
खामोश है जमाना, चुपचाप है सितारें
आराम से है दुनिया, बेकल है दिल के मारे
ऐसे मे कोई आहट, इस तरह आ रही है
जैसे कि चल रहा हो, मन मे कोई हमारे
या दिल धडक रहा है, एक आस के सहारे
गानकोकिळा स्व. लता मंगेशकर आपल्यात नाहीत हे आता आपण स्विकारले आहे.
जस जसे दिवस उलटून जातात तस तशी त्यांची अवीट गोडीची गाणी अधिकच आठवत जातात. काही कानावर पडत राहतात. भारतीय सिने संगीताला लता या नावाने झपाटून टाकलेले आहे. काही काही गाणी तर त्यांनी गायली नसती तर ऐकाविशी वाटली नसती. काही गाणी शब्द, संगीत आणि लताजींची गायकी आणि अद्भुत आवाज या सर्वांचे असे काही मिश्रण आहेत की त्यातल्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष देऊ कळत नाही. त्यांनी आपल्यासाठी मनोरंजनाचा जो ठेवा ठेवलेला आहे त्यावर एकच काय अनेक जन्म आरामात निघतील.
लताजींच्या गाण्याचा ज्युकबॉक्स बनवायचा म्हटलं तर हजारो गाणी आठवतील. काही हरकत नाही. काही काळानंतर गाणी बदलून बदलून ऐकता येतील. अविस्मरणीय, अवीट गोडीची, गाजलेली गाणी तर येऊच द्या. पण जी सुरेख गाणी विस्मरणात गेली आहेत त्यांनाही उजाळा देऊयात.
करूयात का सुरूवात ? माझ्यापासून करूयात.
क्र., गाण्याचे बोल , चित्रपटाचे नाव
१. आप की नजरोंने समझा , प्यार के काबिल मुझे - अनपढ
२. जिया ले गयो जी मोरा सावरिया - अनपढ
३. अगर मुझसे मुहब्बत है, मुझे सब अपने गम दे दो - आप की परछाईयां
योगायोगाने तिन्ही गाणी मदन मोहन यांचीच आठवली.
४. ये दिल और उनकी निगाहों के साये - प्रेम परबत ( संगीतकार जयदेव)
५. धीरे धीरे मचल, ऐ दिल-ए-बेकरार - अनुपमा (हेमंतकुमार)
येऊ द्या. (संगीतकाराचे नाव दिलेच पाहीजे असे काही नाही. पण दिले तर छानच. लिंक दिल्या तर अजून छान होईल).
लग जा गले हे चित्रपटात नसणार
लग जा गले हे चित्रपटात नसणार होतं >> हे वाचून केवळ कल्पनेनेच हादरलो. किती सुंदर गाणं आहे हे! ते नसतं तर असंही एक भावविव्हल गाणं असू शकतं यावर विश्वास बसला नसता इतकं ताकदीचं गाणं - त्यात त्याचे शब्द, संगीत आणि आवाज सगळ्याच गोष्टी आल्या.
अशी लता मंगेशकरांनी गायलेली पण सिनेमात खरोखरच न घेतलेली आणि कुठेही प्रसिद्ध न केलेली कुठली गाणी आता उपलब्ध आहेत का? त्यात काही रत्ने सापडू शकतील.
Kesariya Balma Song | Lata
Kesariya Balma Song | Lata Mangeshkar | Lekin | केसरिया बालम
https://gaana.com/song/kesariya-balma
मोहब्बत की झूठी कहानी पे रोये
मोहब्बत की झूठी कहानी पे रोये || Mohabbat Ki Jhooti Kahani Mughal- E-Azal
https://www.youtube.com/watch?v=NXYlqf3Ei_c
हे एक जास्त परिचित नसलेले
हे एक जास्त परिचित नसलेले गाणे म्हणजे मी तरी हे गाणे काही महिन्यापूर्वी ऐकले
चित्रपट उसपार गीत/संगीत- योगेश/एस्डी
https://www.youtube.com/watch?v=zRfpGUqzdgU
@मॅक्स मस्त गाणे आहे.
@मॅक्स मस्त गाणे आहे.
च्रप्स, सामो, भरत, शांमा,
च्रप्स, सामो, भरत, शांमा, सावी, हपा, मनी, मॅक्स
दुर्मिळ, श्रवणीय, सदाबहार गाणी सुचवल्याबद्दल आभार. खूप छान गाणी येत आहेत.
सिली हवा छू गयी (लिबास) हे
सिली हवा छू गयी (लिबास) हे आर्डीने संगीत दिलेलं गाणं ,,, ह्य गाण्याला त्याने दिलेली ट्रीटमेंट आणि लताचा आवाज!!
लता दिदींची अनेक गाणी मनाच्या
लता दिदींची अनेक गाणी मनाच्या तळात रुजली आहेत. तरी सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे माझं खूप आवडतं गाणं आहे.
मला आवडणारी आणि कदाचित जास्त
मला आवडणारी आणि कदाचित जास्त परिचित नसलेली ही गाणी, बहुतेक सगळी ५० च्या दशकातील आहेत. त्या काळात लतादीदींचा आवाज जो काही अवीट गोड लागला तसा पुढे लागला नाही हे माझे वैयक्तिक मत.
ये शामकी तनहाईया ऐसेमे उनका गम - आह
हमारे दिलसे ना जाना - उडन खटोला
वो दिन कहा गये बता - तराना
याद रखना चांद तारो - अनोखा प्यार
तुम्हारे बुलानेको जी चाहता है - लाडली
देखो जी आखोंमे देखो - ज्वाला
जोगन बन जाउंगी सैया तोरे कारन - शबाब
तेरे सदके बलम न करे कोई गम - अमर
सैया जाओ मोसे ना बोलो - झनक झनक पायल बाजे
बचपन की मोहब्बत को दिलसे ना जुदा करना - बैजू बावरा
चीकू, यातलं ज्वाला मधलं गाणं
चीकू, यातलं ज्वाला मधलं गाणं सोडलं तर बाकीची सगळी ऐकलीत. बहुतेक आवडती आहेत.
सुनो सजना पपीहे ने Suno Sajna
सुनो सजना पपीहे ने Suno Sajna Papihe Ne -Aaye Din Bahar Ke
https://www.youtube.com/watch?v=iCsa5eG9oo0
Ye Samaa Samaa Hai Pyar Ka
https://www.youtube.com/watch?v=qn9GDeIHioE
< a href ="https://youtu.be
औरत ने जन्म दिया मर्दों को,मर्दों ने उसे बाज़ार दिया...........
गीतकार : साहिर लुधियानवी (अजून कोण )
संगीतकार : N Dutta
सिनेमा: साधना (१९५८)
औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया
जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा दुत्कार दिया
तुलती है कहीं दीनारों में, बिकती है कहीं बाज़ारों में
नंगी नचवाई जाती है, ऐय्याशों के दरबारों में
ये वो बेइज़्ज़त चीज़ है जो, बंट जाती है इज़्ज़तदारों में
औरत ने जनम दिया मर्दों को...
मर्दों के लिये हर ज़ुल्म रवाँ, औरत के लिये रोना भी खता
मर्दों के लिये लाखों सेजें, औरत के लिये बस एक चिता
मर्दों के लिये हर ऐश का हक़, औरत के लिये जीना भी सज़ा
औरत ने जनम दिया मर्दों को...
जिन होठों ने इनको प्यार किया, उन होठों का व्योपार किया
जिस कोख में इनका जिस्म ढला, उस कोख का कारोबार किया
जिस तन से उगे कोपल बन कर, उस तन को ज़लील-ओ-खार किया
औरत ने जनम दिया मर्दों को...
मर्दों ने बनायी जो रस्में, उनको हक़ का फ़रमान कहा
औरत के ज़िन्दा जलने को, कुर्बानी और बलिदान कहा
इस्मत के बदले रोटी दी, और उसको भी एहसान कहा
औरत ने जनम दिया मर्दों को...
संसार की हर एक बेशर्मी, गुर्बत की गोद में पलती है
चकलों ही में आ के रुकती है, फ़ाकों से जो राह निकलती है
मर्दों की हवस है जो अक्सर, औरत के पाप में ढलती है
औरत ने जनम दिया मर्दों को...
औरत संसार की क़िस्मत है, फ़िर भी तक़दीर की हेटी है
अवतार पयम्बर जनती है, फिर भी शैतान की बेटी है
ये वो बदक़िस्मत माँ है जो, बेटों की सेज़ पे लेटी है
औरत ने जनम दिया मर्दों को...
दुआ कर ग़म-ए-दिल, खुदा से दुआ
दुआ कर ग़म-ए-दिल, खुदा से दुआ कर
गीतकार : शैलेन्द्र,
संगीतकार : सी. रामचंद्र,
चित्रपट : अनारकली
>>>>>>>>>>>सुनो सजना पपीहे ने
>>>>>>>>>>>सुनो सजना पपीहे ने Suno Sajna Papihe Ne -Aaye Din Bahar Ke
वाह वाह!
'सोलह बरस की बाली उमर को सलाम
'बेमिसाल' चित्रपटातील हे आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले 'ए री पवन' हे अप्रतिम गीत
https://youtu.be/G-fZeCe1Rr4
'स्वामी' चित्रपटातील राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेले 'पल भर में ये क्या हो गया'
https://youtu.be/JVgYYgZ51ps
आम्रपाली चित्रपटातील शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली
'तडप ये दिन रात की'
https://youtu.be/jow10yFXiD4
'तुम्हे याद करते करते'
https://youtu.be/yIlCqg__Nvg
बाज़ार चित्रपटातील खय्याम यांनी स्वरबद्ध केलेली मीर तक़ी मीर यांची अजरामर शायरी ‘दिखाई दिए यूं’
https://youtu.be/zVsIxzMgwVY
'सौदागर' चित्रपटातील रविंद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेले 'तेरा मेरा साथ रहे'
https://youtu.be/DKRHhVY6kQw
'सेहरा' चित्रपटातील रामलाल यांनी संगीतबद्ध केलेले 'पंख होती तो उड आती रे' हे गाणे
https://youtu.be/s3Kt97M0ANQ
गाणे बघून मनस्ताप झाल्यास मी जबाबदार नाही.
'मुगल-ए-आझम' मधील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेली, काहीशी मागे पडलेली
'हमे काश तुमसे मोहोब्बत न होती'
https://youtu.be/T5mp0QX8OwQ
‘ऐ इश्क़ ये सब दुनियावाले, बेकार की बातें करते हैं’
https://youtu.be/cJzwapdk2Cs
मौसम चित्रपटातील गुलज़ार लिखीत मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले 'रुके रुके से कदम'
https://youtu.be/fx1vTY_FO-0
'सोलह बरस की बाली उमर को सलाम' हे गाणे चांगले गायले आहे. लताबाई कशा अलगद समेवर येतात हे अनुभवायला मिळते. ऐकायला सोपे वाटते, गायचा प्रयत्न केल्यावर कळते की 'तेथे पाहिजे जातीचे'. पिक्चरायझेशनमधे माती केलीय.
https://youtu.be/1RIEPUjTXEA
लम्हे मधले 'मोहे छेडो ना नंद के लाला' या गाण्यातील नोंक झोंक लताबाईंनी केवळ आवाजातून साकार केलीय.
https://youtu.be/wvMM5Jl7IVQ
मुकद्दर का सिकंदर चित्रपटातील कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेले 'दिल तो है दिल'
https://youtu.be/5NYAsEn6-Uo
>>>>>गाणे बघून मनस्ताप
>>>>>गाणे बघून मनस्ताप झाल्यास मी जबाबदार नाही. Angry
मुमताज + संध्या
तुम्हे याद करते करते
आणि
तडप ये दिन रात की - तर खूपच आवडते.
खरे आहे मुमताजच सुसह्य आहे बाकी आनंदी आनंदच आहे. संध्याचे विभ्रम मोहक वाटलेच नाहीत कधी. उत्तम नृत्यांगना होती ती पण ...... एक्स्प्रेशन्स्/भाव विभ्रम यांची बोंब.
एक मुमताजच तिथे काय ती
संध्याचे विभ्रम मोहक वाटलेच नाहीत कधी. उत्तम नृत्यांगना होती ती
>> संध्या यांनी व्ही. शांताराम बॅनर सोडुन इतर कुठे काम केलंय का? तशा एखाद्या चित्रपटातील नृत्य पाहिल्यास कल्पना येईल. मी फक्त त्यांचे याच बॅनरचे चित्रपट किंवा गाणी पाहिली आहेत. त्यातला मुद्राभिनय व हालचाली फार भडक वाटतात नेहमीच मला.
जाऊ दे. त्यावर उतारा म्हणून 'तिसरी कसम' मधील शैलेन्द्र लिखीत, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले 'आ आ भी जा' पाहुया आपण.
https://youtu.be/y_pNIhzE1kU
पंख होते तो उड आती रे गाणं
पंख होते तो उड आती रे गाणं असं चित्रित झालं आहे!!! कलचरल शॉक बसला ते बघून. पूर्ण बघू शकलो नाही.
>>>>>>>संध्या यांनी व्ही.
>>>>>>>संध्या यांनी व्ही. शांताराम बॅनर सोडुन इतर कुठे काम केलंय का?
बहुतेक नाही. 'नवरंग' मधील नृत्ये अवघड होती.
>>>>>त्यावर उतारा म्हणून 'तिसरी कसम' मधील शैलेन्द्र लिखीत, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले 'आ आ भी जा' पाहुया आपण.
https://youtu.be/y_pNIhzE1kU
वाह वहीदा!!! प्रश्नच उरला कुठे मग
धन्यवाद रानभुली! या
धन्यवाद रानभुली! या धाग्यामुळे अनेक नवीन गाणी कळली. दिदी गेल्यापासून मी देखील अशाच शोधात आहे. त्यातून सापडलेली गाणी मी एका दुसऱ्या संकेतस्थळावर लिहून ठेवत होते. तिथल्याच पोस्ट्स तारखेसह इथे हलवते आहे.
२१ मार्च २०२२: चाला वाही देस!
गेले काही दिवस मी एक समांतर आयुष्य जगतेय असं वाटतंय. हा माझा एकटीचा प्रवास आहे. अर्थात त्यात काही समानधर्मींशी अधूनमधून टचबेस करतेय पण मी यात एकटीच आहे. लतादिदींच्या जाण्याने माझ्या मनात जी काही उलथापालथ झाली ती झालीच. त्यांची मी खूप मोठी फॅन होते का तर लौकिकार्थाने कदाचित नाही . पण माझं त्यांच्याशी एक नातं आहे हे निश्चित - रूहानियत का रिश्ता. त्यांच्या गाण्यांनी माझ्या आत्म्याला तृप्ती मिळते. आणि या नात्याने लतादिदींशी बांधले गेलेले करोडो लोक आहेत. मुझसे बेहतर सुननेवाले हैं|
सहा फेब्रुवारी नंतर दिदींच्या अनेक आठवणी, गाणी या साऱ्याबद्दल अनेक जण बोलले, अनेक लेख आले. ते सारं ऐकताना, वाचताना मला जाणवलं की लतादिदी किती मोठा खजिना ठेवून गेल्या आहेत. अनंत हस्ते कमलावराने (इथे दिदींच्या गात्या गळ्याने) देता किती घेशील दो कराने अशी सांगीतिक संपन्नता दिदी सोडून गेलेल्या असताना आपली झोळी मात्र तशी रिकामीच आहे! मग आपोआप या वाटेने प्रवासाला सुरुवात झाली. लतादिदींच्या मी न ऐकलेल्या किंवा काहीशा विस्मृतीत गेलेल्या गाण्यांचा शोध घेणे. जरासा मोकळा वेळ मिळाला की मी या जादुई दुनियेत शिरते. ही गाणी माझे अक्षय आनंदाचे निधान आहे!
जी गाणी मला नव्याने कळली ती इतरांना ऐकवून त्यांनाही आनंद मिळावा म्हणून आणि मलाही काही गाणी नव्याने सापडावीत असा दुहेरी हेतू आहे!
जसा वेळ मिळेल तशी लेखात भर घालत राहीन. माझ्या सारख्या यःकश्चित रसिकाची दिदींना हीच श्रद्धांजली __/\__ बाकी ऋणाची फेड शक्य नाही.
हे सारे माझ्या मनाचे खेळ असतील कदाचित पण दिदी गेल्यावर जगातला कर्कश्शपणा (cacophony) वाढल्या सारखा वाटायला लागला आहे. Some harmony vanished after she passed away. अशात या गाण्यांच्या माध्यमातून एका वेगळ्या काळात/विश्वात जाणे हा मी माझ्यापुरता शोधलेला उपाय आहे. मीरेला अपेक्षित असलेला देस थोडा वेगळा आहे पण हा ही देस फार सुंदर आहे! म्हणून हे शीर्षक - चाला वाही देस!
१. चाला वाही देस - हे काही अप्रसिद्ध गाणं नाही. पण मी या आधी फार ऐकलं नव्हतं. दिदींनी गायलेली आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली मीरेची सगळी भजनं सुंदरच आहेत! यातली केनु संग खेलू होरी, करम की गती न्यारी आणि माई माई कैसे जीऊँ री ही माझी आवडती होतीच पण पहील्यांदा ऐकले तेव्हा चाला वाही देस तितके भिडले नाही का कोण जाणे! पण आत्ता पुन्हा ऐकले तेव्हापासून ते खोलवर जात चालले आहे! Only she can pull this off! हे लाईव्ह आहे हे लक्षात घेतले की हात जोडण्याशिवाय पर्याय उरत नाही. I know she has left for this Des!
चाला वाही देस
कहो कुसुंबी साडी रंगावा
कहो तो भगवा वेस
चाला वाही देस!
रच्याकने, इतक्यात जर मुंबई पुणे गाडीने प्रवास केला असेल तर घाटात सर्वत्र कुसुंबीची नवीन पालवी दिसली असेल. तोच हा कुसुंबी रंग - लाल आणि भगवा याच्या मधला - वैराग्याचा रंग! गुगलून बघा नक्की! असं हे गाणं अंतर्बाह्य व्यापते आहे.
२. सावन के झुले पडे - आता दिदींच्या गाण्याचे चाहते म्हणतील, "तू कसली फॅन? हे गाणं माहिती नव्हतं तुला?" मान्य आहे! हे गाणं ऐकलं आणि मलाही हाच प्रश्न पडला? इतके दिवस कुठे होतं हे गाणं! सिनेमा - जुर्माना, पडद्यावर राखी आणि अमिताभ. संगीत आर डी बर्मन - one of the few songs that don't have a RD signature ensemble music orchestra. सारा थेट सुरांचा खेळ आहे. सुरांनी आणि शब्दांनी उभा केलेला romance राखीने तितक्याच नजाकतीने पडद्यावर दाखवला आहे! याचच एक सॅड व्हर्जन पण आहे. पण मला हेच फार आवडले!
३. तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा - हे गाणं अर्थात महेश एलकुंचवार यांच्या लेखात सापडलं! दत्ता डावजेकरांचे शब्द आणि संगीत - काय अप्रतिम शब्द, चाल आणि अर्थातच गायकी! एलकुंचवार म्हणाले तसं "अंजिरि पडदा महिवरि धरीला" ही ओळ पुन्हा पुन्हा ऐकली तरी मन भरत नाही! लतादिदी त्या वेळी विशीच्या आसपास असतील पण या गाण्यात जो स्वर लागला आहे तो एका अत्यंत mature आणि तयारीच्या गायिकेचा आहे. बावनकशी सोन्याला वय थोडीच असतं!
२२ मार्च २०२२
२२ मार्च २०२२
प्रत्येक पिढीचं संगीत असतं आणि ते वय वर्षे १२ ते २४ या काळात असलेल्या संगीतावर आधारित असतं असं माझं मत आहे. या व्याख्येनुसार माझ्या पिढीच्या संगीतात १९९४ ते २००७ अशी (काही वर्षे मागे पुढे) वर्षे येतात. अर्थात मोठे झाल्यावर प्रत्येकजण आपल्या नव्या वाटा शोधून काढतोच. हे सांगायचं कारण असं की त्या काळात लता मंगेशकर हे नाव अधूनमधून दिसायचं - त्यांनी गाणी गाणं पूर्ण बंद केलं नव्हतं पण आता त्यांच्या आवाजातून वय डोकावतंय ही जाणीव होऊ लागली होती आणि ते नैसर्गिकच होतं - १९९९ साली दिदी ७० वर्षांच्या होत्या. या काळातलं “जिया जले” गाणं दिदींच वय विसरायला लावणारं. पण त्याच बरोबरीने फारसा उल्लेख न होणारं पण माझं फार आवडतं गाणं म्हणजे वन टू का फोर मधलं “खामोशीयां गुनगुनाने लगी” (संगीत रेहमान). तनहाईयां मुस्कुराने लगी या दुसऱ्याच ओळीत लतादीदीनीं “मुस्कुराने” हा शब्द जसा गायलाय ना तो खास लता टच आहे! तो ऐकाच! वो मुस्कुराके गाया है! दिदींच्या गळ्यातून शब्दाचं सोनं होतं असं का म्हणतात याची जाणीव मला हे गाणं ऐकताना नेहमी होते.
आता पुन्हा नव्याने सापडलेली जुनी गाणी. एका सिनेमातलं एखादं गाणं सुपर हिट होतं पण बाकीची गाणी देखील सुरेखच असतात तर अशी इतक्यात ऐकलेली काही गाणी -
१. बेकस पे करम किजीये - आपल्याकडे जसे भक्तिसंगीतात गवळण, भूपाळी, विरहिणी असे प्रकार आहेत तसे इस्लामी/सुफी संगीतात देखील आहेत. हे गाणं म्हणजे प्रेषित मुहम्मदाची केलेली आळवणी आहे. या प्रकाराला नात (म्हणताना नाथ - थ हलकासा) म्हणतात. मुघल ए आझम मधली ही नात मला फार आवडते. यातले उर्दू उच्चार खासच. मुघल ए आझम ची सगळीच गाणी ग्रेट आहेत पण दुसरं यातलं मला आवडणारं गाणं - “ए इश्क ये सब दुनियावाले” अर्थात हे गाणं मला शब्दांसाठी जास्ती आवडतं.
२. मेरे मन के दिये - परख मधलं “ओ सजना बरखा बहार आयी” जितकं फेमस आहे तितकं हे गाणं नाही. अत्यंत नाजूक, जवळपास कुजबुजत्या आवाजात असं हे गाणं आहे. सलिलदांनी यात पाश्चिमात्य संगीतातल्या choir चा उपयोग केला आहे. याचं पडद्यावरचं कृष्णधवल चित्रीकरण सुरेख आहे आणि साधना फार गोड दिसली आहे. एकूण काय सगळ्या रकान्यात १० पैकी १० गुण आहेत!
३. ठुमक चलत रामचंद्र - जितकं “पायो जी मैंने राम रतन धन पायो” लोकप्रिय आहे तितकं हे तुलसीदासांचे भजन ऐकलं जात नाही. पण हे फार गोड गाणं आहे. नुकताच चालू लागलेला छोटा राम आणि त्याची पहिली पावलं पडताना कौतुकाने बघणारी कौसल्या.
२४ मार्च २०२२
२४ मार्च २०२२
हृदयनाथांचा एक कार्यक्रम ऐकत होते. त्यात त्यांनी के महावीर यांच्याविषयी सांगितले. के महावीर हे एक मोठे गायक, वादक (पेटी आणि तबला) आणि संगीतकार होते. शिवाय ते उत्तम नर्तक होते - नावातल्या के अक्षर हे कथ्थक या आडनावाचं आद्याक्षर आहे!
तर या के महावीर यांनी संगीत दिलेली गाणी आणि गझला ज्या दिदींनी गायल्या आहेत त्या केवळ अप्रतिम आहेत!
त्यातील ४ खाली देते आहे; जरूर ऐका! या गाण्यांसाठी सहाय्यक म्हणून हृदयनाथ यांनी काम केलं होतं.
या चाली इतक्या सुंदर आणि वेगळ्याच आहेत. अवघडही आहेत. मला खरं सांगायचं तर शब्द सापडत नाहीयेत प्रत्येक गाण्याचं वेगळं वर्णन करायला. अर्थात हा माझा दोष आहे. तीन साडेतीन मिनिटांची ही गाणी पण एक एक गाणं आपला अख्खा दिवस खाऊ शकतं! इतकी या गाण्यांची ताकद आहे.
या इतक्या सकस गाण्यांवर जर तुमचा कान पोसला गेला असेल तर आजची गाणी तुम्हाला आवडणं किती अवघड आहे हे आता मला कळायला लागलं आहे.
१. आज की रात न जा - तुम्ही हे गाणं एकदाच ऐकू शकणार नाही - फारच सुंदर चाल आणि शब्द! आणि किती गोड आवाज! मी या गाण्याची पारायणं केली आहेत!
२. एहदे गम में भी मुस्कुराता है कोई - ही गझल फार सुंदर आहे. Very typical yet very intriguing.
३. आंख से आंख मिलाता है कोई - ही गझल तशी प्रसिद्ध आहे. दिदींच्या आवाजात टिपिकल गझल ऐकायला मजा येते.
४. सांझ भयी घर आजा रे - मारवा या रागात बांधलेलं हे गाणं आहे. मला राग वगैरे कळत नाही पण मारवा संध्याकाळचा, हुरहूर लावणारा राग आहे आणि गाण्याचे शब्द ऐकले की ही चाल किती सुयोग्य आहे हे कळून येते.
या लेखासाठी शोध घेत असताना मला के. महावीर यांचं उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक गाणं सापडलं - तुम्हारी याद के सागर में दिल डूबोते हुए. लेख दिदींबद्दल असला तरी सर्वच मंगेशकर भावंडे ही प्रतिभावंत कलाकार आहेत. त्यामुळे इथे हे गाणं देणं अस्थानी नाही.
३० मार्च २०२२
३० मार्च २०२२
तर माझ्या वडिलांच्या आवडीच्या, अत्यंत अवीट गोडीच्या “गृहदेवता” या सिनेमातल्या ३ गाण्यांबद्दल दोन ओळी मी या भागात लिहिणार आहे. वसंत प्रभू, पी. सावळाराम आणि लता मंगेशकर यांचा हा सिनेमा. या त्रयीने आपल्याला अनेक अजरामर गाणी दिली - चाफा बोलेना, आली हासत पहिली रात, कल्पवृक्ष कन्येसाठी आणि अनेक. कल्पवृक्ष कन्येसाठी या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले तेव्हा शेवटचा टेक झाल्यावर लतादिदी माईकसमोरच भावनातिरेकाने कोसळल्या होत्या. हे वाचले तेव्हा माझ्या मनात अनेक वर्षं असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले - लतादिदींनी हे गाणे कसे गायले असेल?
त्यांनी अशी एक कमी प्रसिद्ध पण सुरेख हिंदी आणि मराठी गाण्यांची प्लेलिस्ट तयार करून घेतली होती जी ते कायम ऐकायचे.
कोणत्याही मुलीसाठी तिचे बाबा खासच असतात. लतादिदी याला अपवाद कशा असणार! ही घटना स्वतः लतादिदींनी सांगितली आहे. १९४२ साली दीनानाथ मंगेशकर गेले. जेव्हा ४३ साली वडिलांची प्रथम पुण्यतिथी आली तेव्हा लतादिदी केवळ १४ वर्षांच्या होत्या. आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की जागा भाड्याने घेऊन काही कार्यक्रम करता येईल. नेमका त्या दिवशी मा. विनायक यांच्या कंपनीच्या नाटकाचा प्रयोग होता. दिदींनी विनायकरावांना विनंती केली की मध्यांतरात पडदा पडून काही वेळ त्यांना द्यावा. त्या १४ वर्षांच्या मुलीने त्या वेळेत आपल्या वडिलांचा फोटो रंगमंचावर ठेवला, त्याला हार घातला आणि श्रद्धांजली म्हणून दीनानाथांची काही गाणी गायली. इतर काही जणांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे त्या स्वाभिमानी मुलीने आपल्या वडिलांची पहिली पुण्यतिथी साजरी केली. ही गाणी ऐकून दुसऱ्या दिवशी पु. लं. देशपांडे दिदींना भेटायला घरी आले आणि आशीर्वाद देऊन गेले! त्यानंतर दिवस पालटले.आजपर्यंत दरवर्षी २४ एप्रिल ला सर्व मंगेशकर भावंडे दीनानाथ मंगेशकर स्मृती महोत्सव आयोजित करतात. दीनानाथांच्या नावे पुरस्कारही दिला जातो. पण ही पहिल्या स्मृतिदिनाची आठवण मला फार विशेष वाटते. जेमतेम १३ वर्षे वडिलांचा सहवास लाभला पण त्यातूनही वडिलांची शिकवण इतकी घट्ट रुजली की तो ठेवा आयुष्यभर पुरला.
दिदी गेल्यावर जेव्हा मी ही गाणी पुन्हा ऐकली तेव्हा मला बाबांची खूप आठवण आली
त्या १४ वर्षाच्या मुलीने जसा आपल्या वडिलांचा वसा जपला, पुढे नेला तशी माझ्या बाबांच्या आवडीच्या गोष्टी पुढे नेण्याची ताकद देव मला देवो!
१. सांग धावत्या जळा - झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे प्रसन्न आणि हसरी चाल आणि शब्द. आणि किती तो गोड आवाज!
२. गोड तुझ्या त्या स्वप्नामधली - या गाण्याची सिनेमातली सिच्युएशन कशी आहे माहिती नाही पण आईच्या प्रेमाचे वर्णन करणारे हे गाणे ऐकले की माझ्या बाबांचे डोळे आजीच्या आठवणीने भरून येत. माझेही येतात कधी तरी.
३. नीज गुणीले नीज लवलाही - दिदींनी गायलेली प्रसिद्ध अंगाईगीतं म्हणजे नीज माझ्या नंदलाला किंवा गुणी बाळ असा जागसि का रे वाया. पण हे म्हणजे अगदी प्रॉपर अंगाई गीत आहे. गुणगुणता येईल अशी चाल आणि सुंदर शब्द. हे गाणं खूप जुनं आहे म्हणून केवळ इतकं ऐकलं जात नाही बहुतेक.
१३ एप्रिल २०२२
१३ एप्रिल २०२२
माझ्या एका आत्याच्या जुन्या घरी लतादीदींचा तरुणपणीचा एक छान फोटो होता. का तर लतादिदींची तरुण असताना गायलेली गाणी ही आत्या आणि काका यांना फार आवडतात म्हणून! त्यांच्या तोंडी लता, आशा, रफी, किशोर असे उल्लेख असतात. बरोबरच आहे - मला नाही वाटत मी श्रेयाला कधी श्रेया घोषालजी म्हणेन! पण लतादिदींना आदरार्थी बहुवचनी संबोधन सोडून लता असं एकेरी संबोधित करणं मला जमायचं नाही. आपली लायकी नाही असं वाटायचं! पण दिदी गेल्या त्या दिवशी मला whatsapp वर १९६७ साली त्यांच्या चित्रपट संगीताच्या कारकीर्दीच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेली एक स्मरणिका मिळाली. हिची संकल्पना होती पु. लं.ची आणि संपादन केलं होतं शांता शेळके यांनी. मी ती पीडीएफ अधाश्यासारखी वाचून काढली आणि आयुष्यात पहिल्यांदा मला लता असं एकेरी संबोधावसं वाटलं! कारण त्या पुस्तकात एका जवळपास माझ्या वयाच्या, ३८ व्या वर्षी हिंदी चित्रपट संगीत सृष्टीची अनभिषिक्त सम्राज्ञी असलेल्या मुलीविषयी अनेकांनी फार आपुलकीने लिहिलं होतं.
तिने कमी वयात प्रचंड यश मिळवलं होतं. भारतासारख्या बहुरंगी, बहुभाषिक देशात सर्व सामाजिक स्तरात लोकप्रियता मिळवली होती - तिचं गाणं धर्म, भाषा, देश, प्रांत याच्या पलीकडे जात होतं. आणि हेच स्थान त्या मुलीने पुढची ५० वर्षे अबाधित राखलं नव्हे पक्कं केलं. ते पुस्तक वाचलं आणि या तिशीतल्या तरुण लताच्या नव्याने प्रेमात पडले!! गळ्यातल्या गंधाराव्यतिरिक्त इतर अनेक गुण तिच्याकडे होते - विनोदबुद्धी, दुसऱ्यांसाठी हौसमौज, भेटवस्तू घेणे, स्वयंपाक, खाण्याची, क्रिकेटची, perfumes ची आवड आणि बरंच काही! त्यावेळी जर कोणी लताची अवांतर (संगीत विषय सोडून) मुलाखत घेतली असती तर मी त्यात एक प्रश्न नक्की विचारला असता - तुझे इतके छान केस तू कशी सांभाळतेस?! हे सारे स्वप्नरंजन ज्या पुस्तकामुळे घडले ते तुमच्या हाती लागले तर नक्की वाचा!
आजची जराशी eclectic गाणी - त्यातला समान धागा शोधायचा तर सगळी रोमँटिक किंवा आनंदी/उडत्या चालीची आहेत असं म्हणता येईल.
१. दुनिया हमारे प्यार की - चित्रपट: लाहोर, संगीतकार - श्याम सुंदर, गीतकार - राजेंद्र कृष्ण
हे करण दिवाण यांच्या बरोबर गायलेलं युगुल गीत आहे. अति प्रचंड गोड गाणं आहे - ‘“तुझे जीवन की डोर से” किंवा जीवन में पिया किंवा वो चांद खिला यांच्या पंक्तीत बसणारं. लताचा आवाज या गाण्यात एकदम सानुनासिक लागलाय इतका की ओळखू येत नाही पटकन. गाणं संथ लयीत आहे पण तुमच्या डोक्यात लूप वर चालेल याची गॅरेंटी मी घेते! ऐकाच!
२. अहा रिमझीम के ये प्यारे प्यारे - चित्रपट: उसने कहा था, संगीतकार - सलील चौधरी, गीतकार - शैलेंद्र
हे तलत मेहमूद यांच्याबरोबर गायलेलं युगुल गीत आहे. अख्ख्या गाण्यात पावसाच्या सरी भरून राहील्या आहेत. हे गाणं तसं लोकप्रिय आहे पण तरी अनेकांना माहिती नसतं.
३. मचलती आरजू खडी बाहें पसारे - उसने कहा था मधलं हे गाणं इतकं ऐकलं जात नाही. मी तर हे इतक्यातच पहिल्यांदा ऐकलं. पण काय गायलंय! वेगळाच ठेका आहे आणि गाण्यात काही ओळींच्या शेवटी जो "ओय" येतो तो इतका गोड आहे की त्यासाठी गाणं पुन्हा ऐकावं!
३. मेरे मन का बावरा पंछी - चित्रपट: अमर दीप , संगीतकार - सी. रामचंद्र, गीतकार - राजेंद्र कृष्ण
हे पण तसं कमी प्रसिद्ध उडत्या चालीचं गाणं आहे. उडती चाल असली तरी सोपी बिलकुल नाही! त्या आवाजाच्या हरकती आणि कसरती केवळ लताच्याच गळ्यातून निघू शकतात!
४. सुरमई रात है (सुभह का इंतजार) - चित्रपट: जोरू का भाई, संगीतकार - जयदेव, गीतकार - साहिर लुधियानवी
आता हे गाणं तलत मेहमूद यांनी आणि लतादिदी दोघांनी वेगवेगळं गायलं आहे. शब्दही वेगळे आहेत. नायकाचं गाणं उदास मूडचं आहे आणि नायिकेचं रोमँटिक! दोन्ही आपापल्या जागी फार सुरेख renditions आहेत. तलत मेहमूद यांच्या आवाजाला मखमली हे विशेषण का लावतात हे आपल्याला हे गाणं ऐकलं की नीटच समजेल! आणि या गाण्यातला लताचा आवाज म्हणजे मधाळ या विशेषणाचा मान वाढवणारा!
५. तेरे प्यार में दिलदार - चित्रपट: मेरे मेहबूब, संगीतकार - नौशाद, गीतकार - शकील बदायुनी
मेरे मेहबूबची गाणी म्हटली की रफी साहेबच आठवतात! पण त्यातलं हे लता दिदींचं गाणं मला फार आवडतं. दिवसभर डोक्यात वाजत राहिलं तरी कंटाळा येणार नाही हे नक्की!
जिज्ञासा, खूप छान लिहिले आहेस
जिज्ञासा, खूप छान लिहिले आहेस. चांगली गाणी संकलित होत आहेत.
जिज्ञासा छान लिहीले आहे. मस्त
जिज्ञासा छान लिहीले आहे. मस्त!!!
जिज्ञासाजी _/\_
जिज्ञासाजी _/\_
“ प्रत्येक पिढीचं संगीत असतं
“ प्रत्येक पिढीचं संगीत असतं आणि ते वय वर्षे १२ ते २४ या काळात असलेल्या संगीतावर आधारित असतं असं माझं मत आहे.” वैय्यक्तिक मत असल्यामुळे चूक - बरोबर चा प्रश्न येत नाही, पण पटलं नाही. The song has the longest life असं म्हणतात. अन्यथा शेकडो वर्षांपूर्वीच्या रागदारींवर / सिंफनीजवर आधारित गाणी ऐकलीच नसती. बर्याच लोकांच्या फेव्हरिट्समधे त्यांच्या जन्माआधी इहलोक सोडून गेलेले किंवा रिटायर झालेले रफी, मुकेश, हेमंतकुमार, तलत सारखे गायक असतील/आहेत.
Pages