नेहमी पडणारी स्वप्ने

Submitted by विजय देशमुख on 22 July, 2013 - 23:04

माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.

१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.

आठवली की लिहितो Happy

यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्‍या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.

एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.

तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो, तुम्ही फार विचार करता बहुतेक ग्रह-ताऱ्यांवर ज्याचा जास्त उपयोग नसतो. माझ्या स्वप्नांविषयी सांगा पाहू कोण येत असेल ? Happy
Clipboard01p

काल ग्रहणकाळात ९ स्तोत्रे म्हटली. function at() { [native code] }ओनात शांत वाटले. रात्री कुरुप स्वप्नं पडले. का होतं असं ज्या दिवशी देवाची स्तोत्रे म्हणुन function at() { [native code] }यंत शांत वाटते, त्याच अगदी त्याच रात्री कमालीचे कुरुप स्वप्नं पडते. हे असे कितीदा कितीदा झालेले आहे. इटस अ नॉर्म. नियम आहे हा.
------------
मूड लंबक हेलकावे खाउन विरुद्ध टोकास जातो असे मत आता बनले आहे.

मला स्वप्नात स्वप्न पडते. मग स्वप्नातच मी मनात म्हणतो अरे हे स्वप्न तर आपल्याला पडलेले आहे. यानंतर स्वप्नात असे असे घडले होते असा विचार येतो. पाहू या तसे तसे घडते का? हा विचार मी करतो. जाग आल्यावर मात्र स्वप्न काय होते हे आठवत नाही. बर्‍याच काळात याप्रकारचे स्वप्न पडले नाही. पण एकदा रात्रभर स्वप्ने पडत होती पण ती आठवत नव्हती.

Pages