शॉपिंग मॉल्स मध्ये होणारे बदल!

Submitted by यक्ष on 8 March, 2022 - 03:14

काल एका मोठ्ठ्या रिलायंस शॉपिंग मॉल मध्ये वेळ घालवायचा म्हणून सहज चक्कर टाकली.

काही वर्षापूर्वी हा मॉल जेंव्हा दिमाखात सुरु झाला होता व मी रांगेत लागून हा मॉल पाहीला होता, तेंव्हा एक फार मोठा बदल होतोय असे वाटले होते....ह्यानी छोटे / मध्यम उद्योग बंद पडून ह्या मॉल्स चीच चलाती राहील असे एकवेळ वाटले.

पण भारतीय ग्राहकाविषयी (मी धरून - कारण मी सुरुवातीला बिग बझार मधून अवास्तव आणी तद्दन खरेदी करून नंतर पस्तावलो होतो व एक चांगलाच धडा शिकलो होतो. मग नंतर मॉल हे वेळ घालवण्याचे साधन असे ठरवले) बर्‍यापैकी कल्पना असल्याने असे काही होण्याची शक्यता कमी आहे असेही वाटले होते.

काल बहुधा सुटीचा दिवस नसल्याने काहीच गर्दी नव्हती आणी स्टाफ निवांत होता... आतील डिपार्ट्मेण्ट मध्ये लक्षणीय बदल झाला होता.....खाण्याचे (माझे आवडते काम) स्टॉल्स नामशेष झाले होते. सुरवातीचा दिमाख दिसेनासा झालेला वाटला. सुरुवातीला टायर्स वगैरे पण मिळायचे (मी कार टायर्स घेतले होते व बसवून पण मिळाले होते) ते केंव्हाच गायब झाले होते. सुरुवातीची व्हरायटी / इंटेरियर / डेकोर / फेर्निचर वगैरे दिसेनासे झाले व त्याची जागा किरकोळ गोष्टींन्नी घेतली होती. वरचे दोन मजले तर चक्क रिकामे झाले. तेथील हाय फाय रेस्त्राँ व गेमिंग पार्लेर्स उडाली होती.

एकंदरीत मॉल संस्कृती आपण पचवली, तिला जगू दिलं व कोपर्‍यावरची वाण्याची दुकानेही टिकून रहिली....अगदी भारतीय संस्कृती सारखी....
आणी ह्याला साक्षिदार -समोर कसेबसे टिकून असलेले मँकडोनाल्ड्स चे व गर्दीने तुंबलेले भेल-चाट चे दुकान!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nope, mall thing is very much on. Probably you have lost the interest in physical visits and shopping in malls, hence you may not have seen the flooded malls.>> नाही ताई. मी पन हिंडते मॉलो मॉली. पण ऑनलाइन शॉपिन्ग मुळे मॉल, ऑनलाइन फूड ऑर्डरिन्ग मुळे फिजिक ल रेस्ट्रॉरेन्ट ऑनलाइन वर्तमान पत्रांमु ळे प्रिंट जर्नालिझम, ओटीटी मुळे थेट्रात जाउन पिक्चर बघ णे. घरपोच डिलिव्हरी मुळे मेडिकल शॉप ह्या सर्वाचा वापर कमी कमी होतो आहे. रिलाय् न्स चा बीकेसी चा मॉल, सिंगापोरचे मॉल एकदम भारी आहेत. मी फक्त जे काय घडत आहे ते लिहिले आहे.

मॉल सारखी एकेकाळी सुरक्षित अशी गार एसी व सुशोभित जागा फिरायला फार छान. लहान मुले, डेटिन्ग करणारी कपल्स, ह्यांच्यसाठी तर बेस्ट जागा. शॉपिन्ग व फूड तर एकदम फेवरिट. डीमार्ट च्या आधी मुम्बईत एक हायपर मार्केट पण होते मैलोन मैल रांगा वस्तु व पदार्थांच्या. ते ही फार भारी वाटलेले.

आमचा लोकल फेवरिट मॉल होता निर्मल लाइफ स्टाइल तो आता अगदी अगदी नजरेसमोर धुळीस मिळाला आहे.

डीमार्ट छान चालते कारण त्या बहुतेक कंपनी ओन्ड / लीज्ड प्रॉपर्टी आहेत. ओनर कंपनी एकदम धिन चॅक आहे. बाकी लोकां ना मॉल मधील दुकानांचे भाडे भरणे अवघड होत चालले आहे कारन फूट फॉल नाही व सेल्स त्याहून कमी.

आत्ता नाही तर दहा वर्शात तिथे इल्लीगल का होईना पण होमलेस लोक राहु लागतील.

>>>>अजुनही ट्रॅडिशनल कस्टमर आहे. ऑनलाइन खरेदी करते, पण तरीही दुकानात जाऊन, हात लावून, ओरिजिनल रंग पाहुन, ट्राय करून कपडे खरेदी केले की जास्त समाधान मिळतं.
ब्रँडेड जीन्स ऑनलाइन .....शक्यच नाही.>>>>
bang on,
बहुतांश लोक जर लुक अँड फील टेस्ट करण्यासाठी आले तर मॉल मधल्या दुकानांना उत्पन्न कसे मिळेल? मॉल मध्ये गर्दी = दुकांनाचा चांगला धंदा हे अनुमान तितकेसे बरोबर नाही.
कपडे, शूज, काही हार्ड-वेअर गोष्टी ( फर्निशिंग items वगैरे) हे वरील ग्रुप मध्ये येतील, इलेक्ट्रॉनिक्स तसेही ऑनलाइन कधीही स्वस्त पडते,
राहता राहिले फूड, एंटरटेनमेंट (सिनेमा मुलांचे प्ले झोन) तर त्या साठी मॉल छान जागा आहे, पण केवळ त्यावर टिकून राहणे कठीण आहे.
मॉल चे

अगदी पुण्यात समोरासमोर असणारे 2 मॉल , त्यातला फिनिक्स टिकून राहिला, इन ओरबीत बंद होऊन ऑफिसेस सुरू झाली तिकडे. काही वर्षांपूर्वीच.

मॉल मधली गर्दी कमी होत जाईल पुढे पुढे हे खरे आहे, पण मॉल संस्कृती जाणार नाही, गल्लो गल्ली मॉल येणे बंद होईल, मोठ्ठे मॉल त्यांच्या ग्लॅमर फॅक्टरमुळे चालू राहतील

मॉलमध्ये गरीब लोकच नोकरी करतात

हॉटेल चे मेन्यूही बदलत आहेत , पूर्वी गल्लीतील हॉटेलातही रोटी , नान , सब्जी मिळायची

आता त्याला गिर्हाईक नाही , खपण्याची गरेनती नाही, तंदुरी कामगार युपी बिहारला गेलेत , अजून आले नाहीत

म्हणून व्हेज चायनीज राईस नूडल्स आणि नॉनव्हेज चायनीज मिळते , ते त्यांना करायला सोपे जाते

मॉलमध्ये गरीब लोकच नोकरी करतात>> बरोबर. आमच्या हैद्रा बादच्या मावशींची मुलगी आता कॉस्मेटिक काउन्टर वर सेल्स लेडी आहे. त्यावर तिचा संसार आहे नवरा आटो चालवतो. कधी मधी.

एव्ढी महाग रिअल इस्टेट धूळ खात पडून राहिली तर सरकारच ताब्यात घेइल

स्वीपर क्लीनर , बॉक्स ऑफिस क्लार्क , बिल बनवणारे , सिक्युरिटी , फूडमधले कामगार , सगळे गरीब अल्प शिक्षित असतात

मला पण खूप कंटाळा येतो हल्ली मॉल मध्ये जायचा. काही काही मॉल पूर्ण फिरे पर्यंत पाय दुखून येतात. थकवा वाटतो.

पण कपड्यांसाठी अजूनही ऑनलाईन खरेदीचा अनुभव फारसा चांगला नाही (साईझ तरी चुकतो किंवा मटेरियल प्रत्यक्षात फालतू निघते) त्यामुळे कपड्यांसाठी फिजिकल शॉपिंगला पर्याय वाटत नाही. कधीकधी डिस्कउंट्स पण मिळून जातात. प्लस अनेक कपडे स्वतः try करून बघता येत. व आपण किती बेढब झालो आहोत हे त्या फुल्ल व साईडच्या आरशात दिसते. आता वजन कमी केल्याशिवाय नवीन कपडे घ्याचेच नाही असा प्रत्येक वेळी निश्चय करून बाहेर येते. (अर्थात त्यासाठी वीकडेलाच जावे लागते नाहीतर फीटिंग रूम मधेही लाईन लागते.

मॉल संस्कृती आली तेव्हा साधारण महिन्यातून एकदा तरी जाणे होई. पण आता साधारण ३ /४ महिन्यातून एकदा वगैरे फार तर जाणे होते. नवरा तर वर्षातून एकदा तसेच काही कारण असेल तर येतो.

मला स्वतःला दुकानदाराला हे द्या ते द्या सांगायला आवडत नाही. स्वतः फिरून चार गोष्टी हात लावून, तुलना करून घेणे पहिल्यापासून आवडते. सेल्स गर्ल्स चे मागे लागणे किंवा आगंतुक सल्लेही आवडत नाही. त्यामुळे standalone दुकानांपेक्षा हे बरे वाटते.

कोणाच्या घरासमोरील मॉल ओस पडलाय तर कोणाच्या नाक्यावरचा मॉल गजबजलेला आहे. प्रत्येक जण आपल्या अनुभवावर निष्कर्श काढू लागला तर अवघड आहे धाग्याचे.
एक मात्र आहे. ऑनलाईन शॉपिंग असो वा कोरोनाची लाट, आमच्या शेजारचे डीमार्ट आणि नाक्यावरची दुकाने दिवसरात्र गजबजलेली असतात. सणासुदीला मार्केटमध्ये पाय ठेवायला आजही जागा मिळत नाही. स्विगी झोमॅटोने बस्तान मांडलेय पण खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि हॉटेल तुडुंबच आहेत. मध्यमवर्गीय भारतीयांमधील चकाचक मॉलची सुरुवातीची क्रेज गेल्यावर एक गर्दी ओसरणारच होती. तेच आणि तेवढेच झालेय. बाकी खरेदीचा किडा कायम राहणारच आहे. भारतीय माणूस सोशल आहे आणि ऑनलाईन शॉपिंगची क्रेझही काही काळाने कमी होणारच आहे.

डी मार्ट स्वस्त असल्यामुळे तिथे गर्दी असते. आमची कामवाली मावशी पण तिथूनच खरेदी करते. बंद पडणा-या माॅल्स नी पण किमती नीट ठेवाव्यात.

Pages