सुरती पनीर घोटाला

Submitted by लंपन on 7 March, 2022 - 08:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर - २00 ग्रॅम ग्रेट करून
३ मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून
भोपळी मिरची (मध्यम) - २ बारीक चिरून
३ ते ४ अमूल चीज क्यूब ग्रेट करून
पावभाजी मसाला - १ १/२ टे स्पून
काश्मिरी लाल तिखट - १ टे स्पून
गरम मसाला - १ टी स्पून
कसुरी मेथी - १ टे स्पून
टोमॅटो केचप - २ टे स्पून
धणे जिरे पावडर - १ टे स्पून
बटर - १ टे स्पून
तेल - फोडणीसाठी अंदाजानुसार
पाणी - एक ते दीड वाटी (आमटीची वाटी)
हिन्ग, हळद, मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

कढईत तेल घ्या. तेल तापले की त्यात हिन्ग, हळद व बारीक चिरलेला टोमॅटो आणि भोपळी मिरची टाका. २ मिनिटानंतर त्यात सगळे मसाले टाका, बटर टाका आणि मीठ टाका. तेल सुटू लागले की त्यात पनीर टाका. नन्तर पाणी टाका. एक वाफ काढून त्यात किसलेले चीज टाका. २ मिनिटे वाफ काढा. घोटाला तयार Happy

हा घोटाला मसाला पाव बरोबर मस्त लागतो. त्यासाठी लादी पाव घ्यावा. तव्यावर बटर टाका, बटर वितळले की त्यात थोडे काश्मिरी लाल तिखट आणि कोथिंबीर टाका. पाव मधून कापून ह्या मिश्रणावर दोन्ही साईडने शेकून घ्या.

Paneer Ghotala .jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्यात कांदा अजिबात घालायचा नाहीये. टोमॅटो केचप टाकायचेच आहे. मसाला पावाबरोबर फारच मस्त लागतो. मूळ कृतीमध्ये जिरे घातले जातात फोडणीत, पण जिर्याशिवाय चव जास्त चांगली लागली.

माहितीचा स्रोत: 
युट्युब वरचे गुजराती फूड चॅनेल्स खासकरून Dharmis Kitchen
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

लय भारी झाला. मी चीज न घालता केला. एकदम सोपी आहे रेसिपी. लादीपाव असता तर आणखीन मजा आली असती पण आज स्लाईस ब्रेडवर भागवलं. तो ही रेसिपीप्रमाणे मसाला पाव केला.

CCDBD280-5715-41D1-ABC8-60427EFC8F87.jpeg

प्लेटमध्ये मसाला पावाबरोबर घेतलेल्या फोटोचा साईझ खूप कमी करावा लागतोय म्हणून तो टाकला नाही. हा आता बर्‍याचदा केला जाणार.

मस्त दिसते आहे ग्रेव्ही. फोटो घेताना जमेल तितका उंचावरुन घ्यायचा. मग करताना/ क्रॉप करताना बरोब्बर येतो. प्लेट मध्ये बोल मध्ये
घोटाला व दोन पाव असा सेट करून हात उंच करून फोन ने फोटो घ्या. मस्त येइल.

मी बिघडवली. टमाटो, सिमला मिर्च्या बाऽऽऽरीक चिरायचा कंटाळा केला. पाचच टमाटो शिल्लक होते , म्हणून ते सगळे घातले. त्यामुळे पाणी घालायच्या आधीच पाणी सुटलं होतं. तरी पाणी घातलं.
आणि
.
.
.
.
.
बटर मागवायला विसरलो.

सायो .. कातील आलाय gravy cha फोटो..करून बघावी वाटतीय...पुण्यात कोणत्या कंपनीचे पनीर चांगले असते?

मस्त रेसिपी. फोटो तर अगदी तोंपासू.
भरत, ते बटर न घातल्याबद्दल दहापैकी नऊ मार्क कटाप. ते आणि चीज हवेच. दिवा घ्या प्लिज
केया, मला इथे गोयल कंपनीचे ताजे पनीर मिळते, ते चांगले आहे.

मी चीज नाही घातलं. मला युट्युबवरच्या रेसिपीत दाखवतात तसं ज्यात त्यात चीज घालायला आवडत नाही. भारतीय पदार्थात तर इतकी गरज नसतेच. माझ्याकडे केचपही नव्हतं. नेक्स्ट टाईम ते असेल तेव्हाच करेन.

सगळ्यांचे फोटो टेम्पटींग आहेत.
एवढी छान आणि सोपी रेस्पी करून बघितल्या शिवाय मी केस डाय करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो.

एक प्रश्न आणि त्यात उपप्रश्न: बटर स्किप केलेले चालेल का, किंवा अनसॉल्टेड/कमी-सॉल्टेड बटर कुठल्या ब्रँडचे चांगले मिळते?

करुन पाहिला. छान झाला एकदम. धन्यवाद रेसीपीसाठी .
YFL वर अंडा घोटाला आहे. पण अंड खात नाही त्यामुळ करून बघितली नव्हती.

परत एकदा खूप धन्यवाद _/\_ सायो, स्वाती अन स्वस्ति फोटू मस्त दिसत आहेत. भरत पुन्हा एकदा करून बघा. मानव लोल, बटर नाही घातले तरी चालेल पण चीज मात्र नक्की घाला. सायो पुढल्या वेळी चीज अन केचपने नक्की ट्राय करा.

IMG_2049_0.jpg

काल केलेला हा घोटाळा. खूप मस्त झाला होता. धन्यवाद रेसिपीसाठी. पुढच्या वेळी चीज ना टाकता करून पाहणार आहे.

IMG_2049_0.jpg

काल केलेला हा घोटाळा. खूप मस्त झाला होता. धन्यवाद रेसिपीसाठी. पुढच्या वेळी चीज ना टाकता करून पाहणार आहे.

Pages