Submitted by पिहू१४ on 10 February, 2022 - 02:47
माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे.आम्ही दोघी बोलत नाही,मन नाराजी आहे.तिच्यामुळे मला एकुलत्या एक भावाच्या लग्नाला जाता आलं नाही आणि माहेरी ही जाता येत नाही. तीची मुलगी , मुलगाही माझ्याशी बोलत नाही.
आईला वाटतं की मी लग्नाला यावं , काय करु काही कळतं नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्याच्या घरचे कार्य आहे,
ज्याच्या घरचे कार्य आहे, त्याने बोलावल्याशिवाय जाऊ नये.
संदर्भ दक्ष यज्ञ कथा
ऑफिशिअ ल आमं त्रण आल्या
ऑफिशिअ ल आमं त्रण आल्या शिवाय जाउ नका. वाटल्यास आई कडे आहेर देउन ठेवा. आपण चुकू नये.
आमच्या सासरे व दिरा मध्ये वितु श्ट आलेले होते. सांगलीकर बंदुक वाले दोघे. तर आमच्या लग्ना त सासर्यांनी मुद्दाम बोलवले नाही. लग्न पार पडले दीड वर्शात सासरे वारलेच. एक ही स़्ंधी हे सं बंध सुधारायची मिळाली नाही. सक्खा भाउ. फक्त फ्युनरल ला आला.
पुढे नणंदेच्या लग्नात सर्वांना आम्ही बोलवलेले.
२०२० मध्ये त्यांच्या घरी एक लग्न झाले त्यात मी सर्व मुलांना फार मजबूत ( माझ्या ऐप ती नुसार आहेर केले व तिथे जाउन चांगली वागले कार्यास शोभा दिली. दिरास आधार दिला. क्लोज केला इशू .
कधीतरी बहिणीस उपरति होईल पण तोपरेन्त तुमचा स्वाभिमान जपा. अपमान करायची संधी त्यांना देउ नका.
भावाच्या लग्नात जायला हवं
भावाच्या लग्नात जायला हवं होतं. तो तुमचाही भाऊ आहेच.
सेम केस माझ्या नातलगात झालेली, फरक इतकाच की धाकट्या बहिणीबरोबरच्या भांडणामुळे थोरली लग्नाला जात नव्हती. तेव्हा तिच्या सासूने तिला जबरदस्तीने पाठवलं होत लग्नाला , भावाच्या लग्नात नाही गेलीस तर आयुष्यभर सल राहून जाईल.
माहेरी सुद्धा बिनधास्त जात जा. तिचं माहेर आहे तसेच ते तुमचेही आहे.
बहिणीच्या मुलीच्या लग्नात मात्र बहिणीने बोलवल्याशिवाय जाऊ नये असे वाटते.
अमा +१
अमा +१
चैत्रगन्धा +१
चैत्रगन्धा +१
मलाही वाटलं होतं जावं लग्नाला
मलाही वाटलं होतं जावं लग्नाला तिनं आमंत्रण दिलं आहे तर पण इतके दिवस बोलत नव्हती आणि एका गावात राहणाऱ्या लहान बहीणी कडे आली माझ्या घरी नाही आली की कळवले नाही .मिस्टर म्हणतात तुला जर काही किंमत नसेल तर कशाला त्रास करून घ्यायचा भावाच्या लग्नानंतर मी खूप डिप्रेशन मधे गेले होते आता जरा
सावरले आहे . पुन्हा जर अपमान झाला तर मला खूप टेन्शन येईल
माझ्या मनात तिच्याविषयी अढी आहे तिच्या मुळे भावाच्या लग्नात जाता आलं नाही आणि माहेरी जाता येत नाही
आमंत्रण कसे दिले आहे? नुसतीच
आमंत्रण कसे दिले आहे? नुसतीच पत्रिका पाठवली आहे की घरी येऊन दिली/ फोनवरून आमंत्रण दिले तुमच्याशी बोलून?
तुमच्याशी बोलायला सुरुवात केली असेल तर तुम्ही मागं बघू नये असं वाटतं. हवं तर फक्त मुहुर्तावर जाऊन या.
नुसतीच तोंडदेखली पोस्टाने किंवा परहस्ते पत्रिका पाठवली असेल तर जाऊ नये. आपला मान आपणच राखावा.
चैत्रगंधा +१
घरातले वाद आहेत, आज ना उद्या
घरातले वाद आहेत, आज ना उद्या मिटतील. SOCIAL मीडिया किंवा तिसऱ्या माध्यमांपर्यंत नेणे चुकीचे वाटते. जे कांही योग्य अयोग्य असेल ते घरातल्या घरातच ठेवा. कधी कधी झाकली मुठ सव्वा लाखाची असते.
ऑफिशिअल आमंत्रण आल्याशिवाय
ऑफिशिअल आमंत्रण आल्याशिवाय जाउ नका. वाटल्यास आई कडे आहेर देउन ठेवा. आपण चुकू नये.>>>>> जोरदार +१.
तिच्यामुळे मला एकुलत्या एक भावाच्या लग्नाला जाता आलं नाही आणि माहेरी ही जाता येत नाही. तीची मुलगी , मुलगाही मा>>>>>>> हे काही कळले नाही.
तुम्हां दोघीत वितुष्ट आले आहे.पण माहेरी न जाण्याचा काय संबंध? तुमची भाची,भाचा तुमच्याशी बोलत नाहीत ते जाऊ दे.
देवकीतै लंबी कहाणी है तीनी
देवकीतै लंबी कहाणी है तीनी लावलेल्या आगीत मी अजुन होरपळतेय , त्याच्या लग्नाच्या वेळी घडलेल्या मान अपमान मुळे नवरा माहेरी जाऊ देत नाही . फोनवर सुध्दा तो नसेल तर बोलावं लागतं , त्याला माहित आहे मी बोलते ते . मधल्या मध्ये माझं सँडविच होतंय
जर तुमच्या बहिणीने फक्त जनरीत
जर तुमच्या बहिणीने फक्त जनरीत म्हणून आमंत्रण पत्रिका पाठवून दिली असेल तर तुम्हीसुद्धा लग्नाला न जाता जनरीत म्हणून आहेर पाठवून द्या.
बहिणीने एक पाऊल पुढे टाकून आमंत्रण पत्रिका घरी आणून दिली असेल तर तुम्ही लग्नाला जायला हवं असं मला वाटते.
वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकून नवदांपत्याला आशिर्वाद देऊन पाहिजे तर लगेच माघारी फिरा, पण लग्नाला जाण्याचे कर्तव्य पार पाडा कारण पुढे भविष्यात संबंध सुधारले तर लग्नाला न गेल्याची मनाला उगीच हुरहुर लागेल.
जर तुम्ही लग्नाला गेलात तर कुठलंही किल्मीष मनात न ठेवता, चेहर्यावर कुठलाही ताण न घेता बिनधास्त जा... जर मनात भीती असेल की, तिथे तुमचा अपमान होईल तर मग बिल्कुल जाऊ नका.
आणि माझ्याकडून एक प्रेमळ सल्ला.. भविष्यात जमल्यास कटू भूतकाळ विसरून बहिणीसोबत संबंध सुधारण्याकडे कल असू द्या.. जर समोरून जास्तच ताणलं जातंय् असं वाटतं असेल तर...' येईल त्याला घर आणि जाईल त्याला दरवाजा ' असं समजून सोडून द्यायला हरकत नाही.
तुमच्या पतीला तुमच्या माहेरची माणसं परकीच आहेत. त्यांना त्यांचा अपमान विसरणं कठीण जाऊ शकतं आणि त्यामुळे जर तुमच्या दोघांच्या नात्यात तुमच्या तिथे जाण्याने तणाव निर्माण होणार असेल, तुम्हांला मनस्ताप होणार असेल तर मग लग्नाला जाण्याचं टाळलेलंच बरं...!!
पिहू १४,
पिहू १४,
कहाणी इथे सांगूही नकोस.तू आणि तुझ्या माहेरचे जर एकमेकांशी बोलत असाल तर प्लीज नवर्याला सांग की ही पण माझी माणसं आहेत. मी त्यांच्याशी बोलणार किंवा त्यांना भेटणार.नवर्याला भेटायचे/बोलायचे नसेल तर नको बोलू दे.त्यांना तुझ्या माहेरची माणसे परकी वाटणार.त्यात फारसे गैर नाही.पण तू सुरुवात करावीस.चूक कोणाची असली तरी प्रत्येकाने जरा आपला अहंकार बाजूला ठेवावा.अर्थात स्वाभिमान राखूनच.
आयुष्य छोटे असते ग.राहून गेलेल्या गोष्टी नंतर खूप त्रास देतात.त्यावेळी आपण का पुढाकार घेतला नाही याचे वैषम्य वाटेल.बेस्ट लक!
देवकी +१११
देवकी +१११
आयुष्य छोटे असते ग.राहून गेलेल्या गोष्टी नंतर खूप त्रास देतात.त्यावेळी आपण का पुढाकार घेतला नाही याचे वैषम्य वाटेल >>> हे अगदी खरं आहे
लग्नाचे आमंत्रण आले आहे
लग्नाचे आमंत्रण आले आहे म्हणता तर जुने सगळे राग लोभ विसरुन जाउन या.
आपण लहान आहोत तर मोठ्यांना क्षमा करुन टाकायची. म्हणजे आपल्या मनात पण रुखरुख राहत नाही. कोणीतरी पुढाकार घ्यायलाच लागेल ना ? मग ताई साठी घेउन बघा तुम्हाला पण बरे वाटेल. शेवटी माणुस महत्वाचं ..आपले राग-लोभ नव्हेत. कितीही झालं तरी ती मोठी बहीण आहे.
तिच्या जुन्या चुका असतील हे खरयं पण चांगल्या गोष्टी पण असतीलच ना... त्या आठवा आणि चुका सोडुन द्या...
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे....आई ची ईच्छा असेल तर जरुर जा.
आई आहे तोवर तिच्या शक्य असतील त्या सगळ्या ईच्छा पूर्ण कराव्यात... नंतर कितीही डोकं आपटलं तरी आई परत मिळत नाही...
खुप थँक्यू सर्वांना, मन आणि
खुप थँक्यू सर्वांना, मन आणि मेंदू कोणाचे ऐकावं तेच कळत नव्हते. आई वडिलांची इच्छा आणि गेलेले क्षण परत येत नाही याचा अनुभव आहे नंतर पस्तावा करून उपयोग नाही म्हणून जाईल लग्नाला. अक्षता टाकून लगेच परत येईल पण मनात रुखरुख लागून राहणार नाही नंतर.
कशाला राग ठेवायचा मनात. आज
कशाला राग ठेवायचा मनात. आज आहोत तर उद्या नाही, दिवस झरझर सरतात. मस्त लग्नाला जाऊन हळदीच्या दिवशी नाचायचं, मटनावर ताव मारायचा आणि एन्जॉय करून यायचं. एन्जॉय करायच्या गोष्टी असतात त्यात इगो मध्ये आणून आयुष्याची वाट लावू नये हे माझं मत आहे. हा पण तुम्हाला अजूनही वाटत असेल की बहीण परत अपमान करेल तर नका जाऊ.
बहीण आह, घेइल समजून. तुम्ही
बहीण आह, घेइल समजून. तुम्ही मन मोठं करा व जा. मात्र तिच्याशी बोला व रुडली (उद्धट) नव्हे पण फर्मली (कणखरपणे) काय ते बजावल्याशिवाय येउ नका.
मनात रुखरुख लागून राहणार नाही
मनात रुखरुख लागून राहणार नाही नंतर........ गुड!
बडा वही बनेगा जो इग्नोर करेगा
बडा वही बनेगा जो इग्नोर करेगा... जा बिंदास...
माझ्या मते, जमल्यास आधी बोला
माझ्या मते, जमल्यास आधी बोला ना बहिणीशी. ‘मला यायचंय तुला चालेल का’ असे काहीतरी. म्हणजे बहिणीला पण समाधान की धाकटी मान देते. व तुम्हालाही मनात ताण नसेल की तिथे काय होईल.
जर लग्नाचे बोलावणे असेल तर
जर लग्नाचे बोलावणे असेल तर तुमच्या मिस्टरांशी बोला आणि जरूर जा असे वाटते. तुमच्या बहिणीने औपचारिक का होईना बोलावणे करून एक पाऊल उचलले आहे. कदाचित तिनेही आईचे मन राखण्यासाठी केले असेल. तुम्ही गेलात तर तुम्ही देखील आईचे मन राखलं असं होईल. आपली मुलं एकमेकांना विचारीत नाहीत ही कोणत्याही आईसाठी दुःखदायीच बाब आहे. This will certainly make her feel better! शिवाय त्या निमित्ताने तुमची इतरही माहेरच्या नातेवाईकांशी भेट होईल. This might break the ice.
आयुष्य छोटे असते ग.राहून
आयुष्य छोटे असते ग.राहून गेलेल्या गोष्टी नंतर खूप त्रास देतात.त्यावेळी आपण का पुढाकार घेतला नाही याचे वैषम्य वाटेल >>> +++
+
क्षमा करुन टाकायची. ===> म्हणजे आपल्या मनात पण रुखरुख राहत नाही.
लग्न, ही आयुष्यात घडणारी एक अत्यंत महत्वची घटना , त्यामूळे जवळाच्या नातेवाईकाच्या लग्नातील अनुपस्थीती त्या व्यक्ती बरोबर आपल्यालाही नंतर त्रास देते , व ईतर नातेवाईक देखील बोलून दाखवतात. ( मी देखील अशी चुक केली , अन आता विषय निघाला की त्रास होतो.)
अनेकदा नात्यातील " दुरावा" खूप अनावश्यक मोठा होतो व त्या व्यक्ती बरोबर अनुभवलेले सुंदर,सुखद क्षण झाकोळले जातत !!
प्रत्येक घरात असा एक सीन
प्रत्येक घरात असा एक सीन असतोच
जे तुमच्या मनाला योग्य वाटेल ते करा. जो तुमचा मूळ स्वभाव आहे त्यानुसार वागा. ईथला कोणाचाही सल्ला ऐकू नका. तसेच एकदा मनाने जो निर्णय घ्याल त्यानुसार वागल्यावर आलेली चांगली वाईट मते ऐकू नका. कारण अश्या केसेसमध्ये योग्य-अयोग्य, चूक-बरोबर असे काही नसते. फक्त तुम्ही जे वागाल ते तुम्हाला शांती समाधान मिळवून देणारे असावे. ते देखील आजच्या घडीला. आज अमुकतमुक वागलो तर पुढे मागे पश्चाताप होईल वा अपराधी वाटेल वगैरे भविष्यातील विचार बिलकुल करू नका.
जायचे नसेल तर नका जाऊ. कोणी तुम्हाला दोष देणार नाही.
जायचे असेल खुशाल जा. अपमान, आत्मसन्मान वगैरे आपल्या मानन्या न मानन्यावरच ठरतात. आपण समोरच्याला महत्वच दिले नाही तर तो आपला अपमान करूच शकत नाही.
Exactly रुन्मेष बरोबर आहे,आणि
Exactly रुन्मेष बरोबर आहे,आणि एकदा संबंध सुधारले की पुन्हा त्या वेळेचा विषय काढुच नये,रुखरुख राहण्याचा काय संबंध ?तेव्हाचे वागणे तेव्हाच्या संबंधावर अवलंबून असणार,
माझ्या नवऱ्या च्या आणि दिराच्या मध्ये पण असे वितुष्ट आले होते, अगदी आम्हाला बाळ झाले तरी ते बघायला सुद्धा आले नाहीत,त्यांच्या घराच्या पूजेच्या वेळी आम्ही नाही गेलो
पण आता संबंध चांगले झाले आहेत, तेव्हाच्या म्हणजे वितुष्ट च्या वेळचा विषय आम्ही कोणीही चुकून सुद्धा काढत नाही
आणि जे झालं ते त्या त्या वेळच्या परिस्थिती वर अवलंबून होतं हे समजून घेतलं आहे