअन गॅरंटी आहे . त्याचा व्याजदर २००३ ते २००८ पर्यन्त ८% नंतर २०२० पर्यन्त ७.७५% आणि सध्या ७.१५% ( NSC + ०.३५% आहे ) तो कमी जास्त होउ शकतो पण जागतिक महागाई आणि व्याजाचा दर बघता तो वर जाईल पण खाली नाही येणार . RBI Bond करपात्र आहे पण त्याच व्याजदरात PPF करमुक्त आहे
RBI bond एजंट मुंबईत घरी येउन काढुन जातो, (०.५% कमिशन पण देतो). पुण्यात मात्र आपल्याला एजंट कडे जावे लागते. व्याज आणि ७ वर्ष झाल्यावर मुद्द्ल हे ज्या बॅकेचा चेक दिला त्या अकाऊट मध्ये जमा होते. त्याकरता काही करावे लागत नाही. पैसे पण काहीही न करता आपल्या account मध्ये येतात. व्याज आणि मुद्दल जमा झाले की email येतो. Form 15 भरला तर व्याजावर कर कापला जात नाही. थोडक्यात RBI bond आणि PPF ची माहिती मिळवण्यासाठी फार कष्ट नाही करावे लागत.
पोलिसीबझ्झार च्या साईट नुसार ICICI चा डेथ क्लेम रेशो ९९.९४% आहे. पण तुम्हाला अधिक माहिती असल्यास सांगा.
जीवन लाभ चे कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी LIC online पॉलिसी काढण्यासाठी माहिती भरली (वय कमी टाकले) आणि त्यात मला वार्षिक प्रिमियम , guaranteed sum आणि max sum मिळाली. आणखी कोणतिही चालु असलेली पॉलिसी दिली तरी चालेल.
तुम्हाला आजुन एक प्रश्न साठ वर्षाच्या व्यक्तीला टर्म प्लान घेण्याचा सल्ला आणि Nobody needs term plans after theirs working age.. ह्या वाक्यावर तुम्ही घेतलेला आक्षेप ह्या बद्दल काही बोलाल का?
विकु सुहृद कडुन चांगली पॉलिसी मिळाल्यावर मी तक्त्या मध्ये पॉलिसी सरंडर केल्यावर होणारे नुकसान पण अॅड करेन. ऑनलाईन पॉलिसी काढताना प्रिमियम नंतर आपण काही कारणाने पॉलीसी बंद केली तर किती पैसे मिळतिल त्याबद्द्ल मुद्देसुद माहिती दिली होती. मी ती माहिती डिलिट केल्याने परत सगळी माहिती भरावी लागेल. online पॉलिसी मध्ये एजंट च्या कमिशन ची माहिती मिळणार नाही.
सुहृद यांनी rbi बॉण्ड्सना
सुहृद यांनी rbi बॉण्ड्सना सॉव्हरिन गॅरंटी आहे का असा प्रश्न उपस्थित करणं हे त्यांच्या एकूणच आर्थिक गुंतवणुकीच्या संदर्भातल्या ज्ञाना विषयी प्रश्न निर्माण करतं..
Pages