Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राजस्थान ने बॉलर्सवर केलेला
राजस्थान ने बॉलर्सवर केलेला खर्च सत्कारणी लागलाय. फिल्डींगवर मात्र मेहनत घ्यायला हवी. नायर आणि जैस्वाल ने सोडलेले कॅचेस इतरत्र नुकसान करू शकतात.
मुंबईने दुसर्यांदा जिंकण्याच्या स्थितीतून मॅच घालवली. तिलक वर्मा आणि किशन मस्त खेळले पण नंतर चहल - अश्विन ने मॅच फिरवली.
दव नसेल तर स्पिनर्स सॉलिड
दव नसेल तर स्पिनर्स सॉलिड सुरू होतात राव. आश्विन-चहल जबर होते आज. स्कोअरबोर्ड प्रेशर असताना क्वालिटी स्पिनर्स कसे भारी टाकतात ह्यासाठी आयपीएल आणि टी-२०चे आभार मानायलाच हवेत.
अश्विनने तिलक वर्माचा काढलेला
अश्विनने तिलक वर्माचा काढलेला बोल्ड जबरी होता!!
Spare a thought for Sanju’s
Spare a thought for Sanju’s captaincy as well. त्याने आज केलेले बॉलिंग चेंजेस स्मार्ट होते.
आजच्या दोन्ही मॅचेस smart आणि
आजच्या दोन्ही मॅचेस smart आणि experienced बॉलिंगने जिंकून दिल्या. पंड्या आणि संजूची कॅप्टन्सी सुद्धा मस्त होती.
फेफ आणि भाचा. अग्री वित यु
फेफ आणि भाचा. अग्री वित यु (एक्सेप्ट दवाचा मुद्दा कारण मला त्या बद्दल माहिती नाही).
अश्विन आणि चहलला चांगलेच वाजवले सुरवातीला पण भारी कमबॅक! अश्विनचा अनुभव अगदी फ्रंट अॅन्ड सेंटर दिसून आला त्या तिलक वर्माच्या विकेट मध्ये. काय बॉल होता बॉस! तेवढी एकच काढली त्यानी विकेट पण फार महत्वाची होती नाहीतर ज्या पेस नी तो बॅट फिरवत होता. मॅचच जिंकवली असती त्यानी. तो बॉल आधीच्या बॉल पेक्षा ५० किमि नी तरी स्लो होता असं कॉमेंटेटर म्हणाला. ते तो नवीन डेटा उपलब्ध होतोय स्पीडचा बघून म्हणाला की अंदाजाने ते माहिते नाही पण आधीच्या बॉल पेक्षा त्या बॉलचे पेस वेरियेशन आणि टप्पा केवळ अप्रतिम होता. तिलक फूल बॅट स्विंग करत रोरावत फटके मारत होता. आधीच्या बॉलला त्यानी रिवर्स स्पीप सिक्स मारला आणि ह्या बॉलनी पुर्ण बीट झाला! बॅट सपकन फिरली नुसती आणि बॉल मस्त ऑफ स्टंपचा वरचा टवका उडवून गेला!
चहलनी पण कमाल दाखवलीच. हॅटरिक थोडक्यात राहिली बिचार्याची!
बाकी गुजरात टायटन्स look like are becoming a force to reckon with. I won't be surprised if they go to the finals and even win it. बिज्जल बेबी! हियर आय कम!
आज परत एकदा जबरदस्त बॉलिंगने
आज परत एकदा जबरदस्त बॉलिंगने मॅच जिंकली.
कालच्या हायलाइट्स मधे
कालच्या हायलाइट्स मधे लिव्हिंगस्टन आणि शिवम दुबेची हाणामारी जबरी होती. विशेषतः दुबेचे शॉट्स एकदम तडाखेबंद वाटतात. लिव्हिंगस्टनने स्वतःच्या बोलिंग वर घेतलेला कॅच आणि कोणीतरी (फिल्डर आठवत नाही) आउटफील्ड मधे डाइव्ह मारून घेतलेला एक कॅच जबरी होते. त्यातही लिव्हिंगस्टनचा भन्नाट!
आमच्या इथल्या ग्रूप्स मधे चेन्नई बद्दल ट्याव ट्याव करणारे खूप पब्लिक आहे. त्यामानाने मुंबईवाले आम्ही २-३च आहोत. त्यांच्या जखमांवर मीठ चोळायला चेन्नई हरली की मजा येते. त्या नादात मग मुंबई अजून जागी झाली नाही हे विसरता येते
रुतुराजला काय झालय राव .
रुतुराजला काय झालय राव . सोन्यासारख्या संधी फुकट घालवतोय. दुसरा संजू होणार कि काय
आज सुंदर एव्हढी सुंदर बॉलिंग करत असताना त्याला का थांबवले ? निव्वळ लेफ्टी बॅट्स्ममन समोर नाही म्हणून का ? हूडा काका पण आज खतरनाक खेळलेत. बदूनी सॉलीड फाईंड आहे राव.
येस! लिविंग्स्टनका दिन था कल!
येस! लिविंग्स्टनका दिन था कल! जबरी फटके! सि एस के आता ह्यावेळी थोडी दमछाक दाखवते आहे. पार ब्रावो पर्यंत डीप लाईन आप आहे पण तरी दुबे सोडून कोणीच नाही खेळलं. खरं तर टायटन्स विरुद्ध चांगले खेळले तरी हाणलं त्यांना. सो टफ आहे ब्रॅकेट ह्यावेळी.
आयुष बदोनी बद्दल +१ असामी. सॉलिड फटाका आहे बॅटिंग त्याची. नुसता पुढचा पाय बेंड करून दांडपट्टा चालवल्यागत सपसप बॅट फिरवतो राव! काय टायमिंग असेल त्याचं? येवढंस पोरगं! रॉ टॅलेंट!
बदोनीचा कंट्रोल फारच जबरदस्त
बदोनीचा कंट्रोल फारच जबरदस्त आहे. मस्त खेळतोय.
ऋतुराज बहुदा बॅक-ट—बॅक इंज्युरी/कोव्हीड मुळे आऊट ऑफ फॉर्म असावा.
उद्या दोन रॉयल्स ची मॅच.
आयुष बदोनीचे टेंपरामेंट फार
आयुष बदोनीचे टेंपरामेंट फार ईम्प्रेसिव्ह आहे. जे तिन्ही खेळीत दिसले. जी त्याची खरी स्ट्रेंथ ठरू शकते. हा फार दुर्मिळ गुण आहे. भारत धोनीपश्चात टेंपरामेंट असलेला फिनिशर अजूनही शोधतोय. त्याने मनावर घ्यावे..
तसेच तो तिलक वर्माही पहिल्या सामन्यात दोन शॉटमध्येच ईम्प्रेसिव्ह वाटलेला. एक स्लॉग होता तर एक स्ट्रेट होता. दोन्ही शॉट कॉन्फिडंट. दुसऱ्या सामन्यात त्याने आणखी रेंज दाखवत त्याबद्दलचा अंदाज खरा ठरवला. त्याला बाद केल्यावरचे आश्विनचे भज्जीस्टाईल सेलिब्रेशन बोलके होते. मुंबईसोबत आहे म्हणजे तो नक्की ग्रूम होणार. १९ वर्षांचा आहे फक्त..
या दोघांनाही या आधी कधीच पाहिले नव्हते. पण दोघेही भारतीय संघात हजेरी लावायच्या लायकीचे प्लेअर आहेत.
ऋतुराज आपला गायकवाड आहे
ऋतुराज आपला गायकवाड आहे म्हणून मुंबईचा पॅटर्न फॉलो करतो. गेले तीन सीजन त्याच्या पहिल्या तीन ईनिंग फ्लॉप आहेत
मैदानावर दव पडत नाहीये. वा
मैदानावर दव पडत नाहीये. वा त्यावर शोधलेले ऊपाय काम करत आहेत. बॉल ओला होत नाहीये त्यामुळे गेले चार सामने छान झालेत.
चेन्नई मुंबई सुरुवातीला मागे पडले आहेत. पण पुढे आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मुसंडी मारल्यास स्पर्धा फार रोचक होऊ शकते ..
ऋतुराज आपला गायकवाड आहे
ऋतुराज आपला गायकवाड आहे म्हणून मुंबईचा पॅटर्न फॉलो करतो. >> गायकवाड महाराष्ट्राकडून रणजी खेळतो. मुंबई इंडीअयन्स नि महाराष्ट्र ह्यांचा संबंध संजू नि कन्सिस्टंसी एव्हधाच घनिष्ट आहे.
"ऋतुराज गायकवाडचे यश पाहता
"ऋतुराज गायकवाडचे यश पाहता महाराष्ट्रातील गायकवाड लोकांना चेन्नईत यश मिळण्याचा पॅटर्न दिसतो" - अशी फेबु पोस्ट मागे एकदा टाकली होती. बहुतांश लोकांना लक्षात आली नाही लिस्ट मधले तीन चार जण तर "असेल बुवा काहीतरी" असे म्हणून लाइक करून मोकळे झाले होते नंतर खुलासा केल्यावर "ओह मला समजलेच नव्हते" म्हंटले वर पुन्हा
गायकवाड महाराष्ट्राकडून रणजी
गायकवाड महाराष्ट्राकडून रणजी खेळतो >>> हो. ते माहीत आहे. मी मुंबई लिहिले ती मुंबईची रणजी टीम नाही तर मुंबई ईंडियन्सबद्दल लिहिले होते. सुरुवातीचे सामने फ्लॉप शो दाखवणे हा मुंबई ईण्डियन्सचा पॅटर्न आहे. बाकी महाराष्ट्राची दुसरी कुठली आयपीएल टीम नाही. प्रांतानुसार ती मुंबई ईंडियन्सच आहे.
<<<सुरुवातीचे सामने फ्लॉप शो
<<<सुरुवातीचे सामने फ्लॉप शो दाखवणे हा मुंबई ईण्डियन्सचा पॅटर्न आहे. >>>
अहो पण किती फ्लॉप जाणार? इतर ५ संघांचे ४ गुण झाले. मुंबईचे अजून शून्य!
सलग सुरुवातीचे पाच सामने
सलग सुरुवातीचे पाच सामने हरूनही मुंबईने कमबॅक केलेले. आता दहा संघ असल्याने कमबॅक लवकर करावा लागणार. तरी दोन तीन सामने हरल्याने कोणी स्पर्धेतून बाहेरही फेकले जात नाही. तो सुर्या परत यायला हवा. मुंबईला होम ॲडवांटेज तेव्हाच वाटेल जेव्हा त्यांची दरवर्षीची कोअर टीम खेळत असेल.
“ मुंबई इंडीअयन्स नि
“ मुंबई इंडीअयन्स नि महाराष्ट्र ह्यांचा संबंध संजू नि कन्सिस्टंसी एव्हधाच घनिष्ट आहे.” -
“ लिस्ट मधले तीन चार जण तर "असेल बुवा काहीतरी" असे म्हणून लाइक करून मोकळे झाले होते” - क्लासिक फेसबुक
फा
फा
रस्सी वॅन डर ड्युसेन किंवा
रस्सी वॅन डर ड्युसेन किंवा निशमपेक्षा रियान पराग कसा काय better choice आहे हे राजस्थान रॉयल्सच्या थिंक टँकलाच माहित.
आज राजस्थान गोते खातंय. आरसीबी नी मस्त बॉलिंग केलीय.
व्हय! चांगलच दाबून धरलय.
व्हय! चांगलच दाबून धरलय. हेटमायर आणि बटलर दोघंही अक्षरशः पाऊस पाडू शकतात चौके, छक्क्यांचा. १२७ - १८ ओवर म्हणजे फारच किरकोळ झाला.
हे भगवान! कैच्या कै हाणले की!
थर्ड अंपायरनी चुकीचा नो बॉल दिला राव! कुछ भी चल रा! ७ रन एक्स्ट्रा गेले त्या चुकीमुळे.
बटलर ने आज एकही फोर मारला
बटलर ने आज एकही फोर मारला नाहिये संजूने आजही निराशा केली नाही म्हणून बरे वाटले फेफ
रस्सी वॅन डर ड्युसेन किंवा निशमपेक्षा रियान पराग कसा काय better choice आहे हे राजस्थान रॉयल्सच्या थिंक टँकलाच माहित. >>
>>रस्सी वॅन डर ड्युसेन किंवा
>>रस्सी वॅन डर ड्युसेन किंवा निशमपेक्षा रियान पराग कसा काय better choice आहे हे राजस्थान रॉयल्सच्या थिंक टँकलाच माहित.
Winning Combination
हे आताच ग्रूपवर एकाने शेअर
हे आताच ग्रूपवर एकाने शेअर केले.
Jimmy Neesham is benched for a guy coming at No.6 ,who avgs 16 and SR 119 ..I know Parag is a social media superstar but thats just not good enough - Simon Doul
“ संजूने आजही निराशा केली
“ संजूने आजही निराशा केली नाही म्हणून बरे वाटले” - हो ना.
पण आज किपींगमधे कोहलीचा रन-आऊट (संजूचा ब्रिलियन्स आणि विलीचं ब्रेन-फ्रीझ) आणि रावतचा कॅच मस्त होता. मागच्या वर्षीपेक्षा यंदा कॅप्टन्सीत सुद्धा गेम अवेअरनेस, नियंत्रण जास्त दिसतंय.
“ Winning Combination” - बरोबर आहे स्वरूप. पण परागचं त्या विजयात काही काँट्रिब्युशन नव्हतं.
शाहबाझ आणि कार्थिक काढतायत आज मॅच.
कार्थिक काय खेळलाय राव .....
कार्थिक काय खेळलाय राव ....... मजा आली एकदम.
एक चहल असताना सोबत आश्विनसाठी
एक चहल असताना सोबत आश्विनसाठी सुद्धा जागा बनवणे अवघड आहे. आश्विन कसोटीत लिजंड असला तरी या फॉर्मेटमध्ये तितका घातक नाही. पण हे दोघे असल्याने फलंदाजीतली डेप्थ मात्र मरतेय राजस्थानची. आज त्याचाच फटका बसला. बटलर हेटमायर असूनही धावगती मंदावलेली कारण मागे कोणी नाही.
@ डीके, हा पुन्हा वर्ल्डकपचे तिकीट मिळवतो का हे बघणे रोचक. तो तरी त्या निर्धारानेच ऊतरलाय जणू. अर्थात त्यासाठी त्याला मालिकेत अगदीच ऊठून दिसावे लागेल. तरी फिनिशरच्या भुमिकेत सातत्य दाखवू लागला तर सिलेक्टर्सची डोकेदुखी वाढवणार हा..
पण परागचं त्या विजयात काही
पण परागचं त्या विजयात काही काँट्रिब्युशन नव्हतं. >>>> माझं काँट्रिब्युशन असलं तर ते फक्त मुंबईच्या विजयात असतं.
Pages