तू तेव्हा तशी

Submitted by Ajnabi on 22 March, 2022 - 04:07

राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट 'तू तेव्हा तशी', स्वप्नील जोशीची आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका
झी मराठीवर रात्री ८ वाजता
कलाकार : स्वप्नील जोशी
शिल्पा तुळसकर
अभिज्ञा भावे
सुनील गोडबोले
सुहास जोशी

Group content visibility: 
Use group defaults

बघायला हवी. मला पल्लवी पाटील आवडते, प्रोमोज बघितले. मलाही हम पांच सारखी असावी वाटली होती.

अजून एक सिरियल बयो का काही असंच नाव सोनीवर सुरू झाली आहे, ती माझ्या आणि इथल्या मनीमोहर यांच्या सासरच्या गावाजवळच्या वाडा गावात शूट होतेय (असं समजलं). अजून बघितली नाही, प्रोमोज बघितले. तिथल्या माध्यमिक शाळेत नवरा शिकला . त्यानेही अजून लाऊन बघितली नाही. परिसर बघण्यासाठी बघायला हवी.

मीही आज एका महिन्याने बघितली. चिंग्स वापरून शिळा भात परतला. तो शिळा भात बासमती तांदळाचा होता आणि अगदी ताजा वाटत होता, त्यात अनामिकेने तिच्या स्टॅंडर्डला शोभतील अशा रंगीत ढोबल्या मिरच्या चिरून टाकल्या. मीठ टाकायची गरज नाही, किती ते कष्ट वाचले. एवढ्या वेळात छान फोडणीचा भात झाला असता.
अशोक समर्थ काय बोलतो कळत नाही अशी पोस्ट केली आस्ताद काळेने अशी मी गुगल फिडमध्ये बातमी वाचली होती. थोडं लक्ष देऊन ऐकावं लागत होतं खरं. राधा आता वाड्यात राहते का. माईमावशी व्हिलन झाल्या का, अगदीच बघवत नव्हत्या.

अशोक समर्थ >>> असं त्या कलाकाराचं खरं नाव आहे होय? मला वाटलं इथे मधेच नारायण धारपांचा रेफरन्स कुठुन आला Proud

Pages