मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार - २५ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'अनुप्रास'

Submitted by संयोजक-मभादि on 24 February, 2022 - 19:36

दागिने किंवा अलंकार हे व्यक्तींच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे भाषेचे अलंकारदेखिल आहेत. आपल्यापैकी काहींनी ते शाळेत शिकलेही असतील. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण त्या अलंकारांचे काही खेळ खेळू, म्हणजे ते अलंकार काय आहेत हे कळायला सोपे जाईल आणि जरा मजाही येईल. तसे भाषेचे अलंकार अनेक आहेत, परंतु तूर्तास आपण काही निवडक अलंकार खेळासाठी घेऊ या. २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात रोज एकेका अलंकाराचा खेळ खेळला जाईल.

तर आजचा अलंकार आहे 'अनुप्रास'.

अनुप्रास म्हणजे काय रे भाऊ?
एखाद्या ओळीत एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे एक नाद निर्माण होतो व शाब्दिक सौंदर्याची अनुभूती येते, त्याला अनुप्रास म्हणतात.

आजचा खेळ काय आहे?
सोपा आहे. कुठलेही एक अक्षर घेऊन सर्व शब्द त्याच अक्षरापासून सुरू होणारे वाक्य लिहा. अशी अनेक वाक्ये/कथा पूर्वी लोकांनी लिहिली आहेत. त्यामुळे पूर्वप्रकाशित वाक्ये लिहायला नकोत याची खबरदारी घेऊ या. खाली काही पूर्वीची उदाहरणे दिली आहेत.
- काकूने काकाच्या कामाचे कोरे कागद कात्रीने कराकरा कापले.
- ढमढेर्‍यांच्या ढेरीवरून ढब्बा ढेकूण ढासळला.

चला तर मग. आजचा दिवस अनुप्रास अलंकाराने सजवूयात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रागावलेल्या रशियाने रातोरात, रक्तरंजित , राक्षसी रणसंग्राम राबविला.
या योजनेमुळे, युक्रेनला या यातनामय युद्धास यावेच (लागले).

* माफ करा आत्ताच्या गंभीर जागतिक परिस्थितीवरती विनोद करण्याचा हेतू नाही.

प्रधानांचा प्रदीप प्रभुण्यांच्या प्रभाच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडला

पट पट पट पट पटाट पट
पट पट पट पट
काय नाय कामात उरक
पट पट पट पट |

पट पट पट पट पटाट पट
पटाट पट पटाट पट

पोंबुर्प्याचा पंपू पावश्यांच्या प्रभीला पाहून पटकन पळाला.

@ शांमा जलद भरुनी आले. (अनिलगण निघाले अशीही पुढे एक ओळ आहे)

ती संपूर्ण कविता अनुप्रास अलंकाराच्या वेगवेगळ्या रूपाची आहे. इथे लाटानुवर्ती अनुप्रास घेतला आहे.
कविता प्रसिद्ध असल्याने फक्त पहिली ओळ लिहीली (कंटाळा केला)

गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतलतनू चपलचरण अनिल गण निघाले.
पण संयोजकांना हे नकोय.

आजीच्या आग्रहामुळे आईने अन्नपूर्णा(ब्रॅण्ड)चे अनारसापीठ आठवणीने आजच आणले आहे

आग्र्याच्या अंजनाने अहमदाबादच्या अर्णवला अत्यंत अवघड आडरानात अडवून अतिशय आवडीने आपटले

Pages