चविष्ट - यू ट्युब चॅनेल

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 July, 2021 - 05:28

नमस्कार मायबोलीकर.
आज एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. आम्ही चविष्ट या नावाने एक यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. आम्ही या साठी कारण हे चॅनेल मी-माझ्या मुली, माझी वहिनी-माझ्या भाच्या असे टिम वर्कने करत आहोत. वहिनी आणि माझ्या पारंपारिक रेसिपीज, माझ्या भाच्या व मुली करणार असलेल्या लेटेस्ट रेसिपीज थोडक्यात सांगायच तर मासे, चिकन, मटण चे प्रकार, चुलीवरचे जेवण, थेट मळ्यातून शेगडीवरचे जेवण, इतर वैविध्यपूर्ण भाज्या, सरबते, लोणची, नाश्याचे चटपटीत प्रकार, सणांचे नैवैद्य, फराळ सगळच आम्ही टाकणार आहोत.
आज मायबोलीवर हे टाकताना खुप आपलेपणा वाटत आहे कारण माझ्या ब-याच रेसिपींना मायबोलीच्या वाचकांनी प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिले. एक नविन ओळख मायबोलीने दिली. मासे आणि रानभाजी दिसली की आम्हाला जागू आठवते हे अजूनही काही मायबोलीकर म्हणतात व त्याच्या रेसिपीबद्दल विचारायला फोन करतात तेव्हा जो आनंद होतो तो शब्दात नाही मांडता येणार. याच सगळ श्रेय मायबोलीला आहे. असेच प्रोत्साहन आमच्या चविष्ट चॅनेललाही मायबोली श्रोत्यांकडून मिळेल यात शंकाच नाही. सगळ्यांनी जरुर आमच्या चविष्ट चॅनेलला सब्सक्राईब करा तसेच येणा-या नविन रेसिपींवरही लाईक, कमेंट करा व आपल्या इतर मित्र परीवार, कुटुंबातील व्यक्तिंनाही शेयर करा. खाली आत्ता पर्यंत केलेल्या रेसिपीजच्या लिंक देत आहे.
चविष्ट - https://youtube.com/channel/UCZUKXjMnkZaGDrLSFRU3naQ

मटार पॅटीस - https://youtu.be/OLv5iyQwX68
आंब्याची कढी - https://youtu.be/aFv7F4aA_RE
Blue lagoon mojito - https://youtube.com/shorts/JuxoKbYEa0c?feature=share
रानभाजी कुर्डू - https://youtu.be/u5iXgtqu_9
व्हेज स्प्रिंग रोल - https://youtu.be/B8pFLgXcNl4
बोंबिल फ्राय - https://youtu.be/MNaQIABvkSY
रानभाजी - कुलू/फोडशी - https://youtu.be/TT2Xr9tERoo
कांदा भजी - https://youtu.be/eeGljj7MjgE
सेजवान पोटॅटो - https://youtu.be/MIjqz2KKufk
शेवळाची आमटी - https://youtu.be/mdmiKhKSkQA
करंदी - https://youtu.be/afzyEvjHIQg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनी, नितिन, निल्सन, लंपन, सावली, वर्णिता खुप खुप धन्यवाद.
सावली नक्की पुढच्या वेळेस भाजी ओळखण्यावर फोकस जास्त देऊ.

हाय, छान आहे सूरवात.

विडीओ अजुन बघितले नाहीत गं, लाईक मात्र केले Wink
बघते व सविस्तर लिहीते.

जागु, छान एकदम.
व्हिडीओ तु रेसीपी सांगत केलेले बघायला जास्त आवडेल.

साधना, सायु आणि सीमा धन्यवाद.
सीमा माझ्या भाच्या आणि मुली लेटेस्ट आणि फास्ट व्हिडिओ हवेत म्हणतात. तरी बघुया पुढे काही बदल केले तर करु.

काही रेसिपीज इथे अपडेट करायच्या आहेत. वर मेन पेजमध्ये परत नाही का टाकता येत?

उपवासाची बटाट्याची सोपी आणि चमचमित भाजी.
https://youtu.be/DJYuEFZjUMw
उपवासाला काहीतरी चमचमीत आणि करायलाही सहज असा घरातीलच सामानातून होणारा पदार्थ हवा तर वरील लिंक उघडून करा बटाट्याची तिखट, चमचमित चविष्ट भाजी आमच्या चविष्ट चॅनेलवर.
IMG_20210726_222132.jpg

स्पेशल मटण दम बिर्याणी
https://youtu.be/CvIr3kZYaRE
गटारी निमित्त काय स्पेशल बनवायच? तेच तेच पदार्थ नेहमिच होतात तर करा ही स्पेशल मटण दम बिर्याणी. या बिर्याणीत असलेले आलू बुखार आणि अननस ही वेगळीच रुचकर चव देतात बिर्याणीला. या दम बिर्याणीच्या घमघमाटानेस मन तृप्त होऊ लागत. रेसिपी आवडल्यास नक्की चॅनेलवर लाईक करा, शेयर करा आणि कमेंटही करा आणि अशाच नविन नविन रेसिपीज पाहण्यासाठी जर आमचे चविष्ट चॅनेल अजुन subscribe केले नसेल तर जरुन करा.
IMG_20210804_140900_0.jpg

व्हिडिओ मध्ये voice over करत जा, आवाजातल्या व्हिडिओला viewers जास्त पसंती दर्शवतात व YouTube algorithm पण व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पाठवत, all the best

छान रेसिपी.
भाजलेला कांदा न खोबरं पाट्यावर वाटलं तर अजून बहार!

Pages