अग/वाग मध्ये हे छोटा प्रतिसाद लिहायला म्हणून घेतले होते. लिहिता लिहिता अजून बरेच सुचत गेले. म्हणून पाडला वेगळा लेख. अर्थातच केवळ विरंगुळा म्हणून केलेले लिखाण आहे हे त्यामुळे घ्या
---
• I think there is background noise from your end.
(मागं इतका गाड्यांचा आवाज कसा रे? कुठं रस्त्याकडेला उभारून काम करतोयस का?)
• So what is the update on that please?
(अजून तेच करायला लागलायस होय रे? अरे तीन दिवस झाले कि राव)
• Yes I am on it.
(काय इंग्लिश भाषा राव. कोंबडी अंडी उबवते तसं काम उबवयत बसलोय असं वाटतंय)
• I am doing it. It is in progress.
(सगळा वेळ तुमच्या मिटिंगमध्येच जातोय. आताची मिटिंग नसती तर काम पूर्ण झालं असतं)
• There is blocker, I am badly stuck. I dont know how to do that.
(त्या फेसबुक आणि गुगलची मारामारी. ते एक टेक्नोलॉजी काढतंय तोवर हे वेगळीच टेक्नोलॉजी घेऊन येतंय. मधल्यामध्ये डेवलपरचं मरण)
• That's older technology, it has upgraded now.
(सकाळीच अपग्रेड केलंय. आता संध्याकाळपर्यत राहील कि आउटडेटेड होणार माहित नाही)
• But you said it was working yesterday?
(म्हणजे कालसुद्धा तयार नव्हतं हे. पण तू मला झालंय म्हणून थाप मारलास काल)
• I think there is advance technology now.
(च्यायला आता कुठे सगळे माहित झाले असे वाटले तोवर ह्यांनी नवीन टेक्नोलॉजी आणली)
• They have release new version of it and we need to upgrade.
(कंटाळा आला राव. मला वाटतंय आता दहाएक वर्षे तरी अपग्रेड करण्यावर कायद्याने बंदी आणा. आम्ही काम करावं का तुमचं सोफ्टवेअर अपग्रेड करण्यातच आयुष्य घालवावं?)
• We already had discussed this yesterday's. But it's ok I will explain it again now.
(कालच सांगितलं होतं कि रे. झोपला होतास काय?)
• Is my voice breaking? Ok wait a moment please...... how is it now?
(काहीही न करता थोड्या वेळानी फक्त "हाऊ इज इट नाऊ?" विचारायचं)
• Your voice is breaking. I can not hear anything.
(स्वस्तातला प्लान आहे का? चांगलं शंभर एमबीपीएस घे कि राव)
भारी
भारी
(No subject)
Save the Manager!https:/
Save the Manager!
https://youtu.be/cu32J3ADibo
प्रतिसादही एकापेक्षा एक भारी
प्रतिसादही एकापेक्षा एक भारी आहेत.
प्रतिसाद एक से एक
प्रतिसाद एक से एक
आज सकाळपसून ऑफिसच्या क्लायेंटकडून इंजिनियरचा सतत म्हणजे अगदी सतत फोन येतोय. बिचारा अजून ज्युनिअर आहे. आणि QA करत बसला आहे. म्हणून मी सुद्धा सहकार्य करत आहे. पण मर्यादा असते ना. आता फोन आला होता...
मी (फोन घेऊन): Yes please, tell me. What is the issue now?
मनात: अरे काय भुणभुण लावली आहे रे सकाळपासून? सगळे इश्श्यूज एकत्र टाचण करून एकदाच फोन कर ना बाबा. हा एकच प्रोजेक्ट आहे का आम्हाला? जसं काय आम्ही बाकीचे कामधंदे सोडून तुझ्याच फोनची वाट बघत बसलोय.... इत्यादी इत्यादी
चांगलं तासभर मिटिंग सुरु असते
चांगलं तासभर मिटिंग सुरु असते. शेवटी मिटिंग होस्ट विचारतो "Okay we have covered everything, anything else pending?"
मग कुणाला काही अजून बोलायचे नाही याची खात्री झाल्यावर तो म्हणतो "Okay then lets conclude"
आता आपण हुश्श्य म्हणून मिटिंग एंड करणार इतक्यात कोणतरी "Just one last thing I want to ask..."
Meting host: Yes please ask
(मनातल्या मनात: अरे आता तासभर बोललो कि. अजून काय विचारायचं राहिलं बाबा? )
त्याचे सगळे चर्चा करून झाल्यावर पुन्हा होस्ट विचारतो "Okay I think we can conclude this call now"
हुश्श्य! आता झाले एकदाचे सगळे, असे वाटतंय तोच अजून कोणतरी "I also have just one last thing I want to ask..."
Meting host: Yes please ask
(आपण मनातल्या मनात: अरे यार, आता याचे आणि काय राहिले? अजून अर्धा तास घेणार कि काय आता हा? बस्स करा रे.... )
लेख आणि प्रतिसाद सगळेच भारी
लेख आणि प्रतिसाद सगळेच भारी
KT(knowledge transfer) चाली चालू करताना सुरवातच अशी करतो की nothing customized here and all is SAP standard configuration!
मी काही केटी देणार नाहीये फक्त फॉरमॅलिटी करायची आहे.
कलीगला मदत मागितली की -- oh.. need to check it in detail.. will check from my side and lets discuss later
वाट बघ! मी काही मदत वगैरे करणार नाहीये..
see, we are not authorized
see, we are not authorized to do this analysis / activity.
मला / आम्हाला येत असले तरी मी / आम्ही का करु हे काम.
तुम्ही सगळे मूर्ख आहात.
तुम्ही सगळे मूर्ख आहात. ( हे मनातल्या मनातच)
टीम मीटींग्स मधे
टीम मीटींग्स मधे
कलीग X : can we do it by different method.
बाकी सर्व : नको ना डोक्याचं दही करू…फुक्कट हुशारी मारतो/ मारते.
टीम लीड: we have to work on this
Saturday
इतर : नको ना यार….वीकेंड ला पण तुमचचं तोंड बघू.
आय ऍम थिंकिंग लाऊड
आय ऍम थिंकिंग लाऊड
(लगेच चुका काढून तुटून पडू नका रे नरसाळ्यानो! सांगून ठेवलंय आधीच वेड्यासारखे बोलणार आहे म्हणून.)
वी डोन्ट हॅव बँडविड्थ टू डू डॅट
(हे बघा, आम्हाला अजिबात जास्तीची कामं सांगायची नाहीत.जरा ओळखीची कामं करत बसलोय ते बघवत नाही का?)
आय ऍम थिंकिंग लाऊड
आय ऍम थिंकिंग लाऊड
Let me see, I am noting your
Let me see, I am noting your issue.
मला माहीत नाही काय करायचं ते.
Im expecting this task to be compeleted in this week.
म्हणजे आजारी(खरे खोटे काहीही )असाल तरी सुट्टी मिळणार नाही
यु टेक युवर कॉल. बट इफ आय
यु टेक युवर कॉल. बट इफ आय वेअर यु, आय वूड हॅव ट्रीटेड टास्क विथ प्रायोरीटी 0.
(मेल्या, इथे मी मरतोय तुमची स्टेटस देऊन तुमच्या साठीच्या शिव्या स्वतः खाऊन, तुला ट्रेनिंग ला नाव द्यायचं आहे?माहिताय काय मोठे दिवे लावणारेस शिकून ते.)
>> मी काही केटी देणार नाहीये
>> मी काही केटी देणार नाहीये फक्त फॉरमॅलिटी करायची आहे
>> तुम्ही सगळे मूर्ख आहात. ( हे मनातल्या मनातच)
>> नको ना डोक्याचं दही करू
>> थिंकिंग लाऊड
>> I am noting your issue.
I am noting your issue.
म्हणजे थोडक्यात, "बडबड बंद कर तुझी, मी नोट डाऊन केले आहे" आणि परत त्या नोट कडे ढुंकूनही बघायचे नाही पुढच्या मिटिंग पर्यंत
'थिंकिंग लाऊड' ट्रेंड मध्ये आहे आजकाल. तयारी न करता बोलायचे म्हणजे 'थिंकिंग लाऊड' बरे पडते
तसेच बऱ्याच वर्षापूर्वी let
तसेच बऱ्याच वर्षापूर्वी let the creative juices flow हि फ्रेज तत्कालीन म्यानेजर लोकांच्यात ट्रेंड होता.
का माहित नाही पण मला अजिबात हा वाक्प्रचार आवडत नव्हता. जेंव्हा केंव्हा मिटिंगमध्ये CEO/Manager वगैरे लोक म्हणायचे
Give us ideas about how to solve this. Let the creative juices flow in your head.
मी मनातल्या मनात: आयडिया देतो. पण तसलं काय म्हणू नका ना राव! डोक्यात पाणी झाल्यासारखं वाटतं मग
ते अजून एक पिक युवर ब्रेन
ते अजून एक पिक युवर ब्रेन वाक्य आहे ते अजिबात आवडत नाही मला.कोणी माकड मीटिंग मध्ये येऊन सर्वांच्या डोक्यातल्या उवा काढेल असं वाटतं ऐकून.
कोणी माकड मीटिंग मध्ये येऊन
कोणी माकड मीटिंग मध्ये येऊन सर्वांच्या डोक्यातल्या उवा काढेल असं वाटतं ऐकून.
pick someone's brain गुगलून
pick someone's brain गुगलून बघितलं. रे देवा! कोण महान आत्मे असले वाकप्रचार बनवत असतील?
एका एमएनसी मध्ये काम करत होतो
एका एमएनसी मध्ये काम करत होतो. कार्पोरेट हेड का कुणाचा चा इमेल आला. एका नवीन ज्युनियर इंजिनियर चे कौतुक केले होते.
मान्य आहे पोरगं नवीन आहे. काम छान केलंय. कौतुक तर करायलाच हवे. सगळे मान्य आहे. चांगलेच होते, वाईट काहीच नाही.
पण शब्द काय वापरले होते: "Kid has done great job"
आम्ही मनातल्या मनात: Kid? नक्की का? चांगला पंचवीस तीस वर्षाचा घोडा आहे कि राव. कुणीकडून कीड वाटला दिसला हा तुला?
आमच्याकडे correct me if I am
आमच्याकडे correct me if I am wrong असं म्हणण्या ऐवजी keep me honest here असं म्हणायची पद्धत आहे
मी मनातल्या मनात काय बोलत
मी मनातल्या मनात काय बोलत अस्ते ते कोणास कळले तर चक्कर येइल पब्लिकला.
(No subject)
यु टेक युवर कॉल. बट इफ आय
यु टेक युवर कॉल. बट इफ आय वेअर यु, आय वूड हॅव ट्रीटेड टास्क विथ प्रायोरीटी 0. > हे किंवा मग I would have done this in different way.. >> अरे मग तुच का नाही करत किंवा आधीच सांगून ठेवाय्चे ना.. आता सगळं झाल्यावर आलाय मोठ्ठा/ आलीय मोठ्ठी
काही काही लोकांना ठराविक
काही काही लोकांना ठराविक वाक्य म्हणायची सवय असते (पूर्वी नाही का? काही हिंदी सिनेमात असे एखादे पात्र असायचे, ज्याचा ठराविक एकच डायलॉग सगळ्या सिनेमाभर अधूनमधून असायचा).
तसे पूर्वी आमच्या एका क्लाएंट कंपनीचा एक टेक्निकल लीडर होता. आमच्या काही शंका असतील तर त्या निरसन करण्यासाठी आम्हाला त्याला जोडून दिले होते. पण त्याचे वैशिष्ट्य असे होते कि काहीही शंका विचारली कि त्याचा पहिला प्रतिप्रश्न असायचा, "What is the use case?"
काहीही विचारा. ह्याचे ठरलेले. "व्हाट इज द यूऽऽऽज केस?" हो, Use चा उच्चार तो तसाच करायचा. "यूऽऽऽज"
बरं, हा टीमला सहकार्य करत नव्हता. मदत सुद्धा फार उपकार केल्यासारखी करायचा. ऐकून घ्यायचा नाही. आमच्या इंजिनियर्सना प्रसंगी उद्धट सुद्धा बोलायचा. त्यामुळे त्याच्याविषयी आमच्या टीममध्ये फार चांगले मत नव्हतेच.
एकदा एका मिटिंग मध्ये आमच्या टीमने एका कॉन्फरन्सरूम मधून त्याच्याशी कॉन्फरन्स केली होती. हा पलीकडून नेहमीप्रमाणे आपली वृत्ती दाखवून बोलू लागला. विचारणाऱ्याला इज्जत द्यायची नाही. एकही प्रश्नाला नीट उत्तर द्यायचे नाही. भलतीच काहीतरी बडबड करायची. वगैरे वगैरे. सगळे नाराज झाले होते. अशातच त्याला आमच्या एका टीम मेम्बरने आपली काही शंका विचारली. आणि त्याने नेहमीप्रमाणे प्रतिप्रश्न केला, "व्हाट इज द यूऽऽऽज केस?"
तेवढ्यात जराही वेळ न दवडता आमच्यातल्या एकाने कॉन्फरन्सचा माईक पट्कन म्युट केला आणि चिडून बोलला,
"Whatever the use case may be, but you know what dude? You are the most useless case"
नंतर टीममध्ये जे सगळे हसत सुटले, बराच काळ माईक म्युटवरच राहिला होता.
त्यानंतरच्या प्रत्येक कॉलवेळी जेंव्हाजेंव्हा तो, "What is the use case?" विचारत असे तेंव्हातेंव्हा आम्हाला हे आठवत असे.
टीम वर्क पद्धत असते का? मग
टीम वर्क पद्धत असते का? मग बेक्कार.
How to win friends
• I am thinking aloud
• I am thinking aloud
(स्वत: म्हणत असेल तर: आता मी काहीही बडबडू शकतो
दुसरा म्हणत असेल तर: याचा अर्थ तू काय बोलणार ते आम्हाला ऐकण्याची गरज नाही)
आला रे बा हा माणुस नेमका
आला रे बा हा माणुस नेमका गडबडीच्या वेळेला.
आता हा मला या वर्षात wrong shipments किती, short shipments किती, transit damages किती, found not working on arrival केसेस किती याचा डेटा आणि स्लाईड तयार झाली का विचारणार.
हे माझ्यावर अतिरिक्त थोपवलेलं काम आहे आणि त्याची लगेच एवढी घाई नाहीये, मी हे आताच्या लोड मध्ये करणं शक्यही नाही, पुढच्या आठवड्यात करणार सांगितले तरी हा उगाच ट्राय टू फिनिश बाय फ्रायडे म्हणाला. आणि आला वाटतं आता झाले का म्हणुन विचारायला. अरे काय ती स्लाईड प्रिंट करून विकेंडला भेटेल त्याला वाटत सुटणार आहेस का? कुठल्या गोष्टीला काय प्रायोरीटी असावी एवढंही कळु नये?
What are you talking????
ओह, प्लिज इग्नोर, आय वॉज जस्ट थिंकिंग अलाउड. बट नाऊ आय ऍम टॉकींग आफ्टर थिंकिंग. तुला त्या शिपमेंट डेटा बद्दल तर काही विचारायचं नाहीये ना?
मानव हो असं घडतं मात्र. आपण
मानव हो असं घडतं मात्र. आपण आठवडाभर झटून सगळे नीटनेटके झाले आहे का नाही हे बघतो, आणि ह्यांचा इंटरेस्ट मात्र, ते केलेलं राहिलं बाजूला, पण त्या जळल्या मेल्या statistics मध्ये जास्त असतो
आणि हे "ट्राय टू फिनिश बाय फ्रायडे" ही फ्रेज कोण म्हणतंय त्यावर सोयीची कि गैरसोयीची ठरते फ्रायडे चा कॉल होण्याचीच काय ती वाट पहायची. तो झाला कि विकेंड, सगळे भुर्रर उडायला तयार.
>>>>>अरे काय ती स्लाईड प्रिंट
>>>>>अरे काय ती स्लाईड प्रिंट करून विकेंडला भेटेल त्याला वाटत सुटणार आहेस का?
हाहाहा
Pages