Submitted by Ajnabi on 22 March, 2022 - 04:07
राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', स्वप्नील जोशीची आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका
झी मराठीवर रात्री ८ वाजता
कलाकार : स्वप्नील जोशी
शिल्पा तुळसकर
अभिज्ञा भावे
सुनील गोडबोले
सुहास जोशी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वल्ली सचिनला हाताशी धरून
वल्ली सचिनला हाताशी धरून घरगुती खानावळ किंवा डबे पोहोचवणे असे काम करू शकते पण तिला काहीच काम करायचं नाही
>>> ऑ ?? मग शिरेल पुढे कशी सरकणार???
पट्याने पैसे वल्लीकडे दिले
पट्याने पैसे वल्लीकडे दिले ठेवायला, आत्ता रिपिट बघतेय. मग ती खर्च करणार, दोष पट्याचाच आहे. वल्लीकडे पैसे दिले तेव्हाच त्याच्यावर पाणी सोडायला हवं होतं.
बँकेत खाते नाही का पट्याचे.
बँकेत खाते नाही का पट्याचे. अकॉउंट बघतो ना हा. मग मावशीबाई अगदीच चालेनाशी झाली की अनामिका येईलच गंगाजळी घेऊन, पट्या रे पट्या म्हणत. कालचा मी सुरुवातीचा थोडा भाग बघितला, उरलेला रात्री बघू असा विचार होता पण रात्री रिपीट दाखवलाच नाही. देवमाणूस दाखवली एक तास.
मी रात्री दोन वाजता बघितला
मी रात्री दोन वाजता बघितला रिपिट एपिसोड.
एकंदरीत त्या पट्याला झोडायलाच हवं. वल्ली तुझाही हक्क आहे या पैशावर, जपून ठेव, मी मागेन तेव्हा मावशीच्या ऑपरेशनसाठी दे. जाम डोक्यात गेला पट्या.
बाय द वे राधाचा अतिशहाणपणा,
बाय द वे राधाचा अतिशहाणपणा, ठाम मतं फक्त आईसमोरच का, हितेनपुढे काही चालत नाही, तो म्हणाला तुझ्या आईला घेऊन येऊ नकोस इथे, लगेच तसं वागली. >>> अगदी अगदी
पट्या खोटा अकौंटंट दिसतोय. हे असे घरी कोण ठेवतं पैसे?
अनामिका तिच्या मुलीला लगेच
अनामिका तिच्या मुलीला लगेच नोकरी देऊ शकते ,पण हा पट्या आपल्या भावाला मात्र नाही नोकरी देऊ शकत, त्याचं डोकं नाही चालत ना तर व्यवसाय तरी सुरू करून द्यावा ना.
पैशाचा व्यवहार त्याच्या हातात नाही ठेवला तरी चालेल पण निदान लिखापढी डेटाएंट्री तरी नोकरी देऊ शकतो ना. Grow up पट्या.
कधी नव्हे ते सचिन बायकोला
कधी नव्हे ते सचिन बायकोला बोलला तर सासरे उखडले, पट्याला पण सुनावले त्यांनी पण त्या दोघांपैकी कोणी असं म्हणालं नाही की वल्ली वचावचा करते तेव्हा तिला नाही तुम्ही बोलत काही.
आता पटी कशी हुशार आणि तिचं डोकं कसं चालते ते उद्याच्या एपिसोडमध्ये आहे. वल्लीने पाच लाखाचे पाच हजार करून आणले. पटी परत मिळवेल ते.
तो सोनाराच्या दुकानातील
तो सोनाराच्या दुकानातील counter वरील माणूस ओळखीचा (दुसऱ्या कोणत्या मालिकेत पाहिल्यासारखा) वाटला का कोणाला???
ती वल्ली या जन्मात सुधारणार
ती वल्ली या जन्मात सुधारणार नाही.
त्या सोनाराला मारता मारता दोनचार स्वत:च्या मुस्कटात ठेऊन द्यायच्या होत्या पट्याने, वल्लीकडे पैसे कोणी ठेवायला दिले. तरी परत हा वल्ली वल्ली करत राहील.
ह्या सिरीयलशी संबंधित कोणीतरी
ह्या सिरीयलशी संबंधित कोणीतरी नक्की हा धागा वाचत असावं कारण काल पट्याच्या तोंडचे डायलॉगज बरेच इथल्याशी साम्यदर्शक होते
आज अर्धवट बघितली पण राधा
आज अर्धवट बघितली पण राधा हितेनच्या कुंटुंबाची भाषा बोलायला लागली आहे काय म्हणजे गुजराथी नाही, पण आईविरोधात जातेय, आईकडे रहायचं आहे दोघांना. पटी नाही म्हणाली ते करेक्ट वाटतंय. बघतील ना दोघे कुठे रहायचं ते.
बिरबलाची खिचडी झालीये ही
बिरबलाची खिचडी झालीये ही मालिका. पट्या काय कोडी घालत बसलाय. आज हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध प्रसंग दाखवला, रस्ता चुकणे, पेट्रोल संपणे आणि मग एका खोपटात नायक नायिकेने रात्र घालवणे. ती झोपडी त्यासाठीच बांधली असावी. अनामिका एव्हडी सुपरवूमन आहे पण नेमकी तिने गाडी दुरुस्तीला टाकली नाही. अनामिकाची मुलगी त्या ईशासारखीच बालिश आहे आणि तिचे होणारे सासरचे पण तितकेच पांचट आहेत. आता एक रात्र एकत्र घालवली बाहेर म्हणून हल्लागुल्ला करतील.
मी इथे वाचून बघायला सुरुवात
मी इथे वाचून बघायला सुरुवात केली. मला आव डतो ह्यांचा रोमान्स. व पात्र र चना पण. काही काही पुणेइझम अगदी बरोब्बर घेतले आहेत. आंब्याच्या पेट्या आल्यावर हापुस पार्टी तर फारच मजेशीर. मी नेहमी दोन तीन भाग मागे असते. उद्या घरकाम करताना हे २४/ २५ तारखेचे भाग सुरू होतील. ऐकताना चार पोळ्या आरामात लाटून होतात.
ती मुलगी च फक्त इरिटेटिन्ग आहे.
मला आवडला पट्या पटी वाट
मला आवडला पट्या पटी वाट चुकणे सीन्स . दोघांनी छान केला अभिनय. स्वप्नील मला चॉकलेट बॉय म्हणून जाम बोअर आणि कृत्रिम वाटायचा पण हयात त्याने वेगवेगळ्या छटा दाखवल्यात त्यातल्या काही आवडतात, काही डोक्यात जातात.
मध्ये उगाच वाडा सीन्स बोअर झाले.
त्या स्वार्थी, मूर्ख मुलीसाठी पट्या पटीने आपल्या प्रेमाचा त्याग बिग अजिबात करू नये. बास झालं त्या मुलीचं उपकथानक, मुळ स्टोरीकडे वळा आता.
चंपा +१२३४५६७८९
चंपा +१२३४५६७८९
अगदीच बोअर करतात. राधा तर अगदीच immature आहे
ती राधा कोणाचेच ऐकून घेत
ती राधा कोणाचेच ऐकून घेत नाही आनी गैरसमज मात्र लगेच करून घेते. अश्या लोकांशी काहीही कम्युनिकेट करता येत नाही.
या पट्याला झोड झोड झोडायला
या पट्याला झोड झोड झोडायला हवं, पटीला प्रपोज करायला किती वळणे घेतोय, इतका फालतूपणा चाललाय, फियास्को होणार त्याचा, वल्ली करणार.
ती सचिनची बॉस चांगली वाटतेय, सच्चूच्या प्रेमात पडणार बहुतेक.
मीही तेच लिहायला आले सच्चू
मीही तेच लिहायला आले सच्चू विबासं करणार किंवा तसा संशय तरी निर्माण होणार आणि वल्ली सुधारणार पण ते शेवटी. गटग मध्ये आलेले जास्तीत जास्त तिशीचे वाटत होते. सगळे अतिशय बालिश वागत होते. अनामिकाला आणि पट्याला बघून अनुक्रमे पुरुष आणि बायकांची लाळ गळत होती. दोघांचे कपडे छान होते. तिला काहीही माहिती नसताना गाजावाजा करून सगळ्यांसमोर एखादा चाळीशीतला माणूस प्रपोज करेल असे वाटत नाही. पट्यासुद्धा आतापर्यंत अगदी समजूतदार, प्रगल्भ दाखवला होता. अहो जाहो करायचं आणि सगळ्यांसमोर लाज वाटेल असं वागायचं याला काही अर्थ नाही. कॉलेजला असताना घालतात तसे कपडे घातले म्हणजे कसेही वागायची मुभा मिळते का. कालपर्यंत तयारी चालली होती गटगची आणि आज ते अचानक झालेसुद्धा. अर्थात प्रेक्षकांना बरेच आहे.
ह्याचा आजचा एपिसोड उगाच अगदी
ह्याचा आजचा एपिसोड उगाच अगदी आठ वाजता बघितला, मी लिहीलं तसंच झालं, त्या पट्याला बदड बदड बदडायला हवं, फालतू आठ वाजून वीस मिनिटं करत राहीली. त्या सचिन मावशीला वगैरे पण दणका द्यायला हवा, त्या सचिनला बायकोवर लक्ष ठेवता येत नाही का. त्या हॉटेलमधे सीसी टीव्ही वगैरे नाही का. हॉटेलचे वेटर असे थोड्या पैशासाठी विकले जातात का, काहीही दाखवतात.
आठवडाभर नुसतं रीयुनियन, प्रपोज करत रहातात, ढोल घेऊन दवंडी. तेव्हाच पचका होणार हे ठरलेलं.
मी आजचा भाग अजून बघितला
मी आजचा भाग अजून बघितला नाहीये.
काल ते कुठल्याश्या हॉटेलमध्ये गेले होते. ते रीयुनियन होतं का? आणि मग रस्ता चुकले तेव्हा कुठे चालले होते दोघे?
रस्ता चुकले तेव्हाही
रस्ता चुकले तेव्हाही लोणावळ्याला चालले होते आणि आज रीयुनियन होतं, मलाही काहीच समजत नाहीये, तेव्हा नक्की काय होतं. मधे मधे स्कीप केलंय.
पण त्या पट्याचा पचका झाला, याला तोच जबाबदार आहे. वल्ली नकी काय देते त्याला, तो वॉशरुममधे पडतो ते उद्या आहे, जीवावर बेतायला नको काही.
पण प्रपोज केलं असा प्रोमोही
पण प्रपोज केलं असा प्रोमोही दाखवतात. नक्की काय ते उदया कळेल. आपल्याला वाटलं अनामिकेने तिला ओळखलं पण ती फक्त वल्लीचा पडलेला रुमाल देते रोखून बघत. जरा आशा ठेवावी एखाद्या मालिकेकडून तर आपलाच भ्रमनिरास होतो.
पण प्रपोज केलं असा प्रोमोही
पण प्रपोज केलं असा प्रोमोही दाखवतात. >>> हो का. या एपिसोडमधे नव्हतं. पुढच्या एपि चा सीन, तो वॉशरुममधे पडतो असा दाखवला आहे.
अखेर पट्याने प्रपोज केलं.
अखेर पट्याने प्रपोज केलं.
22 वर्ष वाट पाहिली. आता ते
22 वर्ष वाट पाहिली. आता ते प्रेम असं चार चौघांत व्यक्त करायचं
किती नाजूक आणि खाजगी असायला हवेत हे क्षण खरंतर.
तो राधा आणि हितेनच्या Live-In
तो राधा आणि हितेनच्या Live-In party चा एपिसोड आत्ताच पाहिला. त्यात मलातरी दोन तांत्रिक चुका आढळल्या.
१. साध्या वायरवाल्या माईकला वायर न जोडता त्याचा cordless mic म्हणून वापर केला आहे. हे पाहताक्षणीच लक्षात येत होते. नंतरच्या अनेक फ्रेम्समध्ये तर स्पष्ट दिसले. कारण cordless mic मध्ये cell घालावे लागत असल्याने त्याची लांबी जास्त असते तर साध्या माईकला वायर जोडण्यासाठी खालच्या बाजूला जो connector असतो त्यात ३ पिन्स असतात (ज्या अनेक फ्रेम्समध्ये स्पष्ट दिसत आहेत!!) या मालिकेचा निर्माता / दिग्दर्शक इतका कंजूष आहे की जो एक cordless mic पण भाड्याने घेऊ शकत नाही!!!
२. प्रोजेक्टरचा पडदा (स्क्रीन) सुरवातीला (प्रोजेक्टर बंद असतांना) पांढरी होती. मात्र प्रोजेक्टर चालू करून फोटो / व्हिडीओ दाखवतांना बाजूची रिकामी जागा काळी दिसत होती. वास्तविक पाहता कार्यक्रमस्थळी पूर्ण अंधार केला असेल तरीही फोटो / व्हिडीओ च्या बाजूची जागा एवढी काळीकुट्ट दिसत नाही, तिथे प्रकाशाची झाक दिसतेच. इथेतर कार्यक्रमस्थळी पुष्कळ उजेड आहे म्हटल्यावर फोटो / व्हिडीओ पांढुरके दिसायला हवेत आणि बाजूची जागा तर आहे तशीच पांढरी (स्क्रीनचा मूळ रंग) दिसायला हवी!
हितेनने त्या पार्टीत विग
हितेनने त्या पार्टीत विग लावला होता का. विचित्र दिसत होते त्याचे केस. तो हितेनचा पप्पा फोनवर बोलताना बायकोशी (व्हिडीओ कॉल नाही) पल्लू म्हणून ओरडतो आणि तीही पल्लू नीट करते. कोणी आक्षेप कसा घेत नाही असल्या सिनला, निदान त्या जमातीतले लोक.
तो हितेनचा पप्पा वल्ली
तो हितेनचा पप्पा वल्ली त्याची मम्मी हे लोक निव्वळ उगीच आहेत. परवा तो साधा व्हिडीओ आल्यावर काय इव्हिल हसत होता मिस अनामिका व पट्याचे एका लेव्हल वर व हे सगळे चिल्लर कुठेतरी चालू आहे. ते वल्लीचे बाबा पार्टीला डब्बा घेउन जातात रिलेटेबल. मी शिल्पा पट्या दोन आज्या ह्यांच्या साठी बघते.
खरं तर पट्या अनामिकाचे लग्न. मग तो वाडा पाडून टावर. खलास स्टोरी.
काहीही म्हणा राधाला तो इंटर्न
काहीही म्हणा राधाला तो इंटर्न सॉलिड योग्य सुनावतो, अगदी आपल्या मनातले.
तिच्या साठी तो इंटर्न
तिच्या साठी तो इंटर्न छान आहे जोडी. पण तिला डोक्यात प्रकाश पडेल तर ना? शिजायला दम आहे पण निवे परेन्त दम नाही अशी आहे ती.
Pages