Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
आज जे नररत्न न्यू यॉर्क च्या
आज जे नररत्न न्यू यॉर्क च्या सबवे मधे गोळीबार, धूर, बॉम्ब वगैरे आरोपात पकडले गेले आहे ते कृष्णवर्णीय आहे. बाय डन आणि त्याचे लोक कंठशोष करून श्वेत वर्णीय वर्ण द्वेष्टे लोकांबद्दल बोलत असतात आणि तो कसा महाभयंकर धोका अमेरिकेत आहे हे उच्चरवाने सांगत असतात. हा पकडला गेलेला नरपुंगव काळा वर्णद्वेषी आहे. श्वेत वर्णीय लोक जगण्याच्या लायकीचे नाहीत, त्यांना मी ठार मारणार आहे वगैरे आशयाची अनेक पोस्ट, व्हिडिओ ह्या थोर विभूती ने पोस्टलेली आहेत. ट्विटर वगैरे सामाजिक न्यायकरता कटिबद्ध असणारी माध्यमे "मला वाटते जगात पुरुष आणि स्त्री अशी दोनच लिंगे आहेत" ह्याला ट्रान्स द्वेष्टे म्हणून बंदी घालते काहीवेळा आजन्म बंदी. पण "मी श्वेत वर्णीय लोकांना मारणार आहे" हे मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जपले जाते. "श्वेत वर्णीय लोकांना जगायचा अधिकारच नाही" हेही.
मला वाटते बाय डन आणि इतर डावे , वोक लोक ह्यामुळे असले वर्णद्वेषी लोक शेफा रले आहेत. ह्या काळ्या वर्णद्वेषी लोकांना लॅटिनो आणि आशियाई लोकांबद्दल ही कमालीचा द्वेष आढळतो.
वोकेशा विस्कॉन्सिन इथे ख्रिसमस परेड मधे लोकांना गाडीखाली चिरडून मारणारा ह्याच जातकुळीचा होता. माध्यमे अशा लोकांबद्दल लिहिणे हळूहळू बंद करून टाकतात. कारण ते त्यांच्या विचारसरणीशी फारकत घेणारे वास्तव असते!
किती ढोंगीपणा चालवला आहे. काही अंत आहे का ह्याला?
तुम्ही हे वाचा. बरे वाटेल
तुम्ही हे वाचा. बरे वाटेल.
https://www.independent.co.uk/news/world/americas/us-politics/upenn-amy-...
Take, you know, the Brahmin
Take, you know, the Brahmin women who come from India and they climb the ladder, they get the best education, we give them every opportunity, and they turn around and lead the charge on ‘we’re racist, we’re an awful country, we need reform,’” Prof Wax said. “Here’s the problem: they’re taught that they are better than everybody else, because they are Brahmin elites, and yet, on some level, their country is a s***hole – excuse my language.
परफेक्ट बोलल्यात की त्या ताई! तेवढा s***hole भाग वगळून.
मोरोबा पूर्ण द्या की कोट त्या
मोरोबा पूर्ण द्या की कोट त्या बाईंचं.
"Well, here's the problem, they're taught that they are better than everybody else because they are Brahmin elites," she said. "And yet, on some level their country is a s***hole, excuse my language. It's not providing them with the opportunities that they feel that they deserve and which in many cases they do deserve."
लायकी असून, deserving असून शिक्षण, नोकरीच्या संधी मिळत नाही म्हणून देश सोडणाऱ्या ब्राह्मणांनी आपल्याला संधी देणाऱ्या कोणत्याही देशाला नावं ठेवू नयेत असं म्हणायचंय ना त्या बाईंना.
श्वेतवर्णी = वर्णद्वेषी हे
श्वेतवर्णी = वर्णद्वेषी हे समीकरण इतक्या उच्चरवाने आणि सातत्याने मांडले जाते की भले भले त्याला भुलून हेच समीकरण जास्त त्वेषाने मांडू लागतात. भारतीय त्याला अपवाद नाहीत.
भारतात पूर्वी काही जमातींना (पारधी , रामोशी वगैरे) गुन्हेगारी जमात मानले जायचे तसे काही काळाने श्वेत वर्ण लोकांना केले जाईल असे वाटते! आणि हे करणारे स्वतः प्रामुख्याने श्वेतवर्णीच आहेत!
मात्र जर एखादा काळा वर्णद्वेषी असला (जसे सबवेमधे गोळ्या झाडणारा थोर इसम) तर तो मात्र मानसिक संतुलन गमावलेला असतो. त्याला रेसिस्ट म्हणायचे नाही अजिबात!
<<>>
<<>>
सगळे लोक सोडून ब्राह्मण बायकांवरच का घसरल्या या बाई? आणि पुरुषांचे काय?
इथे पूर्वी यहुदी, आयरिश, इटालियन, इ. लोकहि आले होते, ते का आले होते? त्यांनाहि तशीच संधि मिळाली. त्यांचे काय? त्यांनी पण बोलू नये?
आणि त्या बायका इथे कायदेशीर व्यवहार करूनच, नागरिकत्व घेऊनच रहातात! मग त्यांच्यासाठी first amendment वगैरे नाही का?
म्हणजे यात काही वर्णद्वेष वगैरे नाही, पण फक्त काही जातीच्या लोकांनी उगाच देशात काय चुकते आहे का वगैरे प्रश्न विचारू नयेत!! राग येतो. एव्हढेच.
हा जातीयवाद नव्हे! असे म्हणायचे का? बरं.
काही नीट सांगितले नाही बुवा त्या बाईने. प्रश्न पडतात.
<<,काही काळाने श्वेत वर्ण लोकांना केले जाईल असे वाटते! >>>
शक्य आहे.
जिथे वर्णाने काळे म्हणून लोकांना गुलाम केले जायचे, वस्तू समजून त्यांची खरेदी विक्री व्हायची, त्यांना गोर्या लोकांपेक्षा अगदी वेगळे ठेवायचे असे प्रकार शंभराहून अधिक वर्षे झाले, तिथे आता चक्रमेनिक्रमेण असे व्हायचेच.
पूर्वी भारतात सुद्धा पेशव म्हणजे ब्राह्मण यांचे राज्य असे. नंतर महाराष्ट्र सरकारात कित्येक वर्षे एकहि ब्राह्मण नाही. तसे.
तेंव्हा ते होणारच. त्या तसल्या देशातले लोक आता शिकून इथल्या सगळ्या उच्च विद्यालयात शिक्षक होतात, जगभर पसरलेल्या कंपन्यांचे सी इ ओ होतात, हळू हळू राजकारणातहि घुसतील! मग काय? त्यांचेच राज्य!
एका गटावर झालेल्या अन्यायाचे
एका गटावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन म्हणून ते अन्याय करणाऱ्यांच्या वंशजावर तसेच अन्याय करायचे आणि ह्याला चक्रनेमिक्रणेन वगैरे समर्थन करायचे हे पटत नाही. असे अन्याय पुढे घडताच कामा नयेत हा धडा शिकलो पाहिजे.
ती बाई गेली कित्येक दशके
ती बाई गेली कित्येक दशके म्हणे ओपन व्हाईट सुप्रमिस्ट आहे. अशा मूर्ख आणि विद्वत्तेची आणि/माज आलेल्या बाईकडे दुर्लक्षच करणे उत्तम.
>>परफेक्ट बोलल्यात की त्या
>>परफेक्ट बोलल्यात की त्या ताई! तेवढा s***hole भाग वगळून.<< +१
असंच, दुसर्या टोकाचं उदाहरण म्हणजे - भारतातल्या रेझर्वेशनला नांवं ठेवणारे, इथल्या अंडरप्रिवेल्ज्डना मिळणार्या सवलती घेताना स्वाभिमान गुंडाळुन ठेवतात. थोडक्यात फुकट मिळतं ते घ्यायचं, नाहि मिळालं तर बोंब ठोकायची - रेसिस्ट, रेसिस्ट म्हणुन. असला प्रकार आहे सगळा...
एमी वॅक्स, व्हाइट सुप्रमसिस्ट? आय्ला आता ज्यु पण यात आले काय...
'It's not providing them with
'It's not providing them with the opportunities that they feel that they deserve and which in many cases they do deserve."
यात काय रेसिस्ट आहे नेमकं? ब्राह्मण बायकांबद्दल?
मायबोलीवर ब्राह्मण बायकांबद्दल विक्रुत धागे काढणारे लोक विचारवंत म्हणून मिरवत असतात त्या तुलनेत wax बाई काहीच आक्षेपार्ह बोलल्या नाहीयेत.
त्या बाईंची मतं peculiar असली तरी तिने ती express करू नयेत हे झेपलं नाही. Tenured professor आहे ती आणि लोक तिची नोकरी घालवायला निघालेत. मूर्खांचा बाजार!
<<<अन्याय करणाऱ्यांच्या
<<<अन्याय करणाऱ्यांच्या वंशजावर तसेच अन्याय करायचे>>>
हे मुद्दामून केले जात नाहीत असे मला वाटते.
असे आपोआपच घडते. काही लोक वर चढतात, काही खाली रहातात.
मुस्लिम, इन्ग्रज यांनी शस्त्रांत्रांच्या जोरावर अमेरिकेतील एतद्देशीय, भारतातील लोक यांच्यावर विजय मिळवला, आता शिकून कायदेशीर रीत्या इतर लोकांचे वर्चस्व वाढते आहे. ते थांबणार नाही!
अगदी काळे लोक गुन्हा करत असले तरी, काळे लोक पण हार्वर्डमधे जाऊन शिकतात, लोकांनी मते द्यावीत असे काहीतरी करतात, म्हणून निवडून येतात नि सुप्रीम कोर्टावर जाऊन बसतात. ते आता थांबणे नाही, कितीहि ओरडा केला तरी.
आता काही लोकांना मनाविरुद्ध झाले की न्यायव्यवस्थेला नावे ठेवायची, निवडणुका खोट्या म्हणायचे अशी सवयच लागली आहे.
<<<मायबोलीवर ब्राह्मण बायकांबद्दल विक्रुत धागे काढणारे लोक विचारवंत म्हणून मिरवत असतात त्या तुलनेत wax बाई काहीच आक्षेपार्ह बोलल्या नाहीयेत.>>>
मायबोलीकरांचे धागे हे काही जगभरात पसरलेल्या मिडिया सारखे नव्हे. आज अमेरिकेत टकरच्या शो ला खूप प्रेक्षक आहेत, तिथेहि ब्राह्मण बायका प्रसिद्ध झाल्या हे वाचून गंमतच वाटली.
माझ्या मते ब्राह्मण बायका काही इथे येऊन दंगली करत नाहीत, निवडणुकीचे निकाल आवडले नाहीत म्हणून कॅपिटॉलवर हल्ला करत नाहीत. प्राउड बॉय्ज, केकेके इ. लोकसुद्धा स्वतःला better than everybody समजतात. त्यांचे नाव तर मिडियामधे अनेकदा येते. मग यांना ब्राह्मण बायकाच कश्या दिसल्या, असे मला आक्षेपार्ह वाटले म्हणून ओरडा.
बाकी खुद्द ब्राह्मण बायका ज्या इथे आल्या, शिकल्या, नागरिकत्व घेतले, first amendment चे हक्क मिळवले त्या त्यांची मते सांगणारच!
<<<तिने ती express करू नयेत हे झेपलं नाही. >>> तिने आपली मते सांगू नयेत असे कोण म्हणेल, पण त्या मतांवर प्रश्न करू नयेत? शंका असतील, तरी गप्प बसून ऐकून घ्यावे?
जसे त्यांना इतरांनी त्यांच्यावर टीका केलेली आवडत नाहीत तशी इतरांनाहि त्यांनी केलेली टीका आवडत नाही. मग त्यांनी बोलायचे, इतरांना नावे ठेवायची नि बाकीचे गप्प बसतील का?
हे असेच चालायचे.
ती त्यांच्या मतांबद्दल
ती त्यांच्या मतांबद्दल स्वतःची मतं मांडत आहे. तो अधिकार तिला आहेच ना? I don't think she is criticizing. She is just perplexed.
तुम्हाला तुमच्या देशात deserving असून संधी मिळत नाही. म्हणून तुम्ही विस्थापित झालात. ज्या देशाने आसरा दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची की त्यांना शहाणपणा शिकवायचा?
क्षमा सावंतचं उदाहरण घ्या. मुळात ती तमिळ ब्राम्हण आहे कमलाबाईंसारखी. सावंत तिच्या एक्स हजबंडचं नाव आहे.
मुंबई पुण्यात वाढलेली आणि नवऱ्याबरोबर अमेरिकेत आलेली ही बाई अमेरिकेत सोशलिझम आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. सोशलिझम हवा तर भारतातच - तमीलनाडूतच- राहायचं ना? अमेरिकेत कशाला आली? तिच्या तमिळ ब्राम्हण पालकांना तमिळनाडू सोडून पुण्यात यायची वेळ का आली?
भारत असो वा अमेरिका. Woke brahmins अनेक प्रॉब्लेम्स तयार करून ठेवतात. त्यांना call out करायला हवंच.
अंडरप्रिवेल्ज्डना मिळणार्या
अंडरप्रिवेल्ज्डना मिळणार्या सवलती घेताना स्वाभिमान गुंडाळुन ठेवतात>>
मिंडी कलिंग च्या भावाने तो ब्लॅक आहे असं क्लेम करून मेडीकल ला एडमिशन घेतली बिचाऱ्या चिन्मय तन्मय च्या पोरांना तो पण ऑप्शन नाही.
<एका गटावर झालेल्या अन्यायाचे
<एका गटावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन म्हणून ते अन्याय करणाऱ्यांच्या वंशजावर तसेच अन्याय करायचे >
त्या वंशजांना शिक्षणाची दारं सरसकट बंद केली तर तो अन्याय होईल. त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात , खरं तर त्यापेक्षा जास्तच त्यांच्यासाठी जागा आहेत. शिवाय नोकर्यांत आरक्षण फक्त सरकारी क्षेत्रात आहे.
'It's not providing them with the opportunities that they feel that they deserve and which in many cases they do deserve."
"That they feel " - यावर अधिक लिहिता येईल. पण मग नेहमीचे कांगावे सुरू होतील.
शेंडे अमेरिकेच्या संदर्भात
शेंडे अमेरिकेच्या संदर्भात बोलत होते ना? तिथे परिस्थिती वेगळी आहे. गोरे लोक अजूनतरी 50% हून अधिक लोकसंख्या आहे. ते ब्राम्हणासारखे मायक्रो मायनोरीटी नाहीत.
ब्राम्हणांची तुलना पारसी लोकांशी होऊ शकेल. एकेकाळी त्यांचा भारतावर influence खूप होता. आता मोजकी बिझनेस हाऊसेस सोडता इतरत्र ते दिसत नाहीत, लोकसंख्या कमी झाली आहे. तसंच ब्राम्हण लोकसंख्या कमी आणि परदेशात स्थलांतर यामुळे होत आहे. Eventually भारतात पारसी आणि ब्राम्हण शिल्लक राहणार नाहीत.
भारत सरकारला कास्ट बेस्ड
भारत सरकारला कास्ट बेस्ड सोशो इकॉनॉमिक सेन्सस करायला सांगा. तुमच्या दाव्याला आधार मिळेल.
बिझिनेस हाउसेस म्हणजे खाजगी क्षेत्र. तिथे आरक्षण नसतं. तरी तिथे ब्राह्मण मोजकेच दिसतात (?) . काय बरं कारण असावं?
<तेवढा s***hole भाग वगळून>
का वगळायचं? असं मत असलेलं आणि ते वारंवार व्यक्त करणारं एक अत्यादरणीय व्यक्तिमत्व आहे की आपल्यात. लिंक त्यांनीच दिलंय. वाचून त्यांना बरंच वाटलं होतं.
देश असा आहे म्हणूनच सोडून आलात आणि दूरवरून त्याची काळजी वाहताय ना?
येताना तिथे जपलेली मूल्यही उचलून आणलीच आहेत.
भारतातल्या ब्रा ह्मणांची संख्या घटण्याचं एक कारण ब्राह्मण मुलींनी आंतर्जातीय विवाह केल्याने ब्राह्मण मुलग्यांना सुयोग्य पत्नी न मिळणं हे आहे असं फेसबुकवरच्या ब्राह्मण ग्रुप्समध्येच बोललं जातं. शिवाय ब्राह्मण मुली शिकतात. नोकर्या करतात . त्यामुळे जास्त मुलांना जन्म देऊ इच्छित नाहीत. त्यांचं याबाबत प्रबोधन करून त्यासाठी कृतीशील पाठिंबाही हवा . (हेही तिथेच बोललं जातं)
<गोरे लोक अजूनतरी 50% हून
<गोरे लोक अजूनतरी 50% हून अधिक लोकसंख्या आहे>
अमेरिकेतल्या मूलनिवासींचं प्रमाण काय आहे?
भारत सरकारला कास्ट बेस्ड सोशो
भारत सरकारला कास्ट बेस्ड सोशो इकॉनॉमिक सेन्सस करायला सांगा. तुमच्या दाव्याला आधार मिळेल.//
माझा नेमका कोणता दावा? मलाच कळलं नाही. मला उद्देशून आहे का ते वाक्य??
बाकी पूढे पुन्हा तुम्ही ब्राम्हण मुली, त्यांचं खाजगी आयुष्य या ट्रॅकवर गेलात. That really is none of your business , is it? सोडा की ते obsession. कसले फेसबुक ग्रुप्स आहेत तुमचे ?
ब्राम्हण लोकसंख्या अनेक कारणांनी कमी होत आहे त्यापैकी काही कारणं इतर कम्युनिटीजमध्येही सेम आहेत पण ब्राम्हण आधीही संख्येने कमीच होते (hence low base effect) आणि त्यातही भारतातून ब्राम्हण टक्केवारी जास्त वेगाने कमी होत आहे कारण स्थलांतर जास्त होत आहे.
त्यामुळे यापुढे भारतात जे रिसोर्सेससाठीचे संघर्ष होतील, कदाचित caste based population races होतील त्यात ब्राम्हण, पारशी, अँग्लो इंडियन हे ग्रुप्स कुठेच नसतील.
अरे धागा ४६ वे अध्यक्ष बायडन
अरे धागा ४६ वे अध्यक्ष बायडन यांच्याबद्दल बद्दल आहे....
<< मला वाटते बाय डन आणि इतर डावे , वोक लोक ह्यामुळे असले वर्णद्वेषी लोक शेफा रले आहेत. ह्या काळ्या वर्णद्वेषी लोकांना लॅटिनो आणि आशियाई लोकांबद्दल ही कमालीचा द्वेष आढळतो. >>
------ गोर्या वर्णद्वेषी लोकांना लॅटिनो आणि आशियाई लोकांबद्दल प्रेम असते या विधाना एव्हढेच वरचे विधान निरर्थक आहे.
बायडन कधीच वर्णद्वेषी ( काळे, गोरे, पिवळे) लोकांना / विचारांना पाठिंबा देत नाही , देणार नाही. बायडन यांच्या मर्यादा आहेत, आणि त्या मर्यादा स्पष्ट दिसत आहेत पण म्हणून असे बेफाम/ बेलगाम आरोप कुठल्याही आधारा शिवाय करण्यात अर्थ नाही.
<<< लिंक त्यांनीच दिलंय.
<<< लिंक त्यांनीच दिलंय. वाचून त्यांना बरंच वाटलं होतं.>>>
मला बरं वाटले असे मी कुठे लिहीले? वाटेल असे लिहीले.
वाटले असे नसून वाटेल असे आहे.
व्यक्तिगत रागापुढे नि व्यक्तिगत नावे ठेवण्याच्या घाईत वाचताना जरा गडबड होते. ठीक आहे.
माझ्याबद्दल तुमचे तसे मत झाले असेल तर असू द्या. मला काSSSहीहि फरक पडत नाही!!
जे आहे ते आहे.
डेम्स मधे वोक लोक खूप भरलेत
डेम्स मधे वोक लोक खूप भरलेत पण बायडेन वोक नाही. उलट असलाच तर तो उजवीकडेच झुकलेला आहे. त्याची पूर्वीची वाक्ये अनेकांनी वापरायचा प्रयत्न केला आहे त्याला तसे दाखवायला. प्रायमरीज मधे कमला हॅरिसनेही केला होता.
ओह ती ब्राह्मण बाई म्हणजे क्षमा सावंत! मी विचारच करत होतो की फॉक्स वर दखल घेण्याइतकी राजकीय गोष्टीत कोण व्यक्ती आहे - ब्राह्मणच काय, पण एकूणच देशी?
बाकी भारतात रिझर्व्हेशन आहे म्हणून इथे येणारे तुरळक असतीलही, माहीत नाही. माझ्या थेट ओळखीत एकही नाही. बहुतांश लोक आपापल्या क्षेत्रात जेथे चांगली संधी, परदेशाचे आकर्षण, पैसा, अनुभव मिळेल तेथे जातात. तसे अनेक भारतीय इथेही आले. लोक मुंबईत येतात तसे. मागच्या काही वर्षात कित्येक लोक परत भारतात जाउन स्थायिक झालेलेही आहेत.
जे परत जात नाहीत ते इथले लाइफ सोडवत नाही म्हणून जात नाहीत. रिझर्वेशन वगैरे कारणे नंतर लावली जातात. नाहीतरी तेथे जाउन इंटरनॅशनल स्कूल, प्रायव्हेट कंपन्या वगैरे मधे आरक्षणाचा संबंध कोठे येतो.
फारेंड +१.
फारेंड +१.
<<<तुम्हाला तुमच्या देशात
<<<तुम्हाला तुमच्या देशात deserving असून संधी मिळत नाही. म्हणून तुम्ही विस्थापित झालात. ज्या देशाने आसरा दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची की त्यांना शहाणपणा शिकवायचा?>>
असे काही नाही आहे. कुणि कुणावर उपकार करत नसतात!!
आसरा वगैरे दिला नाही, पैसे मोजून कायदेशीर रीत्या लोक आले, प्रचंड कष्ट केले, प्रचंड कामे केली, प्रसंगी वर्णद्वेष स्वीकारला, कायदेशीर रीत्या नागरिकत्व घेतले, भले बुरे अनुभवले नि आता आपले मत सांगताहेत यात चुकले काय?
नि अमेरिकेतले सगळे लोक शहाणे आहेत असे तुमचे मत असेल, तर तुम्ही बरीचशी अमेरिका पाहिलेलीच नाही!
जे भारतीय १९९० नंतर अमेरिकेत आले आणि जे पूर्वी स्वतःहून आले त्यांच्या अमेरिकेच्या अनुभवात प्रचंड फरक आहे आणि इथे हे वेळोवेळी जाणवते. यावर मात्र १९९० पूर्वी आलेल्यांचे बहुधा एकमत आहे, कारण काय याबद्दल निरनिराळी मते आहेत.
ओह ती ब्राह्मण बाई म्हणजे
ओह ती ब्राह्मण बाई म्हणजे क्षमा सावंत! मी विचारच करत होतो की फॉक्स वर दखल घेण्याइतकी राजकीय गोष्टीत कोण व्यक्ती आहे - ब्राह्मणच काय, पण एकूणच देशी?///
That's just my guess. They could also be thinking about Madam Vice President who is half tam-bram. Also there are brahmin men and women working in academia and business world and displaying extreme wokeness.
About migration-तुमच्या थेट ओळखीत कोणी नाही म्हणजे तसं नसेलच किंवा २० वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती तशीच सेम आजही असेल हा दावा विनोदी आहे. तरी पण- why brahmins are leaving india असं काही गुगल करून बघा. Update yourself. सामान्य जनता काय म्हणते आहे ते बघा. कोरा साईटवरच्या चर्चा बघा.
फक्त reservation हा एकच मुद्दा न धरता त्याच्या आसपासचे मुद्दे बघा जसे की anti brahmin hate politics. Spreading lies about conspiracies on the same lines of Jewish conspiracies. Justification of violence. Demands for further quotas and more punitive actions against Brahmins in future. Even those who move back to india temporarily for parents ensure that their kids can eventually move out of india.
गेले तर गेले हो ब्राह्मण भारत
गेले तर गेले हो ब्राह्मण भारत सोडून! ब्राह्मण इथे बसूनहि भारताची उठाठेव करतातच की.
इतर अनेक लोक आहेत की भारतात! ब्राह्मणच कशाला पाहिजेत, इतर जातीत काय कमी आहे? ते करतील भारताचे काय करायचे ते!
आणि आताशा तर जाणे येणे पण सोपे झालेले आहे. तेंव्हा इथे काय नि तिथे काय?
आणि त्या बाईला देशीच आठवले याचा अर्थ देशी लोकांचे वर्चस्व डोळ्यात भरण्याइतके झाले! बरे आहे ना मग.
फुकट नाही झाले - कष्ट केले, कामे केली, कायदेशीर नागरिकत्व घेतले म्हणजे या देशाला आपले मानले, चांगले वाईट पाहिले नि मग टीका करतात!!
हे आश्रय दिला वगिरे काय? ते काय निराश्रित म्हणून आले? बक्कळ पैसे मोजून कायदेशीरपणे आले! उगाच काहीतरी - कुणि कुणावर उपकार करत नाहीत,
तुमच्या थेट ओळखीत कोणी नाही
तुमच्या थेट ओळखीत कोणी नाही म्हणजे तसं नसेलच किंवा २० वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती तशीच सेम आजही असेल हा दावा विनोदी आहे >>> हो टोटली विनोदी असता, जर मी तो केला असता. पण कोठे केलाय तसा दावा? माझी अॅनेक्डोटल माहिती लिहीली आहे. तुमचा डेटा वेगळा असेल तर असेल. मी कधी नाकारलाय.
बाकी हेट पॉलिटिक्स आहे, गेल्या १५-२० वर्षांत जास्त आहे. मी भरपूर लिहीले आहे त्याबद्दल इथेही. पण त्यामुळे कोणी इथे आले किंवा परत गेले नाही असे नाही.
बाकी हेट पॉलिटिक्स आहे,
बाकी हेट पॉलिटिक्स आहे, गेल्या १५-२० वर्षांत जास्त आहे. मी भरपूर लिहीले आहे त्याबद्दल इथेही.
नवीन Submitted by फारएण्ड on 16 April, 2022 -
हेट पोलिटिक्स आहे हे मान्य केल्याबद्दल आभार.
पण त्यामुळे कोणी इथे आले किंवा परत गेले नाही असे नाही.//
तुमच्या माहितीत, तुमच्या काळात/पिढीत नसेल. पण म्हणून तसं नाहीच असं कसं म्हणता? म्हणून म्हटलं की जरा सोशल मीडिया वाचून बघा की सध्या काय परिस्थिती आहे. कोणीही स्वतःचे आईवडील ,नातेवाईक, लहानाचे मोठे झालो तो प्रांत सोडून दुसरीकडे जातो तेव्हा push pull दोन्ही फॅक्टर असतात. Pull factor म्हणजे तुम्ही म्हणता तशा संधी, लाईफस्टाईल. आणि push फॅक्टर म्हणजे भविष्यात quota, restrictions, hate politics, violence वाढत जाण्याची दिसत असलेली चिन्हे.
जेव्हा तुमचं यशस्वी असणं हाच तुमचा गुन्हा ठरलेला असतो, तुमची लोकसंख्या इतकी मग तुम्ही अमुक इतकेच यशस्वी हवे- त्यापेक्षा जास्त यशस्वी झालात तर आम्ही त्रास देऊ- हा मेसेज असतो-तेव्हा त्याचे repercussion होणारच ना.
तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुमचे टोटल तीनच कवी हवेत- त्यापेक्षा जास्त लोकांनी कविता करायच्या नाहीत, केल्या तर प्लॅटफॉर्म मिळू दिला जाणार नाही- या लेव्हलला stifling पोचलंय आता.
माझ्याही पाहण्यात फा सारखेच
माझ्याही पाहण्यात फा सारखेच लोक आहेत. रिझर्व्हेशनमुळे भारतात एक कॉलेज मिळालं नाही तर दुसरं मिळेलच. तिकडे कुठलंच मिळालं नाही हे काही शक्य नाही. तिकडे एक मिळालं नाही आणि भारतात दुसरं न घेता अमेरिकेत मिळालं तर टेक्निकली रिझर्व्हेशन मुळे मिळालं नाही कुणी म्हणुच शकतो. पण त्यात किती तथ्य ह्याचा ज्याने त्याने विचार करावा. अमेरिकेतही १० अप्लाय केल्यावर त्यातील ३ ४ मधून होकार आला तर बाकीच्या ६ नी नाकारण्याचे कारण काय ठरवायचं? आणि ते सांगायचं का नाही?
ज्यांना परवडतं आणि संधी मिळते
ज्यांना परवडतं आणि संधी मिळते ते बाहेर शिकायला/नोकरी करायला जातात. त्याचा ब्राह्मण असण्याशी काही संबंध नाही. भारतात खाजगी क्षेत्रात भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत जिथे कोणतेही आरक्षण नाही.
तुमच्या माहितीत, तुमच्या
तुमच्या माहितीत, तुमच्या काळात/पिढीत नसेल. पण म्हणून तसं नाहीच असं कसं म्हणता? >> अहो मी तसे नाहीच असे म्हणत नाहीये. माझ्या माहितीत नाही असे म्हणतोय. इथे आपण असेच लिहीणार ना? इथे कोणी समाजशास्त्रज्ञ वगैरे नाही. जर तुम्ही त्यावर लिहीले की तुमच्या ओळखीत तसे लोक आहेत, तर मला त्यात काही ऑब्जेक्शन नसेल.
तुम्ही लिहीले आहे ते मीही वाचले आहे. पण माझ्या ओळखीत त्यामुळे कोणी इकडे येण्याचा किंवा इकडून परत न जाण्याचा निर्णय त्यावरून घेतलेला नाही.
Pages