नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.
या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :
१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.
म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.
माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.
…
१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य
आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :
अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)
ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...
आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !
२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).
आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :
“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...
३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8
इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?
४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :
“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
५. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:
तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.
मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...
......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************
यु ट्यूबवर दोन व्हिडियो आहेत
यु ट्यूबवर दोन व्हिडियो आहेत
१. शिमगोत्सव
२ लग्नातला
साधना +१
साधना +१
मी जयवंत दळवींच्या कुठल्याशा लघुकादंबरीत ( बहुधा अधांतर) असाच एक वाक्प्रचार वाचलाय. त्यात कळसाचं पाणी मिळाल्याशिवाय ती अंग धरणार नाही, असं काहीसं वाक्य होतं.
साधना +१
प्र का टा
माझ्या कोकणातल्या एका
*यू ट्यूबवर दोन व्हिडियो आहेत>>>
सध्या माझ्याकडचा जालवेग पुरेसा नाही. नंतर पाहतो.
...
माझ्या कोकणातल्या एका मित्रांनी असे सांगितले:
नवरा नवरी यांना संपूर्ण पोशाखात शेजारी बसवले होते आणि एका व्यक्तीने नळीने दोघांच्या अंगावर पाणी घातले.
असा तो जाहीर कार्यक्रम होता.
पूर्वी कळशीने घातल्या
पूर्वी कळशीने घातल्या जाणाऱ्या ह्या अंघोळीस आता नळी वापरलेली पाहून त्याचे नामकरण नळसवणी असे करण्यास हरकत नसावी.
नळसवणी
नळसवणी
लग्नातला कळसवणी खेळाचा
लग्नातला कळसवणी खेळाचा व्हिडिओ आवडला. छान आहे.
....
वधू-वरांचा विषय चालला आहे तर
वधू-वरांचा विषय चालला आहे तर एका शब्दाची व्युत्पत्ती आणि अपभ्रंश लिहिणे प्रस्तुत ठरेल.
एरवी असभ्य समजल्या जाणाऱ्या झ** या शब्दाचा उगम पहा :
धव = नवरा, त्याचें मुख्य कर्म धवनं अथवा (-वि.) धुवनं( = रतं)
ध चा अपभ्रंश झ झाला.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%...
रोचक
रोचक
एक चांगला लेख :विशेषणांची
एक चांगला लेख :
विशेषणांची उधळपट्टी
https://maharashtratimes.com/editorial/samwad/a-waste-of-adjectives/arti...
...... आपण विशेषणांची अशीच उधळपट्टी करीत राहिलो, त्यांना स्वस्त करत राहिलो, तर कोशकारांनी लवकरच 'विपर्यस्त विशेषण कोश' करायला घेतल्यास नवल वाटू नये!
मस्त लेख आहे कुमार सर.
मस्त लेख आहे कुमार सर.
चांगला लेख. त्या महा
चांगला लेख. त्या महा-विशेषणांनी तर महावैताग आणला आहे. आजकाल महा वापरल्याशिवाय त्या शब्दाला भव्य रूप येणारच नाही अशी समजूत झालेली दिसते. 'महाअंतिम फेरी' हा तर विनोद आहे! अंतिम म्हणजे शेवटची; त्यानंतर काही असू नये. मग त्यात लघुअंतिम - महाअंतिम असे प्रकार असायची काहीच गरज नाही.
मागे मी, तुम्ही कुठेतरी उल्लेख केलेली, सई परांजपे यांची मुलाखत पाहिली. त्यात त्या म्हणतात की 'मस्त' हा शब्द वापरला तर त्यांचे आजोबा ओरडायचे. त्या शब्दाचा मूळ अर्थ (दारू पिऊन मस्त होणे अशा अर्थी) न समजून घेता तुम्ही कुठेही तो शब्द वापरता - असं ते म्हणायचे. पण असो. शब्दांचे अर्थ कालानुरूप बदलतही जातात ह्यावर माझा विश्वास आहे. प्लेटोचा झालेला अफलातून आपण प्लेटोची आठवण न काढताही वापरतोच की. शांता शेळक्यांनीही एका लेखात लिहिल्याप्रमाणे पूर्वी बोरांसाठी वापरण्यात आलेलं 'टपोरी' हे विशेषण आता पोरांसाठी वापरलं जातं. कालाय तस्मै नमः| त्यामुळे मी स्वतःच आजकाल भयंकर मस्त, निव्वळ भारी, उच्च, कडक इत्यादी शब्द वापरतो.
**महाअंतिम फेरी' हा तर विनोद
**महाअंतिम फेरी' हा तर विनोद आहे!
>>> अ ग दी च !
आपण संस्थलापुरता विपर्यस्त विशेषण कोश हळूहळू तयार करू शकतो
कॉलेजच्या मुलामुलींमध्ये असे
कॉलेजच्या मुलामुलींमध्ये असे शब्द बऱ्याच प्रमाणात प्रचलित असतात. त्यातले काही त्यांच्या भाषेत नंतरही टिकून राहतात किंवा त्यांच्याकडून ते आजूबाजूला झिरपतात.
सही, कडक, टवका, पोपट, भारी, गंडणे हे शब्द असेच आले असावेत. कडक, टवका पोपट हे विपर्यस्त असले तरी ते वापरण्यातपण एक मजा असते. अर्थात अतिरेक झाला की त्यातली गंमत निघून जाते.
अर्थात अतिरेक झाला की त्यातली
अर्थात अतिरेक झाला की त्यातली गंमत निघून जाते.
>> +११
विपर्यस्त व अतिवापराने विशेषणाचे 'विशेषत्व' संपते.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरा
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरा नवरी ला मांडवात अंघोळ घालतात. त्याला हळद धुणे म्हणतात. त्यात कुंकवाचे पाणी करून आळीपाळीने नवरा नवरीच्या अंगावर ओततात. त्यात सुताचा चौक करून त्याच्या पाच कोपऱ्यात तांब्याचे कलश पाणी भरून ठेवतात. त्यांना सूत बांधून ठेवलेले असते. लग्नात बांधलेले काकण म्हणजे सुताने हळकुंड बांधलेले असते ते सोडतात. यात मग बरेच खेळ खेळतात. हातातली सुपारी सोडवणे, अंगावर चुळा टाकणे त्या चुकवणे. काकण एका हाताने सोडवावे लागते. सगळ्यात शेवटी 5 कलश पाणी ओतून अंघोळ घालतात. तर पाणी ओतताना नवऱ्याच्या हातातून नवरीच्या अंगावर ओततात व उलटही करतात. त्या पाण्याला कळसवणी म्हणतात.
सांगोपांग माहिती धन्यवाद !
सांगोपांग माहिती
धन्यवाद !
एक शब्द प्रथमच वाचनात आला
एक शब्द प्रथमच वाचनात आला:
निक्षेपक = ठेवीदार
क्षेप = टाकणें; फेकणें; खर्च करणें;
धनक्षेप = धन खर्च करणे.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%...
ठेवीदार खरे तर पैशांची बचत करतो ना. मग तो क्षेपक कसा ? की बँकेला त्याने पैसे ‘देऊन टाकले’ म्हणून ?
असे असावे.
नि या उपसर्गाचा प्रयोग जवळ,
नि या उपसर्गाचा प्रयोग जवळ, खाली इत्यादी अर्थांनी केला जातो. त्यामुळे निक्षेप म्हणजे (एखाद्याच्या) जवळ/पाशी टाकणे. ते करणारा/टाकणारा तो निक्षेपक.
पण तुमची शंका रास्त आहे. एखाद्याजवळ पैसे टाकले म्हणजे ते त्याने परत द्यावेच असा काही अर्थबोध होत नाही.
ह पा'नि' चा अर्थ असा आहे :
ह पा
'नि' चा अर्थ असा आहे :
नि ind A particle and prefix implying certainty, absoluteness; and negation or privation; also of an enhancing power.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A8%E0%A4%BF
अच्छा! इथे वेगळा अर्थ दिलेला
अच्छा! इथे वेगळा अर्थ दिलेला आहे मग - https://www.rbsesolutions.com/class-7-sanskrit-vyaakaran-upasarg-prakaran/
वरील दुव्यावर पोचण्यात
वरील दुव्यावर पोचण्यात तांत्रिक अडचण येत आहे
जरा वेळाने पुन्हा प्रयत्न करतो
धव = नवरा, त्याचें मुख्य कर्म
धव = नवरा, त्याचें मुख्य कर्म धवनं अथवा (-वि.) धुवनं( = रतं)>>>
यावरुन आठवले. विवाहबंधन अद्याप टिकुन असलेल्या स्त्रीने प्रियकर केला तर त्या प्रियकराला धगड असे आमच्या इकडे संबोधतात. अर्थातच उघडपणे नाही तर मागुन त्या स्त्रीची निंदानालस्ती करताना हा शब्द वापरतात.
आंबोली घाट उतरल्यावर लगेच माडखोल लागते (हे नदीचे नाव आहे) तिथे धवडकी नावाची वाडी लागते. माझ्या डोक्यात कुठेतरी धगड हा शब्द असल्याने धवडकी म्हणजे नक्की काय असेल याचे कुतुहल होते. तर धवड म्हणजे लोहार, या वाडीतुन जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजुला लोहारकाम करणार्यांची दुकाने आहेत आणि धगधगते भाते लावुन दिवसभर लो़खंड झोडायचा उद्योग इथे सुरु असतो.
धगड >>> छान शब्द.
धगड >>> छान शब्द.
त्याचे स्त्रीलिंगी रूप : धगडी.
धगडीचा = रांडलेक
एक म्हण : जेथें दगड तेथें धगड.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A7%E0%A4%97%E0%A4%A1
कुमार१, लिंक छान. वेळ मिळाला
कुमार१, लिंक छान. वेळ मिळाला की एकेक शब्द शोधुन वाचत बसायला हवे.
यार हा शब्द हल्ली खुप सार्वजनिक झालाय. मला तो ऊच्चारायचे म्हणजे कसनुसे व्हायचे. जार हा शब्द मागे पडला.
साधना +१
साधना +१
कोकणात राजिवडे, नानिवडे,
कोकणात राजिवडे, नानिवडे, बांदिवडे अशी अनेक ‘वडे’-गावे आहेत.
त्यातील ‘वडे’ हा कशाचा अपभ्रंश याचा शोध घेतला.
उदा. म्हणून बांदिवडे कसे आले ते विजय शेट्टी संपादित ‘नावांच्या गावा…’ या पुस्तकात मिळाले.
२ मते आहेत:
१. उंच डोंगरांमुळे बंदिस्त झालेले गाव = बांदिवाडी >> बांदिवडे.
२. गावाच्या तिन्ही बाजूस नद्या. त्यावर मातीचा बांध घातला = बांधवाडी >>> बांदिवडे.
अवलाद हा परिचित शब्द.
अवलाद हा परिचित शब्द. त्याची वंशानुसार अन्य रूपे पाहा:
अवलाद/औलाद – मुलाची संतती.
‘अफलाद’ = मुलीची संतती
अफलाद चा अपभ्रंश >>>> अफ्वाद / अहफाद
अफलाद चा अन्य अर्थ = ठेवलेल्या बाईची संतती.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%BE%...
‘नि’ negationदेखील दर्शवतो हे
‘नि’ negationदेखील दर्शवतो हे बरोबर.
उदा: ‘निलाजरा’. (मराठीत, अर्थात. तुम्ही संस्कृतातच बघताहात का?)
>>> धव = नवरा
>>> धव = नवरा
याचा कोकणी ‘घोवा’शी काही संबंध आहे का?
सगळी चर्चा वाचली नाही, हा उहापोह आधीच झाला असल्यास क्षमस्व.
Pages