मायबोलीकर यूट्युबर्स - पुस्तक दर्पण (प्राचीन)

Submitted by प्राचीन on 7 June, 2022 - 06:56

नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की Happy Happy मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw

रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.

एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान.
सादरीकरण आवडले !
अभिनंदन !!

नक्की पाहतो...
ABP Maza चाही नवीन पुस्तकाचा संक्षिप्त परीचय छान असतो...त्यात पुस्तकाच्या लेखकाला बोलावतात.एक वेळी दोन चार नवीन पुस्तकं असतात.
कार्यक्रमाचे नाव... आनंदाचे पान
https://youtu.be/iq2wtnq8mtk

छान उपक्रम!
तुमचे सादरीकरण पण छान आहे.

सामो, ऋ., कुमार १,दत्तात्रय साळुंके, मृणाली, किशोर मुंढे, अश्विनी११, राधिका, साधना आणि निलाक्षी > तुम्ही सगळ्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. यामुळे पुढे पाऊल टाकण्यास उत्साह वाटतोय..

अतुल., छान वाटलं प्रतिसाद वाचून.. गौरव केलात आपण अगदी..
अवल, राधिका, रुपाली, कौतुकाबद्दल धन्यवाद गं.
सामो, कौतुक पोहोचलं बरं का..

तुमचे चॅनेल बघितले , आवडले . त्यातील ' केतकरवहिनी ' पुस्तक लायब्ररीत मिळाले . छान आहे . तुमच्यामुळे या पुस्तकाबद्दल कळले . अशीच उत्तमोत्तम पुस्तके सुचवत रहा .

आताच तुमचे सादरीकरण(केतकरवहिनी) पाहिले.
सुरेख,प्रसन्न सादरीकरण.पुस्तक वाचून 7-८ वर्षे झाली आहेत. त्या बाईंच्या नीडरतेचा ठसा अचंबित करतो.
धन्यवाद!

अश्विनी ११,देवकी,जागू_प्राजक्ता, छान वाटलं कौतुक ऐकून. धन्यवाद.. आजही एक पुस्तक घेऊन येतेय. लिंक इथे देत आहे..

नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने एका पत्नीच्या शब्दांत पतीचं चरित्र..
https://youtu.be/4ZwA4-Q0IIk
आज रात्री आठ वाजता टाकणारे. सवडीनुसार जरूर बघा.

Submitted by प्राचीन on 17 June, 2022 - 19:09.......
त्याच दिवशी हा भाग पाहिला होता.छान होता.इथे kalavayche राहून गेले.

उपक्रम चांगला आहे. मानसोल्लास उर्फ अभिलषितार्थ चिंतामणि हे पुस्तक एक मोठा ठेवा आहे. त्याचा परिचय आवडला. ह्यातल्या खाद्य भागात मिरचीचा उल्लेख नाही. म्हणजे निदान यादव काळापर्यंत दख्खन पठारी भागात मिरची माहीत नव्हती असा निष्कर्ष काढता येऊ शकतो. खाद्येतिहासातल्या अशा छोटया छोटया गोष्टी मनोरंजक तर असतातच पण संस्कृतीच्या वळणाची दिशा दाखवणाऱ्यासुद्धा असतात.
आपली पुस्तक निवड चांगली असते. सादरीकरणही छान.
माडगावकर ह्यांचं पुस्तक निवडलंत तेही छान. कारण विसाव्या शतकात प्रसिद्ध झालेल्या पण त्याआधी कमीतकमी अडीजशे वर्षे लिहिल्या गेलेल्या महिकावतीची बखर आणि साष्टीची बखर ह्या दोन पुस्तकांव्यतिरिक्त प्रचलित किंवा त्यातल्या त्यात अलीकडच्या मराठीत लिहिलेली मुंबई विषयी एकत्र संकलित अशी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवाय ही दोन्ही पुस्तके माडगावकरकाळाहून अधिक जुन्या काळच्या मराठीत असल्याने परिणामकारक वाचनासाठी योग्य नाहीत.
अशीच सुंदर सुंदर पुस्तके निवडीत राहावे आणि वाचानोत्सुकांना अधिकाधिक उत्सुक करावे.

हीरा, मिरची आणि इतर काही गोष्टी - बटाटा, टोमॅटो वगैरे पोर्तुगीज भारतात आल्यानंतरच आपल्या पाकृमध्ये आले हे सर्वमान्यच आहे ना?

Pages