Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
![आयपीएल](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/03/26/images.jpeg)
आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हुडा आणि बदोनीने मस्त ओढला
हुडा आणि बदोनीने मस्त ओढला स्कोअर.... मॅचमध्ये जरा जीव आला!!
अरे लखनौच्या जर्सीचा कलर एकदम
अरे लखनौच्या जर्सीचा कलर एकदम झटॅंग आहे >>> हो !
तो रंग क्रिकेटच्या जर्सीचा वाटतच नाहीये. पण तरीही मला दोन्ही लखनौ आणि गुजराथ दोन्हीच्या जर्सी आवडल्या. भारी आहेत.
एकूण दव हाच सगळ्यात मोठा फॅक्टर ठरणार असं दिसतय ह्या स्पर्धेत.
गुजरात पेट्रोलपंपवाले वाटतायत
गुजरात पेट्रोलपंपवाले वाटतायत
यलो सारखा कॅची कलर कुणी कसा घेतला नाही अजुनपर्यत??![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पिवळा तर चेन्नईवाल्यांचा ना?
पिवळा तर चेन्नईवाल्यांचा ना?
खेडेगावातल्या घरांना जुन्या काळी डिस्टेंपर द्यायचे त्या कलरची आठवण आली लखनौची जर्सी बघून!! >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अरे हो.... चेन्नई पिवळा आहे
अरे हो.... चेन्नई पिवळा आहे नाही का!! असे कसे विसरलो मी?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
आयपीएल फॅक्ट्स
आयपीएल फॅक्ट्स
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्रीक अशी कामगिरी असणारा एकमेव खेळाडू कोण?
तोच, गेल्या ९ मध्ये सर्वाधिक ५ आयपीएल ट्रॉफी मिळवणारा ..
रोहीत शर्मा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनने
ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनने वात आणला राव. >> इतकी वर्षे विलो वर असत तेंव्हा मधल्या ब्रेक मधे काहीही दाखवत नसत,. आता हुलूवर कसल्या तरी धतिंग अॅड्स दाखवतात नि काव आणतात.
अय्यर ची कॅप्टन्सी एकदम काटेकोर होती काल. राहुल ने आज तो क्प्तान का नको कि परत सिद्ध केले. तुमचा बेस्ट बॉलर तीन ओव्हर्स टाकतो फक्त ?
मुंबई चा आर्चर वाला घेतलेला जुगार महाग पडणार असे वाटते आहे. सॅम्स काय किंवा उरलेले पर्याय काय - कोणिच प्रॉमिसींग वाटत नाही. शेवटि आपला उनाडकट बरा असे होणार. तो पोलार्ड बॉलिंग टाकत असे ह्याची आठवण जयवर्धणे नि शर्मा ला कोणी करून देत का नाही ?
मुंबई प्रॉमिसिंग लोकच घेतात
मुंबई प्रॉमिसिंग लोकच घेतात पण त्यांचं प्रॉमिस डिलीव्हर ग्रूम केल्यावरच होतं. बुमरा २०१२च्या आसपास मार खात होता, तो आता टॉप झाला. किशन, स्काय इ. तसेच. ह्या ग्रुपलाही वेळ लागणार. माझ्या मते मुंबई हे वर्ष आर्चरशिवाय गाजराची पुंगी म्हणूनच खेळणार.
मुंबई चा आर्चर वाला घेतलेला
मुंबई चा आर्चर वाला घेतलेला जुगार महाग पडणार असे वाटते आहे
>>>
मुंबई थिंक टॅंक जुगार खेळते असे वाटत नाही कधी. लाँग टर्म प्लानिंग आहे आर्चर. ईथून बरीच वर्षे तो मुंबईसोबत राहील. तसेच त्याला बारा तेरा कोटी मोजूनही घेतला नाहीये. आठ साडेआठला मिळाला ना काहीतरी. दहा टीम झाल्याने प्रत्येक टीममध्ये आधीच्या तुलनेत वीकनेस आला आहे. सुरुवातीच्या फॉर्मवर कुठली टीम जोखायला नको ईतक्यात..
मुंबई प्रॉमिसिंग लोकच घेतात
मुंबई प्रॉमिसिंग लोकच घेतात >> काय राव ! हे सगळ्याच टीम ना लागू होत नाही का ? कोणी 'अमका फेल जाणार आहे, त्याला घेऊया' असे प्लॅनिंग करून घेत नसणारच ना. कोणतीही टीम कंपोसिशनचा विचार करून संघ निवडत असावी असे मी समजतो ( काही अपवाद वगळता). उपलब्ध फंडमधे त्यात उदयोन्मुख नि प्रस्थापित ह्यांचे मिक्स नीट जमते ती टीम सेटल होते नि जिंकते. गेल्या दोन - तीन वर्षांमधली मुंबई ची तीच टीम गेल्या वर्षी फ्लॉप गेली नि जवळजवळ तीच टिम घेऊन दिल्ली जवळजवळ जिंकली होती. ह्यावेळच्या ग्रूप मधे नीट बघितलेस तर "बाहेरचा फास्ट बॉलर" हा मुख्य बॅकप नाही हा मुख्य फरक आहे. आर्चर असला तरी सॅम किंवा मेरेडिथ नि मिल्स हे भारतीय पिचेस वर कितपत ईफेक्टीव्ह ठरतील ह्याबद्दल मला शंका आहे. जसा आज पावेतो असत आला आहे तसा मेन पेसर ना ( बुमरा नि आर्चर ) दर्जेदार बॅकप नाही हा मुद्दा होता.
काय राव ! हे सगळ्याच टीम ना
काय राव ! हे सगळ्याच टीम ना लागू होत नाही का ? >> नाही!? चेन्नई जुन्या टेस्टेड प्लेयर्सवर भर देतात. ग्रुमिंगवर फार जोर देत नाहीत. बंगलोर, पंजाब इ. टीम्सनी मुंबईच्या दीडपट आणि चेन्नईच्या दुप्पट प्लेयर्स खेळवले आहेत सर्चिंग फॉर इल्युसिव्ह विन. तेही अशी लॉंग टर्म फिलॉसॉफी घेऊन बसत नाहीत.
मेन पेसर ना ( बुमरा नि आर्चर ) दर्जेदार बॅकप नाही >> एक-दोन वर्षांत होतील तयार तेच लोक. एखादा ह्यावर्षीच झाला तर, हा त्यांचा गॅम्बल आहे आर्चरमुळे. दे हॅव टेकन अ पंट कीपिंग लॉंग टर्म इन माईंड.
कोणी 'अमका फेल जाणार आहे, त्याला घेऊया' असे प्लॅनिंग करून घेत नसणारच ना. >> इकडे फिक्सिंगच्या वादांमध्ये कमी घुसत जा बाबा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"आता हुलूवर कसल्या तरी धतिंग
"आता हुलूवर कसल्या तरी धतिंग अॅड्स दाखवतात नि काव आणतात." - हुलूवर दाखवतायत हेच माहित नव्हतं. ESPN+ वर बघतोय मी. इतका त्रास नाही वाटला अॅड्स चा.
आज राजस्थान (स्वरूप!) वि. हैद्राबाद. संजूची १०० वी मॅच आहे रॉयल्स कडून. यंदा तरी ह्या दोन्ही टीम्स चांगली लढत देतील अशी अपेक्षा आहे. टीम्स ऑन-पेपर तरी चांगल्या आहेत.
ESPN+ वर बघतोय मी. इतका त्रास
ESPN+ वर बघतोय मी. इतका त्रास नाही वाटला अॅड्स चा. >>हो रे. इथे स्विच होतो.
इकडे फिक्सिंगच्या वादांमध्ये कमी घुसत जा बाबा. Happy >> आपण ठरवून काय होतय बाबा. सगळे जगच फिक्स्ड आहे असे कॉनी तरी म्हणून गेलय ना.
तेही अशी लॉंग टर्म फिलॉसॉफी घेऊन बसत नाहीत >> अरे अशी उदाहरणे बघितलीस तर प्रत्येक टीम मधे मिळतात रे - जिथे नवोदित किंवा उदयोन्मुख प्लेयर्स घेऊन त्यांना २-३ सीझन संधी देऊन पाहिली आहे. कलकत्ता मावी, नागरकोटी, गिल ह्यांना खेळवत होते. इंजड असताना कॅरी करून गेले. अय्यर नि वरूण ला उचलून आणले. चेन्नई ने पड्डीकल नि चहर ला उचलले. कमी जात होत असणार पण ग्रूमिंग करण्याभर नसेल असे वाटत नाही. " एखादा ह्यावर्षीच झाला तर, हा त्यांचा गॅम्बल आहे आर्चरमुळे" हे तर मान्य आहेच पण उचललेले प्लेयर्स तशा क्वालीटीचे वाटले नाहित. शेवटीउथंपी नि उन्नडकट वर येणार असे वाटतेय. बघूया.
आज संजू ने परत 'हा असा नेहमी का खेळत नाही ?" हा कपालबडवती योग परत आणलाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"आज संजू ने परत 'हा असा नेहमी
"आज संजू ने परत 'हा असा नेहमी का खेळत नाही ?" हा कपालबडवी योग परत आणलाय" - सिरियसली!! (आत्ता आऊट झाला
)
हे क्लासिक प्लेयर्स पाहून नेहमीच असं वाटत रहातं की (क्रिकेटसाठी) हे यशस्वी व्हावेत, दीर्घ काळ खेळावेत... संजू, भुवनेश, रहाणे अशी मोठी लिस्ट आहे.
सिरियसली!! (आत्ता आऊट झाला
सिरियसली!! (आत्ता आऊट झाला Sad ) >> एकदमच. नेकी और पूछ्पूछ.
फेफ - मीही इएसपीएन वरच पाहतो.
फेफ - मीही इएसपीएन वरच पाहतो. हुलूवर एकतर सापडत नाहीत पटकन.
कालचे हायलाइट्स पाहिले. एक दोन मिसफिल्ड्स अक्षरशः ठरवून केल्यासारख्या वाटल्या. तेवातिया ची बॅटिंग जबरी होती. आधी त्या हुडाचीही.
कालची बोल्ट आणि त्या कृष्णन
कालची बोल्ट आणि त्या कृष्णन ची बोलिंग काय जबरी होती. विशेषतः बोल्ट! काय नाचवत होता बॅट्समन ला. इव्हन शेवटच्या ओव्हर्स मधेही मस्त टाकली त्याने.
बाय द वे - केन विल्यमसन क्लिअरली आउट नव्हता. रिप्ले बघूनसुद्धा कसा काय आउट दिला माहीत नाही.
कृष्णन >र्स+१ ... कृष्णा
कृष्णन >र्स+१ ... कृष्णा रे. शमीची आदल्या दिवशी पण जबरदस्त बॉलिंग होती. सुरुवातीची षटके एकंडर फास्ट बोलर्सची दिसतात.
केन विल्यमसन क्लिअरली आउट नव्हता >> हो तो विचित्र प्रकार होता.
कृष्णा रे >> ओह. मी विसरलो
कृष्णा रे >> ओह. मी विसरलो होतो नाव नक्की काय होते.
ओपनर शून्यावर बाद होणे हे या वर्षी खूप कॉमन दिसते. कालही एकजण झाला होता पण नो बॉल होता. त्यामुळे सुरूवातीची षटके बोलरची दिसतात हे खरे.
छान झाली आजची मॅच, या
छान झाली आजची मॅच, या आयपीएलची पहिली जी बघायला मजा आली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अय्यरने छान कप्तानी केली. पण
अय्यरने छान कप्तानी केली. पण एक चूक केली. तीच महागात पडली. लास्ट दोन ओवरसाठी तुम्ही पुर्ण सामन्यात बॉलिंग न टाकलेला व्यंकटेश अय्यर आणि आज धुलाई झालेला रसेल यांना एकत्र ठेऊ शकत नाही. कुठेतरी एक ओवर काढायला हवी होती आधीच.
आज मस्त झाली मॅच. लो
आज मस्त झाली मॅच. लो-स्कोअरिंग मॅचेस खूप जास्त टेन्स होतात. तो एक शेवटचा थ्रो चुकला नसता तर पारडं परत केकेआरकडे झुकलं असतं.
यंदा राजस्थानने चक्क पैसे खर्च करून तगडे बॉलर्स घेतले आहेत आणि त्याचा फायदा त्यांना पहिल्याच मॅचला झाला.
सगळे बॉलर झोडपले जाताहेत. एक
सगळे बॉलर झोडपले जाताहेत. एक रवी बिश्नोईसमोर फलंदाज क्ल्यूलेस दिसत आहेत. हा येत्या २०-२० वर्ल्डकप स्क्वाडमध्ये चहल, जडेजासोबत दिसू शकतो. फॉर्म कायम ठेवायला हवा याने
मॅच लाईव बघणं होत नाही
मॅच लाईव बघणं होत नाही त्यामुळे हायलाईट्सच बघतो. मजा येतेय पण. काल लखनौ आणि गुजरातची मॅच बघितली. सॉलिड फटकेबाजी! आधी हूडा आणि बडोनी अन नंतर वेड, पंड्या, मिलर आणि टेवाटिया! (रिवर्स स्वीप सिक्स
)
एक त्या हार्दिक पंड्यानी पण अक्षर्शः तोंडावर आलेला बॉल डक करतोय असं वाटतं आपल्याला तर भौ नी फोर मार्ली! काय नजर आहे बॉल वर! अन बॉल पण फार हळू वगैरे नाहीच. तरीही!
त्या बडोनीचा बॅटस्पीड तर अचाट आहे. येवढासा पोर्या वाटतो अन शॉट काय लावले! जब्री! तो टेवाटिया पण अगदी साध्या शरिरयष्टीचा आहे. थोडी तब्येत सुधारलीये आता पण तरी येवढे तडाखे लावेल असं वाटत नाही बघून.
ती २४ मंत्रा ऑर्गॅनिक हे नाव आणि जाहिरात दोन्ही अत्यंत अनॉयिंग आहेत. घरके खाने के नाम पे अपने बच्चे को कुछ भी खिला रहे हो क्या? एक कानाखाली द्यावीशी वाटते त्या माणसाच्या अन डायलॉग लिहिणार्याच्या. येडxxxxx! प्रॉडक्ट विकतोयस की शहापण शिकवतोय्स?
आयुश बदोनी.. नाम याद रखना
आयुश बदोनी.. नाम याद रखना पडेगा
दोन मॅच दोन वेगळ्या सिच्युएशन.. दोन्हीत फलंदाजी आणि टेंपरामेंट एकत्र दाखवत मन जिंकले.
भन्नाट झालेली दिसते मॅच.
भन्नाट झालेली दिसते मॅच.
चेन्नई पहिल्यांदा आयपीएलचे
चेन्नई पहिल्यांदा आयपीएलचे पहिले दोन सामने हरली आहे.
अरे बापरे! मी आता बघितला
अरे बापरे! मी आता बघितला स्कोअर! बघायलाच पाहिजे आता.
शेवटच्या ४ ओव्हर्स पाहिल्या!
शेवटच्या ४ ओव्हर्स पाहिल्या! जबर चेस झाली! भन्नाट!
जबरी मॅच होती. इएसपीएनचे
जबरी मॅच होती. इएसपीएनचे हायलाइट्स बर्यापैकी बिनडोक आहेत. १५ मिनीटाची टोटल क्लिप. सगळा भर फक्त सगळे फोर्स, सिक्सेस आणि विकेट्स दाखवण्यावर. मधेच जमले तर एखादा ड्रॉप, मिसफिल्ड दाखवतात. पण मॅचचा ड्रामा नीट कळत नाही.
कालचे उथापा चे एक दोन शॉट्स एकदम "मॅजेस्टिक" होते. साहेबांची आठवण करून देणारे. विशेषतः एक कव्हर ड्राइव्ह. वेगात येणार्या बॉलला एका आर्क मधून सरळ खाली येणारी बॅट भिडते. काहीही तोडफोड शॉट वगैरे वाटत नाही, पण बॉल दोन फिल्डर्सच्या मधून सुसाटत निघून जातो!
एक पॅटर्न दिसू लागला आहे - नक्की कोणत्या ग्राउण्डवर हे जास्त होत आहे माहीत नाही, पण बाउण्ड्रीजवळ खूप अन-इव्हन जागा आहेत - बॉल एकदम दिशा बदलतो व फिल्डर टोटल हुकतो. कधी कधी बॅट रोल केलेली असेल बॉलवर तर जमिनीवर पडल्यावर बॉल वळतो व फिल्डर गंडतो - हे तसे वाटले नाही.
बाकी बाउण्ड्रीवर बॉल अडवलाय असे फार क्वचित दिसत आहे - फिल्डर पोहोचतो, अनेकदा अडवल्यासारखे करतो पण बॉल तरीही पुढे जातो. परवाच्या एका मॅच मधे रन आउट च्या वेळेला बोलरच्या हातात आलेला बॉल त्याने वेळेवर स्टंपवर मारलाच नाही (आरसीबीची गेम बहुधा). असे काही संशयास्पद वाटणारे सीन्स आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages