LIC वाले नातेवाईक

Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07

Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्चेचा रोख पाहता कोणी एजंट असेल तरी काहीच सांगणार नाही. जर चांगला एजंट सुचवा असा धागा असता तर चारपाच नक्की आले असते.

मी LIC मध्ये च आहे, कोणत्याही चांगल्या कंपनी ला असे वाटत नाही की आपला बिजनेस पुर्ण मुदत न चालता मध्ये बंद पडावा. त्यामुळे हप्ता न भरलेल्या चे कारण तुम्ही LIC वर टाकु शकत नाही.

जर पॉलिसी चा प्रिमियम नियमित भरला नसेल तर ती चालू राहणे शक्य नाही.
इथे असणारे बहुतांश सदस्य सुशिक्षित आहेत, त्यामुळे खात्रीशीर गुंतवणूकीचे बरेच पर्याय माहित असतील, पण बाहेर खुप जणांना अगदी बेसीक गोष्टी माहित नसतात.
निम शहरी /ग्रामीण भागात कितीतरी चिटफंड येतात, पतसंस्था येतात, खोर् याने पैसे गोळा करून अदृश्य होतात.
व्याज तर सोडा मुद्दल पण मिळत नाही.

मी ग्रामीण शाखेत काम करते. कितीतरी बायका रडत ईतर कोणत्याही कंपनी च्या पावत्या घेऊन येतात. ईच्छा असुन आम्ही काहीही करू शकत नाही.

आता परताव्याबद्दल जर बोलायचे असेल तर टर्म इन्शुरन्स ची सोय असताना ही बरयाच एन्डावमेंट विकल्या जाण्याचा दोष फक्त एजंट चा नसुन ग्राहकाचा पण आहेच. भरलेले पैसे बुडले तरी चालेल असा म्हणणारे वीर फारसे भेटले नाहीयेत मलातरी.

आणि तसेही कितीही मोठी रक्कम टॅक्स फ्री आणि खात्रीने मिळणे हे LIC शिवाय कोणत्या वित्तीय संस्था करु शकतात ते सांगा.

आत्ता सुद्धा एका पेन्शन सारख्या प्लान मध्ये आम्ही विमा रकमेच्या ८% रक्कम खात्रीशीर, करमुक्त, आयुष्यभर दरवर्षी देतोय. हे सगळे बॉंड वर लिहून. सोवेरिअन गॅरंटी सकट.

राहता राहिला प्रश्न, च्रम्प यांचा तुम्हाला जर गुंतवणूक करायची नसेल, तर सध्या जमणार नाही असे सांगू शकता. आणि आर्थिक कागदपत्रे मागण्या बाबत, विमा रकमेच्या काही लिमीट आहेत, त्या पेक्षा जास्त विमा तुम्ही मागितला असेल तर एकतर मेडिकल टेस्ट कराव्या लागतात किंवा आर्थिक कागदपत्रे देऊन योग्यता सिद्ध करावी लागते. आता ईथे च्रम्प हे जर भारतात नसतील तर आमच्या पॅनल डॉ. कडून फुकट मेडिकल टेस्ट कशी करणार, म्हणून एजंटने आर्थिक कागदपत्रे मागितली असणार.

तरीही कोणालाही LIC बाबत कोणतेही काम/शंका असेल तर मला कधीही विचारु शकता, मी सगळी मदत करेन. मी LIC मध्ये स्टाफ म्हणून आहे, एजंट नाही. माहिती देण्यात माझा कसलाही आर्थिक फायदा नाही.

वैद्यकीय कागत पत्रांना पेस्टब बायपास कशी करते?
म्हणजे मला कँसर झालेला आहे आणि आम्ही जातो आमुच्या गावाचा वर्षभराचा काऊंट डाऊन चालू आहे. पण सहा काय सात आकडी पगार मिळवतो तर पॉलिसी प्रिमियम वर काहीच फरक पडणार नाही?

मी असे कुठे लिहीले आहे कि प्रामीयम वर फरक पडणार नाही, जर व्यकती कॅन्सर पेशंट असेल आणि अगदी कमी वेळ शिल्लक असेल, तर तिला पॉलिसी मिळणार नाही.
वरिल उदाहरण स्टॅन्डर्ड लाइफ म्हणजे निरोगी माणसासाठी होते. ज्याचे उत्पन्न जास्त आहे, किंवा मोठ्या कंपनी त आहे, जिथे आरोग्य तपासणी होत असते तर त्या व्यक्तीची तब्येत इतर रोजंदारीवर असणार्या पेक्षा चांगली असते. कारण दुर्लक्ष होत नाही. म्हणून मेडिकल रिक्वायरमेंट मध्ये सुट मिळते.

माझ्या बाबतीत ही असेच घडले आहे. नोकरीच्या अगदी सुरुवातीला एका ओळखीच्या व्यक्तीने गळ घातली. मी कटवण्याचा खूप प्रयत्न करूनही शेवटी त्याने एक सोडून पाच पोलीसिज गळ्यात मारल्या. सुरुवातीला नियमित हफ्ते भरले पण आता बंद करावं म्हणून आजच lic office मध्ये गेलो तर असे कळले की प्रत्येक पॉलिसी मागे जवळजवळ 10हजार च नुकसान होत आहे. म्हणजे मी भरलेल्या रकमेहून 10हजार कमी मिळतील. फसवले गेल्याचा फिल आला आणि मुकाट्याने हफ्ते भरून आलो. माझं प्रांजळ मत आहे की असे प्लॅन कितीही चांगले असले आणि ajent ne कितीही आग्रह केला तरी स्वतः नीट विचार करून कुठ्यल्याही दबावाखाली न येता जाणीपूर्वक करा. कारण शेवटी हफ्ते आपल्याला भरावे लागतात.

एलआयसी चे रिटर्न भलेही कमी असतील (बाकी कंपन्यांच्या मनाने) पण त्यांचे क्लेम सेटलमेंट रेट सगळ्यात जास्त आहे

आता तुम्ही हफ्ते भरलेच नाहीत तर नुकसान होणारच

च्रॅप्स , सध्या परवडत नाही. घराचे हप्ते आहेत. मुलांचे शिक्षण आहे त्यासाठी गुंतवणुक करतोय अस नाही का सांगता येणार? परवडत नाही अस सांगितल कि लोक सहसा पुढ बोलत नाहीत.

LIC विषयी मात्र बरा अनुभव आहे. दोन तीन पॉलिसीज आहेत. एजंट सगळी काळजी घेतो. वरचेवर फोन करतो. मला तर भारतात सोपी, साधी आणि सेफेस्ट , कमी पैशात होणारी गुंतवणुक म्हणुन LIC चांगली वाटते. अर्थात या पॉलिसीज भारतात कॉलेज झाल्यावर नविन जॉब सुरु केल्यावर घेतलेल्या. सध्या घेईन अस वाटत नाही.

<< कमी पैशात होणारी गुंतवणुक म्हणुन LIC चांगली वाटते. >>
इन्शुरन्स आणि गुंतवणूक या भिन्न गोष्टी आहेत. त्यात गल्लत करू नका. इन्शुरन्स हवा असेल तर term life इन्शुरन्स घ्या, गुंतवणूक दुसरीकडे करा.

इन्शुरन्स आणि गुंतवणूक या भिन्न गोष्टी आहेत. त्यात गल्लत करू नका. इन्शुरन्स हवा असेल तर term life इन्शुरन्स घ्या, गुंतवणूक दुसरीकडे करा. >> ९९% लोक ही चुक करतात. term life इन्शुरन्स मध्ये जर वर्षभरात काही झाले नाही तर पैसे वाया जातात म्हणुन घेत नाहित पण गुंतवणुक म्हणुन LIC policy घेतात भले त्यात १% पण रिटर्न मिळत असेल त्या पॉलिसी घेतात.
term life इन्शुरन्स पण तरुण असताना घेतलेले चांगले. वयाचा ६०व्या वर्षी term life इन्शुरन्स घेतल्यास त्याचे प्रिमियम पण जास्त असते आणि त्याचा फार उपयोग पण नसतो.
आता मुळ मुद्याकडे, LIC च्या काही पेंशन योजना चांगल्या असतात. त्याचे रिटर्न मार्केट रेट प्रमाणे बदलत असते. जेव्हा रिटर्न जास्त असते तेव्हा पोलिसी घेणे फायद्याचे. माझ्या वडलानी २२ वर्षापुर्वी दरवर्षी ९% दराने पेंशन प्लॅन घेतला होता त्याचे व्याज आजही दर महिन्याला १ तारखेला बॅकेत जमा होते. सध्या दर कमी आहे पण जेव्हा व्याज दर चांगला असतो तेव्हा पेंशन पॉलिसी घेणे चांगले.

सरळ नकार देवून मोकळे व्हायचे.lic agent असणे हा व्यवसाय आहे ते त्यांच्या परी नी तो कसा वाढेल हे बघणार.त्या मध्ये त्यांचा तिरस्कार करण्याची काही गरज नाही.
कोणी आजारी पडलं आणि कोणते hospital घेत नसेल तर आपण करतो ना नातेवाईक लोकांना फोन मदतीसाठी,काही संकट आले की नातेवाईक आणि मित्र मंडळी च आठवतात ना.
जरा कोणी एकदा थोडा सा पैसेवाला असेल तर त्याला वाटत मला लुटायला च सर्व नातेवाईक,मित्र मंडळी टपले आहेत
आणि ही समस्या मराठी लोकात जास्त आहे.

च्रप्स ना हा प्रश्न पडावा ह्याचे नवल वाटले.
धागा उपयुक्त आहे. मी नुकतिच पॉलिसी काढलिये असे सांगते आणि ते खरे पण आहे. च्रप्स तुमचे भारतात इनकम सोर्स आहे का? असेल तर त्याच्यातून आधिच पॉलिसी घेतल्याने नविन पॉ. प्रीमियम भरणे शक्य होणार नाही, असे सांगा.

जिथे खडखडाट असतो, तिकडे एजंट लोक वेळ वाया घालवत नाहित.

गुंतवणूक करण्यासाठी LIC योग्य नाही असे मी खुपदा ऐकते, पण योग्य एन्डॉमेंट पॉलिसी योग्य वयात घेतली असेल तर फायदा होतो. तुम्ही तुलना कशा बरोबर करताय हे महत्वाचे. शेअर बाजार म्हणालात तर तो सगळ्यांना जमतो असे नाही. शिवाय ते रिटर्न सुद्धा कुठे खात्रीशीर आहेत.
बॅंक, पोस्ट किंवा इतर छोट्या गुंतवणूकीइतके रिटर्न LIC मध्येही मिळतातच. शिवाय करमुक्त.
पेन्शन प्लान तर आमचा खुपच चांगला आहे, गॅरंटीड ठरलेली व्याजाची रक्कम आयुष्य भर मिळतेच.
कोमल जिवन सारख्या पॉलिसी ला ७५/१००० असा दर वर्षी बोनस होता. काय तोटा होतोय यात?

शहा, मी तर असे म्हणेन उलट साठाव्या वर्षी टर्मच बरा, मृत्यू होण्याची शक्यता अधिक तर क्लेम तरी मिळेल.

साठाव्या वर्षी टर्म प्लान कशासाठी घ्यायचा? त्या वयात तुमच्या शिवाय तुमच्या कुटुंबाचं आर्थिक गाडं अडणार असतं का?

Submitted by सुहृद on 4 August, 2022 - 14:15
>>> परखड आणी व्यवस्थित उत्तर आहे. उगाचह चांग्ल्या सरकारी कंपनीला बदनाम करुन फ्रौड खाजगी कंपनी चे कौतुक करायची अशी टुम चालु आहे

का नाही, एखाद्या चे असुही शकते. आणि माझ्यामुळे किती अडतयं, या पेक्षा मी गेल्यावर ईतकी रक्कम असा ही विचार असु शकतो.

कोमल जिवन सारख्या पॉलिसी ला ७५/१००० असा दर वर्षी बोनस होता. काय तोटा होतोय यात?
>>इंटरेस्टिंग... बघायला हवे...

शेयर मार्केट बद्धल + 1
प्रॉफिट मारतो म्हणणारे लॉस चा स्क्रिनशॉट कधीच देत नाहोत...

प्रॉफिट मारतो म्हणणारे लॉस चा स्क्रिनशॉट कधीच देत नाहोत...
पुढच्या वर्षीपासून प्रॉफिटचा स्क्रीनशॉट पण गायब होईल. पुढचा स्क्रीनशॉट यायला आता २०२६ उजाडेल.

Literacy आणि फायनान्शियल literacy वेगवेगळ्या आहेत.Literacy तुम्हाला कुठल्याही शाळा, कॉलेजात मिळते..फायनान्शियल लिटरसी स्वतः शिकावी लागते.दुर्दैवाने आपल्या शिक्षण पध्दतीत आर्थिक साक्षरता शिकवली जात नाही.
जगात 5% लोक फक्त आर्थिक साक्षर आहेत आणि त्यांना इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट,फायनान्शियल traps, CAGR म्हणजे काय हे माहिती असते.बाकी ९५% लोकांना माहिती नसते कि आपल्या खिसा लिक कसा होतोय आणि त्यातून पैसे कसे पडणार आहेत.ते लिकेज असतं in terms of taxes ,bad financial products etc.
९५% लोकांसाठी LIC सारख्या कंपन्या आहेत.
आपलं आपणच ठरवावे लागेल कि आपण ५% मधे आहोत कि ९५% ?

LIC मधे त्यायल्या त्यात टर्म प्लान्स चांगले आहेत पण बी केअरफुल त्या टर्म प्लान्समधे पण आजकाल उल्लू बनवणारे प्लान्स पण आहेत जसे कि, ऐंशी वर्षांपर्यंत टर्म प्लान, मनी बैक टर्म प्लान्स..
Nobody needs term plans after theirs working age...

९५% लोकांसाठी LIC सारख्या कंपन्या आहेत.
आपलं आपणच ठरवावे लागेल कि आपण ५% मधे आहोत कि ९५% ? >>
Huh ? काही कळलं नाही. LIC खिसा हलका करते वगैरे कस ठरवलं ?

Pages