पनीर - २00 ग्रॅम ग्रेट करून
३ मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून
भोपळी मिरची (मध्यम) - २ बारीक चिरून
३ ते ४ अमूल चीज क्यूब ग्रेट करून
पावभाजी मसाला - १ १/२ टे स्पून
काश्मिरी लाल तिखट - १ टे स्पून
गरम मसाला - १ टी स्पून
कसुरी मेथी - १ टे स्पून
टोमॅटो केचप - २ टे स्पून
धणे जिरे पावडर - १ टे स्पून
बटर - १ टे स्पून
तेल - फोडणीसाठी अंदाजानुसार
पाणी - एक ते दीड वाटी (आमटीची वाटी)
हिन्ग, हळद, मीठ चवीनुसार
कढईत तेल घ्या. तेल तापले की त्यात हिन्ग, हळद व बारीक चिरलेला टोमॅटो आणि भोपळी मिरची टाका. २ मिनिटानंतर त्यात सगळे मसाले टाका, बटर टाका आणि मीठ टाका. तेल सुटू लागले की त्यात पनीर टाका. नन्तर पाणी टाका. एक वाफ काढून त्यात किसलेले चीज टाका. २ मिनिटे वाफ काढा. घोटाला तयार
हा घोटाला मसाला पाव बरोबर मस्त लागतो. त्यासाठी लादी पाव घ्यावा. तव्यावर बटर टाका, बटर वितळले की त्यात थोडे काश्मिरी लाल तिखट आणि कोथिंबीर टाका. पाव मधून कापून ह्या मिश्रणावर दोन्ही साईडने शेकून घ्या.
ह्यात कांदा अजिबात घालायचा नाहीये. टोमॅटो केचप टाकायचेच आहे. मसाला पावाबरोबर फारच मस्त लागतो. मूळ कृतीमध्ये जिरे घातले जातात फोडणीत, पण जिर्याशिवाय चव जास्त चांगली लागली.
धनुडी
धनुडी
(No subject)
आज बरेच दिवसांनी केला सुपघो
आज बरेच दिवसांनी केला सुपघो
अरे गिरीकन्द किती वर्षांनी
अरे गिरीकन्द किती वर्षांनी दिसत आहे, धन्यवाद. निलूदा धन्यवाद. धनुडी
काल बरेच दिवसांनी घोटाला केला
काल बरेच दिवसांनी घोटाला केला. आधी २-३ दा केल्या मुळे रेसिपी न बघता केला पण खाताना सारखं काहीतरी वेगळं लागत होतं.
नेहेमीसारखी टेस्ट लागली नाही. म्हणुन आज येउन सहज रेसिपी चेक केली तर टोमॅटो केचप विसरला हे लक्षात आले.
ही रेसिपी जशीच्या तशी एकदम फुलप्रुफ आहे. एकही पदार्थ कमी जास्त केला तरी ती मज्जा येत नाही.
पुढच्या वेळी रेसिपी करताना आधी रिव्हिजन करुनच करणार
भारी दिसतोय प्रकार. करून
भारी दिसतोय प्रकार. करून बघायलाच हवा हा घोटाळा
मलाही करायचा आहे हा पदार्थ
मलाही करायचा आहे हा पदार्थ
कधी मुहूर्त लागतोय काय माहिती
अरे, कर कर . मस्त होतो. मला
अरे, कर कर . मस्त होतो. मला असं झालं की " तुमचे अभी तक घोटाला नहीं किया?"
नक्कीच, weekend ला
नक्कीच, weekend ला
अशक्य भारी टेस्ट. ते पण
अशक्य भारी टेस्ट. ते पण इतक्या कमी प्रयत्नात आणि लिमिटेड साहित्यात. २-३ वेळेस बनवून झाली आहे. धन्यवाद
धन्यवाद लोकहो.
धन्यवाद लोकहो.
हा घोटाळा केला आहे आताच, चीझ
हा घोटाळा केला आहे आताच, चीझ नव्हतं so नाही घातलं. Test taste बाकी आहे, सांगते. पनीर घरी केलं आहे, दूध फाडून.
..
मस्त झालाय पदार्थ. घरी सगळ्यांना आवडला.
हा पनीर घोटाळा एकदा नक्की
हा पनीर घोटाळा एकदा नक्की करून पाहायचा आहे..
फोटो भारी..!
म्हणुन आज येउन सहज रेसिपी चेक
म्हणुन आज येउन सहज रेसिपी चेक केली तर टोमॅटो केचप विसरला हे लक्षात आले.
>>> केचप कधी टाकायचे आहे, कुठल्या स्टेप ला?
उद्या १७ जणांसाठी करायचा आहे.
उद्या १७ जणांसाठी करायचा आहे सुपघो. एकत्र केळवण करणार आहोत. भाचीच्या लग्नासाठी भाऊ भावजयीला .तिघी बहिणी मिळून.आणि टोमॅटो सार पण मीच करणार आहे.
Pages