सध्या परिस्थिती अशी आहे की जगभरात बहुतेक सगळीकडेच महागाई वाढत आहे. त्यामुळे बहुतेक देशात व्याजदर वाढवले जात आहेत, ज्यामुळे महागाई आटोक्यात येईल. याचा एक परिणाम म्हणजे फायदेशीर व्यवसाय करणे, हळूहळू बऱ्याच कंपन्यांना कठीण होईल आणि त्यातूनच मग लेऑफ म्हणजे नोकऱ्या जाण्यास सुरुवात होणार आहे. म्हणून सर्वांना सावध करण्यासाठी हा धागा काढला आहे. कामावरून काढताना कंपनी आणि एच.आर. अजिबात दयामाया दाखवत नाही असा माझा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, म्हणून कृपया गाफील राहू नका.
१. तुमचे स्किल वाढवत रहा. नवीन गोष्टी शिकत रहा.
२. तुम्ही काम कसे केले, ते मॅनेजरला सांगू नका. फक्त रिझल्ट दाखवा.
३. कामाची पद्धत किंवा तुम्ही वापरता त्या युक्त्या कुणाला शिकवू नका.
४. मॅनेजमेंटवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या कामावर आणि कर्तबगारीवर विश्वास ठेवा.
५. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुणाचीही नोकरी कधीही जाऊ शकते, म्हणून नेहमी डोळे व कान उघडे ठेवा.
६. अवास्तव खर्च करू नका.
७. अडीअडचणीला कामी येईल, म्हणून नेहमी बचत करून थोडे पैसे हाताशी ठेवा.
पुढे येणाऱ्या संकटाची जाणीव करून देण्यासाठी सांगत आहे. जसे वाईट दिवस जातात, तसे चांगले दिवसही बदलतात. नोकरी चालू असेल, तेव्हा फक्त बोनस आणि प्रमोशन समोर दिसते पण परिस्थिती अचानक बदलू शकेल, हा विचार सहसा मनात येत नाही. कुणाला घाबरवायची इच्छा नाही, पण म्हणून तहान लागल्यावर विहीर खोदायला जाणे हे शहाणपणाचे होणार नाही.
दोन-चार ठिकाणी ओळखीच्यात ले-ऑफ झाल्याचे कानावर आले. तुम्ही पण कुठल्या कंपनीत नोकर कपात झाली अथवा नवीन भरती न करणे (ऑफर लेटर रद्द करणे), ऐकले असेल तर इथे लिहू शकता.
रिसेशनला आपण avoid करू शकत
रिसेशनला आपण avoid करू शकत नाही.. ग्रोथ हवी असेल तर रिसेशन येणार.
जेव्हा आपल्याला नोकरी मिळते, आपण रिस्क अनालीसीस करत नाही.. घर घ्या, सोनं घ्या ह्या गोष्टीच्या मागे लागतो.
नोकरी लागली कि पहिल्यांदा सहा महिन्याचा घरखर्च बँकेत वेगळा ठेवा..
चार वर्षाचा घरखर्च एफडी करून ठेवा..
कुटुंबासाठी मेडीकल इन्शुरन्स घेऊन ठेवा..
यानंतर जे हवं ते करू शकतो..रिसेशन दोन वर्षापेक्षा जास्त नसते त्यामुळे चार वर्षाचा फायनान्शियल बैकअप असेल तर नोकरी गेली तरी जास्त फरक पडणार नाही..
अर्थात प्रत्येकाला आपापले स्कील्स अपग्रेड केले पाहिजेत
त्याचवेळी मार्केटमध्ये सध्या कुठल्या स्कील्स valubale आहेत हे हि माहिती हवे.
बरोबर मृणाली.
बरोबर मृणाली.
रामदास पाध्ये आणि अर्धवटराव
रामदास पाध्ये आणि अर्धवटराव आठवला >>>.
पटले मृ !
चांगले लिहिलेय उबो .
बापरे! लिपसिंकींग खरंच माहिती
बापरे! लिपसिंकींग खरंच माहिती नव्हते.
छान विषय आहे.
छान विषय आहे.
२०० % पगारवाढ हे outlier आहे, अपवादानेच असे काही उदाहरण आढळेल. फार मोठा पगार हा शिव्या खाण्यासाठी , वाईट शब्द झेलण्यासाठी पण मिळतो आणि कधीपण गच्छंतीची शक्यता असते. आजघडीला भारतात ५० लाख IT नोकर्या आहेत अशी NASSCOM ची माहिती सांगते. कामधंदा/ नोकरी करु शकतील अशा १०० कोटी लोकांमधे हे < ०.५ % प्रमाण आहे आणि या प्रत्येकाला पगारवाढ नाही आहे.
पगारवाढ विसरा, आहे ते जॉब टिकविण्यासाठीच सर्वसामान्य धडपडत आहे.
work culture ethics हे देश/ काम करणार्या लोकांच्या समुहाच्या संस्कृती प्रमाणे बदलतात.
लिपसिंकींग खरंच माहिती नव्हते
लिपसिंकींग खरंच माहिती नव्हते. >>> मलाही.
Video interview असताना आम्ही विचारलेले प्रश्न परत मोठ्याने बोलून google voice search वापरून मिळालेली उत्तरे वाचून दाखवणारे काही महाभाग सापडले होते.
>>३. कामाची पद्धत किंवा
>>३. कामाची पद्धत किंवा तुम्ही वापरता त्या युक्त्या कुणाला शिकवू नका.
ह्याबाबतीत सदसदविवेकबुध्दी व तारतम्याने निर्णय घेण्याची गरज असते. माझा मॅनेजर मला म्हणाला कि माझ्या हाताखाली काम करणार्या कर्मचार्याला सर्व काही शिकव. जर तू नसशील तर काम अडले नाही पाहिजे. पण हाच मॅनेजर त्याच्या वरिष्ठांकडुन आलेली माहीती अगदी फिल्टर करुन आमच्यापर्यंत पोहोचवत असे. आणि नंतर नंतर नव्या लोकांवर जास्त भिस्त ठेवुन जुन्या लोकांना घाबरवायला लागला. जवळपास सर्व जण टीममधुन निघुन गेले. थोडक्यात तुमच्या हाताखाली काम करणार्या मनुष्याची व तुमच्या वरिष्टांची नियत काय आहे हे माहीती करुनच ज्ञान देण्याचा निर्णय घेणे योग्य ठरते.
आम्ही विचारलेले प्रश्न परत
आम्ही विचारलेले प्रश्न परत मोठ्याने बोलून google voice search वापरून मिळालेली उत्तरे वाचून दाखवणारे काही महाभाग >>>> कमाल आहे हे _/\_
२००% हाईक?
२००% हाईक?
शक्य आहे. अस पहा
मिनरल वाटर बॉटल आमेझान वर १८ रुपये, इराण्याकडे २५ ,
मल्टीप्लेक्स मध्ये ४० रुपये,
फाईवस्टार हॉटेल मध्ये १००, तर एअरपोर्ट वर १५९ रुपये.
तात्पर्य तीच बॉटल तेच पाणी! कोण कुठे विकत घेतो, किती तहान लागली आहे? यावर सगळ अवलंबून आहे.
पाणी पिऊन झाल्यावर ती बॉटल.....
लिपसिंकींग खरंच माहिती नव्हते
लिपसिंकींग खरंच माहिती नव्हते.>> मला ही हाईट च आहे ही चिटींग ची. असे लोक जॉईन झाले तरी २ आठवड्यातच त्यांची खरी लायकी एम्लोयर ला कळेल.
गूगल व्होईस तर कहर च आहे
२०० % पगारवाढ हे outlier आहे,
२०० % पगारवाढ हे outlier आहे, अपवादानेच असे काही उदाहरण आढळेल. >>+१
दोन वर्षांनी पहिला जॉब सोडून
दोन वर्षांनी पहिला जॉब सोडून दुसर्या जॉबला गेलेलो तेव्हा झालेला माझा पगार अडीचपट.
पण मग पुढचे दोन वर्षे प्रत्येकी ४ - ४ टक्के वाढला
रिलायन्सची गोष्टच वेगळी
अमेरिकेत मिळतोय अडीचपट पगार-
अमेरिकेत मिळतोय अडीचपट पगार- पण बेस जास्त वाढवत नाहीत- स्टोकस वाढवून देतात...
२००% वैगरे मिळणार्यांना आधीचा
२००% वैगरे मिळणार्यांना आधीचा एम्लॉयर खुप कमी देत असतांनाची शक्यता आहे..
लिपसिंकींग च्या एका व्हीडीओ मधे तर मुलगी चुकुन मुलाचा व्हाईस लाउन बसली होती - अस एक व्हीडीओ युट्युब वर होता.. इन्टर्व्हूवर ने सांगितल्यावर तिच्या लक्शात आलं आणी तिने पटकन कॉल बन्द केलेला.. हाहा
<< इन्टर्व्हूवर ने
<< इन्टर्व्हूवर ने सांगितल्यावर तिच्या लक्शात आलं >>
Pages