Submitted by भरत. on 6 February, 2022 - 00:01
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.
एक सूर निमाला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
....
....
कधीतरी होणारच होतं पण कल्पना
कधीतरी होणारच होतं पण कल्पना करवत नाही हे असं झालंय ह्याची.
_/\_ श्रद्धांजली !
_/\_ श्रद्धांजली !
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
किती मनहूस होता आजचा दिवस.
किती मनहूस होता आजचा दिवस. यापूर्वी, आई गेली तो दिवससुद्धा असाच मनहूस होता. आई नसलेले जग दाखवणारा तो दिवस! जे जे कसले आवाज त्या दिवशी ऐकायला येत होते ते सगळे सूतकी सूर वाटत होते. दिवसभर आसपास शोकधून वाजत आहेत असे वाटत होते. आज तसेच काहीसे झाले आहे. आयुष्यातली कित्येक वर्षे प्रभातीच्या 'गगन सदन तेजोमय' करणाऱ्या सूरांपासून रात्रीच्या 'तुम्हे याद करते करते' च्या आर्ततेपर्यंत दिवसभर अगणित छटांच्या सूरांनी भावविश्व व्यापून राहत होते, विविध चांगल्या वाईट काळात जे सूर कधी साथी तर कधी आधार बनून आले, कधी मनावर अलगद फुंकर घालत राहिले तर कधी प्रोत्साहन देत राहिले. ती लताई आज सोडून गेली. दिवसभर विविध ग्रुप्सवर श्रद्धांजलीचे संदेश येत आहेत. विविध समाजमाध्यमांवर विविध फोरमवर त्यांची गाणी आठवली जात आहेत. टीव्ही इंटरनेट वरून अंत्ययात्रेचे अलोट गर्दीचे थेट प्रक्षेपण सुरु आहे. पण काही काही काही बघायची इच्छा नाही श्रद्धांजली तरी कसे म्हणावे? ज्या रुपात हा सूर आजवरच्या आयुष्यात भेटत होता तो सूर विज्ञानाच्या कृपेने आजही ऐकायला मिळतोय आणि मिळत राहील. पण आता त्यामागच्या सरस्वतीच्या सूरात नव्याने आता काही ऐकायला मिळणार नाही ही जाणीव फार फार व्याकूळ करते. तळपत्या सूरांची देवताच अस्ताला गेले जणू. अनंताच्या प्रवासाला निघून गेली. आयुष्य व्यापून टाकणाऱ्या त्या सूरांप्रती कृतज्ञ होऊन अगणित श्रद्धा मनात जडून राहिल्या आहेत. हात जोडून त्याच श्रद्धांची ओंजळभर अंजली आज लताईसाठी वहायलाच हवी.
श्रद्धांजली लताई!
नतमस्तक,
अतुल
मनःपूर्वक श्रद्धांजली __/\__
मनःपूर्वक श्रद्धांजली __/\__
दिदी आज आपल्याला सोडुन गेल्या
दिदी आज आपल्याला सोडुन गेल्या हे मनाला समजावणं अवघड आहे पण एक विचार मनात येतोय कि आज स्वर्गातली मैफिल किती छान असेल, खऱ्या अर्थाने स्वर्गीय ........
श्रद्धांजली आणि थँक यु लता दिदी आमची आयुष्य श्रीमंत केल्याबद्दल !
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
रहें ना रहें हम, महका करेंगे
रहें ना रहें हम, महका करेंगे
बन के कली, बन के सबा, बाग़े वफ़ा में...
मौसम कोई हो इस चमन में
रंग बनके रहेंगे इन फ़िज़ा में
चाहत की खुशबू, यूँ ही ज़ुल्फ़ों
से उड़ेगी, खिज़ायों या बहारें
यूँही झूमते, युहीँ झूमते और
खिलते रहेंगे, बन के कली बन के सबा बाग़ें वफ़ा में
रहें ना रहें हम...
काही लोकांबद्दल "ते नेहमी
काही लोकांबद्दल "ते नेहमी असतातच" असं काहीतरी वाटतं. त्यातल्या एक लताबाई. फार विचित्र वाटतय कालपासून.
भावपूर्ण श्रद्धांजली!
आता पुढे काही दिवस अनेक गाणी
आता पुढे काही दिवस अनेक गाणी मुद्दाम ऐकली जातील. काही रॅण्डम आठवणी. रंगा येई वो ये ची तान व एकूणच गाणे. यू ट्यूबवर जी क्लिप आहे त्यात बघितले तर लक्षात येते की ७-८ ओळींची छोटीशी रचना आहे ज्ञानेश्वरांची. पण चाल, संगीत आणि आवाज यातून एक स्वर्गीय गाणे उभे राहिले आहे. हे गाणे असो, रूणूझुणू रूणूझुणू रे भ्रमरा असो की पसायदान, किंवा तुकोबांचे अभंग. अनेक शतके प्रचलित आहेत. पण सुमारे १९५० पर्यंत लोकांनी ते या आवाजात ऐकले नाहीत. नंतरच्या पिढ्या किती प्रिव्हिलेज्ड आहेत!
हिंदीत संगीतकारानुसार तिचा आवाज वेगळा होउन भेटतो आपल्याला. बर्मन लोकांकडे "जा के पनघट पे बैठू मै, राधा दीवानी" एकदम थेट बंगालात घेउन जाते. किंवा "...जाने कहाँ छुप गया, नंदकिशोर". मदनमोहन कडे किंवा नौशाद कडच्या गाण्यात आपल्या शुद्ध तुपातील उर्दू उच्चारांपेक्षा एकदम वेगळे उच्चार ती करते हे जाणवते. शंकर जयकिशन कडे तोच आवाज एकदम रोमॅण्टिक होउन येतो, तर लक्ष्मी-प्यारे कडे पंजाबी ठसकेबाज. आनंद बक्षीचे नेहमीच्या सरधोपटपणाने लिहीलेले 'कोरा कागज था ये मन मेरा' संगीत व आवाजांनी अनेक लेव्हल्स वर उचलले. त्यात कडव्यातून मूळ ओळींवर वर येताना लताचे "मेरा" कोठे थांबते व कोठे बासरी सुरू होते आपण पकडू शकत नाही.
आज पूर्वीसारखे लोक दिवसभर टीव्हीला खिळून बसले होते! तिच्याविषयी बोलणारी प्रत्येक व्यक्ती नतमस्तक होउनच बोलत होती. राजकीय लोक असोत, कला क्षेत्रातील असोत किंवा नवे-जुने बॉलीवूड. Totally towering personality! They don't make them like that anymore.
विविधभारतीने भूले बिसरे गीत
विविधभारतीने भूले बिसरे गीत मध्ये लताची गाणी लावलीत. पहिल्या दोन गाण्यांत जाना, भूलना असेच शब्द आहेत. आपल्या भावना लताच्या शब्दांत.
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
आज लताची अनेक गाणी वेगळाच अर्थ घेऊन आलेली. मेरी आवाज ही पेहेचान है...
काही लोकांबद्दल "ते नेहमी
काही लोकांबद्दल "ते नेहमी असतातच" असं काहीतरी वाटतं. त्यातल्या एक लताबाई. <<< अगदी. कुठल्याही ठिकाणी जा वर बघितल्यावर आभाळ दिसतेच तसेच वाटते अशा लोकांबद्दल. एकाकी, परके वाटायचे कारण नाही.
फा, अगदी. बहुतेक गाण्यात त्यांनी एक स्वतंत्र, एकमेव असा माहोल, मूड उभा केला आहे.
त्यांचा आणि पं भिमसेन जोशींचा 'राम श्याम गुणगान' हा संच तर मला जगातल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक वाटतो. खळ्यांचे संगीत, आणि हे दोघे. एक उच्च निर्मिती. जितके जास्त ऐकावे तितके ते जास्त झिरपते.
1990 ते 93 साली मी वांद्रे
1990 ते 93 साली मी वांद्रे पश्चिम इथे रहायचो व माझा रूम पार्टनर जयवंत शिंदे म्हणून जे जे स्कुलचा विद्यार्थी होता. आणि सुरेश वाडकर जवळच रहायचे, ते आणि शिंदे चांगले मित्र होते. जयवंतने लता दीदींचे एक खूप सुंदर पोर्ट्रेट केले होते. एके दिवशी अचानक वाडकर आले आणि म्हणाले चला जरा बाहेर जाऊ, अन त्यांनी ते पेंटिंग घेऊन मी व शिंदे सह थेट प्रभू कुंज गाठले. तिथे घरी जाऊपर्यंत आम्हाला काही पत्ताच न्हवता की आम्ही कुठे चाललो आहोत. तिथे त्यांना ते पेंटिंग भेट दिले त्यावेळी दीदी यांची 15 20 मिनिटे प्रत्यक्षात भेट झाली. केवळ स्वर्गीय अनुभव होता तो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
जग गरीब झाले, श्रीमंत सूर गेला
सद्गती प्रार्थना _/\_
सद्गती प्रार्थना _/\_
घरातली आश्वासक वडीलधारी व्यक्ती गेल्यासारखे वाटते आहे.
_/\_ श्रद्धांजली.
_/\_ श्रद्धांजली.
कसं तरीच वाटतय, हे लिहीताना.
अजून अश्रू थांबत नाहीत
अजून अश्रू थांबत नाहीत
दीदींनी आमची आयुष्ये भावनाप्रधान केली
सुंदर लेख आणि त्यावरचे अनेक
सुंदर लेख आणि त्यावरचे अनेक सुंदर सुंदर प्रतिसाद.
७ फेब्रुवारी २०२२ रोजीची
७ फेब्रुवारी २०२२ रोजीची विविध वृत्तपत्रे पीडीएफमध्ये:
सकाळ:
https://drive.google.com/file/d/1ow0flQdNnmhZlmfU9RnWUyNcme4odQ0H/view?u...
महाराष्ट्र टाईम्स:
https://drive.google.com/file/d/1QIeZ3l2Jz4TcFxOmig8xkceuY9ulzSjg/view?u...
लोकमत:
https://drive.google.com/file/d/1Gf24D1Oo8HcUBQkn7VSESjz_fldIoJhB/view?u...
सामना:
https://drive.google.com/file/d/1l5a_Oz4VX3KdCF1qMAQ5TN9Yd7yfXH8E/view?u...
पुढारी:
https://drive.google.com/file/d/1NY3lUUM-m_ZJhHCocEVltn-fRy0wO2G3/view?u...
लोकसत्ता:
https://drive.google.com/file/d/1WA51BTiE20BE84HOByPsFWivnSC9x2qR/view?u...
Times Of India
https://drive.google.com/file/d/1yY_8cs6t5GDxdsPPj3_Fjt_0ULkfYh2b/view?u...
(शक्यतो डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर पहा)
एलकुंचवारांनी लिहिलेला हा
एलकुंचवारांनी लिहिलेला हा छोटेखानी लेख वाचनात आला:
>>>>
जी बातमी कानावर येईल म्हणून मन धास्तावलेले होते ती अखेर आलीच. काही काळ मी स्वस्थ बसून राहिलो आणि नंतर स्वत:ला कामात गुंतवून घेतले. अशात संपादकांचा फोन आला, ‘तुम्ही लताबाईंवर काही लिहा म्हणून.’ मी नाहीच म्हटले. कसे व काय लिहिणार? आपले आईबाप गेल्यावर आपण काही लिहू शकतो का? पोरकेपणाची सर्वव्यापी जाणीव आपल्याला घेरून असते. लताबाईंच्या जाण्याने आयुष्यात तिसऱ्यांदा आपले सगळे गेले अशी भावना क्षणाक्षणाला अधिक गडद होत गेली. भारतातल्या कोटय़वधी लोकांचे असे झाले असणार. आईवडील जातात तेव्हा अनाथपणाची जाणीव वैयक्तिक, आपल्यापुरती असते. महान कलावंत जातो तेव्हा मात्र ही जाणीव आसमंतभर पसरते व वैश्विक होते. सर्व माणसांना एकत्र बांधून ठेवणे न राजकारण्यांना जमत, न समाजसेवकांना, न शास्त्रज्ञांना. कलावंत मात्र ते सहज करून जातो. सर्व भारतीय (व त्यात पाकिस्तानमधलेही लोक आले!) एका सूत्राने एकमेकांशी लताबाईंच्या आवाजाने जसे बांधले गेलेले आहेत, तसे इतर कशानेही नाही. रामायण व महाभारत या दोन महाकाव्यांनी ते केले; पण त्यात फक्त हिंदूू एकमेकांशी जुळले राहिले. लताबाईंच्या आवाजाने मात्र हिंदूू, मुसलमान, ख्रिश्चन सगळे कायम एकत्र बांधून ठेवले. नाहीतर पाकिस्तानातल्या मुस्लिमांचे डोळे नुसते लताबाईंचे नाव घेतले तरी ओले होतात, हे झाले नसते. हा अनुभव मी प्रत्यक्ष पंधरा दिवस पाकिस्तानात होतो तेव्हा घेतलेला आहे. तिथले लोक एकामागोमागच्या निर्घृण राजवटींनी मनांनी मोडलेले व घायाळ झालेले. त्यांना बाईंच्या आवाजात विसावा मिळतो, भारताशी गळाभेट झाल्यासारखे वाटते. आपले सगळे हरवले, पण हा आवाज तर आपल्यासाठीच आहे असे त्यांना वाटते. दोन वैरी देशांना जोडणारा हा धागा तुटण्यासारखा नाही. तेवढे एक आशास्थान या दोन्ही देशांतल्या लोकांसाठी कायम जिवंत राहील.
लताबाईंचा उदय भारतीय इतिहासातल्या अत्यंत आनंदाच्या व तितक्याच कधीही भरून न येणाऱ्या व जिव्हारी जखम झाल्याच्या क्षणी झाला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले व भारत दुभंगला. हा रक्तलांछित आनंद मनवावा तरी कसा, अशा विव्हल मन:स्थितीत सर्व देश तेव्हा होता. माणसे मारली जात होती. जी जिवंत होती, त्यांचे लोंढेच्या लोंढे भारतात येत होते. विस्थापित, सर्वस्व गमावलेली माणसे शहरागावांमधून पसरू लागली होती. आणि ते जरा पचनी पडत नाही तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महात्मा गांधींची हत्या झाली. सर्व देश काळोखात बुडाला व आशांचे झरोके कायमचे बंद झाले असे वाटले.
हा काळ किती लोकांना आठवतो आता, ते मला माहीत नाही. पण मला आठवतो. तेव्हा मी सात वर्षांचाच होतो. पण वातावरणातली निराशा व विमनस्कता मला त्याही वयात स्पष्टपणे जाणवत होती. एकमेकांना धरून ठेवावे असे काही सापडत नव्हते. आणि अशात लताबाईंचा कोवळा, पण आश्वासक स्वर आसमंतात सूर्यप्रकाशाप्रमाणे पसरू लागला.
आताच्या व त्यांच्या आधीच्याही पिढय़ांना हे वर्णन अतिशयोक्त वाटेल. पण ते तसे नाही. तेव्हा गावे शांत असत. घरांमध्ये रेडिओ नसत. पण कुठेतरी बाईंचे गाणे कायम लागलेले असे व माणसे हातातले काम टाकून ते ऐकायला अंगणात येऊन उभी राहत. शांत होत. म्हटले तर ती गाणी फिल्मीच होती व अनेक वेळा त्यातले शब्दही उथळ असत. पण त्या शब्दांशी देणेघेणेच काय होते आमचे? एकतर हिंदी-उर्दू शब्द ते.. कळत कोणाला नसत. पण त्या शब्दांना व चालीला त्यांचे त्यांचे देणे देऊन उरत असे तो फक्त बाईंचा आवाज. सर्व आसमंत त्या आवाजाच्या प्रभेने उजळून जात असे. बाहेरचा व आतला पैस त्याने भरून जात असे. मने प्रकाशाने भरून जात. ‘हृदय आमार प्रकाश होलो, अनंत आकाशे’ असा प्रत्यय येई. तो आवाज संजीवक होता व बाई संजीवनी. आपले शांतवन होत आहे ते या आवाजामुळे अशी स्पष्ट जाणीव कोणाला होत नसे. सर्व काही होई ते नेणिवेच्या पातळीवरच. मलासुद्धा त्याचे स्वरूप बुद्धीने आता कळते आहे. पण त्या आवाजाने ओल्या जखमांवर फुंकर घातली जाई, हा तर माझाही अनुभव आहे. आणि हा अनुभव असा, की प्रत्येकाला तो स्वत:च्या खासगी वैयक्तिक पातळीवर येई व त्याचवेळी सामुदायिक पातळीवरही सर्वाना सर्वाचा होऊन येई. निष्कलंक, निरंजन अशा त्या आवाजाने अनंत अमूर्ततेचे पांघरुण सर्वाच्या मनांवर पडे.
सत्तेचाळीसच्या फाळणीच्या सुमारास लताबाई मुंबईत धडपडत होत्या. त्यावेळी चित्रपट व्यवसायात विस्थापितांची गर्दीच झालेली. भलेबुरे, सगळे नवे लोक तिथे आलेले. सर्वस्व गेल्यामुळे मूल्येही फाळणीच्या आगीत भस्म करून निर्मम झालेल्यांची तिथे गर्दी. कोण कोणाचे नाही. ‘डॉग इट्स डॉग’ असा माहौल. या भयकारक अरण्यात ही सोळा वर्षांची एकटी मुलगी किती प्राणपणाने झगडली असेल. काय पाहिले, भोगले नसेल तिने. कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. पण कुटुंबाच्या जबाबदारीची हिची जाणीव इतकी प्रबळ, की इथेही एकाग्रपणे काम करता करता ती सगळ्या भारताचा प्राणस्वर झाली.
मी लताबाईंचे गाणे प्रथम ऐकले तेव्हा साताठ वर्षांचाच होतो, आणि ते गाणे होते- ‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला’ हे त्यांचे भावगीत. हे १९४७ साल असेल. तो पण एक गमतीदार अनुभव आहे. बाईंनी आपली संगीताची अभिरुची कशी घडवली, त्यांच्याही नकळत, त्याची खूणच इथे पटते. आमच्या घरी संगीताचेच वातावरण होते. घरी फोनोग्राफही होता. पण वडिलांची सांगीतिक आवड कर्मठ होती. ते फक्त पक्के गाणे ऐकत व आम्हीही तेच ऐकले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. चित्रपट संगीत सोडाच, पण ठुमरी, दादरा असे उपशास्त्रीय संगीतही त्यांना चालत नसे. ते डेकेडण्ड आहे असे त्यांना वाटे. त्यामुळे ज्या रेकॉर्ड्स घरात होत्या त्या सगळ्या नामवंत ख्यालगायकांच्या. केसरबाई त्यात मूर्धन्यस्थानी. शिवाय ओंकारनाथ ठाकूर, वझेबुवा, फैयाज खाँ, अब्दुल करीम खाँ. सतत तेच कानी पडे. याला अपवाद फक्त बालगंधर्व व मास्टर दीनानाथ यांच्या नाटय़पदांच्या रेकॉर्ड्सचा. हे दोघे चालत. पण फक्त हे दोघेच. अशात एकदा माझा थोरला भाऊ नागपूरला शिकत होता. त्याने एका सुटीत लताबाईंच्या ‘तुज स्वप्नी पाहिले’ या गाण्याची रेकॉर्ड आणली. ती चोरून ऐकावी लागे. दादा घरात नसताना ती लावायची. एकदा असेच ते घरी नसताना आम्ही फोनोग्राफच्या भोवती कोंडाळे करून ही रेकॉर्ड ऐकत होतो. एकदा, दोनदा, तीनदा. अवीट गोडीचा स्वर्गीय आवाज. समाधान होईना. ‘अंजिरी पडदा महिवरी धरिला’ या ओळीत ‘पडदा’नंतर बाईंचा आवाज पडद्यासारखा कसा सळसळत खाली येतो याचे कौतुक भाऊ करीत होता. तेवढय़ात त्याने वळून पाहिले तर दारात दादा! आमचे तर होशच उडाले. प्रथमच दादा म्हणाले, ‘‘चालू दे.’’ ते गाणे पूर्ण ऐकल्यावर दादा म्हणाले, ‘‘कोण रे ही मुलगी?’’ भाऊ पुटपुटला, ‘‘लता मंगेशकर. मास्टर दीनानाथांची मुलगी.’’ वडील क्षणभराने म्हणाले, ‘‘तरीच!’’ मग थांबून पुन्हा म्हणाले, ‘‘हिच्या प्लेटी (रेकॉर्ड्सना ते ‘प्लेट’ म्हणत.) आणत जा.’’ आणि गेले आपल्या खोलीत. मग काय.. त्या एका क्षणात भिंतच ढासळली आणि घर मग पुढे लतामय होऊन गेले.
उपरोक्त भावगीत आता जवळजवळ कोणाला माहीतही नाही. त्यांची अनेक जुनी हिंदी व मराठी गाणी अलीकडच्या दोन पिढय़ांना माहीतच नाहीत. १९६० च्या आसपास विविध भारती आली. त्यावर वाजणारी गाणीच त्यांना माहीत आहेत. आणि विविध भारतीजवळचा संग्रह भिकार आहे. त्यांच्याजवळ १९४८ ते १९५४-५५ या काळातली गाणीच नाहीत. त्यांचे ज्ञान निवेदकांनाही नाही. मला फार हळहळ वाटते याची. १९४८ ते १९५५ या काळातले बाईंचे जे काम आहे, त्यांच्या आवाजाचा जो अनाघ्रात पोत त्यावेळच्या त्यांच्या आवाजाला आहे, तो नवीन पिढी हरवून बसली आहे. तिला तो माहीतही नाही. मी जीव तोडून त्यांना सांगतो, ‘‘अरे, तुम्ही ऐकलेच काय? ही ही गाणी ऐका म्हणजे परतत्वस्पर्श म्हणजे काय ते तुम्हाला कळेल. आईबापांसाठी झुरणाऱ्या एकाकी मुलांपासून ते आयुष्यातल्या आपदाविपदांनी मोडलेल्या माणसांपर्यंत सगळ्यांच्या जीवनावर सावली धरण्याची दैवी शक्ती या आवाजात कशी होती, ते तुम्हाला अनुभवता येईल.’’
गेली कित्येक वर्षे ‘महल’मधल्या ‘आयेगा आनेवाला’ या गीतापासून लताबाई प्रकाशात आल्या असे लिहिले, बोलले जाते. ते निखळ अडाणीपणाचे आहे व असे बोलणाऱ्यांना इतिहास माहीत नाही. बाई ‘प्रकाशात आल्या’ म्हणजे काय? सूर्य प्रकाशात येतो का? बाई आल्या, गायल्या आणि त्यांनी जग जिंकले, हेच खरे आहे. ‘आयेगा आनेवाला’ १९५०च्या आसपासचे. पण त्याआधीही ‘जिद्दी’मधले ‘चंदा रे जा रे जा रे’ (१९४८) हे गाणे, ‘बरसात’मधली त्यांची सगळी गाणी, ‘पतंगा’, ‘जादू’, ‘अंदाज’, ‘दुलारी’, ‘नगीना’, ‘बाजार’, ‘समाधी’ (सर्व १९४८ ते ५०च्या दरम्यान) या चित्रपटांमधली गाणी नाक्यानाक्यांवर, दिशादिशांमधून सतत दरवळत असत. त्यानंतर ‘झांजर’ व ‘घुंघरू’या सिनेमांतली गाणी. ही तर कोणाला माहीतच नाहीत. ‘काली काली रतियाँ’, ‘बदनाम हो रहा है, तेरे इश्क का फसाना’ ही ‘घुंघरू’मधली गाणी, ‘ऐ प्यार तेरी दुनिया से हम’ हे ‘झांजर’मधले गाणे, ‘उठाये जा उनके सितम’(‘अंदाज’), ‘दो दिन के लिए मेहमान यहाँ’ (‘बादल’), ‘वो पास आ रहे है’(‘समाधी’).. अशी किती गाणी अम्लान देवचाफ्यासारखी आहेत. आणि काय तो आवाज! एकाच वेळी नितळ मुलायम, पण त्याचवेळी त्याच्या फेकीतही अशी काही ताकद- लेझरबीमसारखा तो एकाग्र, शक्तिशाली आवाज. समोर शिळा धरली तर ती छिन्न होईल अशी ती ताकद. ‘बदनाम हो रहा है’ हे ‘घुंघरू’मधले गाणे एवढय़ासाठी ऐकावे. शिवाय मुख्य गाण्याआधी त्यांनी गायिलेले शेर. ‘सुरमई रात है, सितारे है’ हा ‘सुबह का इंतजार’ या गाण्याआधीचा शेर (‘जोरु का भाई’), ‘आयी थी रात जो तमन्ना लिए हुए’ हा ‘सितारों की महफिल सजी तुम न आये’ या गाण्याआधीचा शेर (‘उडनखटोला’), ‘जो मैं जानती प्रीत किए दुख होय’ हा ‘मुझे भूल गये सावरीया’ या गाण्याआधीचा शेर (‘बैजूबावरा’). त्यात काय आहे ते सांगता येऊ नये, सुगंधाचे वर्णन करायला शब्दच अपुरे पडावेत असे म्हटलेले हे शेर. मी तर एकेकदा शेर ऐकूनच तृप्त होतो, गाणे ऐकतच नाही पुढचे.. अशी त्यांची महत्ता. हे शेर जसेच्या तसे म्हणून दाखवणाऱ्या अनेक गायिका हल्ली आपण ऐकतो; पण प्रतिभेचे काय कराल? ‘झांजर’मधल्या ‘ऐ प्यार तेरी दुनिया से हम’च्या आधीचा शेर तर विद्धच करतो. काय पॉवर! ऐकल्यानंतर दिवसभर मौन होतो आपण.
आठवायला बसलो की बाईंची शंभर गाणी एकदम आठवतात. केवढे धन आपल्याला देऊन गेल्या या बाई! माझ्या बालपणापासूनच त्या माझ्याबरोबर आहेतच, पुढेही राहतील, माझ्यानंतरही राहतील, आणि माझ्याप्रमाणेच सर्व तृषार्तासाठी राहतील. तंत्रज्ञानाचे उपकार आहेत आपल्यावर ते एवढय़ासाठी. हा आवाज सर्वदा, सगळीकडे कायम असेल. त्याचे आपल्यावर छत्र असेल व अधिकारही. ‘स्वामी मी सदोदित, सहज मी सतत, सर्व मी सर्वगत, सर्वातीत मी’ या ओवीतच त्यांच्या गाण्याची थोरवी सांगता आली तर येईल.
संगीताचे हे एक आहे. ते तुमच्या जुन्या जखमा उकलते व त्याचवेळी त्या जखमांवर स्नेहसिंचन करते, त्या बऱ्याही करते. दु:खाच्याही लाख परी आहेत. माणसागणिक प्रत्येक दु:खाची प्रत, जात वेगळी. त्या सर्वाना लताबाईंच्या आवाजाचा आधार वाटतो. ज्या दु:खांना नाव देता येत नाही, ज्यांना वाचा नाही, ज्यांना ओळख नाही अशी सर्व दु:खे या आवाजाच्या कुशीत शिरतात.
मला फैजसाहिबांची एक गजल आठवते. त्यांनी वेगळ्या संदर्भात ती लिहिली. पण त्याहून व्यापक संदर्भ देऊन ती पाहता येते. सर्व दु:खे लताबाईंच्यापाशी ही प्रार्थना करीत असतात. ती गजल अशी..
‘मेरा दर्द नग्म्मा-ए-बेसदा
मेरी ज़ात ज़र्रा-ए-बेनिशाँ’
(माझं दु:ख म्हणजे नि:शब्द गाणं.
माझं जगणं क्षुद्र- ज्याला काही पडाव नाही.)
‘मेरे दर्द को जो ज़ुबाँ मिले
मुझे अपना नाम-ओ-निशाँ मिले’
(माझ्या दु:खाला स्वर मिळो. मला माझी ओळख मिळो. माझ्या दु:खाला नाव मिळो.)
‘मेरी ज़ात को जो निशाँ मिले
मुझे राज़-ए-नज्म्म-ए-जहाँ मिले’
(माझ्या जगण्याला दिशा मिळाली तर या जगाचं गूढ मला समजेल.)
‘मेरी खामुशी को बयाँ मिले
मुझे अपना नाम-ओ-निशाँ मिले’
(माझ्या मौनाला वाचा मिळो. मला माझा पडाव मिळो.)
‘मुझे क़ायनात की सर्वरी
मुझे दौलत-ए-दो जहाँ मिले’
(मला या सृष्टीचे ज्ञान मिळो.
मला दोन्ही जगातले ज्ञान मिळो.)
‘मेरा दर्द नग्म्मा-ए-बेसदा
मेरी ज़ात ज़र्रा-ए-बेनिशाँ’
यापेक्षा अधिक चांगले मला काही लिहिता येणार नाही. लताबाईंवर एक ललित लेख मी मौजेत लिहिला होता. त्यातला काही अंश या लेखाबरोबरच जोडत आहे. हा लेख काही मी त्यांना पाठवलाबिठवला नाही. माझी एवढी हिंमत नाही. माझ्या उभ्या आयुष्यात बाई व मी तीनदा अमोरासमोर आलो. कोणीतरी आमची ओळख करून दिली. तीनही वेळा माझी वाचा गेली होती व माझे डोळे त्यांचे पाय शोधत होते.
<<<
बाई, सुरेख लेख! इथे
बाई, सुरेख लेख! इथे दिल्याबद्दल धन्यवाद. यात आलेली अनेक गाणी ऐकलेलीही नाहीत. यानिमित्ताने ती माहीत झाली.
हो ना!इथे पहा, गजाभाऊ.
हो ना!
इथे पहा, गजाभाऊ.
सुंदर लेख!
सुंदर लेख!
मस्त लेख. इथे शेअर
मस्त लेख. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद स्वाती_आंबोळे!
एलकुंचवारांचा लेख
एलकुंचवारांचा लेख लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत आला होता.
त्यात त्यांनी शेवटी उल्लेख केलेला मौजसाठी लिहिलेला लेख
लोकसत्तेच्या पुरवण्यांतून
सुमन कल्याणपूर
अरुणा ढेरे
राज ठाकरे
मेधा पाटकर
सुंदर लेख आहे एलकुंचवारांचा.
सुंदर लेख आहे एलकुंचवारांचा. भरत यांनी दिलेले लेख आता वाचते.
सुंदर लेख आहे! यातली बरीच
सुंदर लेख आहे! यातली बरीच गाणी माहीत नाहीत. १९५० च्या आधीच्या गाण्यांचे वर्णन केले आहे त्या खजिन्यापर्यंत आपल्याला पोहोचायला - म्हणजे त्या आवाजाची महती आपल्यापर्यंत पोहोचायला किती गाणी ऐकावी लागतील कल्पना नाही. कारण ५० नंतरची गाणी "जुनी" म्हणून इतकी वर्षे ऐकली. लहानपणी रडकी व बोअर समजली गेलेली गाणी नंतर कधीतरी आरपार पोहोचू लागली. पण आधीच्या गाण्यांची प्रकृती एकदम वेगळी आहे. अजूनही मला तेव्हाची शंकर जयकिशनची लताची गाणी जितकी ऐकावीशी वाटतात तितकी नौशादची वाटत नाहीत. ती भारी आहेत हे समजते पण आपणच तिथपर्यंत पोहोचलेलो नसतो. आणि शंकर जयकिशनने तेव्हा गाणी "सोपी" केली असे वाचले आहे ते ही पटते. मला अगदी काही वर्षांपर्यंत मदन मोहनची तिची गाणी आवर्जून ऐकण्याइतकी आवडत नसत. मग मधेच कधीतरी ती क्लिक झाली, आणि मग त्यातील विशेष जागा कितीदा ऐकल्या तरी त्यातील जादू संपत नाही असे वाटते अशी अवस्था आली. हे आपल्याच डोक्यातील स्विचेस ऑन व्हावे लागतात असे वाटते.
त्यात शास्त्रीय संगीताचे ज्यांचे ज्ञान मर्यादित आहे किंवा फारसे नाहीच त्यांना ती जाणीव असे लेख वाचल्यावर होते. म्हणजे "केसरबाई त्यात मूर्धन्यस्थानी" हे संगीताच्या अर्थाने न समजता फक्त लेखातील एकूण संदर्भाने ज्यांना समजते अशा माझ्यासारख्यांना.
धन्यवाद स्वाती इथे दिल्याबद्दल.
भरत, अतुल - लिन्क्स बद्दल आभार. मी थोडेफार पेपर्स मधे वाचले आहेत. पण बरेच राहिले.
Pages