मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आदू Happy होतं असं. कॉलेजमध्ये असताना/ लहान असताना एखादी गोष्ट खूप आवडते पण नंतर नाही आवडत.

या गोष्टीतला पहिला भाग वाचल्यावर लपंडाव सिनेमा आठवला. तीन फुल्या तीन बदाम.

(वेगळा धागा का नाही काढत? Sad ) >>>एकाच ठिकाणी एकत्र वाचायला बरं पडेल म्हणून इथंच लिहिला .
इशर जज अहलुवालिया या अर्थशास्त्रज्ञ विदुषीचं हे memoir आहे. लहानसं पुस्तक आहे, आणि ते जबरदस्त आहे!>>> छान परिचय करून दिला आहे. मला का कुणास ठाउक पुस्तकाचं नाव वाचुन उगीचच जड असेल पुस्तक वाचायला अस वाटलेलं.
ह्रषीकेश गुप्ते यांचं गोठण्यातल्या गोष्टी पुस्तक.>> नोटेड.
पण आज मला ते बिलकुल आवडत नाहीये>> होत असं खरं बरेचदा. एका वयोगटात आवडणारी पुस्तके दुसऱ्या वयोगटात आवडेनाशी होतात.

Lol
बर्‍याच पुस्तकांचं-सिनेमांचं असं होतं. पूर्वी कधीतरी खूप आवडलेले असतात, पुन्हा वाचल्यावर/पाहिल्यावर का आवडलं होतं असा प्रश्न पडतो.

दोन एक महिन्यांपूर्वी कोल्हापूर ला महालक्ष्मी ला गेले होते, दर्शन झाल्यावर आजूबाजूचा रस्त्यावर भरलेला बाजार डोळे भरुन पाहणं, विंडो शॉपिंग म्हणा पण उगीच ड्रेस, कानातल्यापासून खलबत्ता, छोटे मोठे तवे निरखायला मला फार आवडत. शास्त्र असतं ते आंबाबाई दर्शन झाल्यावर ह्या सगळ्या बाजाराचं दर्शन घेणं Wink
तर अस तासभर भटकून झाल्यावर निसर्गाची हाक आली. तसं देवळापासून लांब आले होते. त्यामुळं जवळपास बाथरूमची सोय असलेलं हॉटेल बघितलं आणि आत शिरले. आता हॉटेलात गेल्यावर काहीतरी ऑर्डर केली पाहिजे म्हणून चहा ची ऑर्डर देऊन मी लगेच स्वछता गृहाकडे निघाले. बरोबर असणार्या काकू त्यांचा मोबाईल बघत आणि माझी पर्स सांभाळत बसल्या होत्या . ज्या स्पीड ने गेलेले त्याच्या डबल स्पीड ने परत आले. काकूंच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. म्हणलं तिकडे बघा तर एक साडी नेसलेला तृतीयपंथीय महिला स्वछतागृहात शिरत होती. मी खर तर घाबरूनच परत आलेले. स्वछतागृहातून बाहेर आलेली महिला आणि तिच्याबरोबरची एकजण आमच्या समोरच्या बाकावर बसलेल्या. छान मेकप, सुरेख केशराचना,चापून चोपून नेसलेली साडी, मॅचिंग कानातले, टिकली. मी बाई असून तिच्याकडे काही क्षण निरखून बघत बसलेले. अचानक जायचं ठरल्याने हाताशी होता तो टॉप अंगात अडकवून,फक्त पोंड्स ची पावडर थापून कोल्हापूर ला आलेले मी . 'ति'च्याकडे बघून मलाच कोंप्लेक्स आला होता.
ही घटना घडून महिना झाला असेल. त्यांच्यावर काही पुस्तक असेल हे डोक्यातच आलं नव्हतं कधी. मग लायब्ररीत गेल्याबर बराच वेळ होता म्हणून रॅक मध्ये पुस्तकं बघत बसले. नाहीतर पटकन टेबलवरचच एखादं उचलते. आणि रॅकमध्ये मला हे पुस्तक दिसलं. तर नमनाला घडाभर तेल ओतून झालंय. आता पुस्तकावर सांगते.

पुस्तकाचे नाव -- हिज-डे
लेखिका -- स्वाती चांदोरकर

एखादा 'तो' म्हणतो मी 'तो' नाही - 'ती' आहे. एखादी 'ती' म्हणते मी 'ती' नाही - 'तो' आहे. असं कोणी उघडपणे घरी बोलायचा अवकाश. झालं . घराण्याला कलंक, समाजातील प्रतिष्ठा धुळीला, लोक काय म्हणतील . त्यापेक्षा घरातून हाकलण सोपं. घर नाही, नाती नाहीत फक्त गुरु आणि त्याचे इतर चेले. मग एक असाच गुरु करायचा आणि मरेपर्यंत जगायचं. पण त्यांच्या या जगण्याला समाज एकतर घाबरून लांब राहतो किंवा तुच्छ लेखतो. पण हे स्त्री-पुरुष या जातीत मोडत नसले तरी 'माणूस' आहेत. अशा या 'शापित माणसांच्या' आयुष्याचे अनेक पैलू या पुस्तकातून समोर येतात.

तृतीयपंथी किंवा हिजडे असे शब्द आपण वापरतो त्यातल्या हिजडे या शब्दाची व्युत्पत्ती रंजक आहे. पूर्वी मुसलमान शहनशहा या तृतीयपंथीयांना त्यांच्या प्रामाणिकपणामुळे जनानखान्याचे रक्षक म्हणून पदरी ठेवत असे. त्यांचा हा प्रामाणिकपणा इंग्रजांना आड येत होता शहेनशहा पर्यंत पोहोचण्यासाठी. हळूहळू या तृतीय पंथीयांना बंदी बनवून त्यांचा छळ करण्यात आला. एकदा तिथल्या जेलरला वाटलं की या सगळ्यात या लोकांचा काहीही गुन्हा नाही. तेव्हा कमीत कमी एक दिवस तरी त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे हवं तसं जगू दे. तेव्हा जेलर म्हणतो 'this one day will be his day'. कालौघात ते हिजडे असं झालं. त्यामुळे 'हिजडे' हा शब्द या लोकांना मुक्तीचा दिवस - मानाचा दिवस आठवून सन्मानाचा वाटतो.

या कादंबरीतल्या व्यक्तिरेखा काल्पनिक असल्या तरी सत्यावर बेतलेल्या आहेत. वीस वर्षांची हेलीना सायकोलॉजी शिकत असते. लाजरी बुजरी , त्यात शारीरिक वाढ पूर्ण न झाल्यामुळे आत्मविश्वासाचा अभाव असलेली, खचलेली, कॉलेजमध्ये अलिप्त राहणारी. शाळेतही ती बुजरीच होती. तिच्याच शाळेत शिकलेली चमेली तिला ट्रेनमध्ये ओळखते. स्वतःहून हाय करते आणि इकडे हेलीनाची कळी खुलते. त्याचवेळी कॉलेजमध्ये जयाशी हाय हॅलो होत मैत्री होते.

चमेली एका तृतीयपंथाची मुलगी असते. जी रहाते ही त्याच वस्तीत. पण इन्शुरन्स ची कामं करून स्वतःचे पोट भरत असते. तर तिकडे जयाला आपल्याला मुलींबद्दलच आकर्षण वाटतंय हे नुकतच उमगलेल असतं. चमेलीशी झालेली मैत्री हेलीनाला तृतीय पंथीयांचं दैनंदिन जीवन जवळून दाखवते. 'ति'चा 'तो' होताना सुक्कीला ज्या मानसिक - शारीरिक वेदना होतात त्या अंगावर काटा आणतात. ठप्पर, साटला , घोडी , खांजरा असे अनेक शब्द त्यांच्यात सर्रास वापरले जातात ते वाचताना त्यांचं वेगळेपण समोर येतं. खरं तर अंगावर येतं.

पोटाची खळगी भरण्यासाठी करावी लागणारी देहविक्री, प्रचंड अस्वच्छता, अपुरी जागा, जीवघेणे आजार यातच गुरफटलेले हे लोक जेव्हा अंतिम प्रवासाला जातात तेव्हा त्यांच्या निष्प्राण कलेवराला तिरडीवर बांधून चपलाने मारतात. का तर परत हा असला जन्म घेऊन येऊ नये म्हणून. या पद्धतीतूनच या लोकांच्या यातनामय जगण्याची दाहकता समोर येते.

हे वेगळं जग अनुभवताना अशा लोकांची मानसोपचार तज्ञ म्हणून काम करताना हेलीना विचाराने परिपक्व होत जाते. आत्मविश्वासाने वावरते. अनेकदा मनाने कोलमडतेही. तेव्हा याच क्षेत्रात शिकून काम करणाऱ्या , मित्र झालेल्या आकाशचा आधार घेते . पुढे त्यांचं लग्नही होतं. मुलगा होतो. शाळेत जाऊ लागलेला हा मुलगा शाळेच्या गॅदरिंग मध्ये साडी नेसून नाच करायला लागतो. तेव्हा मात्र हेलीना चिडते. क्लिनिक मधली सायकॉलॉजिस्ट आणि घरातली एक मुलाची आई या द्वंद्वात ती सैरभैर होते. खरं तर हा प्रसंग अगदी कॉमन असतो .पण सतत तृतीयपंथीयांच्यात वावरण्याने ती तोच संदर्भ या गोष्टीला लावते . आपला मुलगा हा बायोलॉजिकली मुलगाच आहे पण भविष्यात जरी तो तृतीय पंथी झाला तरी त्याला आपण स्वीकारू शकतो. हेच तर आपण क्लिनिकमध्ये येणाऱ्यांना समजावत असतो. ते प्रॅक्टिकलीही आचरणात आणायचं हे लक्षात आल्यावर ती शांत होते.

रेल्वेत भीक मागताना, टाळ्या वाजवताना, शुभ कार्यात किंवा ऑफिसेस मध्ये शिरून पैसे मागताना हे लोक दिसले की भीती, किळस, दया या भावनांची गर्दी होऊन कपाळाला आठी पडण्यापेक्षा त्यांना 'माणूस' म्हणून बघता आलं तरी खूप झालं असं वाटतं शेवटी.

सर्व पात्रं गोष्टीरूप बांधली गेल्याने कादंबरी वाचनीय आहे. प्रवीण दवणे यांचं लेखिकेला लिहिलेलं पत्र प्रस्तावना म्हणून दिलं आहे. या पुस्तकाचे प्रकाशन तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्यात आले आहे.

प्रवीण दवणे यांचं अजून एक पुस्तक होत,जे मेनका अंकात क्रमशः जायचं आता आठवत नाही नाव त्याच कुणाला आठवलं तर सांगा-
द्विदल नाव पुस्तकाचे त्या
कथा पत्र स्वरूपात आहे,लव्ह मॅरेज करून नंतर विभक्त झालेल जोडपं एकमेकांशी पत्राद्वारे बोलत आपल्या भावना व्यक्त करत असत.हिरो च नाव साहिल असावं,
आठवलेले थोडे थोडे मायने देतेय पत्रात असलेले

१)जीवाभावानं घट्ट बांधलेल्या संसारातला एक चमचा जरी इकडचा तिकडे झाला तरी बाईचा जीव कसानुसा होतो, इथे माझ्यासारखी एखादी अक्खा संसार मोडायला निघते,ती किती तुटत असेल,त्याक्षणी ती काय सोसत असेल ते जगातल्या एका जरी पुरुषाला कळलं तरी बस

2)त्या दिवशी तू म्हणाला होतास,एके काळी परदेशात एकटीने जायला घाबरणारी तू आता घरातल्या घरात पण एकटी राहायला घाबरायला लागली का???...हो साहिल,घरातल्या घरातच परदेश वाटायला लागला होता,तू तूच परदेशी वाटायला लागला होतास,
3)तुझ्या यशाचं,गुणांचं मला खूप कौतुक आहेच पण म्हणून माझ्या यशाचं ,गुणांचं गाठोडं करून तुझ्या पायाशी ठेवावं असा अर्थ घेतलास की काय तू त्याचा

नाही देवकी,त्या वयातला वेडेपणा तो, इतकं कसं लक्षात राहिलं तेही समजत नाही,
आता तर फ्रीज उघडला तरी कशासाठी उघडला ते आठवायला 1 min लागतो Lol

आदू Lol
वर्णिता, उत्तम पुस्तक परिचय.

भैरप्पांचं अनुवादित पहिलं पुस्तक 'पर्व' वाचायला घेतलेलं होतं. पण 'महाभारतावर नवा प्रकाश छाप' लेखन वाचायचा फार कंटाळा येतो त्यामुळे सोडलं. पण आता त्यांचं आत्मचरित्र 'माझं नाव भैरप्पा' (मूळ पुस्तक कानडीत 'भित्ती' नावाचे) मिळालं. अपेक्षेप्रमाणे कर्नाटकातील समाजजीवन मांडलं आहे. ब्राह्मण, लिंगायत आणि वक्कलिग याशिवाय असंख्य उपजातीवरच आणि कोण उच्च कोण नीच यावर गाडा चालतो. लहानपणचं शिक्षण आणि आयुष्य हालापेष्टात गेलं. पुढे उच्च शिक्षण होऊन शाळा, कॉलेजात नोकऱ्या मैसूर,बडोदा ,दिल्लीत करतांना आलेले अनुभवही मांडलेत.
साहित्य - पहिली कादंबरी अठराव्या वर्षी लिहिली. नंतर बऱ्याच लिहिल्या आहेत. त्या प्रकाशित करण्यात आलेले प्रकाशकांचे अनुभव आहे हेत. तसंच यांचं नाव आणि पुस्तकं चर्चेत येऊ लागल्यावर जवळपास प्रत्येक पुस्तकांस प्रस्थापित जातीयवादी विरोध होऊ लागला.
४३० पानी पुस्तकात स्वत:च्या लग्नाविषयी फक्त पाच वाक्ये आहेत.
एकूण वाचनीय आहे. इतर पुस्तकंही वाचेन. वंशवृक्ष, गृहभंग,दातू,दूरसरिदरू वगैरे.

पर्व मला तरी खूप आवडतं. 'नवा प्रकाश' म्हणजे नेमकं काय म्हणायचंय ते कळलं नाही. पण प्रत्येक पात्राचा माणूस म्हणून केलेला विचार मला फार आवडला. तसंच रामायणावरचं 'उत्तरकांड'. सीतेच्या बाजूने रामायण मांडताना प्रत्येक पात्राचा माणूस म्हणून विचार केला आहे त्यांनी.
बाकी वंशवृक्ष भारीच आहे. मंद्र, तंतू, काठ हीसुद्धा छान आहेत. गृहभंग म्हणजे 'तडा' असेल तर ते नाही मला आवडलं.

भैरप्पा नी लिहिलेलं आत्मचरित्र वाचायला आवडेल .
वावे, तुला बहुतेक उत्तरकांड म्हणायचंय.
मलाही ते आवडलेलं.
आणि एक वाचलं होतं. हिंदू मुस्लिम लग्न , हम्पीवर डॉक्युमेंटरी वगैरे बनवत असतात दोघे आणि सुरवातीला एकमेकांच्या धर्माचा आदर असतो पण नन्तर त्याचा पावित्रा बदलतो. नाव विसरले मी.

भैरप्पांनी कोणत्या पुस्तकाची कथावस्तू कुठे केव्हा सुचली तेही दिलं आहे.
पुस्तकात बघून इथे देतो.
सर्वात मोठी गोष्ट ज्याबद्दल ठेचा लागल्या ती म्हणजे पोटदुखी. कुणाला कुणाची.

लहानपणी मामाने खूप बदडलं. तीर्थरूपांची वागणूक महा भयानक होती. नसल्यातच जमा. पण श्रेय घेण्यात एकूण ,सर्वच जण पुढे असत.

तत्त्वज्ञान विषय घेऊन उच्च शिक्षण का घेतलं तेही सांगितलं आहे.

पर्व मलाही फार आवडलं नाही. एक वेगळा दृष्टिकोन म्हणून सुरुवातीची १०० पानं वाचायला मजा आली. पण पुढे पुढे तो वेगळा विचार ओढून ताणून होतोय का असं सारखं वाटत राहिलं.

महाभारत,रामायण वाचतांना हजारो प्रश्न पडतात. लहानपणी आपल्याला या कथांतील धमाल प्रसंग आवडत असतात. नैतिकता वगैरे विचार हे दहावीनंतर समजतात. आणखी तीसपस्तीस वयानंथर आणखीच फाटे फुटतात. सत्ता कुणाला नको असते.
---------
भैरप्पांच्या काही पुस्तकाबद्दल त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे.
१) जट्टि मत्तु मट्टि ही कादंबरी पुढे भीमकाय या नावाने प्रकाशित झाली.
पहिलवान आणि वेश्यागमन यावर आधारित.
अठराव्या वर्षी.
२)गतजन्म
याच वेळी लिहिली.जनमित्र नियतकालिकात प्रकाशित.
३)बेळकु मूडितु ( प्रकाश प्रकटला)
जनमित्र नियतकालिकात प्रकाशित.
४)धर्मश्री.
हुबळी आणि मैसुरमधील ख्रिस्ती धर्मगुरुंचा प्रचार पाहून सुचलेली कादंबरी.
५)दूर सरिदरु ( दुरावलेले ). गुजरातमध्ये नोकरीला सहा वर्षे राहिल्यावर आलेल्या विचारांवर आधारित.
६)वंशवृक्ष.
भारतीय तत्त्वशास्त्र . पाच खंड.
भारतीय कलेची मूलतत्त्वे.
-- सुरेन्द्रनाथ दासगुप्ता. यांच्या लेखनामुळे आणि दासगुप्तांच्या गाजलेल्या दुसऱ्या लग्नामुळे लखनौमध्ये सुरमा दासगुप्तांना भेटून आल्यावर सुचलेलं कथानक.
७)दाटू
भारतात विविध ठिकाणी फिरताना दिसलेली जातींवर आधारित ,समाज-रचना पाहून सुचली.
८)गृहभंग
दिल्लीत नोकरीत असताना घराबद्दल लिहिलं ते इथे आत्मचरित्रात आहे.

रात्र काळी घागर काळी - चिं त्र्यं खानोलकर हे पुस्तक वाचलेय का कुणी? मागील पानांवर असेल चर्चा झालेली तर कृपया पान नं सांगा.

गृहभंग
कानडी लेखन - भैरप्पा
मराठी अनुवाद - उमा कुलकर्णी
मार्च २०२२,मेहता प्रकाशन. ३६० पाने,रु ४९०.
(वाचनालयातून)
भैरप्पांनी पंचविशीत लिहिलेली कादंबरी.१९२० -४५ च्या काळातील कर्नाटक. कुडूर ते चन्नरायपट्टण या भागातील एका कुलकर्णी पद चालवणाऱ्या घरातील कलह. सोबत प्लेगच्या साथीतील,आणि दुष्काळाचे वर्णन. समाजाची वागण्याची नोंद म्हणून आहे त्यासाठी ती गावं घेतली तरी तिथेच घडलंय असं नाही. काही संदेशही देण्याचा उद्देश नाही असं लेखक म्हणतो. पुरुषार्थ हरवलेले कुटुंब पुरुष फक्त बायकांना मारणे किंवा घाणेरड्या शिव्यांनी त्यांना बोलणे एवढ्यात धन्यता मानू लागलेले आहेत. मुलं होणे,लग्न आणि संसार रेटणे एवढीच कामे. या वर्णनापलिकडे कादंबरीत काही नाही. पुस्तक वाचलं नाही तरी चालेल.
भैरप्पांची अगदी सुरुवातीचीच कादंबरी असूनही मराठी भाषांतर २०२२ इतक्या उशिरा येण्याचं कारण दिलंय. पूर्वी national book trustकडे दिलं होतं पण त्याची प्रत मिळत नाही आणि त्यांनी पुन्हा छापलं नाही. ते हक्क भैरप्पांनी काढून घेतले आणि मेहता पब्लिशिंगने अनुवाद प्रकाशित केला.

हे भैरप्पा एक कल्ट टाइप आहे. मी पर्व वाचायचा प्रयत्न केला. एकदम नीर स लेखन आहे. शैली फारशी नाहीच. त्यामुळे बोअर होते.

भैरप्पा चे आवरण, तडा,उत्तराकांड,वंशवृक्ष,परिशोध वाचलेत..पैकी तडा फार संथ वाटलेली बाकी ठिक.

वुई दी लिविंग हे अ‍ॅन(आयन) रँडचे अनुवादित पुस्तक वाचले.सोव्हियेत क्रांती,साम्यवाद आणि त्यचे दुष्परिणाम याची पार्श्वभूमीवरील कादंबरी आहे.सुन्न व्हायला होते.
आमच्या एक प्रोफेसर नेहमी या लेखिकेची पुस्तके वाचायला सांगायच्या.एकदा "दि अ‍ॅट्लास श्रग्ड" आणले होते.पण त्या वयात एवढे मोठे पुस्तक इंग्रजीतून वाचायचे म्हणजे कठीण होते.शेवटी न वाचता परत केले होते.रँडची वरची कादंबरी वाचल्यावर आपण काय मिस केले हे कळले.

मंद्र मला खूप आवडलं! Proud

एकंदरीत भैरप्पांच्या पुस्तकांच्या बाबतीत दोन्ही टोकाची मतं ऐकली आहेत हे खरं!

चांगला परिचय लिहित आहात सर्वजण.
गेल्या काही महिन्यांमध्ये हा धागा सुरेख चालू आहे याचा आनंद वाटतो

एकंदरीत भैरप्पांच्या पुस्तकांच्या बाबतीत दोन्ही टोकाची मतं . . . .
भैरप्पा नावाजलेले लेखक आहेत हे ऐकून होतो. पण पूर्वग्रह न ठेवता एक एक मिळेल तसे वाचतो आहे. मुख्य म्हणजे यांचे निरीक्षण चांगले आहे. ते तत्त्वज्ञान घेऊन पीएचडी झाले आहेत. पण आपल्या शोधनिबंधासाठी लागेल तेवढेच त्यांचे वाचन नसून अवांतर भरपूर वाचन केले आहे.( बऱ्याच लेखकांचा आणि पुस्तकांचा 'भित्ती'मध्ये उल्लेख आहे.) कॉलेजात हा विषय शिकवत राहाण्यापेक्षा कादंबरीतून समाज उलगडतात आणि हे एक मोठे कार्य आहे. समाजचित्रण करणे काम आहे. पर्यटनही भरपूर केले आहे. 'भित्ती' हे आत्मचरित्र सर्वात वरचे आहे. मला आवडली नाहीत ती पुस्तके बाद नव्हेत. तर मी त्यात करमणूक,मनोरंजन शोधायला गेलो ही माझी चूक आहे. समजा श्रीनापेंडसे किंवा शंकर पाटील,जयवंत दळवी,व्यंमा यांनी आजुबाजूचा समाज कथांमध्ये आणलाच नसता तर?

आज दुर्गा भागवत चरित्र (प्रकाशन २०१८) - अंजली कीर्तने आणलं आहे.

आल्बेर काम्यूच्या 'द आउटसाइडर' या कादंबरीचा अवधूत डोंगरेंनी अलीकडेच केलेला मराठी अनुवाद वाचला. मराठी कादंबरीचं नाव आहे- 'परका'

इकडून तिकडून बऱ्याच वेळा या कादंबरीचा उल्लेख ऐकला/वाचला होता.
छोटेखानी कादंबरी आहे. सव्वाशे वगैरे पानांची.
एका खटल्याचं कामकाज आणि गिलोटिनची (देहदंड) शिक्षा असा साधारण प्लॉट.

वाचायला लागलो तेव्हा सुरुवातीला दहा पंधरा पानं मला काही कळेचना की लेखकानं एवढ्या क्षुल्लक गोष्टींच्याही इतक्या तपशीलवार नोंदी का केल्या आहेत ते..! फसगत झाल्यासारखं वाटत होतं पण तरीही नेट धरून पुढं वाचत गेलो...आणि मग कळायला लागलं की हे पाणी किती खोल आहे ते..! आणि त्या बारीकसारीक नोंदी उगाच टाईमपास म्हणून केलेल्या नाहीयेत ते..!

मग पुढे पुढे झालं असं की माझ्याकडून सगळ्याच ओळी आपोआप अधोरेखित व्हायला लागल्या..! (काही शब्दांखाली खास पर्सनल खुणा व्हायला लागल्या.. ज्या पुढे नंतर कधीतरी वाचताना फक्त मलाच कळतील..)
कारण ते सगळं तसंच आहे...! पानंच्या पानं भरून सपासप वार आहेत..! माणसाचं आयुष्य म्हणून साधारणपणे जगण्याची जी पद्धत असते, त्यासंबंधी अत्यंत जिव्हार प्रश्न आहेत..!
म्हणजे उदाहरणार्थ तुरुंगात असलेलं, मृत्यूच्या पुढ्यात असलेलं एखादं पात्र एवढ्या सखोल पद्धतीने, डोकं ठिकाणावर ठेवून चिंतन मांडू शकतं, एकेक विचार सुटा करून उलटून पालटून बघू शकतं.. हे वाचून समजून घेत असताना आपण आश्चर्यचकित व्हावं की हादरून जावं, हेच कळत नाही..!

तसं बघायला गेलं तर.. 'समाज' नावाच्या संकल्पनेत एखाद्या 'स्वायत्त व्यक्ती'चं अस्तित्वच बेदखल केलं जाणं..! किंवा 'व्यक्तिमत्व' 'इंडीव्हीजुॲलिटी' ही समाजाला/व्यवस्थेला/धर्माला/नीतीमत्तेला वगैरे धोकादायक वाटणं..! यासंदर्भात आजवर इतरही लेखकांनी, विचारवंतांनी लिहिलेलं आहे..

पण..
स्वतःच्या मनात चालणाऱ्या हालचालींचं जबरदस्त प्रत्ययकारी चित्रण..! स्वतःला जे जाणवलंय ते लिहिताना बिलकुल कशाची भीडभाड न ठेवणं...! आणि त्याचबरोबर लोकांच्या दिखाऊपणावर अत्यंत मर्मज्ञ टोलेबाजी...! आणि शिवाय हे लिहित असताना मनात या सगळ्याबद्दल किंचितही किल्मिष नाही, रागलोभ नाही..!
उलट एखाद्या महाकाव्यासारखा एक शांत प्रवाह वाहता ठेवणं शब्दांमधून..!! ही खरी कमाल आहे..!!

अर्थात, स्वतःकडे निर्विकारपणे बघण्याची प्रदीर्घ सवय असलेल्या तत्वज्ञ वृत्तीच्या लेखकाकडूनच अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहून होत असाव्यात.. आणि असे लेखक काही रोज रोज पैदा होत नाहीत.. हे ही एक आहेच.

Pages