पठाण - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 March, 2022 - 13:59

पठाण - शाहरूख खान

हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था

यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था

अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !

तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..

(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )

और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है

और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये

जल्द ही मिलते है.....

पठाण से !!!!

............

हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्‍यांना चोख उत्तर द्यायला येतोय Happy

पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत Happy
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो Happy

पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उनबिलीवेबल म्हाळसा.. तो अखाच्या अख्खा खरा शाहरूख आहे की खालून जॉनची बॉडी जोडून कोलाज केलेय? पोट आहे की पावाची लादी?

फर्स्ट डे बघणार पठाण... मोस्ट अवेटेड मूवी आहे... दीपिका आणि जॉन पण आहेत...

आणि धागा काढायचे मनावर घेतले म्हणून आभार.. मी आणि म्हाळसा चिकवा वर पठाण बद्धलच चर्चा करत होतो...

मी आणि म्हाळसा चिकवा वर पठाण बद्धलच चर्चा करत होतो...
>>>>
म्हणूनच काढला.. चिकवाला शाहरूख आणि पठाणने हायजॅक करायला नको होते..

मोस्ट अवेटेड आहे, पण दूर आहे अजून डेट

अजून एक वर्ष आहे
>>>>
असेना..
बाळाची गोड बातमी नऊ महिने आधी मिळते. घरात आनंदाचे वातावरण तेव्हापासूनच निर्माण होते. तसेच आहे हे Happy

ऋन्म्या, शारुखच्या झिरोच्या वेळेला सुद्धा तु खूप उड्या मारल्या होत्यास. त्या सिनेमा प्रमाणेच हा देखील जिंक्स्ड होणार... Wink

धोनीने आपल्याला सर्व आयसीसी चषक, सर्वाधिक वर्ल्डकप जिंकवून दिले, कित्येक सामने जिंकवून दिले... पण त्याचवेळी काही हरलोही. आपण तेच चर्चेला घेतले आणि हे विसरून गेलो की जे त्याने जिंकवून दिलेय ते आजवर कोणालाच जमले नाही तर कसे चालेल. तसेच शाहरूखने आणि त्याच्या चित्रपटांनीच आपल्याला आजवर सर्वाधिक आनंद मिळवून दिलाय हे विसरून त्याचे अपयशीच चित्रपटच चर्चेला घ्याल तर कसे चालेल.. Happy

छान !
आम्हीही पठाण मुव्हीची खूप आतुरतेने वाट पाहतोय .
यु ट्यूब किंवा टेलिग्राम वर Happy

रमेशमामा,
थिएटरच्या मोठ्या स्क्रीनवर बघा, टीव्हीच्या छोट्या स्क्रीनवर बघा, मोबाईलच्या छोट्याश्या चौकटीत बघा.. पण बघा. ते महत्वाचे. खुशीया जगह और वक्त देख के नही आती Happy

च्रप्स भन्नाट आयड्या आहे. मायबोलीवर आजवर असा चित्रपट गटग झाला नसेल. चित्रपटही योग्य कलाकाराचा आहे. ज्याने तीन पिढ्यांनी एकत्र बघून आवडीने बघावे असे चित्रपट दिलेत.
चित्रपट संपल्यावर सगळे जण तिथेच फूडकोर्टमध्ये एकत्र खात पित चित्रपट कसा वाटला यावर चर्चाही करूया. त्या वृत्तांताचा धागा मी काढणार. आधीच रुमाल टाकून बूक करतो.

म्हातारपण म्हणजे काय असे वेगळ्या धाग्याचे पोटेन्शियल आहे...
मला प्रत्येक हिरोईन जिने 35 पार केले ती म्हातारी वाटते...

सामो अगं तो ५६ वर्षांचा असूनही असा दिसतोय..कम्मॅान यार
>>>>

अगदी हेच बोलणार होतो.
तसेच तो कधीही जॉन सलमान अक्षय यांच्यासारखा ॲक्शन हिरो नव्हता, मार्शल आर्ट शिकून, जिममध्ये घाम गाळून. बॉडी बनवून, शर्ट काढून ती दाखवणे हा कधी त्याचा पिंड नव्हता. तो किंग ऑफ रोमान्स होता. तो लव्हस्टोरी करायचा, फॅमिली ड्रामा करायचा, त्या जीवावर सुपर्रस्टार बनला. त्याच्या चित्रपटात त्याच्या फिजिकवर कधी फोकस नसायचा, त्यावर त्याचे दुकान नव्हते. आजवर त्याला त्यावर मेहनत घ्यायची काही गरज नव्हती. तरीही आज ५६ व्या वर्षी तो ती मेहनत घेतोय. आणि ती ईन्स्पिरेशनल आहे Happy

अरे चाळीस च्या पूढे सगळेच म्हातारे.. वाईट वाटून कशाला घेताय म्हाळसा आणि ऋन्मेष...
एज फकस्त एक नंबर आहे... रजनी ला बघा...

शाहरूखने आणि त्याच्या चित्रपटांनीच आपल्याला आजवर सर्वाधिक आनंद मिळवून दिलाय>> आणि बाकीच्यांचे पिक्चर पाहुन काय दुख झाले काय?
सगळ्यांना एका कॅटेगिरीत नका ना घेऊ सर.
कोणाला मिथुन, गोविंदा, सनीच्या पिक्चरनेही आनंद मिळत असेल.

Pages