Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
'श्री नर्मदा दर्शन
'श्री नर्मदा दर्शन
प्रथमावृत्ती: ऑक्टोबर २०१४
लेखिका : रेवाशंकर ( दि. अ. जोशी)
पाने ३४०
रु २००
-----------
परिक्रमेवर काही गाजलेली पुस्तकं आहेत. ती २-४ वाचली होती. त्या लेखकाला आलेले अनुभव आणि यात्रा वर्णन दीड दोनशे पानी. त्यात अध्यात्म. पण हे पुस्तक आवडले. यात बऱ्याच परिक्रमा केलेल्या यात्रेकरुंचे अनुभव संकलन केलंय. एक ते चार पानी वर्णन. शिवाय सर्व प्रकार आहेत. संपूर्ण साडेचार महिने (३००० + किमी)पायी चालत ते पंधरा/तीस/६० दिवस पायी बाकी वाहनाने असेही आहेत. तसेच अगदी भाविक ते कुतुहलवाले तसेच फार काटेकोर नियम न पाळणारेही आहेत. नियमीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत काहींनी. अश्वत्थामा भेटला का?/मैयाने दर्शन दिले का?/लुबाडणूक होते का?/परिक्रमेचे नियम पाळले का? इत्यादी.
रेवाशंकर - रेवा ( उच्चार रिवा) हे नर्मदेचे एक नाव आहे. तिला शंकराची कन्या मानतात. परिक्रमा रीतसर सुरू करताना ( बहुधा ओंकारेश्वरापासून)
कन्यादान,कन्याभोजन विधि करून भाविक नर्मदेचं पाणी बाटलीत भरून घेतात आणि चालायला सुरुवात करतात. ( = परिक्रमा उठाना). शंकराची कन्या म्हटली तरी परिक्रमा करणाऱ्यांची ती माता ,मैया असते. बोलताना 'नर्मदे हर' अशी सुरुवात करायची आणि तोच प्रतिसाद द्यायचा 'नर्मदे हर.' पण एरवी फक्त मैया म्हणायचं.
पुस्तक कुठेही उघडायचं आणि वाचायचं. मला आवडलं. मी कधीच जाणार नाही. मला जमणार नाही. पण तरीही यात्रावर्णन म्हणून आवडलंच.
मी एक भटकंती म्हणून पुस्तक वाचले. पिशवीत काय काय नेतात. जेवण ,झोप कुठे? डास फार फोडतात, पहिले दोन महिने थंडी आणि नंतरचे दोन उन्हाळा त्रास होतो यावर एक मत आहे.
मॉलमध्ये मंगोल (सतीश तांबे)
मॉलमध्ये मंगोल (सतीश तांबे)
कथासंग्रह
'मानगुटीवर बसलेल्या ग्लोबलायझेशनच्या वेताळाला' अशी अर्पणपत्रिका पाहून पुस्तक वाचावंसं वाटलं. बहुतेक कथांचं बीज चांगलंच आहे, पण कथाविस्तार आणि निवेदन मला खूपच पाल्हाळिक वाटलं.
सगळ्या कथा प्रथमपुरुषी निवेदनात आहेत. पुस्तकाच्या मध्यात त्याचाही जरा कंटाळाच आला. (लेखकाची शैलीच तशी आहे, की या पुस्तकात हा योगायोग आहे, ते माहिती नाही.) कथा प्रथमपुरुषी केव्हा लिहितात, केव्हा लिहावी, याबद्दलचे काही ठोकताळे असतील तर मला कल्पना नाही. पण सरसकट सगळ्या कथा तशाच, हे मी पहिल्यांदाच पाहिलं.
मध्यमवर्गीय वातावरण, तशीच पात्रं, भाषा साधी-सोपी, समोर बसून गप्पाटप्पांत आठवणी/अनुभव सांगावेत अशी शैली - या पुस्तकातल्या चांगल्या गोष्टी.
पण अर्पणपत्रिकेतला भेदकपणा एकाही कथेत मला तितकासा दिसला नाही.
काही वर्षांपूर्वी या पुस्तकावर पेपरमध्ये, फेसबूक पोस्टींतून बरंच वाचलं होतं. म्हणून फार अपेक्षेने पुस्तक वाचलं; पण मला विशेष आवडलं नाही.
अर्थानुभूती (लेखसंग्रह)।
अर्थानुभूती (लेखसंग्रह)। चन्द्रशेखर टिळक
ISBN No. : 978-93-88602-79-2
हे पुस्तक वाचलं म्हणण्यापेक्षा वाचण्याचा प्रयत्न केला. १९८८ पासून साडेतीन हजारांवर दिलेल्या भाषणांतून सहा लेख तयार करून दिले आहेत. समाजकारण, अर्थशास्त्र, गुंतवणूकीचे मानसशास्त्र, जागतिकीकरण आणि महिला उद्योजकता यांवर विचार मांडले आहेत. इंग्रजीचा रेटा जाणवतो आहे. सुरवातीलाच लेखक म्हणतो की अर्थशास्त्र हा नावडता विषय होता आणि अजूनही आहे हे लेख वाचताना जाणवतं. बाकी यामध्ये सामान्य माणसासाठी वाचण्यासारखं काही नाही.
आत्ताच 'द ओल्ड मॅन अँड द सी'
आत्ताच 'द ओल्ड मॅन अँड द सी' वाचून झाले. छान आहे पुस्तक.
https://www.goodreads.com/book/show/2165.The_Old_Man_and_the_Sea
हे एक रूपक आहे काय?( Old man
हे एक रूपक आहे काय?( Old man and the sea)
@Srd रूपक पण आहे आणि कथा पण
@Srd रूपक पण आहे आणि कथा पण आहे एका मासेमाऱ्याची. त्याचे प्रयत्न एक मार्लिन मासा पकडण्याचे
त्याचा अनुवाद, एका कोळीयाने (
त्याचा अनुवाद, एका कोळीयाने (- पु ल) वाचला होता. अनेकांनी वाचला असेल. अतिशय सुंदर कथा आणि अनुवादही छान आहे.
त्यावर अमिताभला घेउन कोणीतरी
त्यावर अमिताभला घेउन कोणीतरी पिक्चर काढणार होते. काम सुरूही झाले होते. नंतर काय झाले माहीत नाही.
पिच्चरवाले पुस्तकातल्या न
पिच्चरवाले पुस्तकातल्या न बोलणाऱ्या पात्राला बोलायला लावून वाट लावतात.
नारायण नारायण.
इर्फान खान शोभला असता ह्या
इर्फान खान शोभला असता ह्या भूमिकेत. पण त्याने लाईफ ऑफ पाय केल्यामुळे कदाचित हा केला नसता. नाहीतर सगळ्या समुद्री भूमिका त्याच्या वाट्याला आल्या असत्या.
ओमपुरीने पण चांगला केला असता.
ओमपुरीने पण चांगला केला असता.
ओमपुरीने पण चांगला केला असता.
ओमपुरीने पण चांगला केला असता.+१
अगदी हेच मनात आले. रच्याकने, अमिताभ कितीही उत्तम काम करत असला तरी या भुमिकेत म्हातारबा म्हणून त्याच्याबद्दल सहानुभूती वाटणार नाही.
कुमारसरांनी या पुस्तकावर लिहिलेय.
https://www.maayboli.com/node/73602
ओम पुरीने चांगला केला असता +१
ओम पुरीने चांगला केला असता +१
अनुपम खेरही चांगला करेल.
पण पुस्तकात वाचायला जे आवडलं ते पडद्यावर तितक्याच चांगल्या प्रकारे दाखवण्यासाठी दिग्दर्शन उत्कृष्ट हवं. नाही तर कंटाळवाणं होईल.
पुस्तक कुठेही उघडायचं आणि
पुस्तक कुठेही उघडायचं आणि वाचायचं. मला आवडलं. मी कधीच जाणार नाही. मला जमणार नाही. पण तरीही यात्रावर्णन म्हणून आवडलंच. >>> हे विशेष आवडलं. परिक्रमा करणाऱ्यांबद्दल फार आदर आहे. पुस्तक नोटेड.
लाइफ अण्ड डेथ इन शांघाय
लाइफ अण्ड डेथ इन शांघाय लेखिका : निएन चंग अनुवाद : निर्मला स्वामी-गावणेकर
आवृत्ती पहिली : डिसेंबर २००३ आवृत्ती दुसरी : एप्रिल २००५
ISBN 81-7434-265-6
किंमत : २५० रुपये
पाने ३५०
((मूळ इंग्रजी पुस्तक : Life and Death in Shanghai by Nien Cheng, 1995* Year of first publication in the UK))
हे मराठी अनुवादीत पुस्तक मिळालंय.
लेखिकेने १९३४ साली लंडन स्कूल ओफ इकनॉमिक्समधून पदवी घेतल्यानंतर शांघायमध्ये स्थानिक. नवरा 'शेल' या कंपनीत व्यवस्थापक. त्याच्या निधनानंतर लेखिकेला नोकरीत घेण्यात आलं.
चीनमध्ये सतत राजकीय उलथापालथ होत होती. काम्युनिजममध्येही बरेच प्रवाह आले. १९६६मध्ये लेखिकेस 'साम्राज्यवाद्यांची दलाल' ( बहुराष्ट्रीय कंपनीची नोकरी, भलं करणे म्हणजे)या आरोपाखाली साडेसहा वर्षे तुरुंगात टाकण्यात आले. त्या वेळी तिला मेपिलची ( मुलीची) सतत काळजी वाटायची. तर विसाव्या शतकातील चीनचा ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक प्रवास लेखिकेने अनुभव स्वरुपात मांडला आहे. पुस्तक वाचनीय वाटत आहे. प्रवासात किंवा मोठ्या सुटीत वाचण्यासाठी चांगले पुस्तक म्हणेन.
अनुवादही चांगला केला आहे.
फार पूर्वी ('६८मध्ये) पर्ल बक'ची कादंबरी 'द गुड अर्थ' वाचली होती. चीनी शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. तो काळ थोडा अगोदरचा असावा. मुलगी सुंदर दिसणे म्हणजे तिची पावलं लहान हवीत हा समज आणि त्यासाठी ती आवळून बांधत .नंतर हुंडा.
समाजवाद आणता आणता शेती आणि औद्योगिक उत्पादन घसरू नये म्हणून किंचित साम्राज्य वाद आणि भांडवलशाहीही लागते हे नेत्यांच्या लक्षात येऊन बदल केला की पुढचा नेता त्याला समाजवादविरोधी ठरवतो आणि सत्ता हातात घेतो. मग आता १९९५ - २०२० मध्ये चीन केवढा आर्थिक महासत्ता झाला आहे हे आपण पाहतोच आहे.
((समाजवाद हा थोडा एकत्र कुटुंबपद्धतीसारखा मला वाटतो. मठ्ठ,सुस्त,आहे ते चालू ठेवणाऱ्यांचा यात फायदा असतो. सुट्ट्या विभक्त कुटुंबात तुमच्या कष्टाचे फळ तुम्हालाच मिळते. डोकेबाज,चटपटे लोक यात सहज प्रगती साधतात. हे साम्राज्यवाद,स्वतंत्र पद्धतीचे फळ आहे. जर का कष्टाचे चीज आणि परतावा नसेल तर कोण धडपड करेल? ))
फार पूर्वी डे हाँग नावाचे
फार पूर्वी डे हाँग नावाचे पुस्तक चिन मधील जीवना वर वाचले आहे अप्रतिम पुस्तक आहे.
लाइफ अण्ड डेथ इन शांघाय -
लाइफ अण्ड डेथ इन शांघाय - परिचय आवडला.
मला सतीश तांबेंच्या कथा आवडल्या. पसरट, पाल्हाळिक असतात. पण त्यांतला थॉट आवडतो.
मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट नावाची एक दीर्घकथा आहे. वाचतानाच दमायला झालं.
कथाबीज ते नोबल पारितोषिक
कथाबीज ते नोबल पारितोषिक
एप्रिल १९३६, Esquire मासिकात The old man and the seaचे कथाबीज असलेली छोटी गोष्ट Earnest Hemingway च्या एका क्युबातील मित्राने त्याला सांगितली होती ती त्याने लिहिलेली सर्वांना आवडली होती. पण मध्यंतरी स्पनिश यादवी युद्धावर एक कथा पुस्तक लिहिले गेले आणि old man १५ वर्षे मागे पडले. जानेवारी १९५१ मध्ये Life मासिकाने मोठी गोष्ट छापली आणि १९५२ मध्ये पुस्तक आले. १९५४ मधले साहित्याचे नोबल Hemingwayला मिळाले! मासा गेला सँन्टियागोचा पण नोबल देऊन गेला. . . .पुस्तकाचा प्रकाशक Scribner Jr. ने दिलेली माहिती.
. एक म्हातारा कोळी गळाने मासा पकडायला होडके घेऊन जातो . . . नेहमीप्रमाणे रिकामा न येता या वेळेस एक मोठा मासा गळाला लागतो . . त्याला जवळ ओढायचे मग दांडक्याने मारून होडक्यात घ्यायचे (असा शिरस्ता) . . . पण मासाच त्याला ओढतो . . दमला की कोळी त्याला ओढतो . . पुढे . . .दोन दिवस आणि रात्री जातात या ओढाओढीत . . कुणीच हार जात नाही . . . शेवटी . . . शार्कनी खाऊन शिल्लक थोडाच भाग हाताशी येतो. क्युबातच राहायला गेलेल्या हेमिंग्वेने या मूळ कथेत बराच स्थानिक मसाला भरलाय. त्यामुळे रंगतदार झालंय कथानक.
((पुस्तक गाजलेले जुने आहे आणि कथाबिजापेक्षा वर्णन मजेदार असल्याने स्पॉइलरकडे दुर्लक्ष केलंय.))
चीनवरचे मी वाचलेले सर्वात
चीनवरचे मी वाचलेले सर्वात उत्तम पुस्तक म्हणजे वाईल्ड स्वान्स. आजी, मुलगी आणी नात यांचा चीनच्या इतिहासाच्या बॅक्ड्रॉपवर घडणारा प्रवास फार प्रवाही पुस्तक आहे.
चीनवरचे मी वाचलेले सर्वात
चीनवरचे मी वाचलेले सर्वात उत्तम पुस्तक म्हणजे वाईल्ड स्वान्स. आजी, मुलगी आणी नात यांचा चीनच्या इतिहासाच्या बॅक्ड्रॉपवर घडणारा प्रवास फार प्रवाही पुस्तक आहे.
>>> किंडलवर पाहिलंय हे पुस्तक.
मागे एकदा अनयाने 'थ्री डॉटर्स ऑफ चायना' पुस्तकावर लेख लिहिला होता. तेव्हापासून ते पुस्तक शोधत होते. किंडलवर ते अजून सापडलं नाही. पण सर्चमध्ये हे दिसलं होतं.
हे तेच म्हणावं का? नाव बदलून नवी आवृत्ती आली आहे का? कळायला मार्ग नाही.
हो तेच. मी सुद्धा किंडलवरच
हो तेच. मी सुद्धा किंडलवरच वाचले. फार ओघवते आहे पुस्तक. Jung Chang हे लेखिकेचे नाव.
That Will Never Work: The
पुस्तक परिचयाचा मजकूर इथे पोस्ट केला होता. पण आता वेगळा धागा काढला आहे.
https://www.maayboli.com/node/81667
ओके, पुंबा,
ओके, पुंबा,
किंडलवर शोधते पुन्हा.
Wild swans -
Wild swans -
क्रोम ब्राउजर सर्चमध्ये टाकल्यावर Amazon link येते। त्यात किंडल रु २५५ आणि इतर रु ४०० दिसतंय.
( kindle Unlimited नसावं.)
शारदा संगीत हा कथासंग्रह
शारदा संगीत हा कथासंग्रह प्रकाश नारायण संत ( भालचंद्र गोपाळ दीक्षित) यांचा वाचायला घेतला. लंपन नावाचे कथा पात्र ( दहा बारा वर्षांच्या शाळकरी मुलांचे भावविश्व त्याच्याच शब्दांत ) निर्माण करणारे ते हेच लेखक. त्यांच्या काही कथा मौज'मधे '८९-'९० साली वाचल्याचं अंधुक आठवतंय. म्हणून आता कसा वाटतोय हा विचार केला. पाच कथा आहेत. शेवटची शारदा संगीत ही कथा एक पारितोषिक मिळवलेली. त्यात लंपनचाच पुढचा भाग म्हणजे शारदा संगीत विद्यालयात पेटी शिकायला मिळते आणि शिक्षक म्हापसेकरांची ओळख.
इतर चार कथांतही वातावरण धारवाड,बेळगाव,शहापूर,कारवारचा मराठी समाज. कानडी वळणाची मराठी भाषा आहे. लंपनच्या भावविश्वात येणाऱ्या कथा आहेत. शाळा, तिथले सवंगडी, मोठ्या {लंपनवर 'क्रश' असलेल्या} ताया ,आजुबाजुच्या काकू,मावश्या,आज्या येतात. काळ '६०चा. अधुनमधून 'मालगुडी डेज' वाचतोय असं वाटलं.
पण आता या कथा नवीन पिढी वाचेल का शंकाच वाटते.
शब्द, सूर, डोंगरवाटा
शब्द, सूर, डोंगरवाटा
लेखक - मिलिंद गुणाजी ©
आवृत्ती पहिली : ऑक्टोबर २०११
(४० गड/डोंगर . ८५ कृष्णधवल आणि १५ रंगीत फोटो. पण कसे जावे हे नकाशे रेखाटनं पूर्वी गुणाजीनी इतर पुस्तकांत दिली आहेत ती यामधे नाहीत. त्याऐवजी ललित वाक्ये आणि पुस्तकाच्या नावातील सूर म्हणजे संगीतातील वर्णनं देऊन डोंगरवाटांची भेळ उरकली आहे. काळी पांढरी चित्रेही कामाची नाहीत.
ISBN 978-81-7434-555-4
किंमत : ₹१६०/
पाने १४०
लंपन
लंपन
सोनी लिव्ह संतांच्या पुस्तकांवर सिरीज घेऊन येणार आहे असे कळले.
डायलॉगसाठी एका बेळगावकर मित्राला विचारले गेले होते.
त्याने ओरिजिनल फ्लेवर तसाच ठेवायचा आग्रह धरला, परंतु सोनी लिव्हवाल्यांना डायलॉग्स पुलंच्या "रावसाहेब" छाप बुलशीट पुणेकरांच्या मनातले बेळगावी पाहिजे आहेत असं कळलं. त्यामुळे मित्राने नकार दिला व सिरीजचा गाभाच काढला जाईल असा इशारा दिलाय.
आता ही सिरीज आलीच तर काय वाट लावतील ते पाहावं लागेल.
"एक होता कार्व्हर" हे वीणा
"एक होता कार्व्हर" हे वीणा गवाणकरांचे पुस्तक वाचले. मला या पुस्तकाबद्दल काहीच ठाऊक नव्हते. फेसबुकवर एकाने दुर्मिळ पुस्तकांचा ग्रुप काढला त्यामध्ये हे पुस्तक वाचायाला हवं असं एकाने कॉमेंट केली. माझ्या लायब्ररीमध्ये नशिबाने हे पुस्तक धूळ खात पडलेले होते.
पुस्तक खूप चांगले वाटले. भाषा सोपी आहे. हे सगळं खरं आहे यावर माझा अजिबात विश्वास बसत नव्हता. मायबोलीकर आवर्जून पुस्तक वाचा हे.
त्यामुळे मित्राने नकार दिला व
त्यामुळे मित्राने नकार दिला व सिरीजचा गाभाच काढला जाईल असा इशारा दिलाय......खरंय! तुमच्या मित्राच्या अशा भूमिकेबद्दल कौतुक वाटले.
एक होता कार्व्हर, खरंच छान पुस्तक आहे.
एक होता कार्व्हर
एक होता कार्व्हर
या कार्वरचे थोडक्यात चरित्र इथे सापडले. ते वाचले.
Pages