धाग्याची प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/65034
तर मंडळी आमची anniversary आणि ह्यांच्या (म्हणजे आमचे अहो) वाढदिवसाचा महिना जवळ येतोय.
Gift काय द्यावे ते सुचवा.
दोन occasions असल्याने दोन gifts तयार ठेवावी लागतात. एरवी मी काहीतरी विचार करून जमवते व्यवस्थित पण पुरुष मंडळींना काय द्यावं हा नेहमीच पडणारा प्रश्न आहे.
(बरं विचारायला जावं तर iphone, ipad, ray ban अशी उत्तरे येतात . एवढं माझं बाई budget नाही. )
मुलींना किती काय काय देता येतं ना!
(मलाही फेब्रुवारी महिन्यात २ गिफ्ट्स मिळतात म्हणा1.
It is like जगा आणि जगू द्या)
सध्या वेळ कमी आहे म्हणून पटकन घरी order करता येईल किंवा बनवता येईल असं काहीतरी सुचवा प्लीज
(ह्यापूर्वी पाकीट, घड्याळ, perfume, कपडे,
Goggle वगैरे देऊन झालंय)
महिलावर्गाला कामाला येईल हा धागा..
निदान जास्त पर्याय तरी documented राहतील
प्रतिसादांनुसार काही गोष्टींची यादी इथे देते आहे:
----------------------------------------------------------------------------------
चांगले हेडफोन्स, लंबार सपोर्ट असलेली ऑफिस चेअर, अर्गॉनॉमिक कीबोर्ड आणि माउस, फ्लॅट स्क्रीन मॉनिटर,
फॉर्मल टाय ,
योगा मॅट - डंब बेल्स - रेझिस्टंस बँड्स ,
कॉकटेल शेकर आणि कॉकटेल्स बनवण्याठी लागणारी इतर औजारे, कॉकटेल रेस्पीचे पुस्तक, कॉर्डलेस /किंवा कॉर्डेड पावर ड्रिल,
घरगूती टूल्सचा सेट ( हातोडी , नीडल नोझ प्लायर्स, कटिंग प्लायर्स, अडजस्टेबल रेंच ( स्पॅनर म्हणतात बहुतेक भारतात ) अशा गोष्टी ) , ऑफिससाठी किंवा पर्सनल प्रवासाठी बॅकपॅक, छोटेखानी दुर्बीण , रेन जॅकेट , चांगली फोल्डिंग छत्री,
स्वैपाकाची आवड असेल तर चांगल्या प्रतीच्या सुर्या,
लेदर बेल्ट, आवडता पर्फ्यूम, हायकिंग / ट्रेकिंग / कॅम्पिंग चे साहित्य , थंड हवेच्या प्रदेशात रहात /प्रवास करत असल्यास लोकरी स्वेटर्/मफलर्/टोपी , ग्लव्ह्स
-------------------------------------------------------------------------------
किंडल/तत्सम काही ॲप असल्यास ऑनलाईन पुस्तक खरेदी
नेटफ्लिक्स चे ३ महिन्याचे सबस्किप्शन
बाळाची डेस्कवर ठेवायला फोटोफ्रेम
हस्तलिखित कविता, थँक्स गिव्हिंग
------------------------------------
SHoes
Perfume, hot cold thermos, water bottle stainless steel , you can engrave your name and baby Rama's name on it, tie , sport shoes,
Surprise dinner
--------------------------------------
वायरलेस हेडफोन, इयरबड ( स्कलकेन्दी वैगरेचे फार महाग नाहित , एअर पोड , फीटबिट , लेदर ऑफिसबॅग, लेदर जेकेट , टी-शर्टस , आदिदास वैगरे जोगर्स पॅन्ट-टी सेट
--------------------------------------------------------
नावासोबत एखादा छानसा फोटो (दोघांचा/एकट्याचा) प्रिंट केलेला कॉफी मग
Tripod Stand for Mobile Phone
Leather Credit Card Holder/Business card/ATM Card holder 24 card Slots
मोबाईल फोन साठी आकर्षक Case
-----------------------------------------------------
Wristwatch, Bluetooth speakers, MP 3 Player,
आराम करणे आवडत असेल तर किंवा बजेट असेल तर ईझी चेअर,
-------------------------------------------------
जुन्या गाण्यांची आवड असेल तर सारेगामा इ
टाटा/ रेमंड चे उत्तम परफ्युम्स
क्लीन शेव्हींग करत असतील/ आवड असेल तर पूर्ण शेव्हिंग किट (मॅन्युअल/ पॉवर्ड)
वॉलेट वापरत असेल तर ते
गाड्यांची इ. आवड असेल तर टीम-बिएचपी च्या गुडीज (मग्स, कीचेन, कार स्टिकर्स, टीज, हूडीज इ.)
---------------------------------------------------
Wireless headphones/ airpods
3 in 1 printer
Wireless charger
Travel Bluetooth folding key board
Play station
Movies membership cards
Dart boards
Desktop golf
Quick dry/super dry towel ( हे काहीही वाटेल पण जे नियमित फिरणारे असतात त्यांना फार ऊपयोगी ठरतो)
Bed side pockets ( for headphones/ power bank/ books/eye glasses)
Travel bag organizers/ smart pack travel sets
Neck tie travel roll
Cuff links
Knife set/ Swiss knife
Chef’s portable multi tool
Couch arm table
Smart squeeze stress release ball
Stimulating aromatherapy inhalers
Letters to my daughter set
--------------------------------------------------------------------------
वरील पर्याय सुचवल्याबद्दल आभार
--------------------------------------------------------------
ह्याशिवाय आणखी खास भेटवस्तु काय असु शकतात, ह्यासाठी प्रतिसादात उत्तम माहीती आहे, ती माहीती प्रतिसादातच वाचावी
किल्ली, व्यायामाची आवड असेल
किल्ली, व्यायामाची आवड असेल तर किंवा नसेल तरीही आग्रह/प्रेरणा/जबरदस्ती म्हणून जंप रोप, योगा चटई, रेझिस्टंट बँड्स सेट, डंबेल्स, बाईक असे काही देता येईल.
लोणावळ्याला हॉट एअर बलून राईड
लोणावळ्याला हॉट एअर बलून राईड हा चांगला ऑप्शन आहे.
https://www.lonavalahotairballoonclub.in/ (अजूनही बर्याच कंपन्या आहेत)
दरडोई ६ ते १२ हजार चार अशी प्राईस रेंज आहे. लॉकडाऊन आणि पाऊस यामुळे काही शेड्यूल चेंज झाले असतील तर कल्प्नना नाही.
ते पुण्यावरून पिक अप -ड्रॉप पण अरेंज करतात.
वाढदिवस अगदी मेमोरेबल होईल. मॅरेज अॅनिवर्सरी साठी सुद्धा छान ऑप्शन आहे.
नेटफ्लिक्सचे वार्षिक
नेटफ्लिक्सचे वार्षिक सब्स्क्रिप्शन कुपन, एखाद्या नवीन सिनेमाची ब्लुरेडिस्क, ब्राऊनचे इलेक्ट्रिक शेवर देऊ शकता (सिरीज ७/९ फक्त)
ह्यावर्षी काय दिले :
ह्यावर्षी काय दिले :
चांदीचा चमचा (हसू नका)
(हे दुकानातून घेतलं, अमा ह्यांनी सुचवल्याप्रमाणे चांदीच्या वस्तू घ्यायच्या होत्या पण म्हटलं एका वेळी एकच घेऊ )
.
टी शर्ट, chinos पॅन्ट आणि रिस्ट वाच
.
त्याच नेहमीच्या वस्तू आहेत पण सगळ्या वाढदिवसाच्या दिवशी deliver झाल्या आणि काय parcel आलंय बघ असं सांगून त्यांनाच घ्यायला लावल्या (cod नव्हत्या
)
मजा आली, reaction चांगली मिळाली
थोडंसं पावसाळी हवेत फिरून आलो रमेसोबत
अर्धा दिवस वगैरे, तेच celebration.
केक बरा होता, काहीतरी वेगळी चव.
केक ची मज्जा झाली.
आदल्या रात्री कुणी (झोमॅटो )केक डिलीव्हर करायला तयारच होईना तुफान पाऊस होता, शेवटी belgium waffles चा मिळाला तोच order केला. त्यांचे आभार
किती क्युट धागा आहे, आता लक्ष
किती क्युट धागा आहे, आता लक्ष गेले.
)
मागिल वर्षी मी नवर्याला ऑफिस चेयर घेऊन दिली, उपयुक्त वस्तू ठरली ती. (त्याला हवीच होती पण लॉक डाऊन फार काळ असणार नाही वगैरे भ्रामक समजुतीत तो होता, अजुनही घरून काम सुरू आहे
एरवी नवरा चेन, अंगठी, फार से कपड्यांची आवड नसलेला (अर्थात बोर टाईप) असा आहे तर प्रश्न पडला होता.
हा धागा कामाला येईल
ह्यावर्षी टी शर्ट्स order
ह्यावर्षी टी शर्ट्स order केले आहेत
Safe side
काहीतरी customized gift तयार करण्याच्या विचारात आहे.
एकटीचा वेळ मिळणं फारफार कठीण आहे, बघू कसं जमतंय
आता ह्या धाग्यात भर पडू शकते.
आता ह्या धाग्यात भर पडू शकते..स्मार्ट वॉच (फिटनेस ट्रॅकर), वायरलेस ईयरफोन/कीबोर्ड्/माऊस वगैरे मस्त मस्त वस्तू आल्यात.
नवरा या प्राण्याच्या काहीही
नवरा या प्राण्याच्या काहीही अपेक्षा नसतात. बिचार्याला एखादा पँटपीस, शर्टपीस, टॉवेल, टोपी लग्नात मिळाली त्यावरच पाच सहा वर्षे आरामात निघतात. बायकोलाच साडी घ्यायची असल्यास स्वतःला अपराधी वाटू नये म्हणून ती नवर्याच्या मागे लागते कि "हे काय ! किती जुने झाले कपडे ? चला नवीन घेऊ " पण तो बिचारा स्वतःवर पैसे खर्च न करता महागड्या साड्यांसाठी ते साठवत असतो.
इथून पुढचे लिहीताना अक्षरशः बोटात हुंदके आणि पोटात आवंढे येताहेत.
चहा सारखी गोष्ट, पण सहा रूपये जातील म्हणून तो पीत नाही. तेव्हां त्याच्या मनात सोन्याचे दागिने घ्यायचेत, त्याची जमवाजमव चालू असते. शूज जुने झालेले असतात. पण चांभाराकडे जाऊन शिवू शिवू घालत असतो.
नाही नाही... पुढचे लिहवत नाही. स्क्रीनवरची अक्षरे दिसेनाशी झाली आहेत.
काय देणार अशा प्राण्याला म्हणूनच असा प्रश्न पडत असतो.
तिकडे दुसर्या हातावर ( ऑन द अदर हॅण्ड) बायकोला कितीही आणि काहीही घ्या, कमीच पडते, त्यामुळे तिथेही काय घ्यावं हा प्रश्न पडत असतो.
एकंदरीत कठीणच आहे.
नवा आय फोन घ्या.
नवा आय फोन घ्या.
गुवाहाटी ट्रिप
गुवाहाटी ट्रिप
ओ शांत प्राणी, असा सिन टुकार
ओ शांत प्राणी, असा सिन टुकार मराठी चित्रपटात पाहिलात का काय? १९५० साल चे वर्णन आहे हे!
तो गर्म कोट सिनेमा बघितला
तो गर्म कोट सिनेमा बघितला आहे का? लोअर मिडल क्लास पण सभ्य सुसंस्कृत फॅमिली असते. निरु पा रॉय व बलराज साहनी बर्यापै की तरुण दिसतात व तीन मुले. त्यांच्या गरजा घर चालवणे खर्चाचा मेळ बसत नाही. ओढाताणच आहे खरेतर. एक कसले तरी पैसे यायचे असतात . बहुतेक पगा रच. तर प्रत्येकाच्या काही डिमांड असतात. नवरा बायकोच्या हातात पैसे ठेवतो. तर ती बाहेर जाउन फक्त नवृयाला गरम कोट सुटाचे रेशमी कापड घेउन येते व त्याच्या हातात ठे वते. आणि प्रेमाने बघते. तुम्ही आमच्यासाठी इतके करता. तुम्हालाच गिफ्ट हवी. आमच्या गरजा आम्ही बाजूला ठेवतो काही क्षण.
इतकीशीच कथा आहे. पण फार मस्त अॅक्टिन्ग. पुल म्हणतात तसे असले बाप कुठे गेले.मिया बीबीतले प्रेम महत्वाचे. यु आर ब्लेस्ड ऑलरेडी.
आशु २९ ( वय कि काय ?) १९५०
आशु २९ ( वय कि काय ?) १९५० साली आम्ही वल्कले नेसून जंगलात आ SS आ SS आ SS आ SS उ SS करत एका झाडावरून दुसर्या झाडावर लटकत होतो. तुम्ही खूपच प्रगत दिसता.
Pages