अल्ला देवे ,अल्ला दिलावे , अल्ला दारू (दाता) अल्ला खिलावे|अल्ला बिगर नही कोय अल्ला करे सोही होय |

Submitted by राहूलराव on 6 May, 2022 - 00:32

खाली एक पोस्ट ची लिंक देतो आहे ,
त्या नुसार आणि त्यावर जे कॉमेंट्स आले त्या नुसार "अल्ला देवे...अल्ला दिलावे " हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. या फोटो नुसार अभंग क्रमांक ३९८७ , ३९८८ अशा आशयाचा आहे. तर काही कॉमेंट्स नुसार अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ आहे.
.
कुतूहल म्हणून अधिकृत शासकीय शासकीय अभंग गाथा पाहिली , तर
अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ , ३९८७ , ३९८८ असे आहेत.
.
"३९३६. कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ ह्मणविती जगामाजी ॥ १ ॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती ॥ २ ॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥ ३ ॥"
.
"३९३७. कौडीकौडीसाठी फोडीताती शीर । काढूनी रुधीर मलंग ते ॥ १ ॥ पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारती आरोळी धैर्यबळें ॥ २ ॥ तुका ह्मणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचे ॥ ३ ॥"
.
"३९८७. देवाचिये पायी वेचू सर्व शक्ती । होतील विपत्ति ज्याज्या कांही ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नेघे माझी वाचा पुढें कांही वाव । आणी दुजे भाव बोलायाचे ॥ ॥ [त. दे. मनािे.] मनाची वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥ २ ॥ तुका ह्मणे घेईं विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥ ३ ॥"
.
"३९८८. पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्ती भय वाटे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नाही आइकलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भेडसाविलें [दे. भडसाचवलें.] ॥ ॥ विष्णुदासां गती नाही तरावया । [पां. ह्मणतील वांयां.] ह्मणती गेले वांयां [त. पां. कष्टत ही ॥ २ ॥ धिक्कारती मज करीतां कीर्तन । काय सांगों शीण ते काळीचा ॥ ३ ॥ तुका ह्मणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥ ४ ॥"
.
संदर्भासाठी फोटो अधिकृत प्रतीचे फोटो जोडत आहे. (आणि नवगाथेचे पण जोडत आहे)
.
आता संतांचे अभंग सुद्धा आपल्या मतलबासाठी बदलून खपवणारे हे "नवईतिहासकार " हे सर्व कशासाठी करत आहेत हे सर्व सुज्ञ जाणतात.
.
आता असा बदल करून ते पुस्तक प्रकाशित करणे याला कायद्यात काय शिक्षा आहे माहीत नाही .........परंतु मिठाच्या पाण्यात भिजवलेला पोकळ बांबू किंवा ओला फोक ........आणि त्यांचा मऊ पार्श्वभाग यांची गाठभेट होणे हेच उत्तम असं निदान मला तरी वाटतं. बाकीचं तुम्ही ठरवा.
.
.
https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/33482559...

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संत तुकाराम महाराजांचे " नाटाचे अभंग" प्रसिद्ध आहेत. नाट हा अरबी शब्द आहे. त्या अर्थ आहे: अल्लाह च्या स्तुतीपर काव्य.
काही वर्षांपूर्वी 'मनोगत 'वर ह्या नाटाच्या अभंगाविषयी एक मालिका आली होती. त्यात हे अभंग आणि त्यावर निरूपण होतं.

http://mr.upakram.org/node/3200

तुकाराम नामदेव यांचे हिंदी अभंग आहेत.

https://aatmaparikshan.blogspot.com/2017/06/blog-post_25.html?m=1

यात अभंग क्र 444 आहे.

तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते.[

https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A4%E0...

एकेकाळी तुकारामाची गाथा नदीत बुडवायला लोक उत्सुक होते. पण आता तुकोबा फक्त हिंदूंचेच आहेत, असे जनमत बदलत आहे. इतके प्रेम बघून तुकोबा पुन्हा विमानातून खाली येतील की काय, असे वाटू लागले आहे.

Proud

त्या तुलसीदासाचीही अशीच अवस्था झाली असणार. संत तुलसीदास म्हणजे तिकडचे संत ज्ञानेश्वर / संत तुकाराम होते. उच्छभ्रू संस्कृत भाषेऐवजी गावठी भाषेत धार्मिक काव्य लिहितो म्हणून संस्कृतप्रेमी लोक त्याच्यावर डूख धरून होते. पण आता तेच लोक हनुमान चालिसा म्हणायला आशीर्वाद देत आहेत !!! संत तुलसीदासदेखील ढगातून साप सोडून त्यावरून उतरून खाली येतील.

( संत तुलसीदास एकदा बायकोला भेटायला इतके उतावीळ झाले होते की नदी पोहून तिच्या माहेरी गेले आणि बाहेर भिंतीवर लटकलेल्या सापाला चढून वर गेले म्हणे, ते पाहून बायको म्हणाली की मला भेटायला जे श्रम केलेत तेच श्रम रामभक्तीसाठी कराल तर तुमचा उद्धार होईल. मग ते मोठे रामभक्त झाले.

अस्थि चर्म मय देह यह, ता सों ऐसी प्रीति। नेकु जो होती राम से, तो काहे भव-भीत।।’ यानी इस हार मांस के देह से इतना प्रेम, अगर इतना प्रेम राम से होता तो जीवन सुधर जाता।’

https://navbharattimes.indiatimes.com/astro/photo/tulsidas-jyanti-story-...

'नात' मूळ अरेबिक शब्द.
अर्थ = स्तुती.
'नातिया' कव्वाली असते ती ईश्वर स्तुतीपर.
मराठीत 'नाट' झाले असावे किंवा काही वेगळा उगम असावा.

http://tukaram.com/hindi/tukaramji_hindi.asp

images (1).jpeg

यात खाली विष्णुबुवा जोग यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे.

https://sadetod.wordpress.com/2017/03/15/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0...

देहू येथे संगमरवरी भिंतीवर हे अभंग आहेत , असा संदर्भ यात आहे.

गुगल व युट्युबवर फोटो मिळू शकले नाहीत.

काही ना काही गोंधळ चालू ठेवल्याशिवाय चालत नाही का? कंटाळा नाही येत का? >> सिरीयसली. आणि मग तेच तेच लोकं तेच तेच मुद्दे मांडतात. पकाऊगिरी नुसती.

बरं समजा तुकोबांनी अल्लाच्या नावानं काही लिहिलं असेल तर त्यामुळे आनंदित होण्याचं अथवा शरमण्याचं काय कारण ? त्यावरून आपण का चिपळ्या वाजवताय? किती फालतू वेळ असतो लोकांना.

कसले गळे ?

उलट ह्यांना संदर्भ शोधून दिले.

गुळगुळीत पार्श्वभाग काय , बांबू काय .....

भले तरी देऊ कासेची लंगोटी , हे अशा लोकांनीच तर बदलून ठेवले आहे.

समाज बदलतोय यावर विश्वास नाही.

कॉपी पेस्ट
व्यवस्थेचा नेहमीचा गुण आहे. आपल्या विरोधात जो कुणी असेल त्याला आधी कमी लेखा त्रास द्या बदनाम करा. एवढं करून टिकला तर त्याला कसेही करून खपवा. तेवढे करूनही त्याचे विचार टिकले की त्याला तो आमचाच म्हणा. तो आमचा म्हणताना मात्र त्याचे विचार स्वीकार करायचे नाहीत, फक्त त्याचे नाव घ्यायचे. सगळी उदाहरणे अशीच! चार्वाक, बौद्ध, अशोक, कबीर तुकाराम, शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर,

Okay.
तुम्हाला unfortunately अशीच माणसे भेटत रहातात. ती नाहीतच असे म्हणणे नाही. पण इतरही माणसे आहेत, ज्यांची विचारधारा अशी नाही.
पण तुमची तरी ते स्वीकारायची तयारी कुठे आहे?

केवळ धर्म आणि जात बघून बडवत बसणे हे करणारे सगळेच लोक एकाच माळेचे मणी!

आंधळ्या द्वेषाने तुम्हीही माणसांना दुसऱ्या बाजूला ढकलत असाल हा विचार करून बघा एखादेवेळी तरी!

बाकी तुकाराम आणि तत्सम तितक्या level laa पोहोचलेल्या सर्वाँना सर्वांभूती परमेश्वर आणि सबका मलिक एक हे पटलेले असणे स्वाभाविक!

वरच्या लेखावर एका अक्षराची प्रतिक्रिया नाही. पण त्याबद्दल लिहिलं तर गळा काढला, दूषणं दिली. वर दुसर्‍या बाजूला ढकलताय असा कांगावा.
कंटाळा आला या कांगावखोरपणाचा.

Barr....
बाकी तुकाराम आणि तत्सम तितक्या level laa पोहोचलेल्या सर्वाँना सर्वांभूती परमेश्वर आणि सबका मलिक एक हे पटलेले असणे स्वाभाविक! >> वाचता येत नाही का सोयीस्कर दुर्लक्ष करता???

तुम्हीच तुमचे प्रतिसाद वाचा.
मूळ लेखावर प्रतिक्रिया म्हणून लिहिलंय असं सांगता, त्यात लिहिणार्‍याला काही म्हटलंय का?
तेच इतरांना किती काय काय म्हटलंय?

मी व्यवस्था म्हटलंय. उदाहरणं दिलेली आहेत. ( खरं तर हे शब्द माझे नाहीत. मित्राने अन्यत्र चर्चेत लिहिलं. ते मला पटलं).

सध्याचं मोठं उदाहरण देतो. सध्या व्यवस्था चालवणारे गांधी स्वीकारलेत असं दाखवतात. पण कोणते - स्वच्छतेचा आग्रह धरणारे. त्यांच्यासाठी तो भाग निरुपद्रवी. आधीचा प्रवास माझ्या त्या पोस्टमध्ये म्हटलाय तसाच. बाकी सगळ्यांच्याबाबतही तेच झालंय.

कमाल आहे. या लेखाचे कोण लेखक आहेत त्यांचा हा इथे पहिलाच लेख आहे. त्यांना हवं ते त्यांनी लिहिलं. पण इथे सर्व धाग्यांवर जाऊन तोच तोच तमाशा दिवसरात्र लिहिणारे इथेही लगेच सुरू झालेले बघून वैताग आला. जमलं तर या बाजूनी विचार करा. नाहीतर चालू द्या.

मला लेखकाने हा विषय मांडला ते आवडले. ह्यात फालतू काय हे समजले नाही. चिपळ्या वाजवणेही का लिहिले ते समजले नाही.
इथे पूर्वी ह्या अभंगांवर चर्चा झालेली असल्याचे मला तरी आठवत नाही. एक नवीन विषय वर आला म्हणून आनंद झाला होता. तुकोबांच्या इतर अभंगांवरसुद्धा चर्चा होईल असे वाटले होते.किंवा नाथांचे, चांद बोधले ह्यांचे अभंग इथे निघतील असेही वाटले होते. असो.