चवीनुसार मीठ

Submitted by क्षितिज on 8 February, 2022 - 11:19

कुठलीही पाककृती असो, त्यात जर मीठ योग्य प्रमाणात असेल तरच ती पाककृती स्वादिष्ट लागते.

आपण Online recipes ची मदत घेतो. त्यात बऱ्याच वेळा 'चवीनुसार मीठ टाका' असे mention केलेले असते.
तर हे चवीनुसार मीठ म्हणजे मिठाचे प्रमाण कसे ठरवावे?


काही पदार्थामध्ये आपल्याला प्रमाण माहित असते कि समजा १ वाटी तांदूळ असतील तर पाऊण चमचा मीठ लागेल.
पण काही पदार्थामध्ये मिठाचे प्रमाण कसे ठरवावे कळत नाही. त्यात पातळ पदार्थामध्ये correction करण्याची मुभा असते. पण काही solid पदार्थामध्ये तसे करण्याचा scope नसतो.

तर आपण सर्व मिठाचा अंदाज कसा घेता? हे जाणून घ्यायला आवडेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभ रात्री.

ऑफरिंग व्हर्जिन असण्यापेक्षा आपल्या मनावर कन्ट्रोल ठेवायचा एक एक्सरसाइज असं मला वाटतं त्याबद्दल.
असो, मिठाला फारच फाटे फुटले. Happy

पदार्थ पाहूनच मीठ जास्त आहे कि कमी, आहे कि नाही हे कळते.
चितळेंच्या पेढ्यात एक कण मीठ नसते. बीपी वाल्यांना असेच अळणी पेढे देतात.

ज्या पाकात मीठाच्या सारणाचे रसगुल्ले उकळलेत त्यात दहीवड्याचे वडे टाकावेत (आम्ही काहीच वाया जाऊ देत नाही)

आता मी तर चहात (इथे भारतीय पद्धतीचा पातळ बासुंदीत चहा पावडर घालुन केलेला चहा अपेक्षित ) पण अर्धा चिमुट मीठ घालते/तो असं लिहा बघु कोणीतरी.

पातळ बासुंदीचा चहा म्हटला की आमचा बालगेंडा शेपूट हालवत गोंडा घोळवत येतो वासाने. त्याला दिल्याशिवाय सोडतच नाही.

चहात मीठ घालायची गरज नाही.. काही गाईंचं दूध जरा चवीला खारट असतं.. अशा दूधाचा चहा प्यायला नसाल तुम्ही

<<काही गाईंचं दूध जरा चवीला खारट असतं>> एखाद्या पदार्थात मीठ जास्त पडलं की तो गाईला खायला देत असावेत, म्हणुन असं होत असेल.
गाईचे बीपी वाढू शकते. असं करू नये.

आटणे आणि पातळ होणे हे फक्त मायेच्याच बाबतीत समानार्थी शब्द आहेत.
डाॅक्टरांना अपचनाबद्दल सांगताना गोंधळ करु नका.. Rofl

आज आजीलाच हा प्रश्न विचारला. तिने म्हटले पदार्थाचा एक घास ऊचलावा आणि घरातल्या सर्वात सुंदर व्यक्तीच्या डोक्यावरून फिरवून तापल्या तव्यावर टाकावा. जितके मीठ कमी तितका धूर जास्त. याऊलट खारट असेल तर तडतड आवाज निघतो. थोडा श्रद्धेचा भाग असेलही. पण थोडे सायन्सही आहेच.

एखाद्या पदार्थात मीठ जास्त पडलं की तो गाईला खायला देत असावेत, म्हणुन असं होत असेल.
गाईचे बीपी वाढू शकते. असं करू नये.>>> त्यासाठीच तर मीठाचा अंदाज येणे गरजेचं आहे

अरे बापरे हे बदाम बदाम फार डोक्याला शॉट आहे. नक्की कश्यातले गाणे आहे हे. पोरगी आणि तिच्या मैत्रीणी बदाम बदाम करायच्या म्हणून सजग पालकाच्या भुमिकेत शिरून चेक केले तर खाऱ्या काजूत खवट शेंगदाणा यावे असे झाले. दुसऱ्याच मिनिटाला तोडातून बाहेर काढला. आताही का क्लिकले असे झाले Sad

गफ्रे गेली ते डायरेक्ट मीठपुराणात आज्जीच आली.
>>>
आज्जी प्लॅंचेट केल्यावर येते. पण रात्रीला एकच प्रश्न. हा ज्वलंत झाला म्हणून विचारले.

इतका विचार का करता? कमी टाकणे कधीही सुरक्षित. कमी पडलं तर मीठ नंतर घालता येतं. पण जास्त झालं तर काढता येत नाही. पातळ असो वा सोलिड. (असा आहे का कोणता पदार्थ ज्यात नंतर मीठ नाही टाकता येत)

मागे कुठेतरी (बहुधा मायबोलीवरच) वाचलेले की मीठ आणि साखर हे शरीरासाठी विष म्हणजे स्लो पॉयजनच असते. आहारात शक्य तितके टाळावे. फळांसोबत तर बिलकुल खाऊ नये. तेव्हापासून मी काकडी, कलिंगडाला मीठ आणि अननस, टरबूजाला साखर लावून खाणे सोडले. फक्त आजारपणात तोंडाला चव नसते तेव्हा सफरचंदाला मीठ मीरपूड लाऊन खातो.

मीठ घातलंय हे विसरून परत मीठ घातलं आणि पदार्थ खारट झाला. असं वर्षातून किती वेळा होणं नॉर्मल आहे असं समजावं?

आता मी तर चहात (इथे भारतीय पद्धतीचा पातळ बासुंदीत चहा पावडर घालुन केलेला चहा अपेक्षित ) पण अर्धा चिमुट मीठ घालते/तो असं लिहा बघु कोणीतरी. >>>

मानव, खोकला, घसा खवखवणे यावर एक सोपा उपाय म्हणजे आपल्या नेहमीच्या चहात चिमूटभर मीठ घालून तो चहा घशात गरमागरम जाईल असा पीणे. ताबडतोब आराम मिळतो. अनेकदा केलेला उपाय आहे.

काश्मिरमधे गुलाबी चहा बनवतात आणि त्यात साखरे ऐवजी मीठ घालतात.. मलाही हलकासा खारट चहा आवडतो म्हणून चहा बरोबर मोनॅको बिस्कीट खायला आवडतात

मला मामीची का इतर कुणाची तरी (का जीएंची आहे?) वासावरुन नजिकच्या भविष्यात मृत्यू प्रेडिक्ट करणारी कथा आठवली. >>> अमितव, हो माझीच कथा होती. माझं आणि जीएंचं नाव एका वाक्यात लिहिण्याआधी त्यांच्या भावनांचा जरा विचार करायला हवा होतास रे.

असो. आता तू आठवण काढलीस म्हणून दिवाळी अंकात शोधायला गेले तर २०१४ नंतरचे दिवाळी अंकच दिसत नाहीयेत.

गाई आणि मीठ वाचून एक जपानी शो आठवला. तिथे म्हणे काही कोंबड्यांना खाण्यामध्ये थोडे तिखट पण देतात म्हणजे अंड्यांमधील बलक थोडा केशरी आणि वेगळ्या चवीचा होतो.

आताही का क्लिकले असे झाले >>>> आत्ता ही कमेण्ट वाचून पुन्हा धावत जाऊन उरलेला पूर्ण व्हिडीओ पाहिला. हार्ट अ‍ॅटॅक येईल असले काही लिहू नका ओ सर.

अतुल, काही पदार्थ बनवताना, सुरवातीचे काही घटक शिजवायला घेतले की त्यात मीठ घालतात. मीठाने पाणी सुटते, ते आटवून घेणे किंवा त्याचाच शिजवायला वापर करून घेणे वगैरे साठी. मग इतर घटक घातले, पदार्थ तयार झाला मी उर्वरीत मीठ घालतात. अशा पाकृ मध्ये शेवटी मीठ घालायला सांगताना आधी आपण मीठ घातले आहे याची आठवणही करुन दिलेली असते.

अशा पदार्थांसाठी सगळं मीठ नंतर घातलेले चालत नसावे, तशी चव / टेक्स्चर त्याने येत नसावे.

वरती वास आणि ज्ञानेंद्रियांची कमी अधिक शक्ती यावर चर्चा झालीय, ती वाचून आठवलं,, माझ्या एका मैत्रिणीला कसलाही वास / गंध समजत नाही. Anosmia म्हणतात त्याला.
आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा अशी एक मुलगी होती.

Pages