दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.
तर आजचा अलंकार आहे 'अनुप्रास'.
अनुप्रास म्हणजे काय रे भाऊ?
एखाद्या ओळीत एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे एक नाद निर्माण होतो व शाब्दिक सौंदर्याची अनुभूती येते, त्याला अनुप्रास म्हणतात.
आजचा खेळ काय आहे?
सोपा आहे. कुठलेही एक अक्षर घेऊन सर्व शब्द त्याच अक्षरापासून सुरू होणारे वाक्य लिहा. अशी अनेक वाक्ये/कथा पूर्वी लोकांनी लिहिली आहेत. त्यामुळे पूर्वप्रकाशित वाक्ये लिहायला नकोत याची खबरदारी घेऊ या. खाली काही पूर्वीची उदाहरणे दिली आहेत.
- काकूने काकाच्या कामाचे कोरे कागद कात्रीने कराकरा कापले.
- ढमढेर्यांच्या ढेरीवरून ढब्बा ढेकूण ढासळला.
चला तर मग. आजचा दिवस अनुप्रास अलंकाराने सजवूयात.
रागावलेल्या रशियाने रातोरात,
रागावलेल्या रशियाने रातोरात, रक्तरंजित , राक्षसी रणसंग्राम राबविला.
या योजनेमुळे, युक्रेनला या यातनामय युद्धास यावेच (लागले).
* माफ करा आत्ताच्या गंभीर जागतिक परिस्थितीवरती विनोद करण्याचा हेतू नाही.
रंगराव रांजणगावच्या राजाच्या
रंगराव रांजणगावच्या राजाच्या रांगेत रात्र रात्र राजीखुषीने राहतात
वाड्यातलं वार्तापत्र वाचलं
वाड्यातलं वार्तापत्र वाचलं वाट्टं ....
प्रधानांचा प्रदीप
प्रधानांचा प्रदीप प्रभुण्यांच्या प्रभाच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडला
गोलमटोल , गोबर्या गणपतीचा
गोलमटोल , गोबर्या गणपतीचा गालगुच्चा , गाणे गाणार्या गालव गंधर्वास गावला.
अत्युत्तम! अनुप्रासासाठी अधिक
अत्युत्तम! अनुप्रासासाठी अधिक अक्षरेही अजमावल्यास आवडतील.
माझे मनोरथ मातीत मिळाले.
माझे मनोरथ मातीत मिळाले.
आजचा दिवस अनुप्रास अलंकार
आजचा दिवस अनुप्रास अलंकार अजमावूयात.
गडद निळे गडद निळे जलद गण
गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले, गडद निळे
पट पट पट पट पटाट पट
पट पट पट पट पटाट पट
पट पट पट पट
काय नाय कामात उरक
पट पट पट पट |
पट पट पट पट पटाट पट
पटाट पट पटाट पट
पोंबुर्प्याचा पंपू
पोंबुर्प्याचा पंपू पावश्यांच्या प्रभीला पाहून पटकन पळाला.
@ शांमा जलद भरुनी आले. (अनिलगण निघाले अशीही पुढे एक ओळ आहे)
ती संपूर्ण कविता अनुप्रास
ती संपूर्ण कविता अनुप्रास अलंकाराच्या वेगवेगळ्या रूपाची आहे. इथे लाटानुवर्ती अनुप्रास घेतला आहे.
कविता प्रसिद्ध असल्याने फक्त पहिली ओळ लिहीली (कंटाळा केला)
ते कळलं, पण जलदगण निघाले असं
ते कळलं, पण जलदगण निघाले असं नाहीये.
गडद निळे गडद निळे जलद भरुनी
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतलतनू चपलचरण अनिल गण निघाले.
पण संयोजकांना हे नकोय.
आजीच्या आग्रहामुळे आईने अन्नपूर्णा(ब्रॅण्ड)चे अनारसापीठ आठवणीने आजच आणले आहे
माठाने माठाच्या मातीत माठ
माठाने माठाच्या मातीत माठ मिसळला.
ओके. बरोबर.
ओके. बरोबर.
शहाण्या शांताने शंतनुच्या
शहाण्या शांताने शंतनुच्या शत्रूला शुन्यातून शोधले.
सांजवेळी सांजवात सतेज सजली.
सांजवेळी सांजवात सतेज सजली.
काकुने काकांचे काळया कपाटातले
काकुने काकांचे काळया कपाटातले कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले.
नेहमीचं
अनुने अन्याला अनुल्लेखाने
अनुने अन्याला अनुल्लेखाने अव्हेरिले
अनू ऐवजी मी अरु वाचलं, हाहाहा
अनू ऐवजी मी अरु वाचलं, हाहाहा. (आई कुठे काय करते वाचण्याचा परिणाम).
स्मिताने सोन्याचे सामान
सुंदर स्मिताने सोन्याचे सर्व सामान सोलापूरच्या सावकाराकडून सुमडीत सोडवले
पहाटे प्राजक्ताने प्राजक्ताला
पहाटे प्राजक्ताने प्राजक्ताला ( पारिजातकाला ) पाणी पाजवले.
बगाडेंचा बगळ्या बर्व्यांच्या
बगाडेंचा बगळ्या बर्व्यांच्या बनी बरोबर बागडता बागडता बागेतल्या बाकावर बदकन बसला.
बबन्याने बारक्याला बदड बदड
बबन्याने बारक्याला बदड बदड बदडले.
मीनाला मंगळवारी माहेरून
मीनाला मंगळवारी माहेरून मोत्यांची माळ मिळाली
आग्र्याच्या अंजनाने
आग्र्याच्या अंजनाने अहमदाबादच्या अर्णवला अत्यंत अवघड आडरानात अडवून अतिशय आवडीने आपटले
वासंतीने वसंतऋतुत वीणा वाजवली
वासंतीने वसंतऋतुत वीणा वाजवली.
अनुप्रास अलंकार अत्यंत अवघड
अनुप्रास अलंकार अत्यंत अवघड असा अलंकार असतो असे आमचे अण्णा आळवत असत.
तिकडे तावडयांच्या तुषारला
तिकडे तावडयांच्या तुषारला ताईने तिंबले
Pages