Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
![आयपीएल](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/03/26/images.jpeg)
आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सेन ने सैनीपेक्षा ऑलरेडी
सेन ने सैनीपेक्षा ऑलरेडी चांगली बॉलिंग केलीय.
नॉट टुडे!
नॉट टुडे!
( हे बडोनी करता)
सेन चा बॉल भारी होता. ऑन द मनी!
As much as I’d like to see
As much as I’d like to see Riyan Parag hit the batting form, he’s very calm in the field. विशेषतः कॅचेस घेताना त्याचा कंट्रोल सहसा छान असतो.
तपन शर्मा ची अंपायरिंग
तपन शर्मा ची अंपायरिंग आंतरशालेय दर्जाची पण नाहीये.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
यांची मॅच आज पाहिली नाही.
यांची मॅच आज पाहिली नाही. स्कोअरच चेक करत होतो. पण बॅटींग ऑर्डर अनाकलनीय दिसत आहे स्कोअरबोर्डवर. एखादा गौथम वा होल्डर आधी समजू शकतो. दोघे एकत्र पुढे काय करत होते.. आणि स्टॉईनिसची क्षमता आणि गेले दोनेक वर्ष दिल्लीसाठी जे करत होता ते पाहता त्याचा नंबर आठवा केला.. किमान पांड्याच्या आधी पाठवायचे होते मग.. कर्माने घालवलाय सामना.
राहुल मॅच संपल्यावर म्हणाला
राहुल मॅच संपल्यावर म्हणाला "मला बॉल दिसलाच नाही, नाही तर मी बॅट घातली असती मधे"
बोल्ट चा नीशॅमबद्दल केलेला उल्लेख जबरीच होता.
स्टोनिस ला त्याचा एकंदर फॉर्म बघता एव्हढ्या खाली ठेवल्याबद्दल पुढच्या मॅच मधे राहुल ला बाह्वेर बसवायला हवा. काय विचार केला होता देव जाणे. गौथम नि होल्डर दोन चुकलेले प्रयोग. कुलदीप सेन बघूनही पेसी वाटतो. रॉयल्स नी बरेच नवे प्लेयर्स आणले आहेत. खरे ग्रूमिंग हे आहे.
कोहलीच्या विकेट बद्दल बॅत नि पॅड दोन्हींना एकदम लागला तर बेनेफिट ऑफ डाउट बॅट्समनला जातो असा नियम आहे. त्यामूळे थर्ड अंपायरला शंका असल्यावर निर्णय फिरवायला हवा होता.
तो नियम बॅटपॅड एकत्र केसमध्ये
तो नियम बॅटपॅड एकत्र केसमध्ये निर्णय कोणाच्या फेव्हरमध्ये असावा यासाठी असेल. जेव्हा ऑनफिल्ड अंपायरला वाटेल की बॅट पॅड एकत्र आहे तेव्हा काय निर्णय द्यायचा हे रुल बूक मध्ये लिहीणे गरजेचे होतेच. आरसीबी तोच नियम दाखवत असावी.
पण थर्ड अंपायरचे काम कोणालाही बेनेफिट ऑफ डाऊट देणे नसून ऑनफिल्ड अंपायरचे डिसीजन बदलायला १०० टक्के खात्रीचा पुरावा आहे की नाही हे तपासणे असते.
बॅट पॅड एकत्र वाटतेय आणि तसेच १०० टक्के आहे यात फरक आहे. आणि ते खरेच तसे आहे हे चेक करायला सध्याचे तंत्रज्ञान पुरेसे नाही.
फर्स्ट डिसीजन असते तर नक्कीच नुसते वाटतेय हे नॉटआऊट द्यायला पुरेसे ठरले असते कारण तसा नियमच आहे. पण ऑनफिल्ड अंपायरचे डिसीजन बदलायला हे पुरेसे नाही.
मुळात जर थर्ड अंपायरला १०० टक्के खात्री नसेल तर ईट्स ओके. स्विकारायला हवा तो निर्णय.
कोहली आहे. त्याच्या स्वभानुसार वैतागला. म्हणून आता त्याची चूक नाही बिचारा आऊट नव्हता हे दाखवायला म्हणून आता आरसीबी प्रयत्न करतेय..
“ स्टोनिस ला त्याचा एकंदर
“ स्टोनिस ला त्याचा एकंदर फॉर्म बघता एव्हढ्या खाली ठेवल्याबद्दल पुढच्या मॅच मधे राहुल ला बाह्वेर बसवायला हवा. ” - मला राहूल एक खेळाडू म्हणून जितका आवडतो तितकाच एक कॅप्टन म्हणून क्लूलेस वाटतो.
“ कोहली आहे. त्याच्या स्वभानुसार वैतागला.” - एका मान्साला, कोहली आवडत नै जनु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ फेरफटका
@ फेरफटका
त्याचा मूळचा उर्मट अहंकारी स्वभाव नाही आवडत. आणि कसा आवडणार? याबाबत सचिन द्रविड कुंबळे हे माझ्या पिढीचे खेळाडू बेंचमार्क आहेत. धोनी आमच्या पिढीतील शेवटचा खेळाडू आहे.
पण कोहलीचा खेळ आवडतो. अर्थात कोणाला नाही आवडत. आपण त्याला सचिनच्या पंक्तीत बसवतो आणि काही बाबतीत तो त्याच्याही वरचढ ठरतो.
पण मी त्याचा फॅन नाही. ते मी सचिन, दादा, धोनी, शर्मा आणि आता चुम्मा ऋषभ पंत यांचा आहे. द्रविडचा मी हाल्फ फॅन होतो. कसोटी फॉर्मेटपुरता.
नशीब असतं एकेकाचं सर!
नशीब असतं एकेकाचं सर! धोनीच्या आधीच्या कॅप्टन्स च्या काळात टी-२० वर्ल्डकप नव्हता (१९९८ च्या आधीच्या कॅप्टन्स साठी तर चँपियन्स ट्रॉफी पण नव्हती). चँपियन्स ट्रॉफी मध्यंतरी डिसकंटिन्यू झाली होती.
ह्यामुळे धोनीचं यश झाकोळलं जात नसलं तरी इतर कॅप्टन्सचं अपयश सुद्धा म्हणता येत नाही. (पण तरी तुमचंच म्हणणं खरं आहे सर! जळतात लोकं)
Submitted by फेरफटका on 9 April, 2022 - 23:20
>>>>>
याचे उत्तर द्यायचे राहिलेले.
१९८३ नंतर धोनी कप्तान नाही असे एकूण ## वर्ल्डकप/चॅम्पियन ट्रॉफी आपण खेळलो. त्यात एकालाही एकही जिंकता आला नाही. अगदी एकही नाही. याला अपयश म्हणू नये तर काय बॅडलक म्हणावे.
आणि चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा वा २०-२० वर्ल्डकप म्हणा, हे अमुकतमुक काळात नव्हते म्हणावे तर ज्या काळात होते तेव्हाही धोनी वगळता जगातल्या कुठल्या कर्णधाराने हे तिन्ही कप जिंकलेत?
याऊपर त्याने आयपीएलमध्ये ४ कप जिंकलेत. ऑलमोस्ट प्रत्येक वेळी चेन्नईला प्ले ऑफला पोहोचवलेय. यावरून तो लिमिटेड फॉर्मेटमध्ये कर्णधार म्हणून जगात सर्वोत्तम आहे यावरच शिक्कामोर्तब होते. किंबहुना ट्रॉफी मोजणेही सोडा. कप्तानीचे आकडेही फसवे असतात. एखादी ऑस्ट्रेलिया वा विंडीजची टीमच अशी असते की कर्णधार कोणी का असेना ते जिंकतातच. पण आकड्यांपलीकडे विचार करताही क्रिकेटचे सारेच दिग्गज जाणकार याबाबतीत धोनीलाच सर्वोत्तम मानतात तर ते नाकारण्यात काय अर्थ आहे. असा धोनी यावेळी आपण हरणार असे स्वप्न आल्याने कप्तानी सोडतो हे बिलकुल पटत नाही.
कोहली चा क्लास वेगळा आहे..
कोहली चा क्लास वेगळा आहे.. त्या लेव्हल फक्त सचिन येऊ शकतो... तरी थोडा कमीच वाटतो सचिन कोहलीसमोर... द्रविड,गावस्कर, दादा सारखे भरपूर होतील पुढे...
द्रविड तर वन डे मध्ये कॉम्पिटिशन नसल्याने टिकला..
कुंबळे तर लुझर आहे... त्याला मोजूही नका...
धोनी नशिबाने जिंकला या
धोनी नशिबाने जिंकला या स्टेटमेंट वर हसावे का रडावे?
कोहली चा क्लास वेगळा आहे..
कोहली चा क्लास वेगळा आहे.. त्या लेव्हल फक्त सचिन येऊ शकतो
+७८६
कोहलीचा पीक होता तेव्हा कोहलीच कित्येकांना सचिनपेक्षा भारी वाटायचा. पण लाँग रनमध्ये पुर्ण कारकिर्दीचा विचार करता त्यातल्या कित्येकांची मते बदलत सचिनच भारी होता वाटले असेल.
ते असो,
पण कुंबळे लूजर ??
च्रप्स तुम्ही कोहलीचे फॅन आहात आणि कोहली कुंबळे वाद झालेला म्हणून म्हणत आहात का.. कारण जेव्हा आपल्याकडे वेगवान गोलंदाजांची बोंब होती तेव्हा कुंबळेच सहार होता. मग देश असो वा परदेश.. मॅच विनर गोलंदाज तोच होता. मग जोडीला हरभजन आला..
च्रप्स तुम्ही कोहलीचे फॅन
च्रप्स तुम्ही कोहलीचे फॅन आहात आणि कोहली कुंबळे वाद झालेला म्हणून म्हणत आहात का..
>>>बरोबर...
द्रविड तर वन डे मध्ये
द्रविड तर वन डे मध्ये कॉम्पिटिशन नसल्याने टिकला..
>>>
याला +७८६
म्हणून मी कसोटीपुरते फॅन होतो लिहिले.
अर्थात तेव्हा बरेचदा, स्पेशली परदेशात खेळपट्ट्या आतासारख्या पाटा नसायच्या.
लिमिटेडमध्येही फलंदाजांकडे पुरेसा क्लास असणे गरजेचे होते. पण सचिन दादा असताना द्रविड आणखी मिडल ऑर्डरला हे काही चांगले टीम कॉम्बिनेशन नव्हते. त्यामुळे यांचे वैयक्तिक स्कोअर पडायचे पण विजयात रुपांतर होणे युवराज धोनी आल्यापासून शक्य झाले. आधीचा संघ मोक्याला कच खाणारा होता.
द्रविड कॉम्पिटिशनपेक्षा विकेट
द्रविड कॉम्पिटिशनपेक्षा विकेट कीपिंग मुळे संघात २००२ मधे टिकला व नंतर त्याची बॅटिंग इतकी सुधारली की निव्वळ त्या बळावरही तो पुढे राहिला. नंतर कप्तानही होताच २००७ पर्यंत. साधारण २००२ ते पुढे ३-४ वर्षे कोणत्याही विकेट कीपरच्या बॅटिंग पेक्षा द्रविडने कीपिंग करणे जास्त फायदेशीर होते आपल्याला वन डे मधे.
बाकी सचिन शी कोणाची तुलना झाली की पूर्वी मुंबईहून निघताना डेक्कन क्वीनने निघाल्यावर आजूबाजूला लोकल्स दिसत ते आठवते
अधेमधे त्या डेक्कनपेक्षाही वेगात जात. पण हमखास कोणत्यातरी स्टेशनवर स्लो होउन थांबत. काही फार फार तर ठाणे, कल्याण, कर्जत पर्यंत जात. डेक्कन तशीच त्याच वेगात पार पुढे निघून जात असे. सचिनच्या सुरूवातीला अन्वर, अरविंदा डीसिल्वा, मार्क वॉ होते तुलनेत. बराच काळ ब्रायन लारा होता. मग नंतर रिकी पॉण्टिंग आला. हे सगळे भारी होते. आपापल्या बहराचा काळ चमकले. अनेकदा सचिनला न जमलेल्या खेळीही केल्या. पण नंतर मागे पडले. सचिन यातील बहुतेकांच्या आधीही होता व नंतरही. तो १९९२ च्या पाक विरूद्धच्या वर्ल्ड कप मॅचमधेही चमकला होता, २००३ च्याही, आणि नंतर २०११ च्याही. तिन्हीमधे मॅन ऑफ द मॅच होता.
कोहली ऐन भरात असताना सचिनला सहज मागे टाकेल असे वाटे. अजूनही कदाचित टाकेल. आणि सचिनला मागे एखाद्या भारतीयानेच टाकावे. पण एकूण कोहलीचे गेली १-२ वर्षे काहीतरी बिनसलेले आहे.
>>द्रविड तर वन डे मध्ये
>>द्रविड तर वन डे मध्ये कॉम्पिटिशन नसल्याने टिकला..
कुंबळे तर लुझर आहे
मला वाटले चुकून विनोदाच्या धाग्यावर आलो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बाय द वे, काल स्टॉयनिसचा अजुन एखादा शॉट फायनल ओव्हरमध्ये बसला असता तर फिक्सिंग फिक्सिंग म्हणून ओरडला असता का हो??
>>स्वरूप, राजस्थान ने आज
>>स्वरूप, राजस्थान ने आज जैस्वाल ला ड्रॉप करून ड्युसेन ला घेतलाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो
पण आता घेतलाय तर किमान ३-४ मॅचेस खेळवला पाहिजेल.... रियान परागचे मात्र फार लाड झालेत
नीशम बाहेर बसून बोल्टला टीप्स देतोय.... त्यालाही खेळवून बघायला हवे आता!!
सचिनबाबत डेक्कन क्वीनचे
सचिनबाबत डेक्कन क्वीनचे उदाहरण भारी. मी पण वर तेच लिहिलेले. लाँग रनचा विचार करता सचिन अश्या तुलनेत पुढे निघून जातो. विराटच्याही पुढेच आहे हे एव्हाना माझ्यापुरते तरी क्लीअर झाले आहे.
द्रविडबाबत मात्र वनडेमध्ये द्रविड बाकी आहे अजून तर टेंशन नाही. तो टाकेल स्कोअर, तो खेचेल मॅच, असा कॉन्फिडन्स एक प्रेक्षक म्हणून कधी आल्याचे आठवत नाही.
तेच कसोटीला ऊलट होते. द्रविडच गेला आता काय होणार अशी चिंता वाटायची.
सचिन चारशे वन डे मध्ये 49
सचिन चारशे वन डे मध्ये 49 सेंचुरी... विराट दीडशे मॅचेस मध्ये 43 सेन्क्युरी ... तरी सचिन भारी???
"१९८३ नंतर धोनी कप्तान नाही
"१९८३ नंतर धोनी कप्तान नाही असे एकूण ## वर्ल्डकप/चॅम्पियन ट्रॉफी आपण खेळलो. त्यात एकालाही एकही जिंकता आला नाही. अगदी एकही नाही. याला अपयश म्हणू नये तर काय बॅडलक म्हणावे." - ८३ का वगळायचा? केवळ धोनी च्या कौतुकाला अपवाद ठरतो म्हणून? तसंही २००२ मधे भारत जॉइंट विनर होता. असो.. तो मुद्दाच नाहीये. ह्या आकडेवारीमुळे ना धोनीचं कर्तृत्व झाकोळलं जातं ना इतरांचं. captain is as good as his team.
"त्याने आयपीएलमध्ये ४ कप जिंकलेत." - जाऊ द्या ना सर. एकदा ठरवा, आयपीएल फिक्स्ड असते का नाही. तोपर्यंत स्वतःला सोयीचं तेव्हा आयपीएलचा संदर्भ वापरायचा आणि इतर वेळी फिक्सिंगच्या काड्या टाकायच्या हा खेळ बंद करा.
"असा धोनी यावेळी आपण हरणार असे स्वप्न आल्याने कप्तानी सोडतो हे बिलकुल पटत नाही." - जाऊ द्या सर, तुम्हाला पटो ना पटो, चित्र तसंच आहे. धोनीला कॅप्टन्सी सोडायचीच असती (ह्या सीझन ला, गायकवाड ला ग्रूम नकरता) तर फाफ ला रिटेन केलं असतं. जडेजा ने कधी सौराष्ट्राचीसुद्धा कॅप्टन्सी केलेली नाही. पण धोनीने टेस्ट कॅप्टन्सी सुद्धा अशीच सोडली होती.
"मला वाटले चुकून विनोदाच्या
"मला वाटले चुकून विनोदाच्या धाग्यावर आलो" -
"स्टॉयनिसचा अजुन एखादा शॉट फायनल ओव्हरमध्ये बसला असता तर फिक्सिंग फिक्सिंग म्हणून ओरडला असता का हो??" -![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
"बाकी सचिन शी कोणाची तुलना
"बाकी सचिन शी कोणाची तुलना झाली की पूर्वी मुंबईहून निघताना डेक्कन क्वीनने निघाल्यावर आजूबाजूला लोकल्स दिसत ते आठवते" - क्या बात है फा! मस्त उपमा आहे.
"द्रविड तर वन डे मध्ये
"द्रविड तर वन डे मध्ये कॉम्पिटिशन नसल्याने टिकला..![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
कुंबळे तर लुझर आहे... त्याला मोजूही नका..." - आप तो बस, रहने दो सर! हसाँ हसाँके मार डालोगे!
"बाकी सचिन शी कोणाची तुलना
"बाकी सचिन शी कोणाची तुलना झाली की पूर्वी मुंबईहून निघताना डेक्कन क्वीनने निघाल्यावर आजूबाजूला लोकल्स दिसत ते आठवते" >> हे आवडले फा. कोहली सचिनपेक्षा फक्त दीड बाबती मधे उजवा ठरतो - फिटनेस चा हव्यास नि चेस करताना रनरेट मॅनेज करणे . बाकी बॅट्समन म्हणून दोघांच्या ही कारकिर्दी पाहिल्या आहेत नि सचिन त्याच्या पूर्वार्धा मधे ज्या दुबळ्या संघातून नि ज्या विविधतेने नटलेल्या बॉलिंग समोर खेळला आहे ते बघता तो नेहमीच उजवा राहील. २००० नंतर मिळालेला सपोर्ट सचिनला जर ९४ पासून मिळाला असता तर ........
हार्दिक गुजरातचा कॅप्टन
हार्दिक गुजरातचा कॅप्टन झाल्यापासून जरा मॅच्युअर झाल्यासारखा वाटतोय..... या हेअरकटमध्ये सोबर सुद्धा दिसतोय!!
फिटनेस चा हव्यास नि चेस
फिटनेस चा हव्यास नि चेस करताना रनरेट मॅनेज करणे >> +१
कालचा बोल्टचा ओपनिंग स्पेल काय भन्नाट होता! बोल्ट-कृष्णा ही यावेळेस आयपीएल मधली सर्वात इफेक्टिव्ह पेअर असेल का? उमेश यादव व मोहम्मद शामी (वेगळ्या टीम्स मधून) चांगली बोलिंग करत आहेत पण दोघांनाही तितका भारी जोडीदार दिसत नाही.
काल दोन्हीपैकी कोणत्या मॅच
काल दोन्हीपैकी कोणत्या मॅच मधे ते लक्षात नाही पण ओपनर ला पहिल्या दोन बॉल्सला आउट दिल्यावर रिव्यूमधे निर्णय फिरला. मग तिसर्या बॉलला निक होती तर कोणीच अपील केले नाही
रहाणे होता बहुधा बॅट्समन.
चेस करताना रनरेट मॅनेज करणे >
चेस करताना रनरेट मॅनेज करणे >>> दुर्दैवाने हा भूतकाळ झालाय. हल्ली तो चांगला खेळतो. पण गेमवर कंट्रोल करणे हरवलेय त्याचे...
हार्दिक गुजरातचा कॅप्टन
हार्दिक गुजरातचा कॅप्टन झाल्यापासून जरा मॅच्युअर झाल्यासारखा वाटतोय..... >>> सध्या जिंकतोय ना.. हरताना टेंपरामेंट समजेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages