भाग – १६
जगण्या मांत्रिका कडून घरी आल्यावर बाबू आईच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागला , आई ला काही कळेना ती प्रचंड घाबरली ,
ती त्याला सतत विचारत होती पण बाबूच रडण काही थांबेना.
“काय झालय तुला लेकरा , अरे असा का रडतोंयस,” आई देखील रडवेली होऊन त्याला प्रश्न विचारू लागली.
बाबूने जगण्या मांत्रिका सोबत झालेलं सर्व बोलन आईला सांगितलं.
आई कपाळाला हात लाऊन बसली ,
“काय करू मी ह्या पोराच, कोणत्या जन्माच वैर काढतोय कुणास ठाऊक , आता येऊ दे त्याला माझ्या समोर काही खैर नाही त्याची” आई प्रचंड चिडली , आईची अशी अवस्था बघून बाबुला आईचीच काळजी वाटू लागली , त्याने स्वतःला सावरल.
“नको आई , नको तू त्याला काही बोलायला जाऊस , त्याला पुन्हा राग येईल , आता त्याला मी इथून पुढे काहीही बोलणार नाही, त्याला राग येतो न माझा मी चार हात लांब राहील आता त्याच्या पासून”
“अरे , पण त्यान हे सगळ थांबवायला हव , तुझा इतका का राग येतो त्याला, अगदी ह्या थराला जाई पर्यंत ”
“तुला माहित नाही का आई , तू सतत माझ कौतुक करतेस , हेच कारण आहे ,अजून काय”
“बर मग काय त्याच्या चोऱ्या माऱ्यानंच कौतुक करू”
“आई , त्याला सध्या काहीही बोलू नकोस, बघू आपण नंतरच नंतर , मी त्या मांत्रिकाला ताकीद दिली आहे त्याची पोलीसात तक्रार करेल म्हणून आता तो काही चांद्याच्या नादाला लागणार नाही”
त्यानंतर दोघे हि शांत झाले त्यांनी हि गोष्ट दादा आणि झेंडु पासून लपून ठेवली , दुसर्या दिवशी बाबू ने झेंडूच्या शाळेत जाऊन तिथल्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना त्या मुलांची तक्रार केली जे तिला चिडवत होते , आणि त्यांनी त्या मुलांवर योग्य ती कारवाई देखील केली.
त्या नंतर तो विषय बाबू ने घरात अजिबात काढला नाही कि आईला काढू दिला नाही.
ह्यातच पूर्ण वर्ष निघून गेल , मालकाने बाबुला कामगारा पासून त्यांचा सुपरवायजर अशी बढती दिली आणि त्याचा पगार देखील वाढवला .
आता बाबुला दहावीच्या रात्र शाळेचे वेध लागले होते , तो म्हटल्या प्रमाणे रात्र शाळेत दाखल झाला , रोज दोन तास लौकर सुटून सकाळी कामावर दोन तास लौकर जाऊ लागला , ह्या सर्व धावपळीत त्याला बायडाला भेटणे जवळपास अशक्य होऊ लागले , त्यांना संध्याकाळच टेकडीवर भेटण जमेनास झाल ती रोज त्याची कामावर परतताना त्यांच्या नेहमीची ठिकाणी वाट पाहू लागली , पण तो कधी खूप उशिरा यायचा , तर कधी खूप लौकर , भेट काही केल्या होत न्हवती , त्याच्या घरी जाऊ भेटाव तर ते तिला प्रशस्थ वाटायचं नाही.
आणि अशातच आबाने म्हणजे बायडाच्या वडिलांनी बायडाच लग्न तिच्याच मामाच्या मुलाशी सुहासशी करायचं नक्की केल ,
सुहास हा एका खाजगी कंपनीत कामाला होता पगार जास्त नसला तरी त्याने आबाला बिना हुंडा लग्न करायची तयारी दाखवली होती , त्याच्या घरात त्याची आई , वडील , लहान भाऊ , दोन लहान बहिणी असा मोठा प्रपंच होता , त्याच्यावर त्याच्या कुटुंबाची आणि बहिण भावाच्या शिक्षणाची जबाबदारी होती.
बायडाची इच्छा नसताना तिचा बघण्याचा कार्यक्रम पार पडला , बायडा सुहासला पसंत पडली आणि येत्या पंधरवड्यात त्याचं लग्न आबा उरकणार होते आता ही गोष्ट बाबुला कशी सांगायची तो तर तिला निवांत भेटत देखील न्हवता मग तिने त्याला पत्र लिहायचं ठरवलं , बाबूने लिहायला वाचायला शिकवल्या नंतर बायडाची त्याला स्वता:हून पत्र लिहायची ती पहिलीच वेळ आणि कदाचित शेवटची देखील.
“प्रीय, बाबू,
मजह लगीन ठरवल हाय आबानी , तू कवा भेटशील मला तुज्यासंग बोलयचं हाय,
तुजी
बायडी”
अश्या तोडक्या मोडक्या संवादाची चिट्ठी लिहून तिने ती झेंडु कडे दिली आणि आठवणीने बाबुला दे हा अस समजावून देखील सांगितलं , झेंडु ने ती चीठ्ठी तिच्या शाळेच्या दप्तरात लपून ठेवली , आणि त्याच दिवशी अचानक चंदू लौकर घरी आला , त्याला कशाला तरी कागद हवा होता कुठून घ्यावा म्हणून त्याने झेंडुच अख्ख दप्त्तरच रिकाम केल आणि त्याला हि घडी करून ठेवलेली चीठ्ठी दिसली , त्याला कागद मिळाला त्याच काम झाल तो कागद घेऊन पसार झाला. इथे झेंडु ने पुन्हा पुन्हा दप्त्तर तपासलं पण तिला काही ती चीठ्ठी सापडली नाही , कशी सापडणार ती तर कधीच चांद्याने वापरून फाडून टाकली होती ,
पण तरीही झेंडु ने बाबुला त्या चीठ्ठी बद्दल सांगितलं , त्यातला मजकूर काय होता हे तिने दुसर्याची पत्र वाचायची नसतात हे शाळेतल्या बाईनी शिकवलं असल्यामुळे वाचला न्हवता , पण आता तिला तो मजकूर वाचायला हवा होता अस वाटू लागल, जेव्हा झेंडु कडून बाबुला त्या चीठ्ठी बद्दल समजल तर कदाचित बायडाने त्याला टेकडीवर भेटायला बोलवलं असेल म्हणून त्याने सुरुवातीला लक्ष नाही दिल , त्याने तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिची भेट घेऊ अस ठरवलं , आणि आज जाऊ - उद्या जाऊ अस म्हणत दहा-बारा दिवस उलटून गेले , आणि एकदाचा त्याला तिच्या कामावर बंगल्यावर जायचा वेळ मिळाला,
आत जाऊन पाहतो तर बायडा चार दिवसापूर्वीच काम सोडून गेली होती आणि अंन्टी त्याच्यावर भयंकर चिडली होती,
“तू मेंटल , हे क्या , वो लडकी तुझे पागल कि तऱ्हा मिलने कि कोशिश कर रही थी, और तू क्या इधर इतना शांतीसे आया उसे मिलने के लिये”
“काय झाल अंन्टी , मी तिला भेटायला येणारच होतो पण नवीन शाळा म्हणून नाही वेळ मिळाला”
“अरे, उसकी शादी है परसो उसके मौसी के यहा पे, वाकड गयी है वो, क्या तुझे कुछ भी पता नही”
“काय, कस शक्य आहे , मला तर ती काहीच कस बोलली नाही”
“तू उसे मिलेगा तब तो बतायेगी ,जा पहले उससे जा के मिल , बेठ मत अभी इधर , पेहेले हि बहोत देर हो गयी है”
बाबुला काय कराव काही सुचत न्हवत तो घाईघाईत घरी गेला , त्याने आईला सर्व काही सांगितलं आणि त्याने आईकडे त्याचे साठवून ठेवलेले पैसे मागितले.
“पण आता काय करणार आहेस तू , तिकडे जाऊन, लग्न ठरलंय म्हणतोस ना “ आई ने बाबुला विचारल.
“अजून दोन दिवस आहेत आई , आणि मला एक कमाल वाटते , मी तिला नाही भेटलो म्हणून तिने मला नाही सांगितलं , पण मग ती तुला तर सांगू शकत होती ना”
“.................................................”
“तुला का नाही सांगितलं तिने , जाताना भेटली ती तुला” बाबू आईला प्रश्न विचारातच होता.
“................................................”
आईने ऐकून न ऐकल्यासारख केल , बाबुला शंका आली , तो तिच्या जवळ गेला , आईचा हात त्याने त्याच्या डोक्यावर ठेवला ,
“खर सांग आई , तुला माहित होत ना , तीच लग्न ठरलं आहे ते “
“हो माहित होत “ आई ने शांतपणे उत्तर दिल.
बाबू तसाच उठला, आणि एसटी स्टॅन्ड च्या दिशेने जवळ जवळ धावत सुटला.
वाकडला पोहोचे पर्यंत सकाळ झाली , मौशीच घर शोधण त्याला ह्यावेळी काही कठीण गेल नाही,
बाबूला बघून बायडाच्या जीवात जीव आला , आबा , बायडा, तिचे दोघे भाऊ सर्व तिकडेच होते , नाही म्हंटल तरी बाबू वर प्रचंड दडपण आल पण त्याने काहीही झाल तरी आबांशी आता बोलायचंच अस मनाशी पक्क केल.
“बाबू , तू काय करतोस र इथ, मी तर आपल्या वस्तीत कुणालाबी सांगितलं न्हाय बायडीच्या लग्नाचं” आबा बाबू शी थेट बोलू लागले.
“आबा , ऐका ना , मी काय बोलतोय , ती अजून खूप लहान आहे , इतक्यात कुठ तीच लग्न ठरवताय”
“आन तू लय मोठा झालास व्हय , मला शिकवाया”
“तसं नाही आबा , माझ ना प्रेम आहे हो बायडा वर , तीच लग्न अस दुसर्या कुणाशी नका ना करू, हव तर तुम्ही तिला विचारा” बाबू च्या डोळ्यात अश्रू जमा झाले.
“ये, पोरा , आर याड बीड लागलंय का तुला, आर तुझ वय काय आन तू बोल्तूस काय, आला हैईस इथ तर गप चार घास खा, आन घरला जा ,”
“आबा, मी पाया पडतो तुमच्या , माझ खरंच खूप प्रेम आहे , तुम्ही तिला विचार तरी एकदा” अस म्हणून बाबूने चक्क आबांचे पाय धरले.
त्याच बरोबर बायडा देखील त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली.”आबा, खर सांगतोया बाबू, माझ बी प्रेम हाय त्याच्यावर”
“बायडे , गप , गुमान आत जा , इथ लोकाच्या घरी तमाशा नग मला , आन ये पोरा , मला हात उचलाया भाग पडू नगस, शंकर्या ह्याला हाकल इथून लय झाल ह्याच”
“आबा, आबा ,अस नका करू , आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय , खरच नका अस करू, शंकर , शंकर, तू तरी समजाव ना , ऐका ना माझ”
मौशी च्या घरातली, आसपास ची माणस सर्व जमा होऊन आपापसात कुजबुजू लागली , मौशीला मेल्याहून मेल्या सारख झाल होत , काही झाल तरी ती तिच्या माहेरची माणस होती , मग तिनेच बाबू समोर हात जोडले.
“हे बघ पोरा, लय तमाशा होतोय , पोरीच लगीन हाय माझ्या , जा इथून तू , मी पायजे तर पाया पडते तुझ्या” मौशी चे डोळे वाहू लागले.
“अहो पण मौशी “ बाबू ने बोलायचा प्रयन्त केला.
पण मग ती लगेच बाबू च्या पायाशी आली , तसा बाबू चटकन बाजूला झाला , आणि नाईलाजाने जायला निघाला, त्यान एकवार बायडा कडे पाहिलं, ती सुन्न नजरेने त्याच्याच कडे पाहत होती ,
बाबू निघून गेला ,पण तो घरी नाही गेला , त्याला कुठेच जावसं वाटेना , तो तिथेच एस्टी स्टॅन्ड वर बसून राहिला तब्बल दीड- दिवस काही न खाता पिता , तिसर्या दिवशी त्याला ढोल तश्यानच्या आवाजाने जाग आली ती नवऱ्या कडची माणस होती एस्टी स्टॅन्ड मधून उतरली होती ,
बाबू ते सर्व सुन्न नजरेने पाहत होता , ते लोक वाजत गाजत त्यांच्या समोरून निघून गेले , त्याने तिच्या नवऱ्याला सुहासला पाहून घेतलं ,
काळा-सावळा, पण उंच पुरा सुहास नवर देवाच्या वेशात खुलून दिसत होता , बाबू ने एकवार स्वत: कडे आणि मग पुन्हा सुहास कडे पाहिलं , त्याला जाणवलं आपण खरच खूप लहान आहोत का , की बायडाच लग्न इतक्या मोठ्या माणसाशी लाऊन देत आहेत तिच्या घराचे ,
ती माणसे जाई पर्यंत तो तिथेच उभा राहिला मग काहीतरी आठवल्या प्रमाणे तो त्या त्यांच्या मागे गेला ,
मंडप सजला होता , माणसांची वर्दळ दिसत होती, लहान पोर सजून धजून इकडे तिकडे पळत होती , बायकांची लगबग चालू होती , तो तिथेच कुणाला दिसणार नाही अश्या एका झाडाच्या अडोश्याला जाऊन उभा राहिला ,
थोड्या वेळातच मंगलाष्टक सुरु झाली, बाबू पाहतच होता , कोणी तरी नवर्या मुलीला उचलून मांडवात आणल,
त्याला विश्वासच बसेना ती बायडा आहे म्हणून किती वेगळी आणि मोठी दिसत होती ती आणि बर्यापैकी सावरल्या सारखी देखील , कदाचित तिने देखील आता वास्तव स्वीकारल होत आणि तसं ही मुलींच्या इच्छे नुसार प्रेम विवाह करण हे त्या माणसाना पटण्यासारख न्हवत .
संपूर्ण लग्न बाबू ने पाहिलं एकाच जागी उभ राहून जराही न हलता ,
थोड्याच वेळात मागून त्याच्या खांद्यावर एक हात पडला.
क्रमश :
वाचतोय
वाचतोय