तू तेव्हा तशी

Submitted by Ajnabi on 22 March, 2022 - 04:07

राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', स्वप्नील जोशीची आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका
झी मराठीवर रात्री ८ वाजता
कलाकार : स्वप्नील जोशी
शिल्पा तुळसकर
अभिज्ञा भावे
सुनील गोडबोले
सुहास जोशी

Group content visibility: 
Use group defaults

>>स्वतःच्या डागडुजी न केलेल्या वाड्यात राहतात का अजूनही लोक
आहेत काही वाडे शिल्लक अजून. आणि ह्यांचा वाडा तर छानच आहे की. तो कशाला पाडायचा. त्या वल्लीला हवं आहे ते पण.

>>वल्ली पेठेत राहते म्हणून ती अशी आणि अनामिका कोथरूडला म्हणून सुसंस्कृत
अगदीच तसं नसावं. पण पेठी लोकं वेगळ्या लेव्हलचा अपमान करू शकतात हे जगजाहीर आहे Lol पण ती वयाने एवढी लहान असून रोजची साडी वगैरे नेसते, "श्रीमंतांसारखं चिअर्स करू" वगैरे म्हणते, पट्या आला की खांद्यावरून पदर घेऊन "भाऊजी" म्हणते त्यावरून टिपीकल काकुबाई आहे हे नक्की.

कालचा एपिसोड आज बघितला पण मी आधीचा एपिसोड पाहीलेली नसल्याने पार डोक्यावरुन गेलं सर्व. मी मधे तो पटी केक घेऊन येते आणि बड्डे करते पट्याचा सीन फक्त बघितलेला.

वाडा खरा आहे की सेट उभा केलाय. सेट वाटतो मला तर. पट्याला स्वतःच्या घराबाहेर काढलं आणि तो घर देता का कुणी घर असं म्हणत बिचारा फिरत असेल आणि नेमकं त्याचवेळी नटसम्राट मध्ये ते संवाद हा योगायोग नक्कीच नाही. तो चित्रपट मुद्दाम निवडला पट्याची वणवण दाखवण्यासाठी. लेखक खूपच डोकं चालवतोय या मालिकेत. वल्लीच्या अशा वागण्याने तिचाच अपमान होतो हे तिला कळत नसेल का.

कालच्या एपिसोड मध्ये पट्या च्या घरी बायका,वाजंत्रि, म्हणजे वेळ किमान रात्री 9/10 हवी
आणि पटी च्या घरी, मूवी बघून,उशीर झालाय,gn वगैरे करून झालं,त्या नंतर पटीने फोन वर 15 miss call पाहिले,मग तयार होऊन कोथरूड ते पेठ आली...
मला वेळचं गणित थोडं गडलेलं वाटलं...

आत्ता बघितला आजचा एपिसोड, का बघितला मी असं झालं. कचकच कचकच कचकच नुसती, कोण खरं कोण खोटं हा मुद्दा वेगळा, पण मावशी वल्लीच्या कानफटात देते बघून जीव शांत झाला, हाहाहा.

पटी मागे मिक्सरचे पैसे तिने दिले ते का नाही काढत. वल्ली तोंडघशी पडली असती ना. खोटेपणा करते कसा ते वाड्यासमोर दिसलं असतं.

सचिन फार बुळा आहे.

आज वल्ली आणि पटी दोघींनी आपापल्या भुमिका चांगल्या केल्या. वल्ली आहेच आक्रस्तळी, ते तिने बरोबर दाखवलं.

वल्ली पट्याचा एवढा राग का करते >>> घर त्याच्या नावावर आहे म्हणून बहुधा.

आज मावशीने वल्लीला थोबडवलं ते बघून खरंच बरं वाटलं. किती किच्किच करत होती वल्ली!

आज मावशीने वल्लीला थोबडवलं ते बघून खरंच बरं वाटलं. किती किच्किच करत होती वल्ली! >>>>> ती जेव्हा काड्या करते ना तेव्हा थोबाड थोबाड थोबडवली पाहिजे। क्यारेक्ट्रर कजाग दाखवायच्या बाबतीत पूर्ण गंडलंय। म्हणजे तीच ते तोंड वेंगाडून भांडण नाही बघवत। भावजी भावजी।।।।

हो पट्यालाच थोबडावला पाहिजे. त्याला बरोबर नाव दिलंय वल्लीने ATM. त्या मशीनला जसं डोकं नसतं, सांगितले तेवढे पैसे काढून देतो, तसं पट्याला डोकं नाही. बिचारी अनामिका फसणारे या मूर्ख लोकांमध्ये. पहिल्या नवऱ्याला दोन महिन्यात हाकलला, याला एक दिवसही ठेवणार नाही ती.

ती जेव्हा काड्या करते ना तेव्हा थोबाड थोबाड थोबडवली पाहिजे>>>>> भावजीला

Submitted by मेधावि on 6 May, 2022 - 03:19 >>>>> स हं म त

ती पूर्वी व्हिलन रोल बरे करायची, आता फार अतिरेकी करते. तिला परत एकदा positive chara मध्ये बघावं अशी माझी इच्छा आहे.

एरवी ह्यात मला तिचं काम आवडत नाही, पण काल perfect वाटलं, तिला पटीवर जास्तीतजास्त तोंडसुख घेऊन, वाड्यातल्या बायकांसमोर आपली इमेज मोठी आणि तिची कमी करायची होती, तो डाव तिच्यावरच उलटला, मावशीच्या एका वाक्याने आणि नंतरच्या action ने.

भाऊजीना थोबडवायला हवं हे परफेक्ट लिहिलंय वर Lol

पण वल्लीने मार खाल्ला बघून काल बरं वाटलं मला.

या मालिकेत प्रेमकथा पुढे नेता नेता पटी आणि मावशी मिळून वल्लीला वठणीवर आणतात असं दाखवायला पाहीजे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मालिकेला 'अजूनही बरसात आहे' च्या ट्रॅकवर नेऊ नये कधी.

आज आनंदी आनंद झाला. पट्या परत आला. गुणी बाळ आल्या आल्या मावशीचे पाय चेपू लागला. दुसरं गुणी बाळ सचिन दादाला पाहून मुसमुसून रडू लागलं. सचिन निदान पस्तीसचा तरी असेल. कॉलेजात असल्यासारखा वागवतात त्याला. पट्या कुठे गेला होता ते त्याने सांगितलं नाही.

वल्लीचा परवाचा अभिनय आवडला. तिचं कॅरॅक्टर पण पटतं. कुचकामी नवरा, लोभी + दरिद्री + लुच्चा पिता आणि राहतं घरही नावावर नसल्यामुळे वाटणारी असुरक्षितता ह्या सगळ्यांमुळे ती अशी भयंकर वागते आणि सतत हायपर होते.

वल्लीचा परवाचा अभिनय आवडला. तिचं कॅरॅक्टर पण पटतं. कुचकामी नवरा, लोभी + दरिद्री + लुच्चा पिता आणि राहतं घरही नावावर नसल्यामुळे वाटणारी असुरक्षितता ह्या सगळ्यांमुळे ती अशी भयंकर वागते आणि सतत हायपर होते.

नवीन Submitted by मेधावि on 6 May, 2022 - 20:05 >>>>
लुच्चा बाप तिला पटतो आणि तीही त्याच्याबरोबर लुच्चेगिरीच करते मागे पट्याने वल्लीचे हात भाजले (हातावर काहीच डाग दिसत न्हवते भाजल्याचे ) तेव्हा दवापाणी करायला भसकन कितीतरी रुपये (२ हजाराच्यावरच दिसत होते ) देतो आणि पैसे हातात येताच व भावजींची पाठ वळताच हे दोघे हॉटेलात जायचा प्लॅन करतात। शिवाय त्या म्हाताऱ्याच्या प्रत्येक खोचक पणाला हीच पाठिंबा असतो। यांच्या वाड्यावर सुद्धा म्हाताऱ्याने आपल्या नावाची पाटी लावून ठेवली आहे। म्हणजे मुलीच्या सासरी हुंड्यात आलाय पण त्याच्याच घरावर मालकी हक्क दाखवतो आहे।

वल्ली चांगली आहे असं नाही म्हणायचं पण ह्या सगळ्यांमुळे ते रसायन इतकं संपृक्त झालंय असं म्हणायचंय.

वल्ली पाच लाख रुपये ढापणार मावशीच्या ऑपरेशचे. धन्य आहे ही बाई.

पट्या कॅश का मागवतो, हल्ली ऑनलाईन सर्व व्यवहार होतात की, एवढी कॅश कोण आणतं आणि ठेवतं घरात.

वल्ली सचिनला हाताशी धरून घरगुती खानावळ किंवा डबे पोहोचवणे असे काम करू शकते पण तिला काहीच काम करायचं नाही आणि फक्त छानछोकी करायची आहे.

वल्ली तिच्या बाबांना नीट खायला प्यायला देत नाही. स्वत:साठी चांगलं खाणे लपवून ठेवते, ती एवढी मेहनत करणार. पट्यानेच डोक्यावर चढवून ठेवलंय तिला, सचिन मुखदुर्बळ . बरं हिने सचिनशी लग्न का केलं, त्याची धरसोड वृत्ती माहिती नव्हती का. हिच्या बाबांची कमाई काहीच नाही का, जावयाच्या भावाला लूटतायेत.

असे नाही आहे ती तिच्या वडिलांना छान खायला करून घालते (ते स्वतः काही बाही मागत असतात साजूक तुपातले पदार्थ वैगरें, हां हि वेगळी गोष्ट कि ते काही दृश्य स्वरूपात दाखवत नाही प्रत्येक वेळी। वल्ली नवऱ्याला तर हाडतूड करतेच पण त्याहून जास्त दुस्वास त्या पट्ट्याचा करते। सिरीयल मध्ये एकतरी खलनायकी स्वभावाची व्यक्ती असावी म्हणून तिला तशी दाखवली आहे बहुदा पण तिचे कॅरेक्टर मात्र नीट डिफाइन नाही करता आले आहे। गंडलेली व्यक्तिरेखा आहे वल्ली . जसा कॉमिक रिलीफ म्हणून पट्ट्याचा मित्र , अजिबात ती व्यक्तिरेखा वघणेबल नाही .

सचिन सेटल नाही म्हणूनच तिच्या वडिलांनी पट्याकडून वचन घेतले आहे. वल्ली आणि अप्पा मिळून खात पित असतात. वल्लीचा नवऱ्यावरही जीव नाही. झीच्या सगळ्याच मालिकेतील पात्र अशी असतात, अति चांगली किंवा अति वाईट. अधेमध्ये काही नाहीच.

सचिन सेटल नाही म्हणूनच तिच्या वडिलांनी पट्याकडून वचन घेतले आहे >>> सेटल नसलेल्या माणसाशी लग्न कशाला करून द्यायचं. बावळट सचिन, भावाला दावणीला लावलं आहे त्याने.

त्या वल्लीची हाव संपणार नाही, सचिन सेटल होणार नाही, पट्या ओझी उचलत राहील. त्यापेक्षा वाडा विकून tower करायला द्या. मावशी आणि सौरभ ने पैसे वाटून घ्यायचे, थोडे पैसे सचिन वल्लीला द्यायचे, सचिनच्या नावावर ठेवायचे आणि एक फ्लॅट द्यायचा आणि यापुढे मी तुमच्याबरोबर रहाणार नाही, तुमचं तुम्ही बघा सांगत तिथेच दुसरा फ्लॅट घ्यायचा. अर्थात मग सिरियल कशी होईल.

गंडलेली व्यक्तिरेखा आहे वल्ली . जसा कॉमिक रिलीफ म्हणून पट्ट्याचा मित्र , अजिबात ती व्यक्तिरेखा वघणेबल नाही .>>> मित्र तर अगदीच गंडलेला आहे, चेहेऱ्यावर कायम बारा वाजलेले असतात.

वल्ली आणि अप्पा मिळून खात पित असतात. >>> रोज बघत नाही ना. परवा एक सीन होता की वडलांना सांगते की बेसनाचे लाडू लपवलेत माझ्या खोलीत ते खा. सचिन पण त्याच खोलीत राहत असेल ना, त्याला काही पत्ता लागत नाही का.

पतपेढीचे कधीचे तरी पैसे परत मिळतात, चेक नाही का देता येत, कॅश द्यायला येतात, मिळाले हेही नसे थोडके.

बरं ती कॅश मावशीबाई अशीच साध्या कपाटात ठेवतात, छानच.

सत्य युगात राहतात का हे लोक्स. असे पतपेढीचे पैसे आणून देणारे आणि ते पैसे साध्या पिशवीत, साध्या बिनकुलपाच्या कपाटात ठेवणारे सगळेच महान. दागिन्याचा डबाही असाच ठेवतात जिथे पट्या सगळ्यांसमोर जातो फक्त दाराची कडी काढून. फारच हळूहळू पुढे सरकतेय प्रेम कहाणी. दोन्ही म्हाताऱ्याही हवा पाण्याच्या गप्पा मारत बसतात.

मावशीबाई तर आ वल्ली लेके जा पैसा (आ बैल मुझे मार सारखं) करतायेत.

बाय द वे राधाचा अतिशहाणपणा, ठाम मतं फक्त आईसमोरच का, हितेनपुढे काही चालत नाही, तो म्हणाला तुझ्या आईला घेऊन येऊ नकोस इथे, लगेच तसं वागली.

मुळात राधाने हितेनच्या घरी पुजेला तरी का जायच? त्यान्च्या घरची पूजा, बघून घेतील काय करायच ते.

मावशीच्या ऑपरेशनच मध्येच कुठून आल? काय झालय तिला? एरवी तर धडधाकट दिसते ती.

Pages