सध्या परिस्थिती अशी आहे की जगभरात बहुतेक सगळीकडेच महागाई वाढत आहे. त्यामुळे बहुतेक देशात व्याजदर वाढवले जात आहेत, ज्यामुळे महागाई आटोक्यात येईल. याचा एक परिणाम म्हणजे फायदेशीर व्यवसाय करणे, हळूहळू बऱ्याच कंपन्यांना कठीण होईल आणि त्यातूनच मग लेऑफ म्हणजे नोकऱ्या जाण्यास सुरुवात होणार आहे. म्हणून सर्वांना सावध करण्यासाठी हा धागा काढला आहे. कामावरून काढताना कंपनी आणि एच.आर. अजिबात दयामाया दाखवत नाही असा माझा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, म्हणून कृपया गाफील राहू नका.
१. तुमचे स्किल वाढवत रहा. नवीन गोष्टी शिकत रहा.
२. तुम्ही काम कसे केले, ते मॅनेजरला सांगू नका. फक्त रिझल्ट दाखवा.
३. कामाची पद्धत किंवा तुम्ही वापरता त्या युक्त्या कुणाला शिकवू नका.
४. मॅनेजमेंटवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या कामावर आणि कर्तबगारीवर विश्वास ठेवा.
५. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुणाचीही नोकरी कधीही जाऊ शकते, म्हणून नेहमी डोळे व कान उघडे ठेवा.
६. अवास्तव खर्च करू नका.
७. अडीअडचणीला कामी येईल, म्हणून नेहमी बचत करून थोडे पैसे हाताशी ठेवा.
पुढे येणाऱ्या संकटाची जाणीव करून देण्यासाठी सांगत आहे. जसे वाईट दिवस जातात, तसे चांगले दिवसही बदलतात. नोकरी चालू असेल, तेव्हा फक्त बोनस आणि प्रमोशन समोर दिसते पण परिस्थिती अचानक बदलू शकेल, हा विचार सहसा मनात येत नाही. कुणाला घाबरवायची इच्छा नाही, पण म्हणून तहान लागल्यावर विहीर खोदायला जाणे हे शहाणपणाचे होणार नाही.
दोन-चार ठिकाणी ओळखीच्यात ले-ऑफ झाल्याचे कानावर आले. तुम्ही पण कुठल्या कंपनीत नोकर कपात झाली अथवा नवीन भरती न करणे (ऑफर लेटर रद्द करणे), ऐकले असेल तर इथे लिहू शकता.
१००-२००% ची जंप मिळतेय म्हणजे
१००-२००% ची जंप मिळतेय म्हणजे या लोकांचा मूळात पगार किती? प्रामाणिक प्रश्न आहे.
१००के वाल्याला २००-३००केची ऑफर मिळण्याबाबत ३ शक्यता असु शकतात -
१. त्याच्याकडे अतिशय रेर, एक्स्ट्राऑर्डनरी टॅलंट आहे जे हायरिंग कंपनीला फ्युचर रोडमॅपच्या दृष्टिकोनातुन खूप फायदेशीर
२. हायरिंग कंपनीची शॉर्टटर्म नीड - ट्रबल्ड प्रोजेक्ट सॅल्वेज करण्याकरता
३. १००-२००के हाइकमधे ७०-८०% वेरिएबल पे; पेआउट करता १७६० कंडिशन्स...
अपॅरंटली, रिमोट वर्कचा पगारवाढिशी संबंध नाहि/नसावा. उलट मोठ्या कंपन्यांनी, जे छोट्या शहरात गेले त्या-त्या शहराच्या कॉस्ट ऑफ लिविंंग नुसार पगारात अॅडजस्टमेंट केली आहे. संधी (डिमांड) जरुर उपलब्ध झाल्या आहेत पण सप्लायहि स्टेडि असल्याने पगारवाढित स्पाइक दिसुन येत नाहि. उदाहरणं असतील तर ती वनॉफ आहेत, जी नॉर्मल सायकल मधे हि आढळतात...
लिपसिंकींग म्हणजे कसा फ्रॉड
लिपसिंकींग म्हणजे कसा फ्रॉड करतात ?
बहुदा पडोसन चित्रपटासारखे
बहुदा पडोसन चित्रपटासारखे असावे.
थोडे दिवसापुर्वी इंटर्व्यु घेताना (कॉट्रँक्टर) कँडीडेट सिगरेट ओढु लागला. व्हिडीओ इंटर्व्यु मध्ये.
दोनदा तस दिसल्यावर टिमने इंटर्व्यु बंद केला.
चांगला कँडीडेट मिळन फार कठीण आहे. नविन लोकांना घेवून ट्रेन करू पर्यंत नाकीनऊ आलेत. काहीही इशु असु शकतात.
विसराळु , एकच गोष्ट १०० दा सांगायला लावणारे, १०० १०० ओळीची मेल लिहिणारे, मीटींग मध्ये अजिब्बात ऐकुनच न घेणारे. रीसेशन वगैरे येणार असल तरी रीसोर्स जर चांगला असेल तर त्यांना धोका कमी असावा निदान लहान कंपनी मध्ये. अर्थात मास लेऑफ होत असतील तर हे लागु होत नाही.
३. कामाची पद्धत किंवा तुम्ही
३. कामाची पद्धत किंवा तुम्ही वापरता त्या युक्त्या कुणाला शिकवू नका. >>
हे कस शक्य आहे ? टिमला तर सगळे शिकवावेच लागेल. If they grow , I will grow.
१००-२००% ची जंप मिळतेय म्हणजे
१००-२००% ची जंप मिळतेय म्हणजे या लोकांचा मूळात पगार किती? प्रामाणिक प्रश्न आहे. >> भारतामध्ये माझ्या एका ओळखीच्या माणसाला (15-16 वर्षे अनुभव , IT) 21 lakh pagar hota, त्याला आता 40 मिळताहेत.
तसच एका मैत्रिणीच्या कंपनीत 3-४ वर्ष अनुभव असलेल्या मुलाला 24 लाख ऑफर मिळाली होती ६ महिन्यापूर्वी.
4-5 ते 10-१२ वर्ष बाले जोरदार बूम मध्ये आहेत गेले काही महिने. २-३ वाल्याना पण 6-८ लाख चे पॅकेज मिळताना ऐकलेय.
इंतरव्यूच्या अनुभवात - इंटरवह्यूला appear ch न करणारे अशी केटेगरी ऍड करा.
Lip sinking वाल्यांचे अनुभव ऐकलेत पण फारसे कुणी पाहिले नाहीयेत प्रत्यक्षात.
मी माणूस Dev/support कुठे तरी काम करू शकेल का - ह्याने प्रोडक्ट chyaa कुठल्यातरी मोड्युल वर काम केलंय का, एवढे बघते सध्या तरी.
आपल्या पर्यंत (IT service industry) जशी काम येतात, त्यात बऱ्याचशा कामात बेसिक डोक, योग्य कम्युनिकेशन आणि काम करायची इच्छा असेल, वर्क एथिक्स चांगले असतील तर माणूस काम करू शकतो असा अनुभव आहे, गेल्या 20 वर्षातला.
थोडे दिवसापुर्वी इंटर्व्यु
थोडे दिवसापुर्वी इंटर्व्यु घेताना (कॉट्रँक्टर) कँडीडेट सिगरेट ओढु लागला. व्हिडीओ इंटर्व्यु मध्ये >> हायला ऐकावं ते नवलच!
काहीही करतात लोक!
मी अनु
राज, हे कुठल्या ठिकाणचे सांगत आहात? (भारत का बाहेर?) भारतात पगार adjust केल्याचे ऐकले नाहिये
थोडे दिवसापुर्वी इंटर्व्यु
.
आपल्या पर्यंत (IT service
आपल्या पर्यंत (IT service industry) जशी काम येतात, त्यात बऱ्याचशा कामात बेसिक डोक, योग्य कम्युनिकेशन आणि काम करायची इच्छा असेल, वर्क एथिक्स चांगले असतील तर माणूस काम करू शकतो असा अनुभव आहे, गेल्या 20 वर्षातला.>> अनुमोदन.
इथले अनुभव वाचुन हे मार्केट
इथले अनुभव वाचुन हे मार्केट अजुनही कामगारांचंच वाटतंय.
चालू इंटरव्हू मध्ये सिग्रेट फुकायला लागला हे फारच फनी आहे. चार - पाच बॅक टू बॅक इंटरव्हू होते का? कंपन्याही आचरटपणा करतात. पाऊण तासाचे सहा इंटरव्हू ते पण झूम वर देऊन माणूस कावला असेल.
बाकी जॉब बदलताना सध्याचा पगार वाढवुन का बरं नाही सांगायचा? आणि पेस्टब मागतात भारतात ऐकलं आहे, पण कंपनीला कामगारांची गरज आहे म्हटल्यावर ती कशाला द्यायची? मी कायम वाढवुनच सांगितला आहे पगार आणि इथे पेस्टब मागत नाही त्यामुळे कुणाला पेस्टब द्यायचा प्रश्नच नाही. इंटरव्हूला आल्यावर काही तरी खोडरबर आणि शार्पनर सरकवतात तसलंच काही गिफ्ट म्हणताय ना? आता ते परत करायचं एक्स्पेक्टेशन खरंच असतं का कुणाचं? आणि परत करुन तो खोडरबर दुसरीकडे द्यायचा असा काही रिपर्पज फंडा असतो का कंपनीचा?
मला इंटरव्हू दिला म्हणून फक्त आमच्या रोकूने एक रोकू बॉक्स दिलेला. बाकी फुटकळ पेनं आणि २०० पानी दुरेघी वहीबिही मिळालेली आहे. जॉईन व्ह्यायच्या आधीच काय गिफ्ट मिळतं भारतात जे परत करायची अपेक्षा असते? आता फारच उत्सुकता वाटून राहिली आहे. खरंच विचारतोय.
हा काँम्प अॅडजस्ट प्रकार अमेरिकेतही बे-एरिआतून नवॅडाला गेलात किंवा टेक्ससला गेलात (किंवा इतर कुठेही गेलात) तर करतील. त्या मूव्ह मध्येच फ्रँचाईज टॅक्स बोर्डशी काडीमोड होऊन १०% टॅक्स तिथेच वाचलेला असतो. बाकी कुठे हे फार करत नसावेत/ किंवा इतका सिग्निफिकंट फरक पडत नसावा.
बे-एरिआत दारिद्र्यरेषेवर रहायचं असेल तर १५० के + बोनस/ ऑप्शन्स मिळवायलाच लागतात. तेव्हा रेंटल अपार्टमेंटच्या बेसिक इनकम क्रायटेरिआ पास होतो. तो ही एसएफ मध्ये? नाही. साउथ बे मध्ये? नाही. प्लेझंटनला? नाही. ट्रेसीला. हो! ट्रेसीला होईल बहुतेक.
तेवढ्या पैशात ऑस्टिनल नवा कोरा कासल मिळेल.
खोडरबर शार्पणर नाही हो 10
खोडरबर शार्पणर नाही हो 10 रुपयाचं.
ऑफर स्वीकारलया वर साधारणपणे जॉईन होण्याच्या 1 किंवा 2 आठवडे आधी कंपनी गिफ्ट देतात.साधारण 1000 2000 किमतीची वस्तू.हेडसेट, वॉटर बॉटल,बॅकपॅक इत्यादी टाईप.(बहू ला मुहदिखाई देतात तसं )
मी अनू पोस्ट्स ना अनुमोदन!
मी अनू पोस्ट्स ना अनुमोदन!
पगार वाढीची ही छुपी कारणं असावी, मार्केट ही वधारतय हळू हळू.
मोठ्या कंपन्यांनी, जे छोट्या शहरात गेले त्या-त्या शहराच्या कॉस्ट ऑफ लिविंंग नुसार पगारात अॅडजस्टमेंट केली आहे.>>> हे असे अजिब्बात ऐकिवात नाहिये, भारतात किंवा बाहेर ही. आश्चर्य वाटले ऐकून आणि हे फेयर पण नाहिये. परिस्थिती मुळे लोक वर्क फ्रॉम होम करायला लागली ..
नानबा तुम्ही लिहिलेल्या सॅलरीज आयटी क्षेत्रातल्या आहेत काय?
>> आश्चर्य वाटले ऐकून आणि हे
>> आश्चर्य वाटले ऐकून आणि हे फेयर पण नाहिये. >> ऑफ कोर्स फेअर आहे!!!
विचार करा, बे एरियात कुणाला ३००के देत होती कंपनी. तेव्हा त्याच कामाला ऑस्टिनला १२०के मिळत होते. आता हा बेकर ऑस्टिनला गेला रहायला. आता तो भूमीपुत्र ऑस्टिनकर बोंबलू लागेल ना त्याला कमी पगार का म्हणून! परिस्थिती बिरिस्थिती संपली आता. आता लोकेशन प्रमाणे अॅडजस्टमेंट केलीच पाहिजे.
पगार वाढीची ही छुपी कारणं
पगार वाढीची ही छुपी कारणं असावी, मार्केट ही वधारतय हळू हळू. >> पगार वाढ आणी मार्केट ची आर्थिक परिस्थिती याचा काहिहि सम्बध नाहि आनी नसतो
हो अमितव भारतात पण गुरगावात
हो अमितव भारतात पण गुरगावात मिळणारा पगार आणि बडोद्यात मिळणारा पगार फरक आहेच. सेमच पगार द्यायचा असेल तर बडोद्यात कशाला ओफिस काढतील. मला तर दिल्ली NCR आणि मुंबईत पण पगारात बराच फरक जाणवला. दिल्ली NCR मधे पॅकेज खुप चांगले मिळतात cost of living बर्यापैकी सेम असुन. (हे फक्त Oil & Gas बाबत)
भारतात त्या शहराच्या रेंटल
भारतात त्या शहराच्या रेंटल किंमती प्रमाणे पगार द्यावा लागतो. म्हणजे एखाद्या एरियात रेंट 10000 रु आहे तर माणसाला 20000 महिना पगार देऊन तो येणार नाही.
पण एका मर्यादे नंतर (म्हणजे सिनियर लेव्हल ला) ही पॅकेज शहराप्रमाणे बदलत नाहीत.तिथे प्रोफाइल किती तातडीचं, त्यात मिळणारी माणसं कमी की जास्त बाजारात,ज्या बिझनेस साठी घ्यायचं तो लंबी रेस का घोडा गिर्हाईक आहे की एखादं नवं छोटं मोठं अश्या बऱ्याच गोष्टींवर पॅकेज अवलंबून असतात.
शहराप्रमाणे कमी जास्त करेक्शन उघडपणे करता येत नाही.त्यात मग लोक काहीतरी युक्ती लढवून जो जास्त आकडा असेल तो मिळवायला बघतात.
आता एक इंटरव्ह्यू देणार होते.त्याला आधी 2 मेल पाठवून माझा 'या पदासाठी इंटरव्ह्यू' आणि 'या पगारावर मी जॉईन व्हायला हो म्हणते आहे' असे 2 कंसेंट इमेल ने घेतले होते.म्हणजे नंतर उमेदवाराने पैश्यावर हुज्जत घालून कंपनी ला लटकवून ठेवू नये म्हणून.अर्थात लटकवणारे अश्या कंसेंट इमेल ला हो म्हणून पण नंतर लटकवतात.
3 महिने नोटीस पिरियड असताना
3 महिने नोटीस पिरियड असताना जी कंपनी सर्वात आधी ऑफर देते आणि ज्यामुळे उमेदवाराला राजीनामा देण्याचं बळ येतं ती सर्वात जास्त धोक्यात असते.3 महिन्यात खूप काही घडू शकतं.
म्हणून कंपनी या 3 महिन्यात माणूस नक्की आपल्याकडे जॉईन होईल का याची नैतिक तपासणी करत राहतात.म्हणजे अमक्या माणसाच्या मित्राचा मित्र गाठून त्याला हा नक्की काय करतोय विचारणे, उमेदवार ओळखीचा असेल तर त्याला मध्ये मध्ये फोन करत राहून प्रेमळपणे बोलणे, जॉईन व्हायच्या एक आठवडा आधी बोलावून लंच, आणि एखादी भेटवस्तू देणे.जॉईन झाल्यावर लगेच जॉइनिंग वेलकम किट पाठवणे वगैरे.जितकी भावनिक गुंतवणूक वाढेल तितका उमेदवार जॉईन होण्याची शक्यता वाढते.काहीजण स्पष्ट सांगतात.की पैश्यांची गरज आहे, तुम्ही देता ते परवडणारे नाहीये, मी अजून ठिकाणी बघणार आहे.
काही जण आपल्या नातेवाईकांना वापरतात(आजी icu मध्ये, काका गंभीर आजारी वगैरे.) आणि मूळ जॉईन डेट उशिराची करून घेऊन मधल्या वेळेत अजून कंपनी बघतात.
काही जणांची सध्याची कंपनी उमेदवार गरजेचा असतानाही त्याचं पुरेसं नाक दाबायला शांत बसून राहते आणि लास्ट डे च्या 2 दिवस आधी जास्त पगार देऊ करून राहा म्हणते.उमेदवार खरंच दुसरी नोकरी मिळून चाललाय की धमकी द्यायला हातात काही नसताना राजीनामा टाकलाय हे अनेक मार्गाने तपासले जाते.म्हणजे अ ने राजीनामा दिला.तात अ चे स्किल कुठे चालतील, या बिझनेस मध्ये आणि कोणत्या कंपनी आहेत, तिथे आपल्या ओळखीचे जुने लोक असतील त्यांना पिना मारून अमका माणूस येतोय का तुमच्याकडे हे तपासणे.
हा धागा लेऑफ वरुन आता HR
हा धागा लेऑफ वरुन आता HR Grievances वर गेला आहे.
आजची पत्नी ही उद्याची माता
आजची पत्नी ही उद्याची माता त्याप्रमाणे आजची स्वप्नवत नोकरी हा उद्याचा ले ऑफ असू शकतो
आम्ही एकाचा इन्टर्व्यु घेत
आम्ही एकाचा इन्टर्व्यु घेत होतो, बोलताना त्याचे तोन्ड जेमतेम उघडत होते. चेहर्यावर भाव शुन्य. पण आवाज मात्र मोठा, व्यवस्थीत, उत्तरे बरोबर दिलेली, अधुन मधुन बहुतेक विचार वगैरे करण्यासाठी काही सेकंद आवाज थांबत होता तेव्हा हा गडबडत होता. बहुतेक बोलणारा लॅप्टोपच्या मागे बसुन बोलत होता. नेटवर्क इश्यु पण नव्हता. हा अनुभव अजुन एकदा दोन्दा आला..
मला एकदम रामदास पाध्ये आणि
मला एकदम रामदास पाध्ये आणि अर्धवटराव आठवला
आम्ही एकाचा इन्टर्व्यु घेत
आम्ही एकाचा इन्टर्व्यु घेत होतो, बोलताना त्याचे तोन्ड जेमतेम उघडत होते.
मला एकदम रामदास पाध्ये आणि अर्धवटराव आठवला >>> हे उपमा म्हणून आणि मुलाखत ज्याची होती त्याला काही येत नसल्याने शब्दशः अर्धवटराव या अर्थानेही धमाल आहे.
वरती कोणीतरी पडोसनचा संदर्भ दिला आहे तो ही परफेक्ट.
lip sync che
youtube वर "lipsync interview" टाका, पहिलाच व्हिडिओ आपल्या देसी माणसाचा आहे. मला लिंक इकडे टाकता येत नाही.
माझ्या बायकोच्या ऑफिस मध्ये एक माणूस multiple companies मध्ये काम करत होता . अजुन एका कंपनीला join करताना background check मध्ये पकडला गेला
बाबो
बाबो
लीप सिंक ला इतकी मेहनत घेण्यापेक्षा अभ्यास करून इंटरव्ह्यू देणे जास्त सोपे पडेल
अमितव ओके.
अमितव ओके.
लीप सिंक इंटरव्यू मी खूप
लीप सिंक इंटरव्यू मी खूप घेतलेत हल्ली. मला तसा संशय आला तर मी स्पशट सांगतो कॅन्डीडेट ला. अर्थात तो नाकारतो. मग मी त्याला दोन चार वेळा हाताच्या दहा बोटा पैकी रॅन्डम बोटे दाखवून किती आहेत ते विचारतो. खरा इंटरव्यू देणारा केमेर्या समोर नसतो. त्यामुळे तो पाहू शकत नाही आणि चुकीची संख्या सांगतो. संख्या बरोबर सांगितली आणि तरीही मला शंका असेल तर इन पर्सन बोलवतो. इंटरव्यू मध्ये सिलेक्ट झाला तर ट्रॅवल एक्स्पेंसेस देऊ म्हणून सांगतो . अर्थात खोटे लोकं येत नाहीत.
अगदी इंटरव्यू एकाने देऊन जॉइन दुसर्यानेच केल्याची उदाहरण पण आहेत. त्यामुळे आम्ही इंटरव्यू रेकॉर्ड करतो जॉइन होईपर्यंत.
कुंतल त्या ठरावीक भागाच नाव एच वरून सुरू होते का ??
प्रविणपा एकदम बरोबर ओळखलेत.
प्रविणपा एकदम बरोबर ओळखलेत.
हाहा प्रविणपा… तेच ते
हाहा प्रविणपा… तेच ते प्रसिद्ध् शहर… ९०% अर्ज तिथुनच येतात…
Lipsync interview हे खरं आहे.
Lipsync interview हे खरं आहे.
रोज 2-3 interview मधून एक शंका घेण्याइतपत केस असते.
मी interview feedback (internal) मधे सरळ लिहून टाकतो त्या त्या केस प्रमाणे.
आवाज confident असतो पण चेहरेपट्टी, ओठांची हालचाल त्याला मॅचींग नसते.
रामदास पाध्ये आणि अर्धवटराव
रामदास पाध्ये आणि अर्धवटराव आठवला >>
>>>>>>>.लीप सिंक ला इतकी
>>>>>>>.लीप सिंक ला इतकी मेहनत घेण्यापेक्षा अभ्यास करून इंटरव्ह्यू देणे जास्त सोपे पडेल Happy
खरोखर अप्रामाणिकपण घृणास्पदच. आहे.
>>>>>>>>>>>.आजची पत्नी ही उद्याची माता त्याप्रमाणे आजची स्वप्नवत नोकरी हा उद्याचा ले ऑफ असू शकतो Happy
हाहाहा एकदम खरे बोललीस.
Pages