तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-diff...
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
Divide and Rule
Divide and Rule
गुजराती आणि हिंदी आणि जुजबी इंग्रजी येणारा माणूस 40 राज्ये आणि 80 राष्ट्रात फिरतो की.
तसे बाकी नागरिकही कुणाशी कसे बोलायचे हे बघून घेतील
Hindi is a foreign language
Hindi is a foreign language for Gujaratis, says Gujarat high court
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/11321862.cms?utm_source=c...
बॉलीवूडच्या चित्रपटात मराठी
बॉलीवूडच्या चित्रपटात मराठी कुटुंब दाखवले तर ते घरातल्या घरातही हिंदीच बोलतात. हे जाम खटकते. म्हणजे माझ्यावर पिक्चर निघाला तर मी माझ्या आईला हिंदीत बोलताना दाखवणार, मम्मी आज खाने मे क्या है?
(उदाहरण दिलेय, लगेच कोणी काढायचा विचार करू नका)
हिंदी है हम वतन है हिंदोस्ता
हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा...
<<<<हिंदी है हम वतन है
<<<<हिंदी है हम वतन है हिंदोस्ता हमारा...>>>
या ओळीचा भाषेशी काहीहि संबंध नाही!!!
जोपर्यंत हिंदी बोला अशी सक्ती
जोपर्यंत हिंदी बोला अशी सक्ती होत नाही, तो पर्यंत त्या भाषेबद्दल आदर / प्रेम रहाते. याने विनाकारण हिंदी भाषेबद्दल आकस निर्माण होणार.
कुणी काय खावे, कुठल्या भाषेत बोलावे हे लोकांचे लोकांना ठरवू द्या.
अमित शाह हे राजकीय फायदा
अमित शाह हे राजकीय फायदा डोळ्या समोर ठेवून बोलत आहेत.
त्यांना हिंदी भाधा किंवा देश हीत ह्याच्या शी काही देणे घेणे नाही.
भावनिक प्रश्न निर्माण केले की उत्तरेतील यूपी,बिहार मधील लोक मत देतात.
त्या मुळे सर्व राजकीय पक्ष तो फॉर्म्युला वापरतात.
बाकी राज्य भावनिक प्रश्नांना जास्त किंमत देत नाही.
गुजराती मुंबई मध्ये बिल पण गुजराती मधून लिहून देतात.
त्यांना हिदी विषयी काही देणे घेणे नाही.
भारत हा विविध भाषा बोलणारा देश आहे.
कोणतीच एक भाषा देशातील लोकांवर लादता येणार नाही.
कसे दुसऱ्या राज्यातील लोकांशी संवाद साधायचा कोणती भाषा वापरायची हे नागरिक ठरवतील.
केंद्र सरकार नी त्या मध्ये लक्ष देवू नये.
भाजप पायात साप सोडण्यात पटाईत
भाजप पायात साप सोडण्यात पटाईत आहे.
दर आठवड्याला काहीतरी एक मोहिम वजा विधान नाही तर नारा देतात अन मग महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून मारामारीची मजा घेतात.
भाषा, संस्कृती, पर<परा इ. वर बोलण्याची श्री अमित शहांची पात्रता अन लायकी काय आहे... तशी शेटची पण काय आहे...???
BJP देशात अशांतता निर्माण करत
BJP देशात अशांतता निर्माण करत आहे हे BJP विरोधी लोकांस पटत आहेच पण ज्यांनी bjp ल मत दिली त्यांना पण आता त्याची जाणीव झाली आहे.
सत्तेचे केंद्रीकरण करून हुकूमशाही सारखी अवस्था देशात निर्माण करणे हाच bjp च हेतू आहे..
देशाच्या राज्य घटनेने लोकांना दिलेले अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विविध बिल लोकसभेत मांडून बहु मताच्या जोरावर पास करून घेण्याचा सपाटा सध्या केंद्र सरकार नी लावला आहे.
मीडिया batik आहे.
फालतू बातम्या 24 तास देत अस्तात पण .
महत्वाच्या विषयावर 1 मिनिटांची पण बातमी देत नाहीत.
मोदीला मत दिलेला आणि आता
मोदीला मत दिलेला आणि आता जाणीव झालेला कोणी असेल तर इथे हात वर करा. हे म्युच्युअली एक्सक्ल्युझिव्ह सेट्स असतील बहुतेक. एकही हात वर होणार नाही असं वाटतं.
मी स्वतः
मी स्वतः
Bjp ल मत दिले होते पण राज्यात आणि देशात जो ह्यांनी तमाशा चालू केला आहे तो बघून..
मत दिल्याचा पश्र्चाताप होत आहे
गुड फॉर यू!
गुड फॉर यू!
मोदी आधी प्रॉमिसिंग वाटलेले
मोदी आधी प्रॉमिसिंग वाटलेले पण असहिष्णुतेचे थैमान सुरु आहे. अर्थात काँग्रेसकडे राहुलबाबा शिवाय कोणी नाही. त्यामुळे लेसर ऑफ द डेव्हिल्स......
मी सुद्धा २०१४ ला मोदींना मत
मी सुद्धा २०१४ ला मोदींना मत दिलेले.
पुन्हा दिले नाही.
पण मी कायमच एक तटस्थ मतदार आहे. दरवेळी त्या त्या सिच्युएशननुसार मत देतो.
मोदींच्या आणि बीजेपी पक्षाच्या काही गोष्टी आवडत नाहीत. किंबहुना त्या देशाला घातक वाटतात म्हणून नको वाटतात ते. त्याचवेळी सक्षम पर्याय देखील विरोधकांत दिसत नाही. ईकडे दारू तर तिकडे सिगारेट, मतदारांनी निवडावे तर काय निवडावे?
आम आदमी पार्टी / केजरीवाल मला या सर्वात ऊजवे वाटतात. त्यांचे काम बोलते. दुर्दैवाने ते एकदोन राज्यापुरते मर्यादीत आहेत.
महाराष्ट्राचे राजकारण तर आणखी सडके आहे. अमिताभने जे पिक्चरमध्ये केले ते करावेसे वाटते.
मी पार्टी न बघता वोट देतो...
मी पार्टी न बघता वोट देतो... जयाचे काम बेटर तो माझा उमेदवार.. मग तो बीजेपी असू शकतो काँग्रेस किंवा आप .किंवा
Mim ने चांगले काम केले त्यालाही वोट देऊ ..
पहिल्या चार मुद्द्यांशी सहमत
पहिल्या चार मुद्द्यांशी सहमत पण...
इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची? >> हा तर्क पटला नाही. उद्या हिंदी कार्पोरेट आणि इतरत्र वापरली गेल्यामुळे तीही 'ताकदवान, उपयोगाची, आंतर्राज्यीय' वगैरे वगैरे असल्याचं म्हणतील हे लोक. विरोधच करायचा तर सरसकट कुठलीही परभाषा लादण्यावर करायला हवा, मग ती हिंदी असो, संस्कृत असो वा इंग्रजी.
शेवटी लादून काही होत नसतंय, ज्याला/जिला जी भाषा आवडते तीच तो/ती बोलणार. मराठी लोकांना परप्रांतीयांशी बोलायला हिंदी सोयीची पडते, तर मग तेही तीच बोलणार. त्यांना तुम्ही मराठीतच बोला म्हणाल, तर कोणी ऐकणार नाही. लोकांना हिंदी बोलायला, हिंदी सिनेमे, मालिका बघायला आवडतं. इंग्रजीची वेगळीच गत आहे. सर्वांना काही ती भाषा आवडते असं नाही, पण त्या भाषेला एक ग्लॅमर आहे. आपण इंग्रजी बोलून समोरच्यावर छाप पाडू शकतो अशी अनेकांची समजूत आहे. कामाच्या ठिकाणी इंग्रजी का बोलावी ह्याला काही कारण नाही. ठराविक पारिभाषिक शब्द इंग्रजी ठेऊन बाकीचं संभाषण आपापल्या भाषेत होऊ शकतं. मीटिंग्स स्थानिक भाषांत होऊ शकतात. त्यासाठी संस्कृतप्रचुर स्थानिक भाषा बोलायची गरज नसते. गरजेपुरतं इंग्रजी वापरलं की झालं. हा , जिथे इंग्रजी बोलल्याशिवाय गत्यंतरच नाही अशा ठिकाणची गोष्ट वेगळी. पण इतकं असूनही लोकांचा ओढा इंग्रजीकडे असेल, तर आपन विरोध करून काही होणार नाही. तसाच ज्यांचा ओढा हिंदी बोलण्याकडे आहे, त्यांना विरोध करून काही होणार नाही.
माझा विरोध हा कुठलीही भाषा लादण्याला आहे. तुम्ही इंग्रजी किंवा मराठी सोडून हिंदी बोला असं कुणी म्हणत असेल, तर ते पटणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही हिंदी लोकांशी हिंदी सोडून इंग्रजीत बोला असं कुणी लादत असेल, तर तेही पटणार नाही. काय बोलायचं ते लोक त्यांचं ते ठरवतील.
शिक्षित ( पदवीधर) हिंदी
शिक्षित ( पदवीधर) हिंदी भाषकांना जोवर दुसरी एक भारतीय भाषा ( संस्कृत ) नव्हे शिकायला लागत नाही , तोवर त्यांच्याशी इंग्रजीतच बोलावं, असं माझं मत आहे.
हो, वैयक्तिक पातळीवर ते
हो, वैयक्तिक पातळीवर ते करायला हरकत नाही. सरसकट सगळ्यांवर हे करण्याची जबरदस्ती नाही करू शकत. काही जण त्यांच्याशी मराठीत बोलतील, तर काहीजण हिंदीत. ज्यांना जे सोयीचं असेल ते ते करतील.
हिंदी भाषा ही देशाची भाषा
हिंदी भाषा ही देशाची भाषा असावी ही राजकीय मागणी आहे
अनेक भाषा असणे ही देशाची समस्या नाही. उलट बल स्थान आहे देशाचे.
भाषा आणि संस्कृती ह्याचा निकटचा संबंध असतो.
विविध भाषा,विविध संस्कृती,विविध धर्म हे देशाची सुंदरता आहे.
केंद्र सरकार च्या सर्व सेवा मध्ये नोकर भरतो असती तेव्हा हिंदी लाच प्रथम स्थान दिल्या मुळे.गैर हिंदी लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे
स्पर्धा परीक्षा ह्या कोणत्या ही भारतीय भाषेत देता आल्या पाहिजेत.
हिंदी,इंग्लिश हे दोन च पर्याय असता कामा नयेत
ममता जी रेल मंत्री होत्या तेव्हा त्यांनी रेल्वे भरती परीक्षा मातृभाषेत देण्याचं सुविधा निर्माण केली.
त्यांचे त्या साठी अभिनंदन केलेच पाहिजे.
गैर हिंदी लोकांचे >>
गैर हिंदी लोकांचे >>
काहीतरी गैर आहे ह्या वाक्यात.
ह्या देशात कोणतीच भाषा ही
ह्या देशात कोणतीच भाषा ही एकमेव देशाची भाषा असणार नाही.
हिंदी तर बिलकुल नाही.
इथे भाषा द्वेष नाही पण त्या आडून बाकी नॉन हिंदी भाषिक लोकांचे शोषण होईल.
आणि गंमत अशी आहे नॉन हिंदी प्रदेश हे देशाचे आर्थिक, पॉवर इंजिन आहे
आणि हिंदी भाषिक प्रदेश हे देशावरचा बोजा आहे
ही स्थिती असताना राजकीय डावपेच लढवून पॉवर इंजिन वर हक्क गाजवण्याची कुटील ईच्छा पुर्ण होता कामा नये
ईंग्लिश सगळ्यांना कुठे येते.
ईंग्लिश सगळ्यांना कुठे येते. काही प्रतिसाद तर असे आहेत की जणू ईंग्लिश भारतातल्या निम्या लोकांना जमते..
नसेल येत तर शिकवा.
नसेल येत तर शिकवा.
हिंदी का नको.
तर हिंदी भाषा वापर करा असे सांगणे हे राजकीय दृष्टी नी आहे .
Cow बेल्ट चे देशाच्या विकासात जास्त योगदान नाही
Cow बेल्ट देशावर बोजा आहे
तरी हिंदी आडून ह्यांना देशावर हुकूमत गाजवयची आहे.
इंग्लिश का हवी .कारण ह्या मागे कोणताच राजकीय स्वार्थ नाही.
सर्वांना समान न्याय मिळेल
<< ईंग्लिश सगळ्यांना कुठे
<< ईंग्लिश सगळ्यांना कुठे येते. काही प्रतिसाद तर असे आहेत की जणू ईंग्लिश भारतातल्या निम्या लोकांना जमते.. >>
-------- हिंदी तरी सगळ्यांना कुठे येते ? हिंदी पहिली (४३ %), दुसरी, तिसरी भाषा बोलता येणारे असे लोक धरले तरी ५७ % होतात.
देशांत अनेक भाषा वापरल्या जातात, पैकी कुणा एका भाषेला प्राधान्य क्रम देतांना अन्य प्रादेशिक भाषांचा विकास खुंटणार नाही हे पण पहायला हवे. wiki वर डेटा आहे त्यात अन्य भाषिकांची टक्केवारी कमी होत आहे. मराठी भाषा बोलणार्यांची संख्या १९९१ मधे ७.४५ % होती, आणि २०११ मधे ६.८६ % अशी खालावली आहे.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_number_of_native_spea...
भांडण हिंदी वि इंग्रजी असं
भांडण हिंदी वि इंग्रजी असं आहे का स्थानिक भाषा वि परभाषा असं आहे?
भांडण हिंदू वरून नाही
भांडण हिन्दी वरून नाही
हिंदी भाषा लादून हिन्दी भाषिक राज्याचं देशावर वर्चस्व गाजवण्याची जी कुटील निती आणि हेतू आहे त्याला कठोर विरोध आहे..भाषा म्हणून हिंदी ल बिलकुल विरोध नाही
असे लोक धरले तरी ५७ % होतात.
असे लोक धरले तरी ५७ % होतात.
>>>
मग झाले की निम्याच्या वर..
ईथे माझी ईंजिनीअरींग ईंग्लिशमधून झाली तरी मला अजून ईंग्लिश पिक्चर शष्प कळत नाहीत. किमान सबटायटल्स लागतात. बोलताना कोण देणार सबटायटल्स..
हिंदी भाषा लादून हिन्दी भाषिक
हिंदी भाषा लादून हिन्दी भाषिक राज्याचं देशावर वर्चस्व गाजवण्याची जी कुटील निती आणि हेतू आहे
>>>
असे तुम्हाला वाटतेय. पण तसे असेलच असे नाही.
कंपलसरी हिंदी बोला असा नियम काढला आहे का?
मलातरी या गदारोळात गुजराती
मलातरी या गदारोळात गुजराती भाषेचे काय होणार याचीच चिंता वाटत आहे.
ह्यापुढे होणार्या
ह्यापुढे होणार्या पंतप्रधानांची सोय बघितली जात असेल
Pages