नेहमी पडणारी स्वप्ने

Submitted by विजय देशमुख on 22 July, 2013 - 23:04

माणसाला नेहमी पडणारी स्वप्ने मुखत्वे खालीलपैकी एक वा अधिक असू शकतात. मानववंशशास्त्राच्या एका व्याख्यानात ऐकलं होतं.

१. धावणे :- यात व्यक्तीला तो स्वतः कोणातरीपासुन बचाव करण्यासाठी धावतोय असं दिसते.
२. पडणे :- बरेचदा हे पडणे बराच वेळ चालू असते, पण जमिन लागत नाही... म्हणजे तो पडतच राहतो...
३. साप :- नुसतेच साप दिसणे किंवा साप खेळताना, मागे धावताना दिसणे. हे भितीदायक स्वरुपातच असते.
४. मारामारी :- कुणालातरी सडकुन मारणे. एक हिरो १०-१५ + गुंड
५. पाण्यात बुडणे :- इथे माधुरीचा १०० डेज आठवला का ?
६. पैसा/ सोने/ खजिना इत्यादी सापडणे.
७. अंधार
८.
९.
१०.

आठवली की लिहितो Happy

यातील बरिचशी स्वप्ने माणसाच्या उत्कांतीशी संबंधीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर माणुस आदीमानव व तत्सम काळात होता, तेव्हा तो प्राण्यांची शिकार करण्यासाठी आणि प्रसम्गी बचावासाठी धावायचा. प्राण्यांपासुन बचाव करण्यासाठी झाडावर चढणे आलेच, पण तिथुन घसरुन पडू नये, ही भिती. रात्री अंधाराची भिती, तर सरपटणार्‍या प्राण्यांचीही (उदा. साप). दोन टोळ्यांमधील मारामारी ही कदाचित नेहमीची बाब असावी. (धातू युग). तसेच पाण्यापासुन बचाव करणे आणि पाण्यातील प्राण्यांपासुन (मगर वगैरे) हे मासेमारीसाठी आवश्यक असावे.
पुढे मौल्यवान धातूंबद्दलचं आकर्षण, त्यासाठी सोने/ चांदीचा शोध ओघाने आले असावे.

एकुणच हे वारंवार पडणारि स्वप्ने आपल्या मनात वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या घर करुन बसली आहेत, असं मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात.

तुम्हाला कोणती स्वप्न वारंवार दिसतात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला झोपेतून उठल्यावर जी कामं करायच्येत, तीच मी करत्येय अस दिसतं पहाटे- पहाटे....आणि मग उठल्यावर....
हात तिच्या....हे सगळं व्हायचंच आहे होय अजुन !.....असं वाटतं>>>>>>>>>>>>>>मलाही अस खुपदा होत आणि जाग आली की खुप वाईट वाटत.

जवळच्या व्यक्तीच्या मृत्युचं स्वप्न पडलं तर त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं असं म्हणतात.
खुप सारे चमचमीत पदार्थ/ पक्वान्न दिसणं हे पुढे काही वाईट घडणार असल्याचे संकेत आहे असं मानतात.

टुनटुन, तू घाबरू नकोस, मी आहे ना, बघतोच कोण कस धरतय तुला! Proud

मला अगदी पाच मिनिटान्ची डुलकी लागली तरी स्वप्न पडते.
स्वप्नात मी आख्खे जगभरच काय, तर भुत/वर्तमान/भविष्य काळातल्या आख्ख्या जगात फिरत अस्तो.
बरीचशी स्वप्ने चांगलीच लक्षात रहातात, बाकीची विसरली गेली तरी त्यांचा सूक्ष्म परिणाम होत असतो.
कित्येक वर्षांपूर्वी कित्येक स्वप्नात बघितलेल्या जागा/वस्तु/ठिकाणे/व्यक्ति/प्राणी जशाच्या तशा प्रत्यक्षात बघितल्यात.
माणसे/प्राणी/जनावरे/भुते/राक्षस यान्चेशी लढाया केल्यात Proud कित्येकवेळेस पळपुटेपणाही केलाय.
स्वप्नात माझे हातुन "खून" झालेत, तसा माझाही खून झालाय! Proud
स्वप्नात मी तिसरे महायुद्ध कसे असेल याच्या झलकीही पाहिल्यात.
स्वप्नात मी उन्चावरुन पडलोय, पाण्यात बुडलोय, रोडअ‍ॅक्सिडेण्ट्स मधे सापडलोय, तर्‍हतर्‍हेची संकटे झेललोय.
मात्र आजवर कधीही मी स्वप्नात "स्वप्नसुंदरी " की कायसे म्हणतात ते बघितले नाहीये Wink दूसर्‍या शब्दात म्हणजे आजवर माझ्या स्वप्नात एकाही सुंदरीने हजेरी लावली नाहीये!
नशिबाने आजवर स्वप्नात कधीही भाजलो नाहीये, मात्र स्फोट बरेच बघितलेत, व एका स्फोटाच्या स्वप्नाबरहुकूम घडून येऊन प्रत्यक्षात हात जळलाय.
स्वप्नात तर्‍हतर्‍हेची झाडे/वृक्ष/वेली पशु पक्षी यान्चेशी मैत्रीही केलीये. अगदी वाघसिंहाबरोबर बागडलोय.
स्वप्नात कित्येकदा सुवर्णमुद्रा/भुमिगत धन-संपत्ती बघितलि आहे, तसेच कोळसेही बघितले आहेत.
अन एकदाच बघितलेल्या एका स्वप्नात तर भल्या थोरल्या जिवंत गणपतीच्या मांडिवर बसुन लडिवाळपणे त्याच्या दोन्दावरुन सोन्डेशी देखिल खेळलोय. त्याच्या कुशीत झोपलोय.
विशेष म्हणजे, हल्ली हल्ली तर मी स्वप्नात झोपुन त्या झोपेत परत स्वप्न बघु लागतो, अन स्वप्नातल्या त्या झोपेतल्या स्वप्नातुन जागा होऊन मूळच्या झोपेतल्या स्वप्नात पुन्हा वावरू लागतो Proud
फार काय नाही, पण स्वप्नात मी स्वतःला मायबोलीवर पोस्टी देखिल टाईपताना अनुभवलय. Lol

मला वारंवार पडणारे एक स्वप्न म्हणजे - परीक्षेत सगळे पर्यायी प्रश्न धरून माझा पूर्ण पेपर वेळेच्या खूपच आधी लिहून झालाय आणि उरलेला वेळ जाता जात नाहीय. Proud

लहानपणी एक साप नेहमी स्वप्नात यायचा. म्हणजे आधी तो साप नसायचा. साध्या जुन्या कापडाचा तुकडा बागेत एका बारकुशा फांदीवर अडकलेला दिसायचा आणि मग त्याचा अचानक सळसळणारा पिवळाजर्द साप व्हायचा. तो मागे लागायचा. पण गंमत म्हणजे मला खूप वेगाने पळायलाच यायचे नाही. तो साप मला कडकडून चावायचा. पण असा चावला तरी मला अजिबात वेदना व्हायच्या नाहीत. शेवटी स्वप्नातच की जागेपणी मला कोणाकडून तरी असे माहीत पडले की सापाची शेपटी धरून त्याला गोफणीगत गरागरा फिरवले की त्याला चक्कर येते आणि त्याला चांगलीच अद्दल घडते. मग मी स्वप्नात तसे केल्यावर तो प्रकार बंद झाला.
शिवाय, हे घरी कळल्यावर 'राजकुमारी, खजिना आणि नाग', 'खुनी चेटकीण आणि राजकुमार' या छापाची दोन-दोन रुपयांत खूप छान-छान गोष्टींची पुस्तकं त्यावेळी मिळायची. त्यावर बंधनं आली.

आजवर माझ्या स्वप्नात एकाही सुंदरीने हजेरी लावली नाहीये! >> अरेरे!!

एकदाच बघितलेल्या एका स्वप्नात तर भल्या थोरल्या जिवंत गणपतीच्या मांडिवर बसुन लडिवाळपणे त्याच्या दोन्दावरुन सोन्डेशी देखिल खेळलोय. त्याच्या कुशीत झोपलोय.
>> मस्तच आहे हे स्वप्न. लकी लिंबू Happy

हल्ली हल्ली तर मी स्वप्नात झोपुन त्या झोपेत परत स्वप्न बघु लागतो, अन स्वप्नातल्या त्या झोपेतल्या स्वप्नातुन जागा होऊन मूळच्या झोपेतल्या स्वप्नात पुन्हा वावरू लागतो
>>
खूपच गुंतागुंतीचे स्वप्न आहे असे नाही वाटत? Biggrin

>>>> खूपच गुंतागुंतीचे स्वप्न आहे असे नाही वाटत? <<<<
हो तर. अन फारच अडचणी निर्माण करणारे आहे.
एकदा काय झाले की मी रात्री झोपलो नेहेमी प्रमाणे, पहाटे साडेपाचचा गजर झाला, मी जागा झालो, अन गजर बन्द करुन पुन्हा झोपलो.
पण तितक्याने भागले नाही, त्या खर्‍या झोपेतल्या स्वप्नात मी पुन्हा अंगावर पांघरुण लपेटुन झोपलो, अन त्या झोपेतल्या झोपेत बरीच स्वप्ने बघितली, अन कशामुळे तरी (झोपेतल्या स्वप्नातून) जाग आली (व मूळच्या झोपेत परतलो), सकाळ झाली म्हणून चहा वगैरे पिऊन नंतर डायरेक्ट आंघोळीला गेलो, अन अंगावर पहिला तांब्या पाणी घेताच जागा झालो, तो पूर्ण जागा झालेलो, तेव्हा साडेसात वाजलेले. उशिर झालेला Sad

लिंबुजी आणी गजानन एकदम मजेशीर स्वप्नानूभव्.:हाहा:

लिंबुजी डेस्कवर समोर माधुरी/ मधुबाला/श्रीदेवी/ऐश्वर्या/सुश्मिता यापैकी कुणीतरी ठेवा, म्हणजे स्वप्नात नक्कीच येऊन एखादे गाणे म्हणेल वा नृत्य करेल्.:फिदी: पण बायकोच्या चोरुन चोरुन बघत जावा तो फोटो.:खोखो: नायतर बायको हाणंल तुम्हाला.:फिदी:

हल्ली हल्ली तर मी स्वप्नात झोपुन त्या झोपेत परत स्वप्न बघु लागतो, अन स्वप्नातल्या त्या झोपेतल्या स्वप्नातुन जागा होऊन मूळच्या झोपेतल्या स्वप्नात पुन्हा वावरू लागतो>>>>>>>>>>> मला लिओनार्दो चा सिनेमा आठ्वला. Happy स्व्प्नाच्या लेवल्स ... एकाच्या आत एक स्वप्न Happy

मात्र आजवर कधीही मी स्वप्नात "स्वप्नसुंदरी " की कायसे म्हणतात ते बघितले नाहीये.
>>
येत असेल वो, सांगा बिनधास्त. Wink

रच्याकने, बायकोपण हाय काय माबोवर?

मला वारंवार पडणारे एक स्वप्न म्हणजे - परीक्षेत सगळे पर्यायी प्रश्न धरून माझा पूर्ण पेपर वेळेच्या खूपच आधी लिहून झालाय आणि उरलेला वेळ जाता जात नाहीय.
>>
का उगा थापा मारतासा?

स्वप्नात दिसले स्वप्न,
झालो मी अगदी मग्न

राखी सावंतांची ध्यानस्थ होती
कीर्तन प्रवचनामधे रममाण होती

कॉमेडी सर्कसमधे मनमोहन आले
आपल्या विनोदांनी, हासवून गेले

मोदींच्या सभेला, प्रेक्षक नव्हते
अनवाणी स्वप्न हे, वाट चुकले होते

बत्तासन चोविशी, सौजन्यात होते
सोळासहस्त्रांचे, नवध्येय होते..

स्वप्नात दिसले स्वप्न, झालो मी अगदी मग्न

Kiran Wink

मंथरा, आणखी थोड्या आठवल्या आणखी थोड्या मारीन थापा. Proud

( एक मिनिट - तुम्हाला कसे कळतेय हे - माझ्या थापा आणि 'खर्‍या स्वप्ना'तला फरक. तुम्हीपण माझ्या स्वप्नात असायचात का? आणखी एक मिनिट हां - जरा आठवून आठवून बघतो होतात का...
की आयोध्येत होतो? स्वप्नातल्या की खर्‍या? छे बॉ... लईच गुंतागुंत वाढायला लागलीय. Lol )

फेब्रु. माझ्या बाबांच्या १३ वे झाले, त्यानंतर ५-६ दिवसांनी माझ्या मोठ्या बहिणीच्या स्वप्नात बाबा आले. बाबांच्या हातात शर्ट्-पिस होता आणि बाबा तिला सांगत होते कि हा शर्ट्-पिस मला द्यायचा आहे. मी देऊन येतो, कुणाला ते काही तिला समजले नाही. ती त्यांना सांगत होती की बाबा तुम्हाला चालताही येत नाही,तुम्ही जाऊ नका. स्वप्न एवढेच होते. म्हणुन तिने आम्हा सर्व भावडांना विचारले कि बाबांची काही ईच्छा राहीली असेल का? तर माझ्या भावाला आठवले कि ज्या भटजीने कार्य केले त्याचा शिधा द्यायचा राहीला होता. मग त्याला त्याचा शिधा पोहचवला गेला.....आम्ही विसरलो पण बाबांनी आम्हाला हे असे स्वप्नातुन सांगितले....अशीही सुचक स्वप्ने पडतात.

अवो गजाभौ,
सगळ्यांना पेपर पुर्ण नाही झालाय आणि बेल वाजली अस स्वप्न पडतंय. आणि तुमास्नी पेपर झालाय आनि बेल नाही वाजत अस उलटं स्वप्न पडतंय. Proud

मला बर्‍यापैकी स्वप्नं पडतात अन एकदम व्हरायटी... वारंवार अशी एखाद दोनच.
वईट्टं स्वप्नं -
* गणिताचा पेपर आहे आणि सायन्सचा समजून अभ्यास करून आलेय... (अजून पडतात असली स्वप्नं)
* तबल्याच्या साथीला बसलेय पण ऐकूच येत नाहीये (भयंकर आहे हा अनुभव.. स्वप्नातही. मी घामेजून उठलेय)
वाईट पण विनोदी... बोटीने भारतात आलेय(??)... आईचं घर दिसतं समोर... पण मेला कॅप्टन सांगतो की आज किनार्‍यावर जाता येणार नाही कारण आज पाणी आलं नाही (म्हणजे काय कुणास ठाऊक)
कायतरीच...

मस्तं स्वप्नं -
* मला उडता येतय... म्हणजे पंख नाहीत पण एक उडी मारली की झाडांच्या पार वरून-बिरून... इमारती नाहीत त्या स्वप्नांत... खूपदा पडतं.
* झाकीर हुसेन बरोबर बसून पुरणपोळी खातेय. (त्याला आवडते मला माहितीये... मला खास आवडत नाही).
* बाबांबरोबर गाण्याच्या कार्यक्रमाला चाललेय... अख्तरीबाई अन वसंतराव देशपांडे ह्यांच्या... (कार्यक्रम नाही ह्या स्वप्नात. ह्या स्वप्नानंतर मी रडत उठलेय... आनंदानं).

जागू :- स्वप्नांचे अर्थ कोणी लिहिले की वर अ‍ॅड करतोच. धन्यवाद.

दात निखळुन पडण्याचे स्वप्न बंद होण्याचे कारण कदाचित "आता पडायला दातच उरले नाही" अशी अंतर्मनाची झालेली खात्री असावि का? Happy

टूनटून,
मला तरी आयता धनलाभ वगैरे असा झालाच नाही. स्वप्न मात्र पडल्य बर्‍याच वेळा तसे.

दुसरे म्हणजे मी कधी मधी डायट अंगात(हो अंगात आलेच म्हणते..) तर खाल्ले नाही गोड धोड तर मला अगदी मिठाई वगैरेची ताटं भरलीत अशी स्वपन पडतात... कारण भुकेने व आशेने(गोड खायच्या क्रेवींगने) मला पडतात स्वप्न....

काय अर्थ तो देव जाणे... Happy

अवो गजाभौ,
सगळ्यांना पेपर पुर्ण नाही झालाय आणि बेल वाजली अस स्वप्न पडतंय. आणि तुमास्नी पेपर झालाय आनि बेल नाही वाजत अस उलटं स्वप्न पडतंय.
<<<

आता अख्ख्या अयोध्यानगरीपेक्षा वेगळी स्वप्नं बघणार्‍या मंथरेस म्या काय सांगावे? Proud

फार काय नाही, पण स्वप्नात मी स्वतःला मायबोलीवर पोस्टी देखिल टाईपताना अनुभवलय.

>>>>>>>>>>>>>>>>>>

अगदी अगदी, मी देखील स्वप्नात बरेचदा ऑर्कुटवर कडाडून वाद घालत असतो, आणि जेव्हा त्या वादात काही सुचेनासे होते, म्हणजे हरायला येतो अशी स्थिती होते तेव्हा त्या धसक्याने उठतो... उठल्यावर हायसे वाटते की बाबा असे काही झाले नाहिये.. Wink

गेले काही दिवस महिने एक वेगळाच अनुभव घेतोय, कोणाला आयडीया असेल तर मदत करा प्लीज.

मागे एकदा बायको माहेरी गेली होती, (तसे ती वरचेवरच जाते). तर तेव्हा रात्री उशीरापर्यंत टीव्ही बघत मी बाहेर हॉलमध्येच झोपलो होतो. आई सोफ्यावर तर मी खालीच बिछाना अंथरला होता. त्या रात्री कधी नव्हे ते खूप बेक्कार म्हणजे एकदम भूतप्रेत आत्म्याचे अमानवीय स्वप्न पडले, आणि स्वप्नच ते, एवढे डोक्यात भिनले की पुन्हा झोप काही यायला तयार नाही. ती रात्र जागण्यातच गेली, पण दुसर्‍या रात्रीही तेच.. स्वप्न थोड्याफार फरकाने वेगळे मात्र भूतप्रेतआत्म्याचेच .. आता पुन्हा लागोपाठ दोन रात्री दडपणाखाली जागायची तयारी नसल्याने आईला उठवून तिला माझ्या बाजूला झोपवले. मग मात्र आली कशीबशी झोप, पुन्हा काही स्वप्न पडले नाही..

तिसरी रात्र आलीच नाही कारण बायको माहेरहून परत आली. दिवस सरले तसे हे विसरलो.. पण काही दिवसांनी, महिन्यांनी, बायको पुन्हा माहेरी गेली असताना बाहेर हॉलमध्येच झोपणे झाले.. त्याच जागी.. आणि त्याच प्रकारचे घाणेरडे स्वप्न.. बरे हे स्वप्न एवढे बेकार असते की जोपर्यंत आपण उठत नाही तोपर्यंत हे आणखी आणखी बेक्कार होत जाते.. दचकून उठलो ते पहाट झाली होती त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला मात्र पुन्हा काही झोपू शकलो नाही.

पण आता मी पुरता हादरलो होतो, तीनवेळा असेच होणे काही योगायोग होऊ शकत नाही असा मला विश्वास बसू लागला.. तसेच मागच्यावेळी बाहेर झोपलेले असताना आपल्याला घाण स्वप्न पडले होते, जे पुन्हा होऊ शकते असे काही माझ्या डोक्यातही नव्हते, त्यामुळे हा माझ्याच मनाचा खेळ आहे असेही स्वताला पटवून देऊ शकत नव्हतो. पुढच्या रात्री मला माझ्या बेडरूममध्येही एकटे झोपायला भिती वाटू लागली. आईच्याच आयडियेनुसार मग मी वर सोफ्यावर झोपलो आणि ती माझ्याजागी खाली.. ती रात्र व्यवस्थितच गेली.. पुढची रात्रही सोफ्यावरच झोपलो आणि ती देखील छानच गेली.. त्यानंतर दोन-चार दिवसांसाठी माहेरी गेलेली माझी बायको परत आली आणि हे डोक्यातून निघून गेले..

नुकतेच काही दिवसांपूर्वी पुन्हा असाच बाहेर झोपायचा योग आला, भूतप्रेत वगैरे काही नसते हे विचार मनातून झटकून मी सोफ्यावर झोपलो. गेल्यावेळी दोनदा सोफ्यावर झोपलेले असतानाचा चांगला अनुभव गाठीशी असल्याने निश्चिंत होऊनच झोपलो. मात्र पुन्हा तेच झाले आणि यावेळचे स्वप्न तर आधीच्या सर्व स्वप्नांपेक्षा कैक पटीने भयानक होते. जाग आल्यानंतरही धडकी भरायचे काही थांबत नव्हते. थोड्याच वेळात ती अवस्था सहन न होऊन सोफ्यावरची गादी आईच्या बाजूला अंथरूण तिथेच आडवा झालो. परत पुढची रात्र अर्थातच आईच्याच बाजूला.. कारण बेडरूममध्ये एकटे झोपायचा आत्मविश्वास एव्हाना गमावून बसलो होतो.

पुढच्या वेळी बायको माहेरी जाईल तेव्हा कदाचित मी आईच्या बाजूलाच झोपेन कारण अजून हे डोक्यात आहेच. पण यातून लवकरच बाहेर पडायचा प्रयत्न राहील.. मूळचा मी अंधाराला किंवा भूताखेतांना घाबरणारा नाही कारण कॉलेजला असताना जिथे भले भले जायला घाबरायचे तिथे मी मुद्दाम डेअरींग दाखवायला म्हणून एकटा जायचो. एकटे झोपायचे म्हणाल्यास मध्यंतरी गडचिरोलीलाही मोठमोठाल्या पालींनी भरलेल्या खोलीच्या मध्यभागी एकटाच झोपायचो. तसेच तिथे वरचेवर रात्रीचे लाईट जात असल्याने झिरोचा बल्ब सुद्धा साथ सोडायचा पण त्या काळ्याकुट्ट अंधारात सुद्धा मस्तच झोपायचो.. पण स्वप्ने मात्र खरेच मनावर फार मोठा परीणाम करतात एवढे नक्की.. आता मला ठाऊक आहे की हे सारे झूठ असते तरी स्वप्नात असताना ते सारे खरेच वाटते.. आणि जाग आल्यावर ही कित्येकदा मनाला पटवून देण्यात आपण अयशस्वी ठरतो.. तसेच मग स्वप्न पडणार या भितीने आधीच अस्वस्थ वाटू लागते.. तर या मनाच्या कमजोर स्थितीवर मात करायला कोणाकडे काही उपाय आहे का..

(कृपया त्या स्वप्नांचे वर्णन काय ते विचारू नका की आठवायला लाऊ नका)

@ अभि
कारण नाही सांगता येणार. पण एकटा असताना भूताखेताच्या कथा वाचणे, हॉरर मूवीज पाहणे हे होतं का ? एखादी भयाण कथा डोक्यात घोळते का ?

हं !! माझ्या ब्लॉगवरचा लेख वाचुन हा लिहिला की काय?
कधीकधी माझी आजी (वारली ती) स्वप्नात यायची अन डोळे उघडले की नौवारीतलं कोणीतरी उभं आहे असं वाटायचं.

आजच्या स्वप्नात मी डोमेस्टीक एअरपोर्टवरुन इंटरनॅशनल एअरपोर्टकडे जात असताना माझे सामान राहिले आहे आणि लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंडमधेही ते सामान दिसले नाही, माझी फ्लाईट चुकणारच असे वाटले आणि नवर्‍याने आटापिटाकरुन सामान आणून दिले. Happy

हा एक योगायोग म्हणावा लागेल की आत्ता याबद्दल धागा काढुन प्रश्न विचारणार होतो की अचानक हा धागा मिळाला. तर माझी आई आत्ताच सांगत होती की तिला स्वप्नात लग्न , सरपण , शेणाच्या गौर्या दिसतात. आता हे दिसण अशुभ असते . आम्ही तर खुप घाबरलेलो आहोत,कारण वडिल वारलेले आहेत.आणि त्यात आईला हे स्वप्न ! जाणकार मदत करा.

<<<तुमचा अभिषेक >>>

झोपताना ब-याचदा छातीवर हात ठेवुन झोपल्याने भयानक स्वप्ने पडतात असा ब-याच जणांचा अनुभव आहे. त्यामुळे झोपताना छातीवर हात ठेवुन झोपु नका, जागेचा परिणाम असता तर तुमच्या आईलाही अनुभव आला असता. ब-याचदा असे म्हणतात की भयानक स्वप्न पडत असल्यास उशीखाली लोखंडाची वस्तु ठेवल्यास अशी स्वप्ने पडत नाही, एकदा करून पहायला हरकत नाही.

मी माझ्या श्रद्धेनुसार उशीखाली साईबाबांची उदी ठेवतो मग मला अशी स्वप्न पडत नाही.

Pages