![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/02/24/alankar1_0.jpeg)
दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.
तर आजचा अलंकार आहे 'अनुप्रास'.
अनुप्रास म्हणजे काय रे भाऊ?
एखाद्या ओळीत एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे एक नाद निर्माण होतो व शाब्दिक सौंदर्याची अनुभूती येते, त्याला अनुप्रास म्हणतात.
आजचा खेळ काय आहे?
सोपा आहे. कुठलेही एक अक्षर घेऊन सर्व शब्द त्याच अक्षरापासून सुरू होणारे वाक्य लिहा. अशी अनेक वाक्ये/कथा पूर्वी लोकांनी लिहिली आहेत. त्यामुळे पूर्वप्रकाशित वाक्ये लिहायला नकोत याची खबरदारी घेऊ या. खाली काही पूर्वीची उदाहरणे दिली आहेत.
- काकूने काकाच्या कामाचे कोरे कागद कात्रीने कराकरा कापले.
- ढमढेर्यांच्या ढेरीवरून ढब्बा ढेकूण ढासळला.
चला तर मग. आजचा दिवस अनुप्रास अलंकाराने सजवूयात.
जनम जनम जावाच्या
जनम जनम जावाच्या जिषीकपूरच्या जित्रपटात जनिताचं जूत जाहीलं.
रामदास स्वामीरचित
रामदास स्वामीरचित नृसिंहपंचकस्तोत्रातील लाटानुप्रास
नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें।
प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें।
खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें।
तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हिजाळें।।
झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी।
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी।
हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी।
कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।।
कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं।
घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं।
तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं।
धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।
भरभरित भरारी भर्भराटे भरारी।
थरथरित थरारी थर्रथराटे थरारी।
तरतरित तरारी तर्तराटे तरारी।
चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।
रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी।
गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी।
न धरित जन मानें लोक गेलें निदानें।
हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।। - श्रीसमर्थ
मस्त आहे. रामदासनवमी पण होती
मस्त आहे. रामदासनवमी पण होती आणि त्यांनी लिहिलेलं, छान योग.
नको नको नयना, नानकटाई नावडे
नको नको नयना, नानकटाई नावडे नानांना.
ट्कलीने टकल्याच्या टकलात टपकन
ट्कलीने टकल्याच्या टकलात टपकन टवटवीत टप्पोरा टोमॅटो टाकला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हाहाहा, दृश्य उभे राहिले.
हाहाहा, दृश्य उभे राहिले.
मराठीची छान उजळणी होत आहे...
मराठीची छान उजळणी होत आहे... मंडळाचे आभार...
माझ्या मंगलोरच्या मामाच्या
माझ्या मंगलोरच्या मामाच्या मानलेल्या मुलीच्या माजलेल्या मांजरीने मुंबईच्या मावशीच्या मुलाच्या मारकुट्या मित्राच्या मत्स्यपेटीतला महाग मासा मटकावला म्हणून मी माझा मित्र मनोजबरोबर मिळून माजलेल्या मांजरीला मारले
व्यत्ययकृत विक्रमी वाक्य
व्यत्ययकृत विक्रमी वाक्य
'मांजराला मारले' मतल्यावर
'मांजराला मारले' मतल्यावर मस्तपैकी मीटर मध्ये मंजुळ मखमली मंगलगीत मंगताय!
वनिता वाळुंजकरने वाळवलेले
वनिता वाळुंजकरने वाळवलेले वाटाणे वाफवले.
व्यत्ययकृत विक्रमी वाक्य
व्यत्ययकृत विक्रमी वाक्य वाचुन वाचक वार्याच्या वेगाने वाहणार्या विस्कळीत वेडसर विचारांना वापरायच्या विवंचनेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला मामाने मारले म्हणून मी
मला मामाने मारले म्हणून मी मामीचा मोरपंखी मग मोडला.
एक तरी टिकली पाहिजेच.
एक तरी टिकली पाहिजेच.
नीतिका, श्लेष अलंकाराचं खूपच
नीतिका, श्लेष अलंकाराचं खूपच छान उदाहरण. पण तुम्ही चुकून अनुप्रासाच्या धाग्याखाली दिलं आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages