पनीर - २00 ग्रॅम ग्रेट करून
३ मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून
भोपळी मिरची (मध्यम) - २ बारीक चिरून
३ ते ४ अमूल चीज क्यूब ग्रेट करून
पावभाजी मसाला - १ १/२ टे स्पून
काश्मिरी लाल तिखट - १ टे स्पून
गरम मसाला - १ टी स्पून
कसुरी मेथी - १ टे स्पून
टोमॅटो केचप - २ टे स्पून
धणे जिरे पावडर - १ टे स्पून
बटर - १ टे स्पून
तेल - फोडणीसाठी अंदाजानुसार
पाणी - एक ते दीड वाटी (आमटीची वाटी)
हिन्ग, हळद, मीठ चवीनुसार
कढईत तेल घ्या. तेल तापले की त्यात हिन्ग, हळद व बारीक चिरलेला टोमॅटो आणि भोपळी मिरची टाका. २ मिनिटानंतर त्यात सगळे मसाले टाका, बटर टाका आणि मीठ टाका. तेल सुटू लागले की त्यात पनीर टाका. नन्तर पाणी टाका. एक वाफ काढून त्यात किसलेले चीज टाका. २ मिनिटे वाफ काढा. घोटाला तयार
हा घोटाला मसाला पाव बरोबर मस्त लागतो. त्यासाठी लादी पाव घ्यावा. तव्यावर बटर टाका, बटर वितळले की त्यात थोडे काश्मिरी लाल तिखट आणि कोथिंबीर टाका. पाव मधून कापून ह्या मिश्रणावर दोन्ही साईडने शेकून घ्या.
ह्यात कांदा अजिबात घालायचा नाहीये. टोमॅटो केचप टाकायचेच आहे. मसाला पावाबरोबर फारच मस्त लागतो. मूळ कृतीमध्ये जिरे घातले जातात फोडणीत, पण जिर्याशिवाय चव जास्त चांगली लागली.
चमचमीत रेसिपी.. फोटो तोंपासू!
चमचमीत रेसिपी.. फोटो तोंपासू!
चमचमीत रेसिपी.. फोटो तोंपासू!
चमचमीत रेसिपी.. फोटो तोंपासू! >> +1
रविवार सकाळ
रविवार सकाळ
उठावे , असे खावे , पुन्हा गुड नाईट
मस्तच दिसतोय रे हा घोटाला!
मस्तच दिसतोय रे हा घोटाला!
सविस्तर रेसिपी आणि छान फोटो
भोपळी मिरची म्हणजे ढोबळी मिरची हे कळले पण पनीर ग्रेट करणे म्हणजे किसणे का ?
मस्त!
मस्त!
छान दिसतोय घोटाला.
छान दिसतोय घोटाला.
पाककृतीत जिन्नस टाकू नका. घाला.
आज स्विगीवरून पोंक वडा मागवला. छान आहे. तुमच्या फोटोतले जास्त कुरकुरीत वाटताहेत.
भारी दिसतेय रेसिपी. कांदा
भारी दिसतेय रेसिपी. कांदा नाही, आले लसूण पण नाही? करून बघणार नक्की.
भारी दिसतेय रेसिपी. कांदा
भारी दिसतेय रेसिपी. कांदा नाही, आले लसूण पण नाही? करून बघणार नक्की.
यम्मी फोटू . मस्त
यम्मी फोटू . मस्त
मस्त दिसत्येय.
मस्त दिसत्येय.
भारी दिसतोय प्रकार. पनीर आणि
भारी दिसतोय प्रकार. पनीर आणि पावभाजी दोन्ही आवडते प्रकार. नक्की करणार.
धन्यवाद लोक्स _/\_ ब्लॅककॅट
धन्यवाद लोक्स _/\_ ब्लॅककॅट आबा हो रे किसून घेणे. भरत धन्यवाद, सूचना लक्षात ठेवेन. पोंक वड्याच्या काही रेसिपीत सोडा नव्हता (मी घातला होता), कदाचित मूळ पाकृ मध्ये नसेल सोडा, म्हणून कुरकुरीत नसतील. मैत्रेयी, हो कांदा लसूण काही नाही. सिंड्रेला हो ह्यात पाभा मसालाच घालायचा आहे, चव भन्नाट आहे आणि खूपच कमी खटपट आहे. जाई, अमित, वर्णिता, मृणाली अन वावे धन्यवाद.
छान दिसते आहे.
छान दिसते आहे.
मस्त दिसतोय ! करून बघणार
मस्त दिसतोय ! करून बघणार नक्की.
चमचमीत रेसिपी.. फोटो तोंपासू!
चमचमीत रेसिपी.. फोटो तोंपासू! >> +१
सही जबरदस्त फोटो.
सही जबरदस्त फोटो.
मस्त वाटते आहे! केचप मुळे
मस्त वाटते आहे! केचप मुळे गोडसर होते काय?
हा पदार्थ कायम बनवला जातो.
हा पदार्थ कायम बनवला जातो. फक्त आम्ही याला आम्ही पनीर भुर्जी/बुर्जी म्हणतो. गरमागरम पराठे आणि भुर्जी आठवड्यातील एक लंच असतंच.
(फक्त यात केचप घालत नाही कारण गोडसर चव आवडत नाही. पनिरच्या पदार्थात हिंग घालत नाही. आणि एक वाटी पाणी लिहिलं आहे ते सुद्धा अजिबात घालत नाही. पनीर आणि टोमॅटोच्या अंगच्या पाण्यात छान शिजतं. वरून पाणी घालुन चव कमी होईल असं वाटतं)
पनीर भुर्जीत कांदा असतो ना?
पनीर भुर्जीत कांदा असतो ना? यात नाहीए
पनीर भुर्जीत कांदा असतो ना?
पनीर भुर्जीत कांदा असतो ना? >>> हो असतो. पण यांच्या रेसिपीमधे स्कीप केला आहे तरी हरकत नाही.
पण फोडणीत हिंग आणि शिजताना पाणी या ऍडीशन्स मात्र अजिबात चालत नाहीत. पनीरला वरून अजुन पाणी म्हणजे चव पांचट होईल का असं वाटतं आहे.
पाणी घातले तरी तितक्याच
पाणी घातले तरी तितक्याच भाज्या आणि चीजही आहे
म्हणून पांचट होणार नाही
भारी प्रकार आहे.. तेही कमी
भारी प्रकार आहे.. तेही कमी कटकटीचा...!!
भुर्जी कोरडी थोडी लसलशित असते
भुर्जी कोरडी थोडी लसलशित असते हे पावभाजिसारख थोड पळिवाढ दिसतय त्यामुळे त्याला पाणी /दुध्/क्रिम अस काहितरी लिक्विड लागेलच..
छान प्रकार आहे.
सामो, डीजे, अंजू, मीरा,
सामो, डीजे, अंजू, मीरा, सीमंतिनी, प्राजक्ता, सोनाली, पराग धन्यवाद. सीमंतिनी हो थोडी गोडसर चव येते केचपमुळे. मीरा पनीर भुर्जी मध्ये नाही पाणी घालत आपण पण ह्यात चीज आहे आणि टोमॅटो न ढोबळी मिरची पण आहे त्यामुळे फार पातळ किंवा पाणचट नाही होत अजिबात. नक्की अशाप्रकारे करून बघा, आवडेलच.
फक्त यात केचप घालत नाही कारण
फक्त यात केचप घालत नाही कारण गोडसर चव आवडत नाही. पनिरच्या पदार्थात हिंग घालत नाही. आणि एक वाटी पाणी लिहिलं आहे ते सुद्धा अजिबात घालत नाही. >>> जर हे सगळे घातले तर तुम्ही तयार होणाऱ्या पदार्थाला भुर्जी/बुर्जी न म्हणता घोटाला म्हणू शकता
मस्त दिसतोय प्रकार. करून
मस्त दिसतोय प्रकार. करून बघणार.
करून बघितला. मस्त आहे..
करून बघितला. मस्त आहे..
आज केला होता हा घोटाला. मस्त
आज केला होता हा घोटाला. मस्त झाला होता. फोटो मात्र काढायचा ठरवूनही प्रत्यक्षात विसरले!
येस्स! ये आपुनको पता हय! इकडे
येस्स! ये आपुनको पता हय! इकडे सुरतची रेस्टॉरंट चेन आहे. तिथे हा प्रकार पहिल्यांदा खाल्ला.. अफलातून लागतो. फक्त इथे ते खरपूस भाजलेले स्लाईस ब्रेड देतात.
गोटाला वर भ र पू र बटर मारतात, अगदी तवंग आलेला असतो. मी युट्युबवर बघून मग घरी ट्राय केला. त्याप्रमाणे त्यात हिरवी मिरची पेस्ट घातली होती. मस्त चव लागते त्याची पण.
अंडा गोटाला सुद्धा ट्राय करा. सेम हीच पद्धत. फोटो भारी आलाय
सामी, देसाई, अंजली धन्यवाद.
सामी, देसाई, अंजली धन्यवाद. देसाई, वावे तुम्ही रेसिपी ट्राय केली आणि तुम्हाला घोटाला आवडला हे वाचून छान वाटलं अंजली रेसिपी बघून ठेवली आहे अंडा घोटालाची
Pages