गानकोकिळेला श्रद्धांजली

Submitted by भरत. on 6 February, 2022 - 00:01

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.
एक सूर निमाला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लता मंगेशकर यांना निरामय दीर्घायुष्य लाभले. शेवटपर्यंत त्यांची तब्येत उत्तम होती. त्यांचे रसिकांच्या मनावरील अधिराज्य , साधेपणा - प्रचंड पुण्यसाठा, असण्याची ही लक्षणे - आम्हा अध्यात्मिक लोकांच्या मते.

आत्ताच वसंतपंचमी झाली आणि धरेवरती वसंत आला खरा, कोकीळाच उडुन गेली. दीदींच्या आत्म्यास उत्तम गती प्राप्त होवो.
विनम्र श्रद्धांजली!! _/\_

हे असं घडू शकतं याची कल्पना गेल्या काही दिवसांपासून मनात डोकावून जातच होती. पण तितक्याच त्वरेने ती झटकून टाकत होते. आज जेव्हा लतादीदी देहरूपाने आपल्यात नाहीत तेव्हा दुःख आणि अश्रूंच्या बरोबरीने एक भावना दाटून येते आहे ती म्हणजे कृतज्ञतेची! माझ्या सामान्य आयुष्यात लतादीदींचे स्वर्गीय स्वर नसते तर ते किती रिते राहीले असते. त्यांच्या सुरांनी अनेक क्षण अधिक श्रीमंत केले. हे न फिटणारे ऋण आहे.
परमेश्वर दिदींच्या आत्म्याला सद्गती देवो __/\__

संगीतातला एक चमत्कार संपला! अगणित सोनेरी क्षण जिच्या आवाजानं दिले त्या लताला भावपूर्ण श्रद्धांजली!!

खूप त्रासदायक बातमी....
भावपूर्ण श्रद्धांजली!
नाम गुम जायेगा......मेरी आवाज ही पेहचान हैं!

विनम्र श्रद्धांजली !

आपकी आवाज ही आपकी पहेचान है !

Thank you for making our life melodious . We are fortunate to hear you.

You will be remembered always.

कविवर्य बा. भ. बोरकर यांचे गीत, सलील कुलकर्णी यांचे संगीत. "क्षण अमृताचे" या अल्बमसाठी २०१३ साठी लता दिदींनी गायले होते...

आता विसाव्याचे क्षण
माझे सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत
त्याची ओढतो स्मरणी

काय सांगावे नवल
दूर रानीची पाखरे
ओल्या अंगणी नाचता
होती माझीच नातरे

कधी होती डोळे ओले
मन माणसाची तळी
माझे पैलातले हंस
डोल घेती त्याच्या जळी

कशी पांगल्या प्रेयसी
जुन्या विझवून चुली
आश्वासती येत्या जन्मी
होऊ तुमच्याच मुली

मणी ओढता ओढता
होती त्याचीच आसवे
दूर असाल तिथे हो
नांदतो मी तुम्हांसवें

परवाच रात्री पोरगी रंग दे बसंतीमधील लुकाछुपी गाणे ऐकत होती. तशी तिच्या वयाला आणि या जनरेशनला अनुसरून बरीच आचरट गाणी ऐकते. पण असे देखील काही आवडीने ऐकते तेव्हा बरे वाटते. तिला आवर्जून सांगितले हा आवाज लता मंगेशकर यांचा आहे. आणि तो जगातला सर्वोत्तम आहे. त्या गाण्याच्या वेळी त्यांचे वय ७८ आहे हे देखील गूगल करून सांगितले. म्हणजे तुझ्या आजीआजोबांपेक्षाही जास्त वयाची ती तेव्हा होती तरीही ईतका भारी आवाज. डीडीएलजे आणि दिल तो पागल है चित्रपटातील गाणीही तिच्या आवडीची. ती देखील लतादिदींनीच गायली आहेत हे सांगून ऐकून झाली. लता आशा ऊषा हृदयनाथ असा मंगेशकर फॅमिलीचा ईतिहास सांगून झाला. लेकीलाही नुकतेच गायनाच्या क्लासला टाकल्याने तिलाही एका गानकोकिळेबद्दल ऐकायला आवडले. आणि मग आज उठल्यावर तिला ही बातमी द्यावी लागणार.. Sad
पण एक मात्र खरे लतादिदी सर्व पिढ्यांना आनंद देणाऱ्या होत्या, आहेत आणि राहणार.. लेकीला लतादिदींबद्दल सांगताना मला त्या माझ्या पिढीच्या गायिका वाटत होत्या. अजून पंचवीस वर्षांनी माझी लेकही तिच्या लेकीला असेच कौतुकाने लतादिदींबद्दल सांगत असेल.. आणि आपण आपल्या बालपणी लतादिदींची गाणी ऐकली म्हणत असेल.. आणखी काय बोलावे, त्या खरेच अमर आहेत. त्यांना काय श्रद्धांजली द्यावी. त्या सदैव आपल्यासोबतच राहणार आहेत _/\_

20200727_214742.jpg
विनम्र श्रद्धांजली. 1997 साली दीदी डेक्कन क्वीन मधे भेटल्या होत्या त्यावेळी घेतलेली स्वाक्षरी. मर्मबंधातली ठेव.

मेरी आवाज ही पेहचान है
हे त्यानीच गायलेल्या एका गाण्यात यथार्थ पणे सांगितले आहे. त्यांच्या गाण्यांशी, त्या स्वर्गीय आवाजाशी आपण जोडले गेलेलो आहोतच. हाच दुर्मिळ ठेवा जपून पुढच्या पिढीलाही त्याची ओळख करून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
आपली फाटकी आयुष्ये भरजरी करण्यासाठी देवाने दिलेल्या या अलौकिक ठेवी. न मागता दिल्या, न सांगता काढून घेतल्या.
लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली (हे शब्द कधी टाईप करायला लागतील हे गेल्या काही दिवसात मेंदूला जाणवलेले असले तरी मनाला मान्य नाही, कदाचित लवकर होणार ही नाही).

अतिशय वाईट बातमी.
सुरांचा न संपणारा खजाना या युगास अमूल्य भेट रुपी देऊन, एक तेजस्वी तारा हरपला.

भावपूर्ण श्रध्दांजली.

स्तोत्रात इंद्रिये अवघी,गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

आमच्या प्रत्येक सुखाच्या आणि प्रत्येक दुःखाच्या क्षणी तुमच्या सुरांनी साथ दिली.. पुढेही देतीलच...तुमचा सूर अमर आहे....
श्रद्धांजली कशी द्यायची आणि कशाला द्यायची ?
You will be forever in heart....

Pages