पनीर - २00 ग्रॅम ग्रेट करून
३ मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून
भोपळी मिरची (मध्यम) - २ बारीक चिरून
३ ते ४ अमूल चीज क्यूब ग्रेट करून
पावभाजी मसाला - १ १/२ टे स्पून
काश्मिरी लाल तिखट - १ टे स्पून
गरम मसाला - १ टी स्पून
कसुरी मेथी - १ टे स्पून
टोमॅटो केचप - २ टे स्पून
धणे जिरे पावडर - १ टे स्पून
बटर - १ टे स्पून
तेल - फोडणीसाठी अंदाजानुसार
पाणी - एक ते दीड वाटी (आमटीची वाटी)
हिन्ग, हळद, मीठ चवीनुसार
कढईत तेल घ्या. तेल तापले की त्यात हिन्ग, हळद व बारीक चिरलेला टोमॅटो आणि भोपळी मिरची टाका. २ मिनिटानंतर त्यात सगळे मसाले टाका, बटर टाका आणि मीठ टाका. तेल सुटू लागले की त्यात पनीर टाका. नन्तर पाणी टाका. एक वाफ काढून त्यात किसलेले चीज टाका. २ मिनिटे वाफ काढा. घोटाला तयार
हा घोटाला मसाला पाव बरोबर मस्त लागतो. त्यासाठी लादी पाव घ्यावा. तव्यावर बटर टाका, बटर वितळले की त्यात थोडे काश्मिरी लाल तिखट आणि कोथिंबीर टाका. पाव मधून कापून ह्या मिश्रणावर दोन्ही साईडने शेकून घ्या.
ह्यात कांदा अजिबात घालायचा नाहीये. टोमॅटो केचप टाकायचेच आहे. मसाला पावाबरोबर फारच मस्त लागतो. मूळ कृतीमध्ये जिरे घातले जातात फोडणीत, पण जिर्याशिवाय चव जास्त चांगली लागली.
घोटाला करून बघितला....मस्त
घोटाला करून बघितला....मस्त झाला. धन्यवाद लंपन !!
सुट्टीतला उद्योग म्हणून
सुट्टीतला उद्योग म्हणून लेकीला ही पाकृ दिली आणि कर म्हटले. छान झाला आहे घोटाला. सगळ्यांना आवडला. पटकन होतो.
आरती, वैदेही अन धन्वंती
आरती, वैदेही अन धन्वंती धन्यवाद. इतर रेसप्या पण ट्राय करा
मस्त तोपासू दिसतेय..
मस्त तोपासू दिसतेय.. प्रतिसादांतले फोटोही भारी
अप्रतिम झाला घोटाला, मस्त
अप्रतिम झाला घोटाला, मस्त पाककृती लंपन!
मस्त तोंपासू डिश दिसतेय.
मस्त तोंपासू डिश दिसतेय.
पाऊस पडत असताना मज्जा येईल खायला.
रुन्मेष, रानभूली धन्यवाद.
रुन्मेष, रानभूली धन्यवाद. अस्मिता छान दिसत आहे फोटो , रेसिपी आवडली हे वाचून छान वाटले
केला केला घोटाला. हिट आहे
केला केला घोटाला. हिट आहे रेस्पी ! 8 ला पोहोचले घरी, आणि ह्या घोटाळ्याचे सगळे घटक घरी होते तर म्हंटलं करूनच टाकू, फटाफट झाला, पटापट मसाला पाव पण केले आणि पोटात पण गेला. छान च, झाला, फोटो लोड करते. थोड्या वेळाने.
एकदम सोपी रेसीपी. आज ब्रेफा
एकदम सोपी रेसीपी. आज ब्रेफा व टिफिन साठी केली. टेस्टी आहे. मी कांदा घातला मात्र. आणि मॅगी हॉटँड स्वीट ट्माटो चिली सॉस इट्स डिफरंट. कसुरी मेथी आयत्यावेळी सापडली नाही. टेस्टी प्रकार.
मी केप्सिकम व कॉर्न पनीर मसाला करते डब्याला सुकी भाजी पण काल पाव सा तन आल्यावर सर्व कॉर्न चा ट करुन संपवुन टाकले मग आज ही रेसीपी भेटली.
जय महाराष्ट्र
फोटोत नीट दिसत नाहीये पण
फोटोत नीट दिसत नाहीये पण विश्वास ठेवा खूप मस्त झाला घोटाला.
मस्त दिसतंय धनुडी..
मस्त दिसतंय धनुडी..
मस्त दिसतंय धनुडी, करायला
मस्त दिसतंय धनुडी.
करायला सोपे, चवीला झणझणीत. मुलांनाही आवडते व आईला पोळ्या करण्यापासून सुट्टी मिळते. आमच्या घरात हिट झाला सु प घो
अमा धनुडी अस्मिता धन्यवाद.
अमा धनुडी अस्मिता धन्यवाद. धनुडी मस्त दिसत आहे की घोटाला. तुम्हा लोकांना आवडली डिश हे वाचून छान वाटले. खूप कमी वेळ लागतो हा मोठा प्लस आहे.
क्युब ग्रेट करून म्हणजे किसून
क्युब ग्रेट करून म्हणजे किसून का? >>> हो , आता असंच मराठी लिहीलं जातं... (किंवा असच मराठी लिहील जात.. असे पण म्हणतात)...
फार फार मस्त रेसिपी आहे ही.
फार फार मस्त रेसिपी आहे ही. आता आठवड्यातून एकदा होतेच होते. गरम फुलक्यासोबत खायला फार मस्त लागते.
मी त्यात थोडा कांदा आणि ठेचलेला लसूण पण टाकला होता. मस्तच लागले.
एकदा घरी पाहुणे आले होते तेव्हा 10 जणांसाठी केला होता घोटाळा.. पनीर न आवडणाऱ्या जेष्ठांनी पण आवडीने खाल्ले.
खूप धन्यवाद या रेसिपी साठी.
पुण्यात पौड रोड ला पालवी हॉटेल मध्ये शाही पनीर अशी एक डिश मिळते . त्याची चव बऱ्यापैकी घोटाळा सारखी च लागते.
क्युब ग्रेट करून म्हणजे किसून का? >> पनीर आणि चीज ओट्यावर ठेवून त्यांना म्हणायचं की तुम्ही किती ग्रेट आहात. आणि मग घोटला करायचा म्हणजे भाजी चवदार होते .. (दिवे घ्या) :-);-)
हा आमचा घोटाला...
हा आमचा घोटाला...
आज केला घोटाला. मस्तं झाला.
आज केला घोटाला. मस्तं झाला.
आजच केला होता. मुलांना खूप
आजच केला होता. मुलांना खूप आवडला ( मलाही अर्थात) !
कसूरी मेथी विसरले
फोटो देण्याचे मला जमत नाही.
पण धन्यवाद एका छान रेसिपी साठी !!
आजच केलेला हा घोटाळा ;-)पण
आजच केलेला हा घोटाळा ;-)पण कोणत्याही घोटाळ्याशिवाय.. मस्तच आहे रेसिपी. बॅचलर्स किंवा एकट्याने राहणाऱ्या मंडळींना सहजपणे करता येईल अशी.. हिट्ट आमच्याकडेही ..
काल अठरा जणांच्या पार्टी साठी
काल अठरा जणांच्या पार्टी साठी हा घोटाळा केला. एकदम हिट झाला. लहान मोठे सगळ्यांना आवडला. काल फोटो काढायचा राहिला. हा उरलेला
कसले एकेक सही फोटो आहेत
कसले एकेक सही फोटो आहेत सर्वांचे, जबरदस्त.
सगळ्यांचे घोटाले जबरी दिसतायत
सगळ्यांचे घोटाले जबरी दिसतायत.
प्राचीन>> घोटाळ्याशिवाय घोटाळा
स्मिता, इंदूसुता, अनामिका,
स्मिता, इंदूसुता, अनामिका, प्राचीन आणि साक्षी धन्यवाद. साक्षी पार्टीमध्ये सगळ्यांना आवडला हे वाचून मस्त वाटलं. स्मिता तुमच्या पाहुण्यांना पण आवडला वाचून छान वाटले. कमी वेळात टेस्टी पदार्थ होतो , साहित्य पण फार नाही लागत. सर्व फोटो पण मस्त. विनय
आज केलाय अखेर. मस्त यम्मी
आज केलाय अखेर. मस्त यम्मी झालाय .काश्मिरी तिखट नव्हते त्यामुळे घरच्या लाल तिखटवर भागवल. बाकी रेसिपी तंतोतंत फॉलो केली. मसाला पाव पण मस्त झाले होते.
झटपट होणारा पोटभरीचा चविष्ट मेनू आहे .
आज परत केला, कसूरी मेथी
आज परत केला, कसूरी मेथी विसरले होते. नंतर घातली. पण पावाबरोबर नाही खाणार, पोळ्या केल्या.
नेहमीचाच पोळी भाजी खायचा
नेहमीचाच पोळी भाजी खायचा कंटाळा आला होता. काहीतरी वेगळा मेन्यू करुया असा विचार केला आणि ह्या बाफची आठवण झाली.
सुपरहिट झाला होता घोटाळा. शेवटी कढई पण चाटून पुसून साफ केली
आज केला घोटाळा
आज केला घोटाळा
छान झाला बायको मुलीला आवडला
हा घोटाळा असा पहिलाच असेल जो
हा घोटाळा असा पहिलाच असेल जो केल्यानंतर करणारा त्याची चारचौघात जाहीर कबुली देतो,. बुमाबूम करून सांगतो घोटाला केला. आणि घरचे खुषही होतात
धनुडी
धनुडी
ज्जे बात
ज्जे बात
Pages