शॉपिंग मॉल्स मध्ये होणारे बदल!

Submitted by यक्ष on 8 March, 2022 - 03:14

काल एका मोठ्ठ्या रिलायंस शॉपिंग मॉल मध्ये वेळ घालवायचा म्हणून सहज चक्कर टाकली.

काही वर्षापूर्वी हा मॉल जेंव्हा दिमाखात सुरु झाला होता व मी रांगेत लागून हा मॉल पाहीला होता, तेंव्हा एक फार मोठा बदल होतोय असे वाटले होते....ह्यानी छोटे / मध्यम उद्योग बंद पडून ह्या मॉल्स चीच चलाती राहील असे एकवेळ वाटले.

पण भारतीय ग्राहकाविषयी (मी धरून - कारण मी सुरुवातीला बिग बझार मधून अवास्तव आणी तद्दन खरेदी करून नंतर पस्तावलो होतो व एक चांगलाच धडा शिकलो होतो. मग नंतर मॉल हे वेळ घालवण्याचे साधन असे ठरवले) बर्‍यापैकी कल्पना असल्याने असे काही होण्याची शक्यता कमी आहे असेही वाटले होते.

काल बहुधा सुटीचा दिवस नसल्याने काहीच गर्दी नव्हती आणी स्टाफ निवांत होता... आतील डिपार्ट्मेण्ट मध्ये लक्षणीय बदल झाला होता.....खाण्याचे (माझे आवडते काम) स्टॉल्स नामशेष झाले होते. सुरवातीचा दिमाख दिसेनासा झालेला वाटला. सुरुवातीला टायर्स वगैरे पण मिळायचे (मी कार टायर्स घेतले होते व बसवून पण मिळाले होते) ते केंव्हाच गायब झाले होते. सुरुवातीची व्हरायटी / इंटेरियर / डेकोर / फेर्निचर वगैरे दिसेनासे झाले व त्याची जागा किरकोळ गोष्टींन्नी घेतली होती. वरचे दोन मजले तर चक्क रिकामे झाले. तेथील हाय फाय रेस्त्राँ व गेमिंग पार्लेर्स उडाली होती.

एकंदरीत मॉल संस्कृती आपण पचवली, तिला जगू दिलं व कोपर्‍यावरची वाण्याची दुकानेही टिकून रहिली....अगदी भारतीय संस्कृती सारखी....
आणी ह्याला साक्षिदार -समोर कसेबसे टिकून असलेले मँकडोनाल्ड्स चे व गर्दीने तुंबलेले भेल-चाट चे दुकान!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय... ऑनलाईनमुळे मॉल मधे गर्दी संपली असावी त्यात कोरोनामुळे मॉल मधे जाण्याची सवयही सुटली असावी.

आमच्या इथले बिगबझार गाशा गुंडाळून देखील बरीच वर्षं झाली पण डी-मार्ट मात्र जसंच्या तसं...!! तिथं अजुनही तीच अन तशीच गर्दी. त्याला ना ऑनलाईनचा फटका ना कोरोनामुळे उतार... उलट कोरोना आधी सकाळी १० ला उघडाणारं डीमार्ट हल्ली ७ वाजल्या पासून ते रात्री ११ पर्यंट सुरू असतं....

कोरोनामुळे लोक गरजेपुरता खर्च करू लागले आहेत. त्यात २ डोस झाले असतील तरच प्रवेश आणि अनावश्यक खर्च टाळायला मॉल ला जाणे टाळले जाते. गेल्या २ वर्षात अजून तरी जाणे झाले नाही, गरज वाटत नाही. एकतर ऑनलाईन मिळतात गोष्टी आणि उगाच गर्दीत जायला आता खरंच जीवावर येते.
मॉल संस्कृती राहील व कोपरीवरचा वाणी देखील.

दोन महिन्यापुर्वी चिंचवड रिलायंस शॉपिंग मॉल मध्ये दोन-तीन वेळा जाण्याचा योग आला. विकेंड ला बर्यापैकी गर्दी असते. पण एरवी रिकामे असते. पुर्वी एकच होते आता दोन आहेत. रिलायंस मॉल किती चालते यासाठी सहज त्याचा मागचा तीन महिन्याचा रिपोर्ट बघितला . त्यानुसार त्याची सुमारे १४४१२ दुकाने आहेत ऑनलाईन आणि ऑफ्लाईन मिळुन मागिल तीन महिन्यात ५७,७१४ कोटीची विक्री केली आहे जी आधिच्या वर्षापेक्षा ५३%ने जास्त आहे. भारताची एवढी ग्रोथ नाही आणि हा बिझनेस कोपर्‍यावरचा वाणी, कापड दुकान आणि ईलेक्ट्रॉनिक दुकान याचा बिझनस घेउन वाढ झाली आहे.

डी-मार्ट , स्टार बाझार मध्ये मात्र रिलायन्स्च्या तुलनेत भरपुर गर्दी असते. त्याचा पण व्यापार जवळपास ह्याच दराने वाढत आहे. बिग बास्केट्ने होम डिलिव्हरी देण्यास सुरवात केल्यापासुन घराखालच्या वाण्याच्या दुकानातील गर्दी कमी होण्यास सुरवात झाली. ज्याची स्वताची दुकाने आहेत ती चालु आहेत. ज्याची भाड्याने दुकाने आहेत ती बंद झाली.

डी-मार्ट , स्टार बाझार , बिग बास्केट् आणि रिलाय्न्स मुळे कोपर्यावरची वाण्याची दुकाने कमी होतील. बंद नाही होणार कारण गरजेसाठी घराजवळ दुकान लागत. ही दुकाने नंतर कदाचित ७-११ सारखी convert होतिल . मेडिकल मध्ये पण काही दुकाने Med-plus मध्ये convert होत आहेत.
काही असो स्पर्धा असल्याने ग्राहकासाठी हा बदल फायद्याचाच आहे.

साहिल शहा - घराजवळच्या किराणावाल्याबाबत +१.

बिग बास्केटने हिम डिलिव्हरी द्यायला सुरुवात केल्यापासून हे कळले नाही. ते सुरुवातीपासून ऑनलाइन ग्रोसरी शॉपच आहे ना?

तुम्हांला बिग बझार म्हणायचंय का?

बिग बास्केट होम डिलिव्हरी देत होता पण ते ऑर्डर प्रमाणे . पण ६ महिन्यापुर्वी आमच्या कॉलनीसाठी रात्री १० पर्यन्त ऑर्डर द्यायची ( no limit , 5 रुपयाची पण ऑर्डर चालते) आणि सकाळी ६ वाजता डिलिव्हरी चालु केली ज्यात ज्या गोष्टी रात्री किंवा सकाळी सकाळी वाण्याकडुन घेतल्या जायच्या त्या बिग बास्केट कडुन घेतल्या जातात

बीबी डेली. कारण अशी रात्री ११ पर्यंत ऑर्डर करा, सकाळी ५ पर्यंत डिलिव्हरी मिळेल अशी दुसरी अ‍ॅप बेस्ड ग्रोसरी स्टोअर्स आली. - सुपर डेली . आणखीही असतील.
आता स्पर्धा आणखी वाढली आहे. डीमार्टने स्विगीसोबत टाय अप करून अर्ध्या तासात डिलिव्हरी सुरू केली आहे.
ग्रोफर्स - आता ब्लिंकिट मला १८ मिनिटांत डिलिव्हरी दाखवतं आहे.

करोनापूर्व काळात आम्ही सगळी ग्रोसरी आणि महीन्याचे इतर सामान ग्राहक पेठेतून आणायचो.... एकतर तिथे लोकल प्रॉडक्ट भरपूर मिळायचे आणि दुसरे म्हणजे सोडेक्सो चालते!!
आता गेल्या दोन वर्षात तरी सुरुवातीला सगळी ग्रोसरी जवळच्या किराणा दुकानातून आणि नंतर BBdaily आणि SuperDaily वरुनच मागवतोय.
अजुन काही महीन्यांनी कदाचित परत ग्राहक पेठ चालू करु Happy

मलाही बोअर होते मॉलमध्ये जायला. खरेदी तर कुठूनही होते. बहुतांश ऑनलाईनच होते. खायला प्यायला खेळायला बागडायला मजा करायला त्या बंदिस्त जागेत जाण्याऐवजी खुल्या जागी जायला आवडते. मला लोकांचे निरीक्षण करायलाही आवडते. मॉलमध्ये दिसणारी लोकं मला टिपिकल वाटतात. सगळे एकाच छापाचे चेहरे आसपास बघतोय असे वाटते. तेच गार्डनमध्ये फिरायला जाताना तसे वाटत नाही. मला आठवत नाही शेवटचे मी मॉलमध्ये कधी गेलो असेन. यातून पिक्चर बघायचे कारण वगळा.

मॉल्स मधेच स्पर्धा आहे. रिलायन्सच्या बाबतीत का कोण जाणे पहिल्यापासूनच त्यांना भारतीय ग्राहक आपलासा करता आलेला नाही. डी मार्ट तुडुंब चाललेले असतात. बिग बझार मध्यंतरी कोर्ट केसेस मुळे भाडी थकल्याने बर्‍याच ठिकाणी बंद होते. आता कोर्टाचा निकाल अ‍ॅमेझॉनच्या बाजूने लागल्यावर रिलायन्सने जिथे बिग बझार आहे त्या इमारतीच भाड्याने घेतल्याने प्रत्येक ठिकाणच्या स्टोअरचा वेगळा व्यवहार होत आहे. बातमीत असे मोघम आहे.

मॉल्समधला सर्वात कंटाळवाणा प्रकार म्हणजे बिल बनवण्याच्या वेळी लागणार्‍या मोठ्या रांगा. किराणा मालाची दुकाने धडाधड बंद पडत आहेत. बालाजी या ब्रॅण्डची दुकाने तीन वर्षांपेक्षा जास्त एका ठिकाणी दिसत नाहीत. इलेक्ट्रॉनिक्स दुकानांना तर कुणी विचारत नाही. मोबाईल फोन हे ऑफलाईन पेक्षा ऑनलाईनच जास्त विकले जातात. यात वाढच होईल.

फक्त मॉल कशाला? सगळ्याच तोट्यात जाणाऱ्या गोष्टी बंद करून गरिबांना घरं द्यावीत. पण गरीबीवर एवढं सोप्पं उत्तर असतं तर जगाची ही समस्या कधीच सुटली असती.

उद्या चमचमीत पाककृतीच्या धाग्यावर कुणीतरी लिहितील , हे करून अपव्यय करण्यापेक्षा त्याच पैशात भाकरी करून गरिबांना वाटा

मी अमाजींशी सहमत आहे. यापुढे जाऊन मी तर असे म्हणेन की अँटिलिया सारखे मोठे घर एका कुटुंबासाठी अनावश्यक आहे. त्यामुळे तिथे ८०० स्के फूट घर अंबानींसाठी ठेवून मुंबईत ज्यांना घरे नाहीत अशा सर्वांना १५० स्क्वे फूटाची घरे अँटिलियात द्यावीत. शाहरूख सरांनी स्वदेश मधे जसा त्याग केला तसा अंबानी, अदानींनी केला तरच भारत देश महान होईल असे माझे स्पष्ट मत आहे.

सगळ्याच तोट्यात जाणाऱ्या गोष्टी बंद करून गरिबांना घरं द्यावीत. पण गरीबीवर एवढं सोप्पं उत्तर असतं तर जगाची ही समस्या कधीच सुटली असती.>> पण तसा प्रयत्न पण होत नाही ना. अनधिकृत हॉस्पिटल ठेवले होते ड्रीम मॉल मध्ये आग लागली त्यास. आता हे फिजिकल शॉपिन्ग चे संपतच जाईल. काही द्शकात. ती जागा तशीही ओसच पडेल. मॉल थिंग इज ओव्हर.

मॉल थिंग इज ओव्हर.>>>> Nope, mall thing is very much on. Probably you have lost the interest in physical visits and shopping in malls, hence you may not have seen the flooded malls.

इथे पुण्यात तर मॉल्स भरभरून गर्दीचे असतात. ठाण्यात विवियानामध्ये पण केवढी ती गर्दी. हल्ली लोक शॉपिंग ऑनलाइन करतात आणि वीकेंडला फिरायला मॉलमधे जातात. पूर्वी आपण आऊटिंगला, लॉंग ड्राइव्हला किंवा मुल लहान असताना बागेत जायचो तसंच काहीसं. हे मला अतिशय विचित्र वाटतं. हल्ली तर कपल्सपण फिरायला मॉल्समध्ये जातात. (पूर्वी संभाजी बागेत जायचे Proud )
मी अजुनही ट्रॅडिशनल कस्टमर आहे. ऑनलाइन खरेदी करते, पण तरीही दुकानात जाऊन, हात लावून, ओरिजिनल रंग पाहुन, ट्राय करून कपडे खरेदी केले की जास्त समाधान मिळतं.
ब्रँडेड जीन्स ऑनलाइन .....शक्यच नाही.

>>सर्व फिजिकल मॉल बंद करुन तिथे गरिब होमलेस लोकांना हाउसिन्ग उपलब्ध करुन द्यावे.
काहीच्या काही!!
गरीबांना रोजगार देणारे उद्योग बंद करुन तिथे फुकटच्या सवलती देण्याची मानसिकताच खराब आहे!!
गरीबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे प्रयत्न सोडून असल्या सवलती दिल्याने कुठल्याही गरीबाचे भले झालेय का??
प्रॅक्टिकल काहीतरी बोला राव!! विषय कुठला कुठे घेउन जायचा??

मुळात गरिबीवर ' पैसे/मालमत्ता फुकट वाटणे ' हे उत्तर नाही. ते वाटले तरी ते शाबूत राहण्यासाठी त्यांना रोजगाराच्या संधी हव्यात, शिक्षण, आरोग्य दर्जेदार आणि परवडेबल हवं, हे सगळं असलं तर त्याला काही अर्थ आहे. नाहीतर आज तुम्ही द्याल त्यांना घरं, पण त्यांना रोजच्या अन्नाची व्यवस्था सुटत नसेल तर ते एक दिवस घर विकून झोपडीत राहतील आणि मिळालेल्या पैशातून तात्पुरती पोटापाण्याची व्यवस्था करतील. किंवा कुणी आजारी पडले आणि हॉस्पिटल साठी पैसे नसतील तर घर विकून ते उभे करतील. त्यांच्या प्राथमिक गरजा कुठल्या ते आपण त्यांच्यावर लादू शकत नाही. त्यांचे ते ही पैसे संपले की पुन्हा जैसे थे. कल्याणकारी योजना ह्या शाश्वत हव्या, तात्पुरत्या वाटपातून कल्याण होणार नाही.

आता फारच विषयांतर झाल्यामुळे मी ह्या ' गरिबांना घरे देणे ' विषयावर इथे फार आणखी लिहीत नाही.

सर्व फिजिकल मॉल बंद करुन तिथे गरिब होमलेस लोकांना हाउसिन्ग उपलब्ध करुन द्यावे.>>> आपण भाज्या दुधअंडी ब्रेड मांस मासे किराणा पासुन सगळं लोकल भाजीवाला, किराणावाला, मासेवाली कडुन न घेता आँनलाईन मागवुन गरीबीला हातभारच लावत आहोत.

हा वाढत्या आर्थिक विषमतेमुळे निर्माण झालेला प्रश्न आहे.
आज वन रूम किचन घरं बनतच नाहीत. म्हाडा ही बनवतं का माहीत नाही.
जी मोठाली पॉश घरं बनतात ती बहुसंख्य लोकांना परवडत नाहीत. ती घरं विकलीही जात नाहीत.
ज्यांच्याकडे भरपूर पैसा, कर्ज मिळण्याची ऐपत आहे असे लोक दोन दोन घरं घेऊन रिकामी ठेवतात.

वाढत्या आर्थिक विषमतेमुळे उपलब्ध साधनसामुग्री गरजांपेक्षा चैनीच्या वस्तूंच्या निर्मितीकडे वळते.

Pages