माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.
१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.
आठवली की लिहितो
यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.
एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.
तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?
मामी प्रमाणापेक्षा जास्त
मामी प्रमाणापेक्षा जास्त विडियो गेम्स खेळल्याचा परिणाम असेल
मी नाही गेम खेळत भ्रम नाही
मी नाही गेम खेळत भ्रम नाही स्वप्नच
चाफ्या
स्वप्ने पडतात तेव्हा आपला
स्वप्ने पडतात तेव्हा आपला आत्मा देह सोडून इतरत्र भटकत असतो म्हणे
रिया याचा अर्थ तू/तुम्ही खुप
रिया याचा अर्थ तू/तुम्ही खुप क्रीएटीव्ह आहे.
झकासराव मलाही तुमच्यासारखी
झकासराव मलाही तुमच्यासारखी स्वप्न पड्तात..
१) मी खुन करुन पळालेय आणि पोलिस मला शोधतायेत.
२) कधी साप दिसतात. मी त्याना मारते.
३) पेपरमधे न सुटलेल गणित , स्वप्ननात सुटत्..आणि उठ्ल्यावर परत आठवत नाही कस सोडवल ते..:(
४)
शाळेत परिक्षा आहे,,, पेपर ला उशीर झाला .. आभ्यासच करायचा राहिला..ई<<< मला ह्यातच अजुन जास्त डिटेल मधे पडते. पेपर आहे हेच माहीत नाहीये, अभ्यास वेगळ्याच विषयाचा केला गेलाय, हाईट म्हणजे सेमीसटरला विषय होता हेच माहीत नसत. आता शिक्षण संपल्यावर खुप अभ्यास करायचा राहुन गेला असच वाटतय.
>>>>>>>>>>>> अगदी अस कस सेम सेम...
मला काल स्वप्न पडलं की माबोकर
मला काल स्वप्न पडलं की माबोकर शोभातै ने कोणता तरी पिक्चर बनवलाय. जो पाहिला मी विथ फॅमेली गेलीये
आणि त्यात एक डायलॉग होता की हे दिनेश्दांच्या रेसिपीने बनवलय... आवडलं ना तुला?
नीट आठवत नाहीये स्वप्न पण असच काही तरी होतं... नंतर मी थेटर मध्ये इतर माबोकरांना शोधत होते तेंव्हा मला तिथे फक्त अमृता१ आणि स्वप्नाली१ असा आयडी असलेल्या दोघी भेटल्या (असेकाही आयडी आहेत का माबोवर?) आणि मग माझे फॅमेली मला सोडून पोहे खायला गेली जे जागूतैच्या रेसीपीने बनवलेले
नीट काही आठवत नाहीये पण हे आठवल्यावर मीच हसायला लागले
रिया...तुझी स्वप्न मजेशीर
रिया...तुझी स्वप्न मजेशीर असतात...तु खरि माबोकर आहेस, तु माबो खातेस्,पितेस्,जगतेस्,झोपतेस(स्वप्नतेस पण).... :हिहि: ,
हेहे नाही ग ते इकडे काल
हेहे नाही ग
ते इकडे काल मूव्ही विथ माबोकर्स ठरलं ना त्यामुळे असेल कदाचित
आधी काही घडून गेलं असेल आणि
आधी काही घडून गेलं असेल आणि त्याच्याशी संबंधीत स्वप्न पडलं असेल तर "मनी वसे ते स्वप्नी दिसे" लागू होतं. पण जर स्वप्नात एखाद्या घटनेचा काही भाग/सूतोवाच दिसतो आणि पुढे सत्यात ती घटना पूर्ण होतो किंवा तसंच घडतं किंवा स्वप्नात कुणीतरी अर्धवट सोडलेलं वाक्य सत्यात पुढे दुसर्याच कुणाच्या तोंडून कंप्लिट केलं जातं (स्वप्नातलं वाक्य उच्चारुन) तेव्हा काय म्हणायचं?
कुणाला भविष्यविषयक स्वप्न
कुणाला भविष्यविषयक स्वप्न पडली आहेत काय? स्वप्नात दिसले तसे भविष्यात प्रत्यक्षात घडले अशा अर्थाने. अर्थात अशी स्वप्ने आठवली तरचा हा प्रश्न आहे.
प्रकाश घाटपांडे, मी वर तेच
प्रकाश घाटपांडे, मी वर तेच म्हटलंय. आपण ज्योतिष ह्या अर्थाने म्हणत असाल तर माझा फारसा विश्वास नसल्याने मी त्या वाटेला जात नाही. पण भविष्यकाळातील सुचना ह्या अर्थाने म्हणत असाल तर माझी वरची पोस्ट लागू होते. हे काय असतं? मी हे दणदणीत अनुभव अनेकवेळा घेतले आहेत.
मी पूर्ण आस्तिक आहे. अधला मधला प्रकार अजिबात नाही.
वरती नंदिनी,लाजो आणि
वरती नंदिनी,लाजो आणि केदारदादाने लिहिलय ना
त्यांना असं काही जाणवलेलं
काल मला फॉर अ चेंज काहीच स्वप्न पडलं नाही
रिया, वेंधळेपणा क्विन जसी समु
रिया, वेंधळेपणा क्विन जसी समु होती तशी तू स्वप्नसुंदरी म्हणायचं का?
केश्वे.. रिया, स्वप्नांच्या
केश्वे..
रिया, स्वप्नांच्या इतक्या मालिकाच सुरु आहेत तुझ्याकडे. एखादी असंबद्ध गोष्ट लिहुन काढ बयो.
स्वप्नात दिसले तसे भविष्यात
स्वप्नात दिसले तसे भविष्यात प्रत्यक्षात घडले अशा अर्थाने. <<< मला दिसतं तसं.
२०१४ मध्ये कोणाला काही नवे
२०१४ मध्ये कोणाला काही नवे स्वप्न पडले की नाही?
शाळेत / कोलेजात परिक्षा
शाळेत / कोलेजात परिक्षा आहे,,, पेपर ला उशीर झाला राहिला..>>>>>>>>>>>> अगदी अस कस सेम सेम...मलाही असेच स्वप्न पडते पण मी एक नंबर अभ्यासखोर होते एकही केटी लागली नाही कोलेज एका दमात पूर्ण केल, हो पण पार्ट time जोब करायचे, शेवटचे लेक्चर संपले कि धूम पळायचे ऑफिसला जायला. कोलेज मधील मज्जा कधीच अनुभवू शकले नाही. आय मिस माय कोलेज डेज.
सेन्या , असं कसं होईल? मला
सेन्या , असं कसं होईल?
मला रोज स्वप्न पडतातच.
आताशा मी त्यांना विसरून जाण्यात यशस्वी झालेय.
स्वप्नं कुठली पडतात याचं इथं
स्वप्नं कुठली पडतात याचं इथं चांगलं वर्णन आहे. स्वप्न का पडतात याविषयी कोण काही विधान करू शकेल काय?
काल रात्री मला एक स्वप्न पड्ल
काल रात्री मला एक स्वप्न पड्ल होत...........ते अस.की.मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले आहे........ती जिथे राह्ते त्या इमारतीच्या मागे बीच आहे........... मी एकटी बीचवर गेले आणि वाळूवर चालत असताना.....अचानक सगळीकडे साप पसरले......मी पळत घरी जाउ लागले तर सगळीकडे साप होते, रस्त्यावर, पायर्यावर.., पॅसेजमधे,.....सगळ्या जमिनीवर साप.... मी जीव खाउन पळत होते वाट दिसेल तिथे... शेवटी माझ्या तोडातून साप बाहेर आले....... असच पळ्त असताना मला एक दार दिसले आणि त्या दाराच्या आत अजुन पॅसेज होता, तिथे दिवा होता आणि साप नव्ह्ते..........मी तिथून आत गेले पळ्त ....बरर्याच खोल्या होत्या आत..सगळ्या बंद होत्या......पण एक शेवट्ची खोली उघडी होती .......मी तिच्यात गेले...........मंद दिवा होत तिथे......... आणि मला जाग आली..........या सगळ्या विचित्र स्वप्नाचा काय अर्थ असावा
हा बाफ चाळताना माक्ष्या एका
हा बाफ चाळताना माक्ष्या एका स्वप्नाबद्दल लिंबुदांची एक पोस्ट पाहिली की या स्वप्नाचा अर्थ मी नोकरीसाठी लांब जाऊन रहाणार आहे असा होतो...
खरच झालं की राव ते
आई बाबतही वेडीवाकडी स्वप्न पडतात लिहिलेलं ना मी... आईही आजारी असते आजकाल
स्वप्न खरच काही तरी सांगत असतात का आपल्याला?
माझी स्वप्न युज्लेस असतात म्हणा
बायदवे माझी वेड्या वाकड्या स्वप्नांची मालीका अजुनही चालू आहेच... पुन्हा इथे लिहायला लागेन लवकरच
सगळ्यांना स्वप्न पडायची बंद
सगळ्यांना स्वप्न पडायची बंद झालीत का?
मला नेहमी खूप स्वप्नं पडतात,
मला नेहमी खूप स्वप्नं पडतात, एखादा टिव्ही चॅनल चालू असावा तशी. आणि दुसर्या दिवशी सगळी आठवतात. त्यामुळे झोप पूर्ण न झाल्याचे फिलींग यायचे. आता झोपायच्या आधी थोडा वेळ ध्यान करते. त्यामुळे दोन तीन स्वप्नं असतात. पण अगदी डीटेल आठवतात. एकदा तर स्वप्नात मी चक्क हिटलरची गर्लफ्रेंड होते, माझा नाईलाजाने त्याने खून केला , खोल विहीर टाइप चेंबर होता त्यात त्याने मला ढकललं, हे करतांना तो खूप दुःखी होता मात्र. मग त्याने आत्महत्या केली. हे स्वप्न खूप वर्षांपुर्वीचे आहे. पण हिटलर मुळे लक्षात राहिले. कारगिल चे युद्ध होण्याआधीच स्वप्नात पाहिले होते. तुम्हाला वाचताना कदाचित विचित्र वाटेल, कारण मलाच कधी कधी विचित्र वाटते, मला माझे अनेक पूर्वजन्म स्वप्नात दिसले आहेत.
अनामिका, तुमचे अनुभव कसले
अनामिका, तुमचे अनुभव कसले भारी असतात! आणखी वाचायला आवडेल...
@ अनामिका
@ अनामिका
माझा नाईलाजाने त्याने खून केला>>>> का बरं केला असेल??
मला तर कायम माझ्याच लग्नाचं स्वप्न पडतं. जिथे मी सोडून बाकी सगळे लोक छान तयार झालेत आणि मला फक्त 10 मिनीटात तयार व्हायचं आहे.
धन्यवाद श्रद्धा, जसा वेळ
धन्यवाद श्रद्धा, जसा वेळ मिळेल तसे नक्की लिहीन.
मला वाटतं चिन्मयी, हिटलरने केलेली आत्महत्या, त्याचा व त्याच्या साम्राज्याचा अंत जवळ आलाय हे कदाचित त्याला जाणवले असेल, आणि आपल्या मागे माझे हाल होउ नयेत किंवा मी शत्रूच्या हाती लागता कामा नये असे असेल कदाचीत. आपला एक अंदाज. कारण शेवटच्या क्षणी त्याच्या डोळ्यातलं प्रेम आणि निराशा अगदी आजही आठवतात.
अनामिका, तुम्ही हिटलर इव्हा
अनामिका, तुम्ही हिटलर इव्हा ची प्रेमकहाणी मनापासून वाचलेली दिसतेय.
मला मी भूत/स्पिरीट झालेय (म्हणजे एकदम हलकी) आणि उडत चाललेय असे स्वप्न मध्येमध्ये पडते.यात मी नेहमी लोणावळा/दापोडी/देहूरोड वरुन उडत असते हे फारच विनोदी आहे.आणि उडत असताना खालचे दृष्य सेपिया असते.एकदम हिरवे नसते.(भूत झाल्यावर तसे होत असेल.)
बाकी भितीदायक स्वप्नं जोराची लहान लागलेली असताना/रात्री खूप कडक कॉफी प्यायल्यावर पडतात.
नाही हो अनु, मी हिटलरचं
नाही हो अनु, मी हिटलरचं किंवा त्याच्यावर लिहिलेले कुठलेच पुस्तक वाचलेले नाही. त्याच्या प्रेयसीचे नाव इव्हा होते का? हे आता तुम्ही लिहिल्यावर कळले. फक्त शालेय शिक्षणात हिटलरचा उल्लेख होता, तोही एक कृरकर्मा असंख्य ज्यू लोकांची हत्या करणारा म्हणून.
ह्म्म. मग योगायोग असेल.
ह्म्म. मग योगायोग असेल.
ही हिटलर इव्हा ची स्टोरी.
https://en.wikipedia.org/wiki/Eva_Braun
Submitted by mi_anu on 20
Submitted by mi_anu on 20 September, 2018 - 14:30
स्वप्ने मनातील भावनांचे प्रतीक असतात.
थोडक्यात तुम्ही "पंछी बनं उडती फिरू मस्त गगन मे" भूत बनून करून घेता.
Pages