Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पुस्तक वाचून झाल्यावर त्याचा
पुस्तक वाचून झाल्यावर त्याचा 13 digit ISBN number लिहून ठेवतो. कुणाला सांगायचे झाल्यास हा उपयोगी पडतो. हा नंबर
ISBN search site मध्ये टाकल्यावर त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ, प्रकाशन,लेखक आणि ते कुठे आहे हे समजू शकते/ दिसते.
ISBN search sites ( शोधून तपासणे. काही साइटस दाखवत नाहीत. पुढे दोन तीन दिल्या आहेत.)
1).
https://isbnsearch.org/
2)
https://www.bookfinder.com/isbn_search/
3)
https://isbn.gov.in/
https://isbn.gov.in/Recently_Published_Books.aspx
https://www.bookfinder.com/isbn_search/
isbn लिहून ठेवण्यापेक्षा
नवीन माहिती कळली.. धन्यवाद...
isbn लिहून ठेवण्यापेक्षा पुस्तकाचे नाव आणि लेखक नोट केलेला बरे नाही का? नक्की काय फायदा आहे isbn नोट करण्याचा?
ल-प्रि - सचिनबद्दल सहमत. एक
ल-प्रि - सचिनबद्दल सहमत. एक कलाकार म्हणून यशस्वी आहे, चांगलाही आहे. मोठी कारकीर्द आहे. पण जनरल पब्लिक इमेज त्यानुसार नाही.
धागा काढल्या बद्दल अॅडमिन
धागा काढल्या बद्दल अॅडमिन टीमचे आभार व धन्यवाद.
द नाईट (knight) ऑफ सेव्हन
द नाईट (knight) ऑफ सेव्हन किंगडम्स वाचतोय- जॉर्ज आर आर मार्टिन.
तीन कादंबरीकांचे (novella) एकत्रित पुस्तक आहे. गेम ऑफ थ्रोन्सचा प्रिक्वेल म्हणता येईल अशी गोष्ट आहे. या गोष्टी टेल्स ऑफ डंक अँड एग म्हणून प्रकाशित झाल्या होत्या. मस्त गोष्टी आहेत. डंक म्हणजे एक Knight आणि एग म्हणजे त्याचा स्क्वायर, त्यांचे गंमतीशीर किस्से आहेत. टारगारियन राजांच्या काळातली गोष्ट आहे.
नक्की काय फायदा आहे isbn नोट
नक्की काय फायदा आहे isbn नोट करण्याचा? >>> माझा सुद्धा सेम प्रश्न
ISBN मुळे नक्की कुठले पुस्तक
ISBN मुळे नक्की कुठले पुस्तक आहे ते कळते. प्रत्येक आवृत्तीनुसार किंवा भाषांतरानुसार ISBN बदलतो.
बरोबर. आणि निर्देश करणे,
बरोबर. आणि निर्देश करणे, whatsapp ला पाठवणे सोपे पडते. वेगवेगळ्या सर्च साइटस वेगळी माहिती देतात.
उदाहरणार्थ
१) White Mughals
- William Darlymple
ISBN 13
978-01-43030-46-1
२) The Last Mughal
- William Darlymple, Anita Anand
ISBN
978-01-43102-43-4
३) Koh - i - noor , the history of the world's infamous diamond.
- William Darlymple
ISBN माहिती नसल्यास ही लिंक देऊ शकता.
https://books.google.co.in/books?id=KPVrDgAAQBAJ&dq=Kohinoor&source=gbs_...
कोह इ नूर वाचण्यासारखे आहे. आता हा हीरा आपल्याला युकेकडून का मिळणार नाही हेसुद्धा कळते.
सचिनबद्दल सहमत
सचिनबद्दल सहमत
सचिनने आपली कहाणी इतक्या वेळा मुलाखती, मासिकांत दिली आहे की आता नाविन्य राहिले नाही. बायकोचे प्रेम जुने आणि तिरुमला नवीन.
क्षितिजापारच्या संस्कृती -
क्षितिजापारच्या संस्कृती - मिलिंद बोकील - समकालीन प्रकाशन
यापूर्वी दिवाळी अंकांत प्रकाशित झालेल्या आठ लेखांचा संग्रह. आदिम ऑस्ट्रेलिया आणि शांग्री-ला हे लेख २००८ साली तर अंगकोरचे स्मितहास्य, ब्रह्मदेशाचे ब्रह्मरहस्य, एफेससचा धडा , माणसांनी हरवलेली माया, कॉकेशसच्या कुशीतला आर्मेनिया, आशेच्या वाटेवरचा अफगाणिस्तान हे लेख २०१८-२०२० या वर्षांतले.
या सगळ्या देशांत एका समूहाकडून दुसर्या समूहाचा संहार झालाय , आक्रमक- विस्तारवाद्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी जुलूम केलाय - करताहेत.
आर्मेनिया, कंबोडियामध्ये वंशसंहार झालाय. ऑस्ट्रेलिया , दोन्ही अमेरिका खंडांतले मूळ रहिवासी नावापुरतेच उरलेत. आणि ज्यांनी हे केलं किंवा ज्यांच्यामुळे झालं ते युरोपीय देश आज त्यांच्याकडे येणार्या स्थलांतरित- निर्वासितांमुळे त्रस्त आहेत.
अंगकोर, एफेसस, माया , ब्रह्मदेशातील पॅगोडा ही जागतिक वारसास्थळं. तिथल्या तिथल्या नगरांचे अवशेष , वास्तू आणि पुतळ्यांचं , संग्रहालयांचं वर्णन , जुना इतिहास हे तर प्रत्येकच लेखात आले आलेत. एफेसस (तुर्कस्तानातील ग्रीक आणि रोमन संस्कृतीचं ठिकाण) माया या सर्वस्वी वेगळ्या संस्कृती असल्याने तिथल्या वास्तू , शिल्पांचं वर्णन , रोचक वाटलं. पण शांग्री-ला तले बौद्ध मठ, अंगकोर मधली मंदिर ब्रह्मदेशातले पॅगोडा यांची वर्णनं , राजवटींची माहिती पुढे पुढे कंटाळवाणी वाटू लागली. ब्रह्मदेशातल्या इन्ले सरोवरातील लोकजीवन आणि बलून उत्सवाचं वर्णन वाचताना त्यात आलेल्या गोष्टी गुगल करून पाहिल्या आणि मग पुस्तकात आलेल्या सगळ्याच पुरातत्त्वांबद्दल गुगल करून त्यांची छायाचित्र पाहिल्यावर लेखकाने केलेलं वर्णन किती चपखल आहे , हे लक्षात आलं. ( छापील प्रवासवर्णन हा प्रकार आता कालबाह्य समजावा का?) लेखांत छायाचित्रे नाहीत. चित्रे आहेत.
अंगकोर, एफेसस , माया ही निव्वळ पर्यटनस्थळं असल्याने सध्याच्या लोकजीवनाचं वर्णन नाही. ब्रह्मदेश , शांग्री-ला, ऑस्ट्रेलियात ते वर्णन एक अंतर ठेवून येतं.
आर्मेनियात लेखकाचा प्रवास गांधींच्या दीडशेव्या जन्मशताब्दीनिमित्ताने काढलेल्या जय जगत पदयात्रेच्या निमित्ताने झाला. त्यामुळे स्थानिक लोकांशी संबंध आले. त्यांच्याकडून पाहुणचार झाला. त्यामुळे हा लेख जिवंत वाटला. करोनामुळे ही पदयात्रा अर्ध्यात बंद पडली.
आशेच्या वाटेवरचा अफगाणिस्तान हा लेख मौज दिवाळी अंकात वाचला होता. आता तिथलं चित्र पूर्णच बदललं आहे.
भव्य शिल्पे, वास्तु उभारण्यामागच्या प्रेरणा, त्यासाठी लागणारी साधनसामग्री मनुष्यबळ यांचाही उहापोह लेखकाने केला आहे.
बहुधा प्रत्येक लेखाच्या शेवट तिथल्या माणसांबद्दलच्या चिंतनाने झाला आहे.
छान लिहिलं आहे भरत. यापैकी
छान लिहिलं आहे भरत. यापैकी माया संस्कृतीवरचा आणि अफगाणिस्तानवरचा, असे दोन लेख दिवाळी अंकात वाचले आहेत.
छापील प्रवासवर्णन हा प्रकार आता कालबाह्य समजावा का? >> व्हिडिओ आणि फोटोंमुळे अधिक जिवंत प्रवासवर्णन करता येतं म्हणून का?
मी आत्ता वाचलेलं पुस्तक - क्षुधाशांती भुवन. लेखक किरण गुरव. 'नवीन' लेखकांच्या पुस्तकांपैकी मी वाचलेलं हे पहिलंच आणि अतिशय आवडलेलं पुस्तक. आता अशी अजून पुस्तकं वाचायला आवडतील!
या पुस्तकात तीन कथा आहेत. क्षुधाशांती भुवन, शोध आणि भिंत, अशा.
तसं पहायला गेलं तर यातली प्रत्येक 'कथा' दोनतीन ओळींमध्ये सांगून टाकता येईल, इतकी लहानशी आहे. पण लेखकाने प्रत्येक कथेत प्रत्येक पात्राला, जागेला, घटनेला, वेळेला जे काही फुलवलं आहे, त्यात या कथांचं सगळं सामर्थ्य सामावलेलं आहे!
सर्व कथांची पार्श्वभूमी गावाकडची आहे. शहरी नाही. गावातले व्यवहार, व्यवसाय, जाती, इरसाल माणसं आणि या सगळ्यांना जोडणारं राजकारणाचं अस्तर, त्यातली गुंतागुंत असं सगळं फार समर्थपणे उभं केलं आहे.
मला शोध आणि भिंत या दोन कथा त्यातल्या त्यात जास्त आवडल्या. याचं कारण कदाचित त्या कथांमधले नायक सरळ, साधे नाहीत, हे असावं.
वावे, किरण गुरवांचं बाळूच्या
वावे, किरण गुरवांचं बाळूच्या अवस्थांतराची डायरी हे माझ्या मित्राने वाचलंच पाहिजे असं पुस्तक असल्याचं सांगितलंय.
विश्वास पाटील ह्यांच्या
विश्वास पाटील ह्यांच्या चंद्रमुखी कादंबरीत कथा घडते तो कालखंड कुठला आहे ?
वावे, छान लिहिलं आहेस.
वावे, छान लिहिलं आहेस. क्षुधाशांती भुवन विशलिस्टला टाकलं.
बाळूच्या अवस्थांतराची डायरी >>> या पुस्तकाला नुकताच युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला (ना?)
@भरत, हो, आता एकेक करून ही
@भरत, हो, आता एकेक करून ही पुस्तकं वाचणारच आहे.
@ललिता-प्रीति, थँक्स
भरत, ते लेख वाचले नव्हते.
भरत, ते लेख वाचले नव्हते. पुस्तक वाचेन आणि मिलिंद बोकील आमच्या वाचनलयात आहेत. ते एक एक वाचून काढतो.
----------
जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख
वाचनालयात सापडलं.
//
मनोविकास प्रकाशन
जग बदलणारे 'ग्रंथ' । दीपा देशमुख Jag Badalanare 'Granth' | Deepa Deshmukh
प्रकाशक अरविंद घन:श्याम पाटकर मनोविकास प्रकाशन फ्लॅट नं. ३-ए, चौथा मजला, शक्ती टॉवर्स, नू.म.वि. समोर, ६७२, नारायण पेठ, पुणे - ४११०३०. दूरध्वनी : ०२०-२९८०६६६५ info@manovikasprakashan.com www.manovikasprakashan.com
© दीपा देशमुख बी-४, सनशाईन पार्क, बालेवाडी, बालेवाडी-बाणेर रोड, पुणे-411045. मो. 9545555540 adipaa@gmail.com www.deepadeshmukh.com
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी आतील मांडणी : गिरीश सहस्रबुद्धे अक्षरजुळणी : गणेश दीक्षित
मुद्रक : श्री जे प्रिंटर्स प्रा. लि., पुणे
पहिली आवृत्ती । २० ऑक्टोबर २०२१
ISBN: 978-93-91547-27-1
मूल्य । ₹३९९
//
तर यामध्ये पन्नास ग्रंथांची थोडक्यात पण कामाची माहिती दिली आहे. लेखकांची इतर गाजलेली पुस्तकं आणि वैयक्तिक जन्म, लग्नं, आयुष्य हेसुद्धा दिलंय. इतर जे गुडरीडस, मस्ट रीड यादीतील असते त्यापेक्षा खूपच उपयोगी. मराठीत हे विशेष. वीस ते तीस वयातल्या वाचकांना मार्गदर्शक आहे.
अजुनही पन्नासची यादी पुढच्या भागात येणारे. लेखिकेने सर्व ग्रंथ वाचले आहेत. ग्रंथ निवडण्यात आणि लेखन करण्यात सहकार्य करणाऱ्यांची ओळख दिली आहे. निवडण्यात अच्युत गोडबोलेंचे खूप सहाय्य झाले म्हटलेले ते खरे आहे. मानसशास्त्र, आणि अर्थशास्त्र विषयावरचे ग्रंथ अधिक आहेत.
विज्ञानात न्यूटन,आइनश्टाइन,हॉकिंग आणि धार्मिक दोन,स्त्रियांसंबंधित दोन तीन आहेत. महाभारत,तिपिटक ,कौटिलिय अर्थशास्त्र, कामसूत्र हे भारतीय ग्रंथ आणि बाकीचे परदेशी आहेत.
जग बदलण्यात कथा,कादंबऱ्या येत नसाव्यात.
बाकी पुस्तक संकलन आवडले. अशाच प्रकारची संकलने इतर लेखकांचीही येवोत.
चंमतगhttps://twitter.com
जग बदलणारे ग्रंथ ऐकून हे ट्वीट आठवलं.
चंमतग
https://twitter.com/MysticHeretica/status/1518595118193950721
हंहंहं.
हंहंहं.
मलाही इकिगाई विशेष आवडले नाही
मलाही इकिगाई विशेष आवडले नाही. अ बनाल सेल्फ हेल्प बुक.
मी आत्ता वाचलेलं पुस्तक -
मी आत्ता वाचलेलं पुस्तक - क्षुधाशांती भुवन. लेखक किरण गुरव >>> वावे, धन्यवाद. मला यावेळेस पुण्यात मी ज्या दुकानात गेलो तेथे मिळाले नाही. पण वाचायचे आहेच. इतरही बघेन आता याच लेखकाची - भरत यांच्या पोस्ट मधे आहे ते व इतर.
सामो, ते दोन थ्रेड्स आहेत. एक
सामो, ते दोन थ्रेड्स आहेत. एक ती पुस्तकं का वाचावी. दुसरा - तीच पुस्तकं का वाचू नयेत.
आपल्या गावच्या नगरपालिकेचे
आपल्या गावच्या नगरपालिकेचे वाचनालय असावं. त्यांची जागा मोठी असतात, फंड असतो पगारासाठी आणि दर सहा महिन्यांनी नवीन येतात पुस्तके. फी कमी असते. ( आमची वीस रुपये) . तर पुस्तकासारखं पुस्तक वाचल्याचा आनंद अधिक घरात विकत घेऊन ठेवलेल्या पुस्तकांची गर्दी होत नाही. पंधरा दिवसांची पुस्तक बदलायची मुदत चांगली आहे. प्रवासात नेता येईल.
संदर्भ ग्रंथ - शब्दकोश, thesaurus इत्यादी विकत घ्यावेत असं माझं मत.
पुस्तक गप्पा - किरण गुरव
पुस्तक गप्पा - किरण गुरव
धन्यवाद भरत.
धन्यवाद भरत.
srd, वाचनालयाचा फायदा होतोच. पण मला तरी काही काही पुस्तकं परत परत वाचावीशी वाटतात. त्यासाठी ते ते पुस्तक विकतच घ्यायला पाहिजे. वाचनालयातून आणून वाचलेली काही पुस्तकं मी नंतर विकत घेतली आहेत.
तब्बालियु नीनादे मगने (कन्नड)
तब्बालियु नीनादे मगने (कन्नड)
S. L. Bhairappa.
पारखा
अनुवादित.
उमा वि. कुलकर्णी.
२०१५, मेहता पब्लिशिंग हाऊस.
पाने २७०.
कर्नाटकातील एका गावाची कहाणी असली तरी ती दुसऱ्या कोणत्याही गावाला लागू होईल असे लेखक म्हणतो. त्या गावातील गाईंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबातील तीन पिढ्यांची गोष्ट. गाईला आई मारणाऱ्या आजोबा आजीपासून परदेशी नातसून गाय खाणारी आणि तो सर्व प्रवास बहुतेक १९३० - १९७० च्या काळातला वाटतोय.(अतिरिक्त जमीन सरकारजमा करण्याचा आदेश येतो.)
कुटुंबातील एक पात्र तायव्वा जन्मापासून मुकी आहे पण बहिरी नसते यावर काही वाचकांनी आक्षेप घेतला होता. मग असे उदाहरण लाखात एक असते म्हणे . कर्नाटकातील सामाजिक समजूती दिल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे तायव्वा बाळाला दूध पाजू शकत नाही तर जी पाच वर्षेपर्यंत दूध पाजते तीच खरी आई.
गाय आई म्हणून पाळणे आणि दूध न देणारी गाय तसेच म्हातारे बैल कसायाला विकणे या दोन विरोधी विचारांवर कादंबरी बेतली आहे.
भैरप्पाची पुस्तके खूप गाजतात. मी हे पहिलेच वाचले. एवढं काही गुंतवतून ठेवणारं वाटलं नाही.
अनुवाद : कानडी लोक ठासून तुटक बोलतात. संवादातला तो जोर मराठीतल्या कोणत्या बोलीत आणायचा हा प्रश्नच आहे. काही पात्रांच्या तोंडी शुद्ध पुणेरी मराठी, तर काही कराड कोल्हापुरी मराठीत "होऊ दे काय बी! मला नगं सांगू." वगैरे.
असो.
पारखा मलाही फारसं आवडलं
पारखा मलाही फारसं आवडलं नव्हतं.
srd, भैरप्पांची 'वंशवृक्ष' वाचून पहा. मला फार आवडते ती कादंबरी.
मी आत्ता वाचलेलं पुस्तक -दंशकाल -हृषीकेश गुप्ते. गूढकादंबरी आहे.
पुस्तक आवडलं.
हृषीकेश गुप्त्यांच्या बऱ्याच कथांमध्ये असते, तीच उत्तर कोकणातली रोहा-नागोठणे परिसराची पार्श्वभूमी. भूगाव नावाच्या गावात असलेलं देशमुखांचं कुटुंब. त्या कुटुंबातले, तुंबाडच्या खोतांशी स्पर्धा करतील असे एकेक नमुने. घरातल्या एका व्यक्तीला वेड लागल्यानंतर झपाट्याने बदलत, बिघडत गेलेली परिस्थिती. हे सगळं लहानपणापासून किंवा खरं तर पौगंडावस्थेपासून पहात मोठा झालेला आणि मोठा होऊन मानसोपचारतज्ज्ञ झालेला नायक म्हणजे नानू, म्हणजे अनिरुद्ध देशमुख. त्याचं या सगळ्या परिस्थितीचं आकलन आणि विश्लेषण. शिवाय तोही या घटनाक्रमाचा भाग आहेच.
लेखकाची शैली वाचकाला गुंतवून ठेवणारी आहे यात शंकाच नाही. अत्यंत गुंतागुंतीच्या, काहीशा अमूर्त कल्पना त्यांनी प्रभावीपणे मांडल्या आहेत.
मला एकच त्रुटी जाणवली, ती म्हणजे नायकाच्या पत्नीचं व्यक्तिमत्त्व convincing वाटलं नाही. बाकी कादंबरी आवडली!
हंगर गेम्स चा पहिला भाग वाचून
हंगर गेम्स चा पहिला भाग वाचून झाला
कमालीचा predictable आणि बेसिक गंडलं आहे असे वाटलं
पुढचे भाग वाचलेत का कोणी?
तिन्ही वाचलेत
तिन्ही वाचलेत
नाही वाचले तरी चालतील. आता एकाही पुस्तकातलं काहीही आठवत नाहीये इतके अंडरव्हेल्मिन्ग आहेत.
हो ना, म्हणजे आता पुढच्या
हो ना, म्हणजे आता पुढच्या भागात काय परत तेच वाचायचं का या विचाराने धडकी भरली
काहीतरी इंट्सरेटिंग असेल तर वाचायला मजा येईल
म्हणजे ती बंड पुकारते वगैरे पण लेखिकेला तेवढी व्याप्ती वाटत नाही
पर्व
पर्व
एस. एल. भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी.
मे १९९०
पाने ७९०
विषय महाभारत.
हे फार उशिराच माझ्या हातात आलं. महाभारतावर आठशे पानं. थोडं चाळलं आणि ठेवलं. शंभर पानांत उरकण्यासारखं कथानक लांबवलं आहे.
Pages