पनीर - २00 ग्रॅम ग्रेट करून
३ मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून
भोपळी मिरची (मध्यम) - २ बारीक चिरून
३ ते ४ अमूल चीज क्यूब ग्रेट करून
पावभाजी मसाला - १ १/२ टे स्पून
काश्मिरी लाल तिखट - १ टे स्पून
गरम मसाला - १ टी स्पून
कसुरी मेथी - १ टे स्पून
टोमॅटो केचप - २ टे स्पून
धणे जिरे पावडर - १ टे स्पून
बटर - १ टे स्पून
तेल - फोडणीसाठी अंदाजानुसार
पाणी - एक ते दीड वाटी (आमटीची वाटी)
हिन्ग, हळद, मीठ चवीनुसार
कढईत तेल घ्या. तेल तापले की त्यात हिन्ग, हळद व बारीक चिरलेला टोमॅटो आणि भोपळी मिरची टाका. २ मिनिटानंतर त्यात सगळे मसाले टाका, बटर टाका आणि मीठ टाका. तेल सुटू लागले की त्यात पनीर टाका. नन्तर पाणी टाका. एक वाफ काढून त्यात किसलेले चीज टाका. २ मिनिटे वाफ काढा. घोटाला तयार
हा घोटाला मसाला पाव बरोबर मस्त लागतो. त्यासाठी लादी पाव घ्यावा. तव्यावर बटर टाका, बटर वितळले की त्यात थोडे काश्मिरी लाल तिखट आणि कोथिंबीर टाका. पाव मधून कापून ह्या मिश्रणावर दोन्ही साईडने शेकून घ्या.
ह्यात कांदा अजिबात घालायचा नाहीये. टोमॅटो केचप टाकायचेच आहे. मसाला पावाबरोबर फारच मस्त लागतो. मूळ कृतीमध्ये जिरे घातले जातात फोडणीत, पण जिर्याशिवाय चव जास्त चांगली लागली.
मस्त.
मस्त.
वीकेंडला करणार हा पदार्थ.
वीकेंडला करणार हा पदार्थ.
अंडा घोटाला https://www.maayboli.com/node/54324 या रेसिपीने अगदी मस्त होतो. मी मटण आणि चिकन खिमा दोन्ही वापरुन केलाय .
मस्त व सोपी रेसिपि . करुन
मस्त व सोपी रेसिपि . करुन पहायचिच आहे.
आज करून बघितली. छान लागते
आज करून बघितली. छान लागते चवीला.
1 वाटी पाण्याने अजिबात पाणचट नाही होत.
मीही ही रेसिपी करून पाहिली.
मीही ही रेसिपी करून पाहिली. पनीर ऐवजी फर्म टोफू वापरलं. मस्त झाली होती. आवडली.
मीसुद्धा काल केली ही रेसिपी.
मीसुद्धा काल केली ही रेसिपी. काहीही बदल केले नाहीत. फार मस्त झाला होता!! धन्यवाद रेसिपीसाठी.
मानव, मेधा, आरती, चैत्रगन्धा,
मानव, मेधा, आरती, चैत्रगन्धा, मेघना, मैत्रेयी खूप धन्यवाद. आवडला पदार्थ हे वाचून छान वाटलं.
लय भारी झाला. मी चीज न घालता
लय भारी झाला. मी चीज न घालता केला. एकदम सोपी आहे रेसिपी. लादीपाव असता तर आणखीन मजा आली असती पण आज स्लाईस ब्रेडवर भागवलं. तो ही रेसिपीप्रमाणे मसाला पाव केला.
लादीपाव म्हणजे स्लाइस ब्रेड
छान
सायो मस्त दिसतोय घोटाला!
सायो मस्त दिसतोय घोटाला!
सायो मस्त दिसतोय घोटाला!>>
सायो मस्त दिसतोय घोटाला!>> +११११
प्लेटमध्ये मसाला पावाबरोबर
प्लेटमध्ये मसाला पावाबरोबर घेतलेल्या फोटोचा साईझ खूप कमी करावा लागतोय म्हणून तो टाकला नाही. हा आता बर्याचदा केला जाणार.
मस्त दिसते आहे ग्रेव्ही.
मस्त दिसते आहे ग्रेव्ही. फोटो घेताना जमेल तितका उंचावरुन घ्यायचा. मग करताना/ क्रॉप करताना बरोब्बर येतो. प्लेट मध्ये बोल मध्ये
घोटाला व दोन पाव असा सेट करून हात उंच करून फोन ने फोटो घ्या. मस्त येइल.
मी बिघडवली. टमाटो, सिमला
मी बिघडवली. टमाटो, सिमला मिर्च्या बाऽऽऽरीक चिरायचा कंटाळा केला. पाचच टमाटो शिल्लक होते , म्हणून ते सगळे घातले. त्यामुळे पाणी घालायच्या आधीच पाणी सुटलं होतं. तरी पाणी घातलं.
आणि
.
.
.
.
.
बटर मागवायला विसरलो.
सायो .. कातील आलाय gravy cha
सायो .. कातील आलाय gravy cha फोटो..करून बघावी वाटतीय...पुण्यात कोणत्या कंपनीचे पनीर चांगले असते?
मस्त रेसिपी. फोटो तर अगदी
मस्त रेसिपी. फोटो तर अगदी तोंपासू.
भरत, ते बटर न घातल्याबद्दल दहापैकी नऊ मार्क कटाप. ते आणि चीज हवेच. दिवा घ्या प्लिज
केया, मला इथे गोयल कंपनीचे ताजे पनीर मिळते, ते चांगले आहे.
मी चीज नाही घातलं. मला
मी चीज नाही घातलं. मला युट्युबवरच्या रेसिपीत दाखवतात तसं ज्यात त्यात चीज घालायला आवडत नाही. भारतीय पदार्थात तर इतकी गरज नसतेच. माझ्याकडे केचपही नव्हतं. नेक्स्ट टाईम ते असेल तेव्हाच करेन.
okey ऑर्किड..
okey ऑर्किड..
सायो भारी दिसतोय पनीर घोटाला.
सायो भारी दिसतोय पनीर घोटाला.
कातिल आहे . करून बघण्यात येईल
कातिल आहे . करून बघण्यात येईल.
केला आज. मुलांना आवडला.
केला आज. मुलांना आवडला.
आज सकाळी सकाळी घोटाळा केलाय .
आज सकाळी सकाळी घोटाळा केलाय .
नंतर जेवताना गरम करेन तेव्हा चीज घालेन.
वाहवा. मस्त फोटो आहेत. छान
वाहवा. मस्त फोटो आहेत. छान पाककृती. लगेच करण्यात येईल.
सगळ्यांचे फोटो टेम्पटींग आहेत
सगळ्यांचे फोटो टेम्पटींग आहेत.
एवढी छान आणि सोपी रेस्पी करून बघितल्या शिवाय मी केस डाय करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो.
एक प्रश्न आणि त्यात उपप्रश्न: बटर स्किप केलेले चालेल का, किंवा अनसॉल्टेड/कमी-सॉल्टेड बटर कुठल्या ब्रँडचे चांगले मिळते?
करुन पाहिला. छान झाला एकदम.
करुन पाहिला. छान झाला एकदम. धन्यवाद रेसीपीसाठी .
YFL वर अंडा घोटाला आहे. पण अंड खात नाही त्यामुळ करून बघितली नव्हती.
सर्वच फोटो आहाहा.
सर्वच फोटो आहाहा.
परत एकदा खूप धन्यवाद _/\_
परत एकदा खूप धन्यवाद _/\_ सायो, स्वाती अन स्वस्ति फोटू मस्त दिसत आहेत. भरत पुन्हा एकदा करून बघा. मानव लोल, बटर नाही घातले तरी चालेल पण चीज मात्र नक्की घाला. सायो पुढल्या वेळी चीज अन केचपने नक्की ट्राय करा.
काल केलेला हा घोटाळा. खूप
काल केलेला हा घोटाळा. खूप मस्त झाला होता. धन्यवाद रेसिपीसाठी. पुढच्या वेळी चीज ना टाकता करून पाहणार आहे.
काल केलेला हा घोटाळा. खूप
काल केलेला हा घोटाळा. खूप मस्त झाला होता. धन्यवाद रेसिपीसाठी. पुढच्या वेळी चीज ना टाकता करून पाहणार आहे.
(No subject)
Pages