Submitted by निर्देश on 28 March, 2022 - 14:52
जून मध्ये कर्नाटक मधील प्रेक्षणीय स्थळे (बंगळुरू , मैसूर , हंपी , उडुपी , मुरुडेश्वर इत्यादी ) पाहण्याचा विचार आहे. तेथील टुर ऑपरेटर अथवा ड्राइव्हर चा रेफरंस / रेकमेंडेशन असल्यास कृपया मेसेज करून कळवाल का. धन्यवाद.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रकाश ९८४५०९४९०१ एक्सलंट
प्रकाश
९८४५०९४९०१
एक्सलंट
http://sumantravelsmanipal
http://sumantravelsmanipal.com/
माझा अनुभव function at() {
माझा अनुभव function at() { [native code] }त्युत्कृष्ट आहे
कुठून येणार आणि किती दिवस हे
कुठून येणार आणि किती दिवस हे नक्की करा. मग प्रकारची स्थळे - धार्मिक, समुद्र किनारे, अभयारण्ये, ट्रेकिंग हिल स्टेशन्स. त्यानंतर एकेक भाग घ्या म्हणजे बेंगळुरूजवळ, मैसूरजवळ,कारवार/ मंगळुरू जवळ. इत्यादी. टुअरवाले जिथून सुरू करतात परत तिथेच आणून सोडतात.
स्वत:च रेल्वे / बसने जाणे हा वेगळा प्रकार आहे तो मी करतो. परंतू टुअरवाल्यांची पत्रके माझ्याकडे आहेत. त्यांच्या आराखड्यांत फारसा फरक होत नाही पण रेटस वाढलेले असतात. पुण्यातील एक कंपनी तुम्ही दिलेली ठिकाणं पंधरा दिवसांत ऐंशी हजारात करवते. दोन वर्षांपूर्वीचा रेट आहे.
बाकी वल्ड ट्रेड सेंटर ( रविवारी बंद) मुंबई येथे कर्नाटक टुअरिझमचे कार्यालय आहे तिथे दिलेली ठिकाणे दाखवल्यास ट्रिप प्लान करून देतात. किंवा रेडी प्लानही नकाशांसह मिळतात. थोडी कल्पना येईल दिवस आणि खर्चाची. सध्या दिवसालाला तीन चार हजार रु प्रत्येकी पडतात. शिवाय काही कोरोना प्रतिबंध असल्यासही कळतील.
http://www.ancient-trails.com
http://www.ancient-trails.com/ - हे खूपच छान trip organize करतात. एक indologist असतो गाईड म्हणून.
I highly recommend this.
http://www.ancient-trails.com
http://www.ancient-trails.com/ साइटवर.पेमेंट गेटवे क्यूआर कोड टाकला आहे पण साईट https secure केली नाही.
लगे हाथ गोकर्ण पण करा नी इथे
लगे हाथ गोकर्ण पण करा नी इथे त्या ट्रिपचा सचित्र वृतांत द्या. तुम्हाला प्रवासासाठी अनेक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद रेव्यु, srd
खूप खूप धन्यवाद रेव्यु, srd,अनघा, रश्मी.
बंगळुरू - मैसूर - नागरहोळे - बेलूर - हळेबिडू - उडुपी -मुर्डेश्वर - गोकर्ण - बदामी - हंपी - बंगळुरू असा १० दिवसाचा प्लॅन आहे. जर खूपच धावपळ होणार असेल तर काही ठिकाणे कमी करावी लागतील. शिवाय जून / जुलै मध्ये पाऊस देखील सोबतीला असेल. तोही विचार करावा लागेल.
१] मुर्डेश्वर (रेल्वेने) -
१] मुर्डेश्वर (रेल्वेने) - गोकर्ण(१) -सिरसी (१) - बनवासी -कुमठा(रेल्वेने परत)
२] उडुपी - श्रिंगेरी (१) - चिकमगळुरु (१) - बेलवडी-हळेबाडु - बेलूर, चिकमगळुरु (+२) -बाबा बुदनगिरी, झरी फाल्स,मुलयनगिरी,होन्नेमारा,माणिक्यदारा फाल्स. - कडूरु स्टेशन (रेल्वेने परत).
३] बिजापुरा(रेल्वेने) (१) गोलगुंबज, तोफ आणि दोन ठिकाणं . - बदामि (१) लेणी, तलाव, शाकांबरी. बदामी (+२) ऐहोळे पूर्ण, पट्टडकलु. होस्पेटे (१) हंपी होस्पेटे (२) हंपी . लखुंडी - हुब्बळी ( (रेल्वेने परत)
हे प्लान केले आहेत स्वत:च. दगदग न होता शांतपणे ठिकाणं पाहता येतात. तीन वेगळे करा किंवा जोडून करा. स्थानिक प्रवासासाठी एसटी, टाक्सी , हाफ/फुल डे टुअर असतात.
बेंगळुरु - मैसरु - उटी सहा दिवसांचा प्लान आहे. चौधरी यात्राचा स्वस्तात असतो. किंवा स्वत:ही करू शकता. भरपूर पर्याय आहेत.
धन्यवाद srd. वेगवेगळ्या ६-७
धन्यवाद srd. वेगवेगळ्या ६-७ दिवसांच्या ट्रिप ची कल्पना आवडली.
माझा पण प्लॅन आहे बंगलोर
माझा पण प्लॅन आहे बंगलोर म्हैसूर आणि उटी.. २० मे च फ्लाईट चे तिकीट काढलंय. २२ ला एक मुंज आहे ती अटेंड करणार आणि २९ ला परत येणार.. माझ्या बरोबर माझी आई आहे ८० ची तिला घेऊन कसे काय जमवायचे म्हैसूर उटी ते कळत नाही. तिला कुणाकडे ठेवून पण जाऊ शकत नाही.., ती हि येते म्हणतेय पण तिला तीन तास एका जागी बसवेल का ते कळत नाही.. गेलो तर मज्जा खूप येईल.. आई आणि आम्ही असे ५ जण आहोत..
मैसुर-उटी मैसुर -एक दिवसात
मैसुर-उटी मैसुर -एक दिवसात नेऊन आणतात . स्वराज माझदा २३/१९ सीटर बसेस असतात. बसमध्ये पाय मोकळे सोडून चांगले बसता येतं. सीट्स चांगल्या असतात. ( मोठ्या बसेस लांबच्या रोडने जातात. सहा तास लागतात. त्याने जाऊ नका.) शॉर्टकट अडीच तासांचा आहे. येताना पाच वाजता बांदिपूरमधल्या रस्त्यावर खूप प्राणी दिसतात आयतेच. (काळा वाघ सोडून.) थंड वातावरणामुळे थकवा येत नाही. अवश्य न्या आइला.
उटी गार्डन आणि तलाव हे महत्त्वाचे तेच दाखवतात. बराच वेळ मिळतो.
उटी मस्त आहे. आम्ही आधी
उटी मस्त आहे. आम्ही आधी बंगलोर मग मैसूर आणि शेवटी उटीला गेलो होतो. उटीला 4 दिवस राहिलो. अगदी आवश्यक असा ब्रेक मिळाला. मस्त हवा आणि वाफाळत्या इडल्या, फिल्टर कॉफी.कोईमतूरहुन परत.
पुढील वेळी फक्त उटीला जाऊन यावे वाटतंय.
धन्यवाद srd .. आम्ही परतीचे
धन्यवाद srd .. आम्ही परतीचे तिकीट नाही काढलंय तर असे वाटतंय कि पुन्हा बंगलोरला येण्यापेक्षा उटीवरून किंवा म्हैसूर जो जवळचा एअरपोर्ट असेल तिकडून पुन्हा मुंबईला यावे..
श्रवू, उटीपासून कोईमतूर
श्रवू, उटीपासून कोईमतूर एअरपोर्ट जवळ आहे.
मैसुरूवरून बेंगळुरू 150km.
मैसुरूवरून बेंगळुरू 150km.
पण मैसुरूवरून बरेच पर्याय आहेत.
वेळ आणि दिवस असल्यास
१.)मैसुरू ते माडिकेरी (118km), माडिकेरी ते मंगळूरू (138km). मंगळूरू एरपोर्ट.
किंवा२.) मैसुरू ते कालपेटा(138km) म्हणजेच वायनाड. कालपेटा ते कोझिकोड (72 km). तिथून रेल्वे किंवा नवा एरपोर्ट.
किंवा ३.) मैसुरू ते हसन (150km). हळेबिडु बेलूर(30km) पाहून रेल्वेने परत.
माडिकेरी आणि वायनाड अशी आणखी दोन हिल स्टेशनस आहेत. यापैकी एक वरवर पाहून होईल.. पश्चिम घाट पाहता येतील. आणि कोझिकोड ( कालिकत / मलबार) हे वेगळे मलबारी पदार्थांचे ठिकाण. केरळ ट्रिपात हे नेहमीच गाळतात.
सुप्रभात
माझे मडिकेरी कूर्ग झालंय.. हसन श्रवणबेलोगोळ पण झालंय.. ( हसन तो मंगलोर रस्ता भयंकर खराब आहे.. मी २०१९ मध्ये गेले होते.)
"च्या" तुम्ही उडुपी गेलात तर,
"च्या" तुम्ही उडुपी गेलात तर, जयलक्ष्मी सिल्क उद्यावर ला जा.. सुंदर आणि स्वस्त साड्या मिळतात.. खास साड्या घेण्यासाठी आम्ही गेलो होते.. उडुपी कृष्णमठ केल्यानंतर..
यूट्यूब चानेल Not in office
यूट्यूब चानेल Not in office पाहिल्यास त्या भागातील २०२१ मधील रस्त्यांची कल्पना येईल. ( कन्नडा, इंग्रजी सबटाइटल्स.) comment box मध्ये प्रश्न वाचारू शकता.
/उडुपी गेलात तर, जयलक्ष्मी
/उडुपी गेलात तर, जयलक्ष्मी सिल्क/ नोंद घेतली आहे.
/उडुपी गेलात तर, जयलक्ष्मी
डबल पोस्ट.
धन्यवाद श्रवु .
धन्यवाद श्रवु .